आठवड्याचे-समालोचन – निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा – २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा –  २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७

मार्केटमध्ये परिणाम होणारे दोन प्रकारचे factor असतात. (१) MACRO (२) MICRO. फिस्कल डेफिसिट वाढते  आहे. GST कलेक्शन कमी, झाले, ADVANCE TAX कलेक्शन कमी झाले आणी सरकारला आपला खर्च कमी करायचा नाही त्यामुळे सरकारला ही कमी पडणारी रक्कम कर्ज काढून उभारावी लागेल. फक्त त्यातल्या त्यात चांगली गोष्ट एकच! विकास योजना सुरु ठेवाव्यात त्यात कुठलीही कपात न करता पैसा कर्जाच्या रुपात उभा करावा असा सरकारचा विचार दिसतो आहे. BOND यील्ड वाढते आहे यामुळे बँकांचे उत्पन्न कमी होईल. त्यामुळे रेटिंग एजन्सी वर्षभर तरी देशाच्या रेटिंगमध्ये सुधारणा करणार नाहीत. क्रूडचे दर वाढू लागल्यामुळे पेट्रोल, डीझेलचे दर वाढतील महागाई वाढेल. फक्त लिक्विडीटी आहे, पैसा येतो आहे म्हणून मार्केट तेजीत आहे. साध्या टाचणीनेही हा तेजीचा फुगा फुटेल. RBI सुद्धा पुढील ५ ते ६ महिन्यात रेटकट करणार नाही. उलट RBI रेट वाढवण्याची शक्यता आहे बँकानी मुदत ठेवीवरील व्याज दर वाढवायला सुरुवात केली आहे

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI आणी अर्थमंत्रालयाने असे जाहीर केले की ते कोणतीही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक बंद करण्याच्या विचारात नाहीत ज्या बँका PCA खाली ठेवल्या आहेत त्यांच्या वर RBI चे अधिक लक्ष राहील.
 • सेबीने AXIS बँकेला त्यांची अंतर्गत प्रोसेस आणी सिस्टिम्स सुधारण्याचा सल्ला दिला. AXIS बँकेचे तिमाही निकाल बँकेने हे निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्याआधी WHATSAPP वर जाहीर झाले होते सेबीने याच संबंधात काही शेअर ब्रोकर्स आणी शेअरमार्केटच्या तज्ञांच्या ऑफिसवर छापे टाकले
 • सरकारने असे जाहीर केले की सरकार युनायटेड बँक,ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, IOB, कॉर्पोरेशन बँक या सर्वाजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये इंद्रधनुष योजनेखाली Rs १०,००० कोटी भांडवल पुरवेल.
 • प्रायव्हेट इक्विटी फर्म KKR ला RBI ने पहिली विदेशी मालकीची ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) सुरु करायला मंजुरी दिली.
 • सेबीने सर्व कमोडीटी एक्स्चेंज आणी BSE, NSE ही इक्विटी एक्स्चेंज १८ ऑक्टोबर २०१८ पासून इंटिग्रेटेड एक्स्चेंज म्हणून काम करतील असे सांगितले. म्हणजेच कमोडिटी मार्केट इक्विटी मध्ये आणी NSE,(कारण NSE चे लिस्टिंग २०१८ मध्ये होईल.) BSE ही इक्विटी एक्स्चेंज कमोडीटी मध्ये ट्रेड करू लागतील. याचा फायदा NSE ला होईल(कारण NSE चे लिस्टिंग २०१८ मध्ये होईल).
 • AION कॅपिटल आणी JSW स्टील यांच्या कन्सोर्शियमने मॉनेट इस्पात आणी एनर्जी या कंपनीसाठी रेझोल्युशन प्लान सादर केला. यात Rs २५०० कोटी कर्जफेड आणी Rs १००० कोटी इक्विटी असेल. कर्जदार ७५% हेअरकट घेतील.
 • SBI ने कॅस्टेकस या कंपनी विरुद्ध NCLT मध्ये INSOLVENCY प्रोसीडीग दाखल केले.
 • DGCA (डायरेकटोरेट जनरल ऑफ सिविल एव्हिएशन) ने एअर डेक्कन ला ३४ मार्गांवर उडान योजनेखाली फ्लायिंग परमीट दिले.

सरकारी अनौंसमेंट

 • उत्तरप्रदेशात राज्य सरकार स्टेट एक्साईज पोलीसी आणणार आहे. मद्यार्कावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. याचा परिणाम ग्लोबस स्पिरीट, पायोनिअर डीस्टिलरी, युनायटेड ब्रुअरीज, J M ब्रुअरीज, युनायटेड स्पिरीट या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने त्यांच्या सर्व बचत योजनांवरचा व्याजाचा दर ०.२०% ने कमी केला.
 • सरकारने Rs ५०००० कोटी जास्त कर्ज उभारण्याचे ठरवले आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • स्टार सिमेंट या कंपनीला सरकारकडून Rs १५.९ कोटी मिळाले.
 • कॉपरच्या किमती ३ वर्षाच्या उच्चतम स्तरावर होत्या. याचा परिणाम हिंदुस्थान कॉपरवर होईल.
 • लोकांची दिशाभूल करून इन्शुरन्स पॉलिसी विकल्या असा ठपका ICICI बँक आणी ICICI प्रू यांच्यावर ठेवला.
 • हेइंकेन ही कंपनी युनायटेड ब्रुअरीजमध्ये स्टेक खरेदी करण्याची शक्यता आहे.
 • EDEL WEISSला IRDA कडून जनरल इन्शुरन्सच्या बिझिनेससाठी परवानगी मिळाली.
 • डॉल्फिन ऑफशोअर ला ONGC कडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • EID PARRY त्यांचा बायोपेस्टीसाईड बिझिनेस कॉरोमोन्डेल फरटीलायझर या कंपनीला विकणार आहे.
 • TCS ला निएलसन कंपनीकडून Rs १४५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • GAIL या कंपनीला घेण्यासाठी IOC आणी BPCL उत्सुक आहेत.
 • ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट नाताळला रिलीज झाला. हा चित्रपट तुफान गर्दीत चालू आहे याचा फायदा PVR, आयनॉक्स,लीजर आणी इतर कंपन्यांना होईल.
 • IT क्षेत्रातील कंपन्यांचे दिवस फारसे चांगले सुरु नाहीत. टी सी एस मधील एका कर्मचाऱ्यांने मला भेदभावाची वागणूक मिळते आहे अशी तक्रार २०१५मध्ये केली. ही केस काढून घ्यावी म्हणून टी सी एसने अर्ज केला. पण ही केस काढून घेणे तर दूरच पण जे इतर अमेरीकन या कंपनीत काम करत होते त्यांचा समावेश या दाव्यात केला गेला. म्हणजेच क्लास एक्शन सूट दाखल करण्यात आली. या प्रकारची क्लास एक्शन सूट इन्फोसिस विरुद्ध दाखल केली गेली आहे.
 • ऑरोबिंदो फार्माला USFDA कडून झोपेच्या औषधासाठी मान्यता मिळाली
 • उसाच्या किमती वाढल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम होईल.
 • हवाई इंधन GST खाली आणण्यासाठी आणी इनपुट TAX बेनिफिट देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली. याचा फायदा जेटएअर वेज, स्पाईस जेट आणी इंटरग्लोब याना होईल.
 • RCOM या ADAG ग्रूप कंपनीने असे जाहीर केले की त्यांचे टेलिकॉम ASSETS (स्पेक्ट्रम, टॉवर्स, फायबर) विकून Rs २५००० कोटी उभारेल. सर्व कर्जदारांचे कर्ज मुदतीआधी फेडले जाईल. कंपनी मार्च २०१८ मध्ये SDR बाहेर येईल. कंपनीने चीन डेव्हलपमेंट बँकेबरोबर ऑऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली. या बँकेने त्यांचे Rs ११४६० कोटींचे कर्ज वसूल करण्यासाठी IBC खाली RCOM वर INSOLVENCY साठी अर्ज केला होता. RCOM त्यांचा वायरलेस बिझिनेस बंद करतील. फक्त ते त्यांचा एन्टरप्राईज बिझिनेस चालू ठेवतील. RCOMने हा प्लान जाहीर केल्यावर पुन्हा एकदा ADAG ग्रूपच्या शेअरमध्ये संजीवनी आली. पण पूर्वी एकदा अशीच योजना सादर केली होती पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही हे गुंतवणूकदार विसरलेले नाहीत.
 • JP इन्फ्रास्ट्रक्चरच्या २२०० VAT च्या ASSET खरेदीसाठी ब्रूकफिल्डने Rs ३५०० ची बोली पाठवली आहे.
 • कमर्शियल GAS सिलिंडरचे भाव वाढणार आहेत.
 • अमूल्य लीजिंगची (AP अपोलो TUBES) ९% हिस्सेदारी प्रमोटर्सनी प्रती शेअर Rs ५६० या भावाने विकली. हे शेअर्स चांगल्या म्युचुअल फण्डानी खरेदी केले.
 • अस्टॉन पेपरचे शुक्रवारी Rs ११४ /- लिस्टिंग झाले. एशियन GRANITO कडे याचा मोठा स्टेक आहे.शेअरची किंमत Rs १२०.७५ पर्यंत वाढली. हा शेअर IPO मध्ये Rs ५० ला दिला होता.

कॉर्पोरेट एक्शन

पिडीलाईट या कंपनीने Rs १००० प्रती शेअर या भावाने  ‘BUY BACK’ जाहीर केला पण या ‘BUY BACK’ चा ACCEPTANCE  रेशियोही फारच कमी आहे. त्यामुळे ही ‘BUY BACK’ ऑफर शेअरहोल्डर्सना किंवा गुंतवणूकदारांना पसंद पडली नाही. कंपनी ‘BUY BACK’ वर Rs ५०० कोटी खर्च करणार आहे.(BUY BACK आणी शेअर्सच्या लिस्टिंग बद्दल माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.)

मार्केटने काय शिकवले

मंगळवारी तारीख २६ डिसेंबर २०१७ रोजी किर्लोस्कर ऑईल आणी किर्लोस्कर ग्रूपच्या इतर कंपन्याच्या शेअर्सची किमत वाढत होती. याचे कारण शोधता असे आढळले की CUMMINS ही कंपनी किर्लोस्कर घेते आहे अशी बातमी आहे. दुपारी CUMMINSने या बातमीचे खंडन केले. अशावेळी ज्यांनी कोणी या बातमीच्या आधारावर ट्रेड केला असेल त्यांनी तो ताबडतोब क्लोज करणे जरुरीचे असते.

इंडोटेक या कंपनीच्या CEO पदी आल्फ्रेड या  M /A(मर्जर आणी अक्विझिशन) आणी टर्न अराउंड तज्ञाची नेमणूक झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरवर परिणाम झाला. कधी कधी लीडर बदलल्यामुळे एखादी कंपनी आपल्या प्रगतीचा वेग वाढवू शकते.

शुक्रवारी संयमाची परीक्षा होती. STRESSED कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी होत होती. चांगले शेअर्स बाजूला सरकले होते किंबहुना चांगले शेअर्स पडत होते. अशावेळी जर STRESSED  कंपनीचे शेअर्स पदरात आले तर हा भाव पुन्हा दिसतो की नाही हे त्या विधात्याला माहिती त्यामुळे सतर्क राहणे योग्य! मार्जिन फंडिंगमुले ३०% ते ३५% ची हालचाल या शेअर्समध्ये दिसत होती.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच क्रूड वाढत होते. भारताची अर्थव्यवस्था क्रूडवर अवलंबून हे सर्वांना माहित आहे. क्रूड वाढले की अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो  आयात बिल वाढते. GST कलेक्शन कमी झाले आहे. पण लिक्विडीटी आहे पैसा येतो आहे त्यामुळे मार्केटमध्ये तेजी आहे. पण स्टॉपलॉसवर ध्यान ठेवून ट्रेडिंग करावे.ह्या आठवड्यात धोक्याची घंटी वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २०१८ चे पहिले सहा महिने यथातथा तर पुढील सहा महिने चांगले जातील असा अंदाज आहे. ८ राज्यातल्या निवडणुका आणी जानेवारीत लागणारे तिसर्या तिमाहीचे निकाल, ADVANCE  TAX चे आकडे आणी १ फेब्रुवारी सादर होणारे  अंदाजपत्रक  याकडे लक्ष ठेवावे. या ब्लॉगच्या सर्व वाचकांना नवीन वर्ष समृद्धीचे,यशाचे,समाधानाचे आणी आरोग्यपूर्ण जावो ही हार्दिक शुभेच्छा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०५७ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०५३१ वर आणी बँक निफ्टी २५५३९ वर बंद झाले.

 

Advertisements

One thought on “आठवड्याचे-समालोचन – निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा – २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s