आठवड्याचे समालोचन – बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८

शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी आणी त्यांच्या क्षेत्रीय निर्देशांकांनी (उदा मिडकॅप,स्मालकॅप) उच्चांक प्रस्थापित केला. सध्या प्रीबजेट RALLY सुरु आहे. २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकाभिमुख आणी लोकप्रिय अंदाजपत्रक सादर केले जाईल असा मार्केटचा अंदाज आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून किंवा ग्रामीण भागाला खुश करण्यासाठी शेती आणी इतर ग्रामीण क्षेत्राना प्राधान्य देऊन सरकार आपल्या अंदाजपत्रकाची आखणी करेल. प्रत्येकजण आपापला अंदाज व्यक्त करत आहे. सरकारने जाहीर केले आहे की शेती, सिंचाई, इन्फ्रास्ट्रक्चर, निर्यात, लघुउद्योग, मेक इन-इंडिया, आणी रोजगारनिर्माण यावर सरकारचा भर असेल. शुक्रवारी तारीख ५ जानेवारी २०१८ रोजी संसदेचे शीतकालीन अधिवेशन संपले  आता थेट संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होईल. मार्केटमध्ये अंदाजपत्रकात कोणत्या क्षेत्राना उत्तेजन दिले जाईल, सरकार आपला पब्लिक एक्स्पेन्डीचर कोणत्या क्षेत्रात जास्तीतजास्त करेल. याच्या अंदाजावर निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात चढ उतार होत आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA आपल्या व्हिसासंबंधीत नियमांमध्ये बदल करणार आहे. जर USA मध्ये ६ वर्ष राहत असलेल्या आणी ग्रीन कार्डासाठी अर्ज केलेया H1B व्हिसा धारकांना त्यांच्या अर्जाविषयी USA सरकारने काही उत्तर दिले नसले तर ग्रीन कार्ड विषयावर अंतिम निर्णय होईपर्यंत अशा H1B व्हिसाधारकांना USA मध्ये राहण्याची मुभा दिलेली होती. पण आता मात्र ज्या H1B व्हिसा धारकांच्या ग्रीन कार्डाविषयी अंतिम निर्णय सहा वर्षानंतर झाला नसेल अशा H1B व्हिसा धारकांना आपल्या देशात ताबडतोब परतावे लागेल. त्यांच्या ग्रीन कार्डासंबंधात अंतिम निर्णय झाल्यावर त्यांना परत व्हिसा काढून USA मध्ये जाता येईल. USA मधील ग्रीन कार्ड मंजुरीची प्रक्रिया खूप वेळ घेते. त्यामुळे या बाबतीत अंतिम निर्णय होईपर्यंत सहा वर्षानंतरचा काल H1B व्हिसा धारकांना आपल्या देशात व्यतीत करावा लागेल. या घडीला अंदाजे ५ लाख भारतीय H1B व्हिसा धारक ग्रीन कार्डासंबंधीत अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ग्रीन कार्डवर अंतिम निर्णय होईपर्यंत भारतात परत यावे लागेल. तसेच त्यांच्या व्हिसावर डीपेंडट व्हिसा असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बरोबर भारतात परतावे लागेल. याचा परिणाम पर्यायाने IT क्षेत्रातील कंपन्यांवर होईल. या नियमातील बदलांचा ORACLE या कंपनीवर कमीतकमी परिणाम होईल.
 • USA मध्ये क्लास 8 TRUCK ची विक्री ७७% ने वाढली. याचा फायदा भारत फोर्जला होईल.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने जून २०१८ पासून PACKINGमध्ये तागाचा उपयोग केला पाहिजे अशी सुचना केल्यामुले LUDLOW , CHEVIOT आणी GLOSTER या ताग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम झाला.
 • टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांना काही सवलती देण्याचा सरकार विचार करत आहे. स्पेक्ट्रमवर असलेली कॅप काढून टाकण्याचा सरकार विचार करत आहे. यामुळे टेलीकॉमक्षेत्रात मर्जर आणी अक्विझिशनची प्रक्रिया सोपी होण्यास मदत होईल. तसेच सरकार टेलिकॉम क्षेत्रात ऑटोमटिक रुटने १००% FDI आणण्यासाठी मंजुरी देण्यावर विचार करत आहे.
 • तसेच TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) १ फेब्रुवारीपासून इंटरकनेक्शनविषयी नवीन नियम जारी करेल. या नियमानुसार अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत करार केला पाहिजे.
 • सरकारने UCO बँकेत Rs १३७५ कोटी तर IDBI बँकेत Rs २७२९ कोटी भांडवल दिले.
 • क्रुडऑइलच्या वाढत्या किमती लक्षात घेवून राज्य सरकारांनी आपल्या VAT चा दर कमी करावा असे पेट्रोलियम मंत्र्यांनी राज्य सरकारांना आवाहन केले. या आधीच महाराष्ट्र गुजरात आणी उत्तराखंड या राज्यांनी आपले VAT चे दर कमी केले आहेत.
 • अर्थमंत्र्यांनी असे सांगितले की २०१८ मध्ये खेड्यांचा विकास करण्यावर आणी खेडी रस्त्यांद्वारे शहरांना जोडण्यावर भर दिला जाईल. प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे काम अग्रक्रमाने हाती घेतले जाईल. ग्रामीण क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी अग्रक्रम दिला जाईल. याचा परिणाम पॉवर सेक्टरवर आणी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर होईल
 • सरकारने फरटीलायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना DBT योजनेखाली सबसिडी द्यायला सुरुवात केली.
 • तसेच सरकारने कस्टमाइझ्ड फरटीलायझर बनवण्यासाठी टाटा केमिकल आणी इंडोगल्फ फरटीलायझर या कंपन्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे सरकारला सबसिडी द्यावी लागणार नाही. ‘जशी जमीन जसे पीक तसे खत बनवावे’ अशी सरकारची ऑर्डर आहे. टाटा केमिकल्सने ‘पारस’ या नावाने खत बनवून विकण्यास सुरुवात केली आहे. हे खत मार्केट प्राईसला विकता येईल.
 • सरकार ITI (इंडिअन टेलिफोन इंडस्ट्रीज) मध्ये दोन टप्प्यात डायव्हेस्टमेंट करणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकार FPO च्या माध्यमातून १८ कोटी नवे शेअर्स इशू करेल. तर दुसर्या टप्प्यात OFS च्या माध्यमातून ९ कोटी शेअर्स डायव्हेस्ट करेल. या सर्व प्रक्रीयेनंतर ITI मध्ये सरकारचा ७४.८६ % स्टेक राहील.
 • सरकार पोर्ट कंपन्यांना पोर्ट वापरण्यासाठी त्यांना आकारल्या जाणार्या फीमध्ये सवलत देण्याचा सरकार विचार करत आहे. मॉडेल कन्सेशन कराराचा रिव्हू घेतला जाईल. मोठ्या पोर्टमध्ये PPP योजनेअंतर्गत सूट दिली जाईल.
 • सरकारने जनरल PROVIDENT फंडावरील व्याजाचा दर ०.२०% ने कमी केला.
 • सरकार एअरइंडियाच्या ३३ मालमत्ता विकणार आहे.
 • दिल्ली राज्य सरकारने दुचाकी इलेक्ट्रीक व्हेईकलसाठी Rs ३०००० सबसिडी देण्याची घोषणा केली.
 • सरकारने जोझीला टनेलसाठी Rs ६९०० कोटी मंजूर केले. या टनेलचे काम ITNL या कंपनीला मिळाले.
 • ‘मीडडे मील’ या योजनेखाली दिल्या जाणार्या आहारात आता दुधाचा समावेश केल्यामुळे डेअरी कंपन्यांवर परिणाम होईल – प्रभात डेअरी, पराग मिल्क, क्वालिटी
 • ज्या कंपन्यांनी GST चे दर कमी केल्यानंतर त्यांच्या उत्पादनाचे दर त्या प्रमाणात कमी केले नाहीत म्हणजेच GST कमी केल्याचा फायदा अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवला नाही अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सरकारने कळवले आहे. उदा HUL ज्युबिलंट फूड्स, वेस्ट लाईफ, स्पेशालिटी रेस्टॉरंट
 • सरकार सहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल बँकामध्ये Rs ७५७७ कोटी भांडवल घालणार आहे ते या प्रकारे बँक ऑफ इंडिया Rs २२५७ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र Rs ६५० कोटी, देना बँक २४३ कोटी, सेन्ट्रल बँक Rs ३२३ कोटी.
 • सरकारने Rs ८०००० कोटींचे रीकॅपिटलायझेशन BONDS इशू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेमध्ये मंजुरी मिळाली. सरकारने असेही सांगितले की या रीकॅपिटलायझेशन BONDच्या इशूमुळे सरकारच्या वित्तीय घाट्यावर परिणाम होणार नाही.
 • ONGC आणी HPCL या कंपन्यांच्या मर्जरमध्ये अडचणी येत आहेत.हे मर्जर मार्च २०१८ पर्यंत पुरे होईल असा अंदाज आहे.
 • सरकार GAILचे दोन विभागात विभाजन करण्याच्या विचारात आहे. एक भाग मार्केटिंग बघेल तर दुसरा GAS च्या उत्पादन आणी संबंधीत बाबींकडे लक्ष देईल.
 • संरक्षण मंत्रालयाने Rs २४०० कोटींच्या योजनांना मंजुरी दिली या योजनांचा परिणाम .ASTRA मायक्रोवेव्ह, वालचंदनगर इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यासाठी नवीन बिल लोकसभेत सादर केले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ८ कोअर सेक्टरमध्ये प्रगतीचे आकडे खूप चांगले आले. सरकारचा भर इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. सिमेंट स्टील पॉवर या कोअर सेक्टरमधील आकडे चांगले आले.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • इरिगेशनसाठी जी साधने लागतात त्यावरील GST १२% वरून ५% करणार आहेत. याचा परिणाम जैन इरिगेशन , EPC आणी PI इंडस्ट्रीज या कंपन्यांवर होइल
 • RBI कडे सरकारने Rs १३००० कोटी अतिरिक्त लाभांश मागितला होता. RBI ने हा लाभांश देण्याची तयारी दाखवली आहे.
 • RBI ने अलाहाबाद बँकेला PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) च्या तरतुदी लागू केल्या.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • लार्सेन एंड टुब्रो ला हायड्रोकार्बन बिझिनेस साठी Rs २१०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • सबमिलरचे ASSET ब्रिगेड एन्टरप्रायझेसने खरेदी केले.
 • मुकेश अंबानींच्या ‘इंडस्ट्रीयल सिटी प्रोजेक्टला’ CIDCO ने मंजुरी दिली.
 • NTPCने कुडगी प्रोजेक्ट II सुरु केला
 • डिसेंबर महिन्यात मारुतीची कार विक्री वाढली. पण निर्यात कमी झाली.
 • बजाज ऑटोच्या तीनचाकी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. निर्यातही वाढली.
 • टी व्ही एस मोटर्स आणी एस्कॉर्टस यांची निर्यात वाढली.
 • युनियन बँक Rs १२८७ कोटींचे १७ NPA विकण्यासाठी बोली मागवल्या.
 • कॅनरा बँकेने Rs १००० कोटींचे २० NPA विकण्यासाठी बोली मागवली
 • JSW एनर्जीने JP पॉवरचा बिना प्रोजेक्ट विकत घेण्यासाठी २०१६ साली केलेला करार रद्द केला.
 • शेअर मार्केट मध्ये तेजी आहे IPO ना गुंतवणूकदार भरभरून प्रतिसाद देत आहेत या सर्वामुळे ब्रोकर आणी इन्व्हेस्टमेंट बँकर आणी रजिस्ट्रार टू इशू अशा विविध फिल्डमध्ये काम करणाऱ्या EDELWEISS, मोतीलाल ओसवाल, जे एम फायनांसियल्स, A B मनी या कंपन्यांवर परिणाम होईल.
 • कॉक्स एंड किंग्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपले शेअर्स विकले.
 • PNB त्यांच्या म्युच्युअल फंडातील स्टेक विकणार आहे.
 • टाटा केमिकल्सचा टाटा ग्लोबल आणी RALLIS मध्ये स्टेक आहे तो विकून त्यांना Rs ५००० कोटी मिळतील.
 • प्रभात डेअरीने २३ लाख शेअर्स तारण म्हणून ठेवले.
 • D B रिअल्टीजने त्यांचे १ कोटी शेअर्स गहाण ठेवले.
 • हिमाद्री केमिकल्स ही लिथीयम BATTERY साठी लागणारा ADVANCE कार्बन बनवणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. सरकारचे धोरण इलेक्ट्रीक वाहनांना उत्तेजन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे या वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या BATTERY साठीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हिमाद्री केमिकल्सवर होईल.
 • रिलायंस इंडस्ट्रीजने जामनगरमध्ये GAS CRACKER चे उत्पादन सुरु केले.
 • मारुतीने आपल्या कार्सच्या वेगवेगळ्या मॉडेलवर Rs २०००० ते Rs ३०००० पर्यंत डीस्कौंट जाहीर केल्यामुळे शेअरच्या किमतीवर परिणाम झाला
 • देना बँक त्यांचा NSDL मधील १.५६% स्टेक विकणार आहे
 • GM ब्रुअरीज चा निकाल खूप चांगला आला
 • वरूण बिव्हरेजीसने पेप्सी कंपनीबरोबर मार्केटिंग आणी डीस्ट्रीब्यूशनसाठी करार केला
 • संघी इंडस्ट्रीज उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी Rs १२५० कोटी खर्च करणार आहेत.
 • GRAVITA इंडस्ट्रीजने आपल्या जयपूर येथील प्लांटमध्ये लेड टेट्रा ऑक्साईडचे उत्पादन सुरु केले.
 • इलेक्ट्रो स्टील्स ही कंपनी खरेदी करण्यात टाटा स्टील, EDELWEISS, आणी वेदांता या कंपन्यांनी रुची दाखवली.
 • पराग मिल्क या कंपनीने दिल्ली मध्ये ‘गोवर्धन’ BRAND दही launch केले

नजीकच्या काळात येणारे IPO

 • सरकार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स या कंपनीचा Rs ४००० कोटींचा IPO आणत आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • SJVN, युनिकेम LAB, आरती ड्रग्स या कंपन्यांनी शेअर्स ‘BUY BACK’ विचार करण्यासाठी ८ जानेवारी २०१८ रोजी आपापल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • लव्हेबल लोंन्जरीचा Rs २५० प्रती शेअर या भावाने २० लाख शेअर्ससाठी ‘BUY BACK’ ८ जानेवारीपासून सुरु होईल.
 • साउथ इंडियन बँकेने ९ जानेवारी २०१८ रोजी २० कोटी भांडवल उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • ऑरबीट एक्स्पोर्ट Rs १८० प्रती शेअर या भावाने ४.४४ लाख शेअर्स ‘BUY BACK’ करेल.
 • BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) ने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी १५ जानेवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

मार्केटने काय शिकवले

शेअरमार्केटचे पीच बदलले आहे. षटकार,चौकार मारले तर झेल जाण्याचा धोका २०१८ मध्ये आहे. करेक्शन आले तरी थोडेसे येईल पण पुन्हा मार्केट वर जाईल असे जे ट्रेडर धरून चालले होते तसे घडेल असे दिसत नाही. प्रत्येक वर्षी ३०% वाढ होत नाही, पण गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये करेक्शन असताना २०१८ हे वर्ष गुंतवणूक करण्याची संधी देईल असे वाटते.

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण एखाद्या खास घटनेसाठी खास वस्तूंची खरेदी करतो. पण घटना घडून गेल्यावर त्या वस्तू विकत नाही तर त्या समारंभाची आठवण म्हणून जपून ठेवतो. पण शेअरमार्केटमध्ये तसे नाही. कारण दैनंदिन आयुष्यात आपण वस्तू वापरण्यासाठी खरेदी करतो म्हणजेच उपभोगासाठी खरेदी करतो. ती विकून फायदा मिळवण्यासाठी नाही पण शेअरमार्केटमध्ये मात्र आपण खरेदी करतो ती विकून फायदा मिळवण्यासाठीचं!! आता पहा नाताळ आल्याबरोबर मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या  शेअर्सच्या किमतीत वाढ होते. नाताळ संपल्याबरोबर ते शेअर पडू लागले. मद्यार्काची मागणी वाढेल या अपेक्षेने नाताळच्या आधी शेअर्सची खरेदी केली आता मद्यार्काची मागणी कमी होईल म्हणून ह्या शेअर्सची विक्री वाढत आहे म्हणजेच ट्रेडर्स शेअर्स ‘शॉर्ट’ करत आहे. म्हणजेच मार्केटमध्ये दोन्हीही प्रकारचा ट्रेड करून फायदा मिळवता येतो.

सोमवारी १ जानेवारी रोजी PUT /CALL रेशियो १.६२ आणी फिअर ग्रीड मीटर ७३ होते. या परिस्थितीत मार्केट टिकत नाही. VOLUME खूप कमी होते. त्यामुळे अचानक मार्केट पडू लागले. 2018चे दर्शन मार्केटने दिले. २०१८चे संपूर्ण वर्ष मार्केट सरसकट तेजीत राहील असे दिसत नाही गाढव आणी घोडे यात गुंतवणूकदार फरक करतील, किंबहुना तो करावा लागेल जर कळत नसेल तर शिकून घ्यावे लागेल. हे ट्रेडर्स मार्केट आहे इन्व्हेस्टरचे नव्हे. सातत्याने सेक्टरमध्ये शेअर्समध्ये रोटेशन करावे लागेल. PASSIVE इन्व्हेस्टर राहून चालणार नाही. आपल्या पोर्टफोलिओचे सतत परीक्षण आणी निरीक्षण करून त्याची मार्केटच्या चालीबरोबर सांगड घालता आली पाहिजे.

सध्या निफ्टीमध्ये फारशी हालचाल नाही. निफ्टी एका छोट्याशा रेंजमध्ये फिरत आहे. मार्केट लहरी सुलतानाप्रमाणे वागत आहे. सकाळची मार्केटची भूमिका वेगळी असते तर दुपारची भूमिका वेगळी असते. मिड्कॅप आणी स्मालकॅपमध्ये हालचाल आहे. चांगले मिडकॅप शोधा. पण सावधगिरी बाळगा. कारण मिडकॅप शेअर्सना एकदा लोअर सर्किट लागायला लागली की विकायला कठीण होऊन बसते. पार्टी चालू आहे पण आपल्याला किती पचते आणी किती रुचते याचा विचार करायला हवा नाहीतर डॉक्टरकडे जावे लागते. ज्याप्रमाणे आपण आपले आरोग्य सांभाळतो त्याप्रमाणेच गुंतवणुकीचे आरोग्यही सांभाळावे लागते. क्रुडचा दर वाढत आहे पण त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वाढत आहे., त्यामुळे क्रूडच्या दरवाढीचा परिणाम थोड्या प्रमाणात कमी होत आहे. ज्यावेळी रुपयाचे अवमूल्यन होईल तेव्हा क्रुडचे  चटके बसू लागतील.

पुढील आठवड्यात कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात होईल. त्याप्रमाणे जे बदल होतील त्याकडे लक्ष द्या

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१५३ वर NSE निर्देशांक निफ्टी १०५५८ वर आणी बँक निफ्टी २५६०१ वर बंद झाले.

 

Advertisements

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८

 1. Tanaji tukaram khaire

  धन्यवाद मॅडम
  मी आपला मेल दर आठवडा वाचतो
  खूप छान माहिती दिली जाते
  कधी कधी वाटते की खुप सारी माहिती आपण जमा कोठून करता
  माझा साठी तुमी खुप काही तरी करता
  मला इंग्लिश वाचता येत नाही त्यामुळे तुमचा इमेल खूप फायदा करून देतो
  जर एकादी compny असेल तर सांगा की जे मधून ला छान फायदा होईल

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८ | Stock Marke

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s