आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये तेजी – दांडीयावाली कां सांताक्लाजवाली – ११ डिसेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केटमध्ये तेजी – दांडीयावाली कां सांताक्लाजवाली – ११ डिसेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७

शुक्रवारी मार्केटचा मूड एकदम बदलला. मार्केटमध्ये तेजी आली. करन्सी मार्केटची सुरुवात दमदार झाली. रुपयाचा US$ बरोबरचा विनिमय दर ०.१९ नी सुधारला. गुरुवारी आलेल्या एक्झिट पोलचा हा परिणाम असावा असे दिसते. या पोलप्रमाणे गुजरात BJP स्वतःकडे राखील तर हिमाचल प्रदेशमध्ये BJP ला बहुमत मिळेल. कोणतीही नवी गोष्ट करायला घेतली की काही चुका होतातच, काही नुकसान होते, काही लोकांना विनाकारण त्रास होतो पण उद्देश चांगला असेल तर जनता हा त्रास सहन करायला तयार असते. GST आणी डीमॉनेटायझेशन याचा त्रास गुजरातमधील लोकांना खूप झाला. परंतु GST मध्ये ज्या अडचणी आल्या त्या सोडविण्याची तयारी सरकारने दाखवली एवढेच नव्हे तर त्यापैकी काही अडचणी दूरही केल्या. याचा सकारात्मक परिणाम मतदानावर झाला असे एक्झिट पोलने दाखवले आणी मार्केटने तेजीची सलामी दिली. मतदार राजाही सुज्ञ झाला आहे आणी मार्केटही सुज्ञ झाले आहे हे जाणवते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • मंगळवार १२ डिसेंबर २०१७ पासून अचानक क्रूडचे दर वाढू लागले. त्यामुळे एक्सप्लोरेशन कंपन्यांवर परिणाम होईल. ONGC ऑईल इंडिया, रिलायंस. सरकारने ज्यांच्याजवळ ऑईल ब्लॉक्स आहेत त्यांनी शेल GAS शोधावा असे सुचवले आहे. क्रूड आणी डीझेलची मागणी वाढत आहे.
 • एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताच्या या फिस्कल वर्षीचा ग्रोथरेट ६.७% एवढा केला तर २०१९ या फिस्कल वर्षासाठी ७.३ % केला.
 • US फेडरल रिझर्वने १३ डिसेम्बर २०१७ पासून आपले रेट ०.२५% ने वाढवले. तसेच आपण २०१८ आणी २०१९ मध्ये प्रत्येकी तीन वेळा रेट वाढवू असे जाहीर केले.
 • बँक ऑफ इंग्लंड ने आपल्या प्रमुख व्याज दरात (०.५० %) कोणताही बदल केला नाही

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने पुन्हा १८०० शेल कंपन्यांची यादी तपासणी करण्यासाठी एजन्सीजकडे सोपवली.
 • सरकारने सर्व बँक खाती आणी इतर गुंतवणूक आधार बरोबर लिंक करण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली. मात्र आपला मोबाईल नंबर आधार बरोबर लिंक करण्याची तारीख कायम ठेवली. यावर गुरुवारी तारीख १४ डिसेंबर २०१७ला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले.
 • सरकारने सिमेंट कंपन्याना पेट कोक वापरण्यासाठी बंदी घातली होती. ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली. पेट कोकचा वापर करण्याऐवजी कोळशाचा उपयोग केला तर पॉवरखर्चात २५% वाढ झाली असती. यामुळे सिमेंट सेक्टर तेजीत होता. उदा प्रिझम, JK लक्ष्मी, अल्ट्राटेक, ग्रासीम, ककातीया, आंध्र, अंबुजा,श्री सिमेंट ACC, हैडलबर्ग.
 • LNG ला कमर्शियल फ्युएल चा दर्जा मिळेल असे वाटते. दुचाकी वाहने LNG वर चालवावीत असा विचार चालू आहे.
 • सरकारने चर्मउद्योगाला Rs २६०० कोटींचे PACKAGE मंजूर केले. याचा परिणाम त्या सेक्टर च्या शेअर्स वर होईल – खादीम’S, बाटा, लिबर्टी, मिर्झा
 • १५% मेथेनॉल ब्लेंडीगला परवानगी देण्यासाठी या अंदाजपत्रकांत नोटिफिकेशन आणण्याची शक्यता आहे. RCFचा मेथेनॉल बनवण्याचा कारखाना बंद पडला आहे. दीपक फरटीलायझर मेथेनोल बनवते.
 • मोबाईल फोनवर कस्टम ड्युटी ५% ने वाढवली. BPL आणी डिक्सन टेक्नोलॉजीला तसेच रेडिंगटनवर परिणाम होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने ज्या सरकारी कंपन्यात ५% पब्लिक शेअरहोल्डिंग आहे त्या कंपन्यात सरकारला डायव्हेस्टमेंट सूरु करायला सांगितले.
 • कॉर्पोरेट गव्हरनन्ससाठी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींवर विचार चालू आहे.
 • ‘WHATAPP’ वर काही कंपन्यांचे तिमाही निकाल उपलब्ध कसे झाले याबाबत कंपनी बरोबर चौकशी चालू आहे.
 • IPO साठी दिलेली समय सीमा कमी करण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
 • युनिटेकचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तहकूब करून त्याजागी सरकारने नेमलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमण्यासाठी दिलेल्या NCLT च्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
 • CCI(COMPETITION COMMISSION ऑफ INDIA) या सरकारी संस्थेने ABBOTT LAB, नोवार्तीस, EMCURE फार्मा आणी USV या फार्मा कंपन्यांना मधुमेहाच्या औषधांच्या प्राईसफिक्सिंगसाठी नोटीस दिली.
 • RBI ने कॉर्पोरेशन बँकेला PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) च्या तरतुदी लागू केल्या. कॉर्पोरेशन बँक ही PCA खाली येणारी ८ वी बँक आहे.
 • सुप्रीम कोर्टाने कर्नाटक राज्यात आयर्न ओअर काढण्याची सीमा 3० मेट्रिक टन वरून ३५ मेट्रीक टन केली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • नोव्हेंबर २०१७ मध्ये CPI ४.८८% (ऑक्टोबरमध्ये ३.५८%) वाढले. ही १५ महिन्यातील कमाल वाढ आहे.
 • IIP ऑक्टोबर मध्ये २.२% ने (सप्टेंबरमध्ये ४.१%) वाढली. यात कॅपिटल गुड्स, FMCG उत्पादनात आणी INFRASTRUCTURE क्षेत्रात वाढ झाली.
 • WPI (घाऊक महागाई निर्देशांक) नोव्हेंबर २०१७ मध्ये ३.९३% होता. हा गेल्या ८ महिन्यातील कमाल स्तरावर आहे. अन्नधान्य भाजीपाला यांच्या किंमती वाढल्या.
 • सोमवार १८ डिसेंबर पासून सिप्ला आणी ल्युपिन हे सेन्सेक्स मधून बाहेर पडतील तर इंडस इंड बँक येस बँक सेन्सेक्स मध्ये सामील होतील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • DR रेड्डी’जच्या आंध्र प्रदेशामधील बाचुपल्ली युनिटची तपासणी एप्रिलमध्ये झाली होती USFDA कडून या युनिटला EIR मिळाला.
 • एशियन पेंट्सने मोड्युलर किचन बनवणाऱ्या ‘SLICK’ या कंपनीमध्ये स्टेक घेतला. या कंपनीचे हे डायव्हरसिफिकेशन आहे.
 • स्टेट बँक ऑफ इडियाने आपले Rs १३२६ कोटींचे ११ NPA विकण्यासाठी बोली मागवली.
 • २०१८ या वर्षात सुट्या अशा तर्हेने आल्या आहेत की ‘लॉंग वीक एंड’ भरपूर आले आहेत हे हॉटेल इंडस्ट्री पर्यटन उद्योग यांच्यावर चांगला परिणाम करतील. रुपया जर असाच वधारत राहला तर परदेश वारीची सुसंधी.
 • टाटा केमिकल्स फॉस्फेटिक फरटीलायझर बिझिनेस विकण्यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी घेईल.
 • भारती एअरटेलने लडाखमध्ये 4G सर्विस सुरु केली.
 • IDBI ने NEGIL मधील ३०% स्टेक म्हणजे १.२ कोटी शेअर्स विकेल.
 • भेल इंडोनेशियात ५४ MV चा पॉवर प्लांट लावणार.
 • पुंज लॉइड या कंपनीला GAIL आणी NHAI कडून Rs १४५० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
 • GODFREY फिलिप्स या कंपनीने आपल्या मार्लबरो, रेड & व्हाईट, कॅवेंडर या सिगारेट BRAND ची किंमत ७% ट८% ने वाढवली.
 • ल्युपिनच्या (बर्थ कंट्रोलच्या औषधाला) ‘SALYRAL’ला USFDA ने मंजुरी दिली.
 • आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात माल पुरवण्यासाठी पराग मिल्कप्रोडक्टने ताजग्रूप बरोबर करार केला
 • थायरोकेअर, युकल फ्युएल, अटलांटा याचे तिमाही निकाल चांगले आले.
 • इन्फोसिसने सेबीकडे पनाया आणी CFO ला दिलेल्या SEVARANCE PACKAGE बाबत प्रकरण मिटवण्यासाठी अर्ज केला होता. पण NSE आणी इफोसीस यात फरक करू नये. तसेच मागील दरवाजाने कोणतेही सेटलमेंट करणे योग्य नाही असे कळवले आहे.
 • भेलला तामिळनाडू राज्य सरकारकडून १३२० MW प्रोजेक्टकरता Rs ७३०० कोटींची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • टाटा कम्युनिकेशन या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने ७७३ एकर अतिरिक्त जमीन हेमिस्फींअर प्रॉपर्टीज इंडिया या कंपनीला ट्रान्स्फर करण्यास मंजुरी दिली. ही कंपनी टाटा कम्युनिकेशनच्या शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणात आपले शेअर्स देईल. या जमीनीची किंमत Rs १०००० ते Rs १५००० कोटी दरम्यान असेल. ही जमीन विकल्यावर जो पैसा येईल त्या पैशातून टाटा कम्युनिकेशन आपल्याला स्पेशल लाभांश देईल अशी शेअरहोल्डर्सची अपेक्षा आहे. या सर्व व्यवहारासाठी सेबी, NCLT ची मंजुरी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास ५ ते ६ महिने लागतील.
 • शालीमार पेंट्स राईट्स इशू आणणार आहे.

या आठवड्यातील IPO OFS QIP

 • इंटरग्लोब एव्हिएशन Rs ११३० प्रती शेअर्स या भावाने OFS आणत आहे.
 • युनियन बँक प्रती शेअर Rs १५४.६५, नात्को फार्मा प्रती शेअर Rs ९३७.६३, PNB प्रती शेअर Rs १७६.३५, NCL इंडस्ट्रीज Rs २३७.५० प्रती शेअर या भावाने QIP आणत आहेत.
 • सिंडीकेट बँकेने प्रती शेअर Rs ८४.१५ प्रती शेअर या भावाने QIP द्वारा Rs ११५१ कोटी उभारले.
 • या आठवड्यात ASTRON पेपर या कंपनीचा IPO १५ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान ओपन राहील. प्राईस BAND Rs ४५ ते Rs ५० आहे मिनिमम लॉट २८० शेअर्सचा आहे. कंपनी या IPO द्वारा Rs ७० कोटी भांडवल उभारेल. ही कंपनी PACKING इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणारा क्राफ्ट पेपर बनवते. कंपनीने गेल्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे. IPO प्रोसीड्सचा उपयोग अंशतः उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणी कर्जफेडीसाठी केला जाईल
 • IRDAने NATIONAL इन्शुरन्स कंपनीच्या IPO ला मंजुरी दिली.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • SHALBY हॉस्पिटलचे लिस्टिंग Rs २३९ आणी Rs २३७ ला अनुक्रमे NSE आणी BSE वर झाले.
 • फ्युचर चेन सप्लाय या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग सोमवार १८ डिसेंबर २०१७ रोजी होईल.

मार्केटने काय शिकवले

मार्केट जेव्हा अशा स्तरावर पोहोचते की ट्रेडर्सना आपल्याला होणार्या नुकसानीच्या भीतीपेक्षा होणाऱ्या फायद्याची शक्यता जास्त वाटते तेथे ट्रेडर्स खरेदी करायला सुरुवात करतात. येथे मार्केट्चा किमानस्तर म्हणजे बॉटम तयार होतो.

कोणता शेअर वाढणार किंवा कोणता शेअर पडणार हे समजले नाही तरी चालेल पण या तेजीत आपण आपले जे शेअर्स फायद्यात असतील ते विकून फायदा घरी आणावा. कोणता शेअर वाढणार किंवा कोणता शेअर पडणार हे समजत नसेल पण वातावरण तेजीचे आहे किंवा मंदीचे आहे हे जाणवत असेल तर त्यानुसार निफ्टीमध्ये खरेदी विक्री करावी.

सोमवारी संध्याकाळपर्यंत गुजराथ विधानसभेचे निकाल येऊन गुजरात विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल. BJP ला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मार्केट निराश होईल आणी जर १२० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मार्केट खूष होईल आणी तेजीची घोडदौड सुरु राहील. पण आयकराची मर्यादा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बँकांचे रीकॅपिटलायझेशन, या गोष्टी प्रमुख असतील. बघु या १८ तारीख काय दृश्य दाखवते!

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३४६३ NSE निर्देशांक निफ्टी १०३३३ तर बँक निफ्टी २५४४० वर बंद झाले

Advertisements

One thought on “आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये तेजी – दांडीयावाली कां सांताक्लाजवाली – ११ डिसेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७

 1. पिंगबॅक अनामित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s