आठवड्याचे समालोचन – भावनेचा खेळ पण बसत नाही मेळ – १८ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भावनेचा खेळ पण बसत नाही मेळ – १८ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७

गुजराथ आणी हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. BJPने गुजराथ राखले तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता काबीज केली. जरी BJPला गुजराथमध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असले तरी आज BJPचे गुजराथमध्ये २२ वर्षे राज्य आहे याचा विचार करता ANTI- INCUMBANCY वर BRAND मोदीचा विजय झाला असे तज्ञांचे मत आहे. गुजराथमध्ये ग्रामीण भागात BJP ला कमी जागा मिळाल्या आणी आता राजस्थान आणी मध्यप्रदेशमध्ये येणार्या वर्षात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अंदाज पत्रकात शेती आणी ग्रामीण उद्योग यावर भर असण्याची शक्यता आहे. BJP च्या या विजयामुळे सरकार करीत असलेल्या सर्व सुधारणांमध्ये स्थैर्य आणी सातत्य तसेच आणखी लोकाभिमुखता येईल असे वाटते.त्यामुळे लोकाना आवडेल असे अंदाजपत्रक बनेल का अशी भीती कमी झाली आणी मार्केट कमाल स्तरावर पोहोचले. पण तेथे टिकाव धरू शकले नाही. USA मध्ये TAX रीफॉर्म बिल पास झाले. त्यामुळे ज्या अमेरिकन कंपन्या भारतात कारभार करतात त्यांना भारतात व्यवसाय करणे फायदेशीर ठरणार नाही. किंवा भारतातही TAX कमी करावे लागतील. सतत वाढणारे क्रूडचे भाव हा मात्र चिंतेचा विषय ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA मध्ये H1B व्हिसा होल्डर्स च्या जोडीदाराला आता USA मध्ये नोकरी करता येणार नाही. USA मध्ये TAX रीफॉर्मवरील मतदानाच्या प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे या TAX रीफॉर्मवर पुन्हा मतदान घेतले गेले.तेव्हा हे TAX रीफॉर्म मंजूर झाले. कॉर्पोरेट TAX ३५% वरून २१ % वर आणला.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने इलेक्ट्रिक आणी इलेक्ट्रोनिक उत्पादनांवर लागणाऱ्या इम्पोर्ट ड्युटी मध्ये ५% ते १०% वाढ केली. ही वाढ मेक-इन-इंडिया या कार्यक्रमाला उतेजन देण्यासाठी केली. यात मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, VCR/DVD प्लेयर्स, टीव्ही/VIDEO /डिजिटल कॅमेरा, LED दिवे, इलेक्ट्रिसिटी मीटर्स, सेट टॉप बॉक्स, पेट्रोलियम कोक, आणी LED/ LCD/ OLED टी व्ही PANEL आणी दिवे आणी लाईट फिटिंग यांचा समावेश आहे.
 • सरकार बँकांना Rs २००० पर्यंतच्या डेबिट कार्डच्या मदतीने केलेल्या व्यवहारावरील MDR (मर्चंट डीस्कौंट रेट) बँकांना REIMBURSE  करेल. यात भीम, UPI आणी AePS चा समावेश आहे.

 

 • सरकार फेब्रुवारी २०१८ मध्ये बँकांच्या रीकॅपिटलायझेशनचा पहिला हप्ता म्हणून Rs ७०००० कोटी रीकॅपिटलायझेशन BONDS इशू करेल. सरकारने बँकांना ते करणार असलेल्या सुधारणांचा आराखडा सादर करायला सांगितला आहे. काही बँकांना कॅपिटल मार्केट मधून पैसा उभा करायला सांगितला आहे.
 • सिगारेटच्या पाकिटावरील ८५% भाग हा ध्रुमपानाविरुद्ध इशाऱ्यासाठी असावा असा नियम होता तो भाग आता ४०% केला याचा परिणाम GODFREY फिलीप आणी ITC यांच्यावर होईल.
 • पेट कोकवरील इम्पोर्ट ड्युटी २.५% वरून १०% केली.
 • सरकारी उद्योगातील शिलकी पैसा आता त्यांच्या SBI मधील खात्यात जमा असतो. पण महापात्रा या IAS ऑफिसरच्या सुचनेवरून ही शिलकी रक्कम आता एक नवीन कंपनी उघडून तिच्याकडे किंवा PFC किंवा REC कडे जमा ठेवण्याचा सरकार विचार करीत आहे. या रकमेचा विनिमय सरकार उर्जा निर्माण करण्यासाठी करेल.
 • साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे सरकारने साखरेवर ३१ डिसेंबरपर्यंत बसवलेली स्टॉक लिमिट मुदतीपूर्वी रद्द केली. याचा चांगला परिणाम साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.
 • ७००० रेल्वे स्टेशनवर LED लाईट्स लावले जातील. याचा परिणाम HAVELLS एव्हरेडी, सूर्या रोशनी यांच्यावर होईल.
 • कोल इंडिया आता Rs ५० प्रती टन वाहतूक चार्ज लावेल यामुळे त्यांच्या उत्पन्नात Rs २५०० कोटींची वाढ होईल.
 • सोमानी सिरामिक्समध्ये  NRI च्या गुंतवणुकीवरील बंदी उठवली.
 • टाटा स्टील त्यांच्या कलिंगनगर प्लांटच्या विस्तारासाठी Rs २३५०० कोटी खर्च करील टाटा स्टील राईट्स इशू आणेल.
 • सरकारने आतापर्यंत इंद्रधनुष योजनेखाली सरकारी बँकांना Rs ५१८५८ कोटी भांडवल पुरवले. २०१७ मध्ये सरकारने ७५% भांडवल पुरवले आहे. या पुढे सरकार सरकारी बँकांची आर्थिक स्थिती आणी त्यांचा PERFORMANCE बघूनच भांडवल पुरवेल.
 • सरकारने टेक्स्टाईल सेक्टरसाठी Rs १३०० कोटींचे PACKAGE मंजूर केले. याचा परिणाम सेंच्युरी, अरविंद, सुमीत, डोनिअर, बन्सवारा, गार्डन, दिग्जाम, AB FASHION, VIP क्लोदिंग यांच्यावर होईल.
 • सरकार Rs १२०० कोटी खर्च करून बायो टॉयलेट बनवणार आहे. याचा परिणाम स्टोन इंडियावर होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • गंगेच्या किनार्यावर प्लास्टिक पिशव्या टाकल्यास Rs ५००० दंड लागेल; असे NGT ने (NATIONAL GREEN TRIBUNAL) जाहीर केले.
 • CCI (COMPETITION COMMISSION ऑफ INDIA)ने इंडस इंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्ल्युजन यांच्या मर्जरला मंजुरी दिली.
 • रुची सोया या कंपनीची IBC खाली INSOLVENCY प्रक्रिया सुरु झाली.
 • 2G घोटाळ्याच्या बाबतीत कोर्टाने सर्व आरोपींना पुरेशा पुराव्याच्या अभावी निर्दोष म्हणून सोडून दिले. तसेच ज्या कंपन्यांच्या मालमत्ता या केससाठी जप्त केल्या होत्या त्याही मालकांना परत करायला सांगितल्या. याचा परिणाम युनिटेक, RCOM, सन टीव्ही नेट वर्क, आयडीया, DB रिअल्टी या कंपन्यांवर होईल.
 • RBI ने बँक ऑफ इंडिया आणी युनायटेड बँक या दोन सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाना PCA च्या तरतुदी लागू केल्या PCA खाली आतापर्यंत १० सरकारी बँकांना आणण्यात आले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

नोव्हबर २०१७ मध्ये भारताची निर्यात ३०.६ % ने वाढून US $ २६.२ बिलियन झाली तर आयात १९.६ % ने वाढून US $ ४० बिलियन झाली. त्यामुळे ट्रेड GAP US $ १३.८ बिलियन झाली. इंजिनीरिंग गुड्स आणी जेम्स आणी ज्युवेलरी यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • जेपी ग्रूपने आपली ५ हॉटेल्स Rs २५०० कोटींना विकायला काढली आहेत सुप्रीम कोर्टाने जेपी इन्फ्राटेक या कंपनीला Rs १२५ कोटी कोर्टात जमा करण्यासाठी २५ जानेवारी २०१८पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
 • GMR इन्फ्रास्ट्रक्चरच्या JV ला फिलिपिनमधील क्लार्क विमानतळ बनविण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे
 • भारती एअरटेल पेमेंट बँकेमध्ये ४.७ मिलियन खातेधारकांच्या खात्यात Rs १६७ कोटी कुकिंग GAS वरील सबसिडी जमा झाली. खातेधारकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा अकौंट ‘ACTIVATE’ केला गेला आणी ही सबसिडी त्यात जमा केली गेली. आता कोणतेही खाते खातेधारकाच्या पूर्वपरवानगीशिवाय ‘ACTIVATE’ करता येणार नाही असा नियम सरकार करणार आहे. कंपनीने ग्राहकांच्या ते सांगतील त्या खात्यावर सबसिडी जमा करण्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रकारात भारती एअरटेलवर Rs २ कोटीपर्यंत दंड लावला जाण्याची शक्यता आहे.
 • पुढील सुचना मिळेपर्यंत एअरटेल पेमेंट बँकेला E- KYC सेवा स्थगीत ठेवायला सांगितल्या आहेत तसेच पेमेंट बँकेसाठी असलेले लायसन्स रद्द केले.
 • JSW होल्डिंगची FPI मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • निवडून आलो तर प्रत्येक घरात कुकिंग GAS उपलब्ध करून देऊ अशी BJP ने त्यांच्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती. याचा परिणाम गुजरात GAS, अडानी GAS यांच्यावर होईल.
 • टॉरंट फार्माच्या दाहेज युनिटला जर्मन रेग्युलेटरने मान्यता दिली आणी या युनिटमधून निर्यात करण्यास परवानगी दिली.
 • स्ट्राईडस शसून ‘ट्रिनीटी फार्मा’ या साउथ आफ्रिकास्थित कंपनीमधील मोठा स्टेक Rs २८ कोटींना खरेदी करणार आहे
 • LUMAX AUTO या कंपनीच्या ६ शहरातील १२ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे घातले.

कॉर्पोरेट एक्शन

 • शालीमार पेंट्स Rs १४० प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार आहे.
 • क्लारीस लाईफला डीलिस्टिंगसाठी मंजुरी मिळाली.
 • E-क्लर्क सर्विसेस ह्या कंपनीने प्रती शेअर Rs २००० या भावाने ‘BUY BACK’ करणार असे  २२ डिसेंबरला झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठकीत ठरले.
 • गांधी स्पेशल ट्युब्स या कंपनीने Rs ५०० प्रती शेअर या भावाने BUY BACK’ करायचे ठरवले आहे.
 • LT फूड्स चा QIP Rs ७९ प्रती शेअर या भावाने उघडला.
 • रेलीगेरेचा सिक्युरिटीज बिझिनेस EDELWEISS खरेदी करणार आहे.
 • JP पॉवरच्या सबसिडीमधील स्टेक विकण्यासाठी SBI ने बोली मागवल्या. SBI ने JP इन्फ्रास्ट्रक्चरने गहाण ठेवलेले १० कोटी शेअर्स जप्त केले.
 • पीडीलाईटने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • आरती इंडस्ट्रीज Rs १२०० प्रती शेअर या भावाने शेअर ‘BUY BACK’ करणार आहे.
 • VIP क्लोदिंग Rs २६ प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार आहे. (राईट्स इशूबद्दलची सर्व माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे)
 • सणासुदीच्या काळात करमणुकीशी सलग्न असलेल्या शेअर्स वर परिणाम होतो. ENIL, PVR, सिनेलाईन, मुक्ता आर्ट्स, वांडरेला हॉलिडेज, इत्यादी.
 • अडानी ट्रान्स्मिशन यांनी रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चरचा मुंबईमधील पॉवर जनरेशन आणी डीस्ट्रीब्युशन बिझिनेस Rs १३२५१ कोटींना खरेदी कार्यसाठी करार केला. या पैशाचा उपयोग रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर कर्ज फेडण्यासाठी करील
 • डालमिया भारत ही कंपनी मुरली इंडस्ट्रीज ही बँकरपट कंपनी Rs ४०० कोटींना विकत घेईल.
 • सरकारने नवीन कन्झ्युमर प्रोटेक्शन बिल २०१७ हे बिल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले.

 या आठवड्यातील लिस्टिंग

फ्युचर चेन सप्लाय या कंपनीचे NSE वर Rs ६६४ वर तर BSE वर Rs ६७४ वर लिस्टिंग झाले.

मार्केटने काय शिकवले

सिनेमा, नाटक, व्याख्यानाचा कार्यक्रम संपल्याबरोबर, दरवाजा उघडल्याबरोबर बाहेर पडण्याची घाई करू नये त्यामुळे चेंगराचेंगरी होते. थोडा वेळ थांबून बाहेर पडावे. हीच गोष्ट, हीच घाई ट्रेडर्सनी सोमवारी केली. जसजसे गुजराथमधील मतदानाचे कल कॉंग्रेसच्या बाजूने येऊ लागले असे पाहिल्याबरोबर सेन्सेक्स ८०० पाईंट पडले तर निफ्टी १००७५ पर्यंत पडला. जणू काही सर्व संपुष्टात आले असे समजून मंदी केली. परंतु जसजसे पुढील कल BJP च्या बाजूनेही येऊ लागले तसे मार्केट सुधारले, सुधारतच गेले. म्हणजे अपघात झालां या बातमीची पूर्ण माहिती न घेताच केवळ कल्पनेने एखाद्यास हृदयविकाराचा झटका येतो आणी अपघातात सापडलेल्या व्यक्तीस मात्र थोडे खरचटण्याशिवाय काही झालेले नसते. त्यामुळे रोजच्या आयुष्यात काय किंवा मार्केटमध्ये काय आपले डोके संकटाच्या काळात शांत ठेवणे नितांत गरजेचे आहे. भावनेच्या खेळामुळे अतोनात नुकसान होते आणी हे नुकसान का झाले याचे उत्तर मिळत नाही.यावेळी म्हणजेच सोमवारी तारीख १८ डिसेंबर रोजी  ‘HIGH WAVE CANDLE PATTERN’ डेली चार्टवर तयार झाला. हाय वेव्ह याचा अर्थ गोंधळ, अनिश्चितता, असामजस्य,  संशय असा होतो.  निफ्टीमध्ये १००७५ वर ट्रिपल बॉटम तयार झाला.

ओपनिंग प्राईस हीच दिवसाची हाय प्राईस आणी दिवसाच्या लो किंमतीला मार्केट बंद होते. मंदी करणार्यांचा वरचष्मा राहतो यालाच ‘बेअरीश बेल्टहोल्ड PATTERN’ असे म्हणतात. शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी हा धोक्याचा इशारा असतो.

गुजराथमधील निकालात उद्योग आणी व्यापार क्षेत्रातील नाराजी डोकावते. त्याची दखल सरकार उद्योग आणी  व्यापार क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी दूर करून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल. हे शेअरमार्केटच्या दृष्टीने चांगले आहे.

मंगळवार तारीख १९ डिसेंबर २०१७ सर्व ऑटो शेअर्स खूप वाढत होते. मार्केट नेहेमी सुतावरून स्वर्ग गाठते. गुजराथ विधानसभा निवडणुकीत BJPला ग्रामीण भागात कमी मते मिळाली. शेतकरी वर्ग नाराज आहे असे जाणवले. त्याचे उत्पन्न वाढवण्याकडे सरकार अंदाजपत्रकात लक्ष देईल. त्याचे उत्पन्न वाढले तर ते कशावर खर्च होईल? तर दुचाकी चारचाकी ऑटो खरेदी करण्यात. यामुळे ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली. आता पुढच्या तर्काप्रमाणे ऑटो कंपन्या वाढल्या की त्याना पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये खरेदी होईल.

लॉंग वीक एंड आहे. नाताळमुळे फंड MANAGER सुट्टीवर असतात त्यामुळे पुढील आठवड्यात VOLUME कमी असतील. शुक्रवारी VIX १२.०८ आहे. हा १२ च्या खाली गेल्यास प्रॉफीट बुकिंग करा पुट कॉल रेशियो १.४९ होता.

मार्केट तेजीचे आहे नवनवीन उच्चांक गाठत आहे. घोडे आणी गाढव एकत्र धावत असतात तेव्हा घोडे कोणते आणी गाढव कोणते हे ओळखता आले पाहिजे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३९४० तर NSE निर्देशांक निफ्टी १०४९३ आणी बँक निफ्टी २५६४८ वर बंद झाले.

‘मार्केट आणी मी’ च्या सर्व हितचिंतकांना हा ख्रिसमस सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जावो हे शुभेच्छा आणी Santa पोतडीतून आपल्यावर असंख्य सुखांचा वर्षाव करो.

 

Advertisements

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – भावनेचा खेळ पण बसत नाही मेळ – १८ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा – २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिस

 2. पिंगबॅक आठवड्याचे-समालोचन – निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा – २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिस

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s