आठवड्याचे समालोचन – घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची  – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८

क्रूडने वाढता वाढता US$ ७० प्रती BARREL(तीन वर्षातील कमाल भाव) ची पातळी गाठली. USA मध्ये थंडीचे प्रमाण खूपच वाढले आहे. नायगारा धबधबा गोठला असल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच. मार्केट प्रत्येक बातमीची नाळ आर्थिक बाबींशी जोडते. आणी अर्थव्यवस्थेवर प्रत्येक घटनेचा काय परिणाम होईल आणी कोणत्या कंपन्यांवर किती आणी कसा परिणाम होईल, हे पहाते आणी आपणही स्वतःच्या पोर्टफोलीओवर काय परिणाम होईल हे पहाणे गरजेचे असते.

सध्याच्या मार्केटचे वर्णन ‘गंगा आली रे अंगणी’ या शब्दात करता येईल. घरात लग्न कार्य आले की लोक खूप, गरज असो वा नसो खरेदीवर खर्च करतात त्यात हौस, प्रतिष्ठा, व्यवहार शास्त्र स्पर्धा या सर्व गोष्टी येतात. विचार बाजूलाच राहतात. ‘केलाच पाहिजे खर्च, आयुष्यात एकेकदाच होतात या गोष्टी’ असे म्हणत ऋण काढून खरेदी करतात. पैशाची आवक वाढली की विचार खुंटतो. योग्य अयोग्य सर्वच गोष्टींना मागणी येते. एखाद्याने टोकले तर सर्वांनाच त्याचा राग येतो. याचाच प्रत्यय सध्या येतो आहे. सर्व निगेटिव्ह गोष्टी दिसत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करून मार्केट वाढतेच आहे. हीच खरी परीक्षेची वेळ आहे.

डावोसला होणाऱ्या मीटिंगच्या आधी FDI चे नियम सरळ सोपे आणी गुंतवणुकीसाठी आकर्षक करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे.

या अंदाजपत्रकात STANDARD DEDUCTION आणी कॅपिटल गेन्स कर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे नैसर्गीक वायुसाठी मागणी वाढली. पाईप मधून केला जाणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा गोठून गेला आहे
 • ट्रम्प प्रशासनाने H1B व्हिसाच्या नियमात बदल करणे रद्द केले आहे. फक्त आता दरवर्षी H1B व्हिसाचा रिव्यू घेतला जाईल.
 • चीनने USA ट्रेजरी BONDS ची खरेदी नजीकच्या भविष्यात कमी करण्याची किंवा थांबवण्याची शिफारस केली आहे.

सरकारी अनौंसमेट

 • रेल्वे ८५०० स्टेशन्सवर WI-FI सुविधा देणार आहे. याचा परिणाम डी-लिंक, तेजस नेटवर्क या कंपन्यांवर होईल.
 • रेल्वे WI –FI वर Rs ७०० कोटी खर्च करेल.
 • १८ जानेवारीला GST कौन्सिलची बैठक आहे. यात निर्यातीला उत्तेजन मिळण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकात सरकार पर्यटन आणी पर्यटनाशी संबंधी उद्योगांना उत्तेजन देण्याची शक्यता आहे. याचा परिणाम TFCIL सारख्या पर्यटनाशी संबंधीत कंपन्यांवर होईल.
 • भारत नेटचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सरकार Rs ३४००० कोटी खर्च करणार आहे याचा परिणाम नेल्को वर होईल.
 • IRCTC रेल्वेमध्ये रेडी-टू-इट खाद्यपदार्थांसाठी टेंडर मागवत आहे. याचा परिणाम कोहिनूर फूड्स, नेस्ले आणी ITC यांच्यावर होईल.
 • सोलर सेलवर ७०% सेफगार्ड आयात ड्युटी लावण्याचा सरकार विचार करत आहे याचा परिणाम WEBSOL एनर्जी, इंडोसोलर आणी सुझलॉन या कंपन्यांवर होईल.
 • सरकार नवीन ‘GOLD POLICY’ आणणार आहे या पॉलिसीची घोषणा मार्च २०१८ पर्यंत होईल. सरकार सोन्यावरील. आयात ड्युटी कमी करण्याचा विचार करत आहे. PNB ने बुलियन बँक चालू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या पॉलिसी मध्ये GOLD बोर्ड तसेच गोल्ड स्पॉट एक्स्चेंज वरही विचार केला जाईल.
 • सरकारने GDP मधील वाढीचे अनुमान वित्तीय वर्ष २०१८ साठी ६.५ % केले.
 • सरकारने आपल्या FDI पॉलिसीमध्ये बदल केले.
 • सिंगल ब्रांड रिटेलमध्ये १००% FDI ऑटोमटिक रूटने परवानगी दिली. याचा परिणाम इंडियन टेरेन FASHION, VMART रिटेल, शॉपर्स स्टॉप, TRENT, ZODIAC क्लोथिंग कंपनी यांच्यावर होईल
 • रिअल इस्टेट ब्रोकिंगमध्ये १००% FDI ला परवानगी दिली.
 • वैद्यकीय उपकरणांचे वर्णन आता FDI पॉलिसीमध्ये केल्याप्रमाणे होईल.
 • FII /FPIज आता पॉवर एक्स्चेंजच्या IPO मध्ये गुंतवणूक करु शकतील
 • परदेशी रिटेलर्ससाठी ३०% स्थानिक सोर्सिंगची अट आता ५ वर्षे पुढे ढकलली.
 • सरकारने आता एअर इंडियामध्ये ४९% FDI ला काही अटींवर परवानगी दिली
 • नौकानयन मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे ड्रेजिंग कॉर्पोरेशन खाजगी क्षेत्राला विकण्याचा विचार सरकारने स्थगित ठेवला आहे.
 • सरकारने स्पेक्ट्रमवर असलेली कॅप वाढवली आहे. याचा फायदा या सेक्टरमधील मर्जर आणी अक्विझिशन मध्ये होईल. IDEA आणी व्होडाफोन मर्जरमध्ये याचा फायदा होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

वर्ल्ड बँकेने भारताची अर्थव्यवस्था वित्तीय वर्ष १९ मध्ये ७.३% ने तर पुढील दोन वित्तीय वर्षात ७.५ % ने वाढेल असे भाकीत केले आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • तंबाखू प्रॉड्क्टसाठी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय डावलून ८५ % वेष्टनावर pictorial WARNING असली पाहिजे असे जाहीर केले.
 • सेबीने नवीन जिंदाल यांना लाच आणी भ्रष्टाचार या दोन्ही प्रकरणात दोषी ठरवले आहे.
 • सेबीने सत्यम केसमध्ये PRICE WATERHOUSE या ग्लोबल ऑडीटिंग फर्मला लिस्टिंग कंपनीचे ऑडीट करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे ऑडीट सर्टिफिकेट देण्यावर २ वर्षेपर्यंत बंदी घातली. तसेच Rs १३ कोटी परत द्यायला सांगितले.
 • सुप्रीम कोर्टाने JP ASSOCIATES ची संपत्ती विकण्यावर स्थगिती दिली. तसेच या केसमध्ये तिसऱ्या पार्टीला समाविष्ट करून घेण्यास नकार दिला. घर खरेदीदारांसाठी वेगळे पोर्टल बनेल असे सांगितले.
 • आयडीया आणी वोडाफोन यांच्या मर्जरला NCLT ने मंजुरी दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सन फार्माच्या हलोल येथील प्लांटची नोव्हेंबरमध्ये तपासणी झाली होती. त्यावेळी ९ त्रुटी दाखवल्या होत्या. आता USFDA फेब्रुवारी २०१८मध्ये तपासणी करणार आहे.
 • HCC ला मेट्रोसंबंधीत Rs ४८४ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • NBCC ला कोटद्वार ते रामनगर रोडसाठी Rs २००० कोटींची ऑर्डर मिळाली
 • ABAN ऑफशोअर या कंपनीने कर्ज देणाऱ्या बँकांना Rs ६० कोटी देण्याची तयारी दाखवली
 • शोभा डेव्हलपर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. याचा परिणाम प्रेस्टीज इस्टेट आणी ब्रिगेड एन्टरप्रायझेस या दक्षिण भारतातील कंपन्यांवर होईल.
 • जे पी इन्फ्राटेकच्या रिअल इस्टेटमध्ये टाटा आणी लोढा यांनी रुची दाखवल
 • कोल इंडियाने कोळशाच्या भावात ९% वाढ केली. ह्या बातमीचा अनुकूल परिणाम कोलइंडियावर आणी प्रतिकूल परिणाम सिमेंट आणी पॉवर, फरटीलायझर सेक्टरवर होईल.
 • वेलस्पन इंडिया ने आपली सबसिडीअरी इंडोस्पन नेक्स्टजेनचे युनिट USA मध्ये सुरु केले.
 • ‘धनुका अग्रीटेक’ या कंपनीने आपले गुरूग्राम युनिट पूर्णपणे बंद करून उत्पादन राजस्थान मध्ये सुरु केले.
 • साउथ इंडियन बँकेचे NPA कमी झाले.
 • IOB आपल्याजवळील सरप्लस फंडाचा उपयोग घाटा काढून टाकण्यासाठी करू शकते. बँकेजवळ Rs ७६५० कोटी शेअर प्रीमियम अकौंटमध्ये आहेत कंपनी कायद्याप्रमाणे याचा उपयोग बोनस शेअर्स, लाभांश यासाठी किंवा इतर विशीष्ट कारणांसाठी करणे कंपनीवर बंधनकारक असते. पण IOB ही बँकिंग रेग्युलेशन कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे IOB वर ही बंधने नाहीत कंपनी आपला Rs ६९७८ कोटींचा घाटा काढून टाकण्यासाठी हे सरप्लस वापरू शकते.
 • चीन डेव्हलपमेंट बँकेने RCOM च्या INSOLVENCY साठी केलेला अर्ज मागे घेतला
 • GMR इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा छत्तीसगढ मधील 1370MW पॉवर प्लांट मध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी अडानी पॉवर, JSW एनर्जी आणी टाटा पॉवर यांनी बीड सादर केल्या.
 • बलासोर ALLOYS ही कंपनी झिम्बाब्वे ALLOYS या कंपनीमध्ये ७०% स्टेक खरेदी करणार आहे. यासाठी कंपनी US $ ९०.73 मिलियन एवढे पेमेंट करेल.
 • एव्हररेडी ही कंपनी कन्फेक्सनरी बिझिनेसमध्ये उतरणार आहे. जेलीची TROPHY बनवणार आहे.
 • अपोलो टायर्स ही कंपनी आंध्र प्रदेशात Rs १८०० कोटी खर्च करून नवीन युनिट सुरु करणार आहे.
 • कोची शिपयार्ड मुंबई येथील शिपयार्ड भाड्याने घेणार आहे.
 • मुंबईमध्ये बीअरच्या किमती ८% ती ९% ने वाढल्या. याचा परिणाम युनायटेड ब्रुअरीजवर होईल.
 • सिमेंटवर इम्पोर्ट ड्युटी लावावी अशी मागणी सिमेंट सेक्टरमधील कंपन्या करत आहेत. JK सिमेंट, JK लक्ष्मी सिमेंट, RAMKO, क्कातीया, सागर, ग्रासिम , अंबुजा, ACC, श्री सिमेंट, अल्ट्राटेक, हैडलबर्ग सिमेंट
 • इंडसइंड बँकेचा तिमाही निकाल चांगला म्हणता येणार नाही. NPA वाढले. भरवश्याच्या म्हशीला अशी गत झाली. मार्केट अशावेळी दया दाखवत नाही.
 • श्री सिमेंट, H T मेडीया व्हेन्चर यांचे निकाल चांगले आले. श्री सिमेंटने Rs २० प्रती शेअर लाभांश दिला.
 • टी सी एस ने Rs ७ प्रती शेअर लाभांश दिला.

कॉर्पोरेट एक्शन

 • नवीन फ़्लुओरिनने नोसिल मधील १% स्टेक (१६ लाख शेअर्स) विकला.
 • JSPL ही १००० कोटींचा QIP आणत आहे. (QIP विषयी सविस्तर माहिती माझ्या ‘ मार्केट आणी मी ‘या पुस्तकात दिलेली आहे).’ओमानमधील बिझिनेसचे लिस्टिंग करणार आहे यातून Rs २००० कोटी मिळतील.
 • युनिकेम LAB Rs ४३० प्रती शेअर या भावाने २.०६ कोटी शेअर्सचा BUY BACK करेल.
 • आरती ड्रग्ज ही कंपनी Rs ८७५ प्रती शेअर या भावाने २.७५ कोटी शेअर्स BUY BACK करेल.
 • IDFC बँक आणी फर्स्ट कॅपिटल याचे मर्जर होईल अशी वदंता आहे.
 • TCS या IT क्षेत्रातील कम्पनीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. कंपनीचा रेव्हेन्यू Rs ३०९०४ कोटी तर नफा Rs ६५३१ कोटी झाला. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन २५.२% राहिले. कंपनीने फ्युचर गायडंस आशादायी दिला. कंपनीला आशा आहे की बिझिनेस ENVIRONMENT सुधारेल, USA मध्ये करकपात जाहीर झाल्यामुळे IT सेक्टरवरचा खर्च वाढेल, रिटेल सेक्टरमध्ये प्रगती होईल आणी एकूण ऑपरेटिंग मार्जिन २६% ते २८% राहील
 • इन्फोसिसया कंपनीला तिसर्या तिमाहीसाठी Rs ३७२६ कोटी नेट प्रॉफीट झाले रेव्हेन्यू Rs१७७९४ कोटी झाला.
 • ऑपरेटिंग मार्जिन २४.३%. ऑपरेटिंग मार्जिनविषयी गायडंस २३% ते २५% दिला.

या आठवड्यात येणारी IPO आणी OFS

 • NMDC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीतील आपला स्टेक सरकारने OFS च्या माध्यमातून स्टेक विकला. याची सपोर्ट प्राईस Rs १५३.५० होती किरकोळ गुंतवणुकीसाठी ५% डीस्कॉउंट ठेवला होता. मंगळवार तारीख ९ जानेवारी २०१८ पासून संस्थागत गुंतवणूकदारांसाठ्री तर बुधवारी तारीख १० जानेवारी २०१८ रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन होता. OFSमधील संस्थागत इन्व्हेस्टरसाठी असलेला कोटा १.६८ वेळा तर रिटेल इंव्हेस्टरसाठी असलेला कोटा ५.४ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला. या OFS मधून सरकारला Rs १२०० कोटी मिळाले.
 • एअर एशिया इंडिया ही प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनी IPO आणण्याचा विचार करत आहे.
 • JSPL ही कंपनी Rs १००० कोटींचा QIP करणार आहे. (QIP विषयी सविस्तर माहिती मी माझ्या ‘मार्केट आणी मी’ पुस्तकात दिली आहे) ओमानमधील बिझिनेसचे लिस्टिंग करणार आहे. यातून कंपनीला Rs २००० कोटी मिळतील.
 • अपोलो मायक्रो सिस्टिम्स ह्या सरंक्षण क्षेत्रात (इलेक्ट्रोनिक सिस्टीम आणी डिझाईन उत्पादन) काम करणाऱ्या आणी एव्हीयॉनिक सिस्टम, मिसाईल उपग्रह सिस्टिम्सना हार्डवेअर पुरवणार्या कंपनीने  आपला IPO १० जानेवारी ते १२ जानेवारी या काळात आणला. प्राईस BAND Rs २७० ते २७५ चा होता मिनिमम लॉट ५० शेअर्सचा होता. IPO  Rs १५६ कोटीचा होता. कंपनीचा गेल्या पांच वर्षातील परफॉर्मन्स चांगला आहे. पण IPO माहाग आहे असे तज्ञाचे मत आहे. हा IPO १३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला
 • NEWGEN SOFTWEAR हा Rs ४२४ कोटींचा IPO १६ जानेवारी ते १८ जानेवारी या काळात ओपन असेल. याचा प्राईस BAND Rs २४० ते Rs २४५ आहे. ही कंपनी BSE आणी NSE वर लिस्ट होईल. ही कंपनी आपले बिझिनेस प्रोसेस MANAGEMENT SOFTWARE, बँकांसाठी, सरकारी संस्थांसाठी बनवते आणी ६० देशात विकते. ही कंपनी १९९२ साली स्थापन झाली.
 • SREI इन्फ्रा त्यांच्या इक्विपमेंट फायनान्सच्या व्यवसायासाठी IPO आणणार आहेत.

मार्केटने काय शिकवले

सरकार ‘SCRAPING POLICY’ आणण्याचा विचार करत आहे. १५ ते २५ वर्षे जुनी असलेली वाह्ने चालवायला परवानगी असणार नाही. जर ही पॉलिसी अमलात आणली तर प्रदूषण कमी होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रद्द झालेल्या वाहनाच्या संख्येइतकी वाहनांची मागणी वाढेल. याचा परिणाम ASHOK LEYLAND, आणी इतर ऑटो उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.

प्रमोटर्सने जर एखाद्या कंपनीत आपला स्टेक वाढवला तर त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येते. कारण प्रमोटर्सच्या स्टेकमधील वाढीत त्यांचा कंपनीच्या उज्वल भविष्यावर विश्वास दिसतो. तर प्रमोटर्सनी स्टेक विकला तर कंपनीच्या चांगल्या भविष्याबद्दल त्यांना विश्वास नाही असे दिसते.

जेट एअरवेजच्या विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांजवळ बेकायदेशीररीत्या ठेवलेले परदेशी चलन सापडले. यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो त्या एअरहोस्टेसवर कंपनीने योग्य ती कारवाई केली या प्रकरणाचा कंपनीच्या आर्थिक बाबींशी काहीही संबंध नाही. शेअर्सचा भाव तात्पुरता कमी झाला. कारण शेवटी शेअरमार्केट हे गुंतवणूकदार आणी ट्रेडर्सच्या अपेक्षांचे आशा निराशेचे प्रतिबिंब असते.

शुक्रवार तारीख १२-०१-२०१८ रोजी PUT /CALL रेशियो १.६६ वरून १.७५ वर गेला. ओव्हर बॉट स्थिती झाली होती FIIची इंडेक्स फ्युचरमध्ये विक्री सुरु आहे. अंदाजपत्रकाची तारीख जवळ जवळ येत असल्यामुळे कॅश मार्केटमध्ये विक्री दिसत नाही. थोडा थोडा फायदा घेत घेत ट्रेड करावा. ज्यावेळी तेजीचे म्युझिक थांबेल तेव्हा तुम्ही खुर्चीत बसलेले असले पाहिजेत आणी धावता धावता पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मार्केट कधीही पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे पण त्यासाठी तात्कालिक कारण कोणते असेल याचा नेम नाही. सुप्रीम कोर्टाच्या चार वर्तमान न्यायाधीशांनी प्रेस कॉनफरंस घेऊन काही गोष्टी सांगितल्या याचा शेअर मार्केटशी काहीही संबंध नसतानाही मार्केट ३०० पाईंट पडले. त्यामुळे सावध रहा संयम ठेवा एवढेच सुचवावेसे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४५९२ NSEचा निर्देशांक निफ्टी १०६८१ तर बँक निफ्टी २५७४९ वर बंद झाले.

 

Advertisements

One thought on “आठवड्याचे समालोचन – घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केटच्या पिचवर कसोटी क्रिकेट की एक दिवसाचा सामना! – १५ जानेवारी २

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s