आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केटच्या पिचवर कसोटी क्रिकेट की एक दिवसाचा सामना! – १५ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेअर मार्केटच्या पिचवर कसोटी क्रिकेट की एक दिवसाचा सामना! – १५ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी २०१८

हा आठवडा फार मजेशीर गेला. क्रिकेटच्या सामन्याप्रमाणेच जाणवले एकदा का वन डे किंवा २०-२० ची सवय लागली की माणूस आपण कसोटी सामना खेळत आहोत हेच विसरून जातो. त्यामुळे कसोटी सामन्याच्या शौकिनांनाही मजा येत नाही. आणी वन डेच्या प्रेक्षकांनाही मजा वाटत नाही. नुसता गोंधळ. मी तर म्हणेन ‘गाढवांचा  गोंधळ आणी लाथांचा सुकाळ’ यात ना बुल्सचा फायदा झाला ना बेअर्सचा क्षणात मार्केट वरती तर क्षणात खाली. त्यामुळे स्टॉप लॉस हिट होत होते. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनाही समजले नाही. या गाढवांच्या गोंधळातील लाथा मात्र किरकोळ गुंतवणूकदारांना मार्केट जेव्हा अचानक पडायला लागेल तेव्हा असह्य होतील. सार्वकालिक कमाल भावाला खरेदी केलेले शेअर्स आणखी वाढतील ही आशा, एकामागून एक लोअर सर्किट लागायला लागली की भयाण निराशेत रुपांतरीत होते. मार्केटमध्ये सर्वत्र महागाई असल्यामुळे रिटेल गुंतवणूकदार त्याला परवडेल असेच शेअर्स घेतो आणी नंतर तो भाव येण्यासाठी कमीतकमी ५ वर्षे तरी वाट बघत बसतो. आता शेअर्स खरेदी करायचे तर लवकरात लवकर विकून मोकळे व्हा. होत असलेला नफा घरी आणा. नाहीतर कमाल भावाला खरेदी केलेले शेअर्स किमान भावाला विकण्याची वेळ येईल. तेव्हा वन डे चा सामना चालू आहे कसोटी सारखे खेळू नका. आपला पवित्रा बदला हेच सांगणे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मधील कर कपातीचा फायदा घेण्यासाठी आता भारतीय आंतरराष्ट्रीय फार्मा कंपन्या USA मध्ये एकतर नवीन युनिट स्थापन करण्याचा विचार करत आहेत किंवा USA मधील फार्मा कंपन्या विकत घेण्याचा विचार करत आहेत. यामध्ये सन फार्मा, कॅडिला हेल्थकेअर, ऑरोबिंदो फार्मा आणी टॉरंट फार्मा आघाडीवर आहेत. यात टॉरंट फार्माने USA मधील BIO-PHARM ही जनरिक आणी OTC ड्रग्स बनवणारी कंपनी खरेदी केली.
 • USA ने स्टील प्लेट आणी स्टील पाईप कॅप वर ANTI DUMPING ड्युटी बसवली ही बातमी भारतातून ह्या वस्तू निर्यात करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रतिकूल आहे.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने INTERNATIONAL टर्मिनेशन चार्ज Rs ०.५३ वरून ०.३० पैसे केला ग्रे रूट तर्फे केल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय CALLS ना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाउल उचलले.
 • सरकार प्रत्येक नागरिकाला Rs ८ लाखाची विमा पॉलिसी द्यावी असा विचार करत आहे.
 • सरकारने आपण Rs ५०००० कोटी अतिरिक्त कर्ज घेण्याऐवजी फक्त Rs २०००० कोटी अतिरिक्त कर्ज घेऊ अशी घोषणा केली यामुळे BOND YIELD कमी झाले त्यामुळे बँकांची स्थिती सुधारली.
 • सरकार आपले वित्तीय वर्ष २०१९ चे डायव्हेस्टमेंटचे लक्ष्य वाढवणार आहे. सरकार ३६ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये डायव्हेस्टमेंट (यात एअर इंडिया, द्रेजिंग कॉर्पो, पवन हंस) करणार आहे तर ६ कंपन्यांचा IPO आणणार आहे. सरकार भारत -२२ ETF चा दुसरा हप्ता आणण्याची शक्यता आहे.
 • सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमधील FDI मर्यादा २०% वरून ४९% वर् तर खाजगी बँकांमधील FDI मर्यादा ७४% वरून १००% करण्याच्या विचारात आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • नोव्हेंबर २०१८ साठी IIP चे आकडे आले. या महिन्यात FACTORY उत्पादन ८.४% ने वाढले. ही गेल्या २५ महिन्यातील कमाल वाढ आहे. मुख्यत्वे कॅपिटल गुड्स, इंटरमिजीअरी गुड्स, CONSTRUCTION गुड्स, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. २३ पैकी १५ उद्योगात वाढ दिसली. त्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धात औद्योगिक वाढीला चालना मिळेल अशी लक्षणे दिसत आहेत.
 • डिसेंबर २०१८ या महिन्यात CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ५.२% ने (नोव्हेंबर मध्ये ४.८८%) वाढले ही १७ महिन्यातील कमाल वाढ आहे. अन्नधान्याची महागाई ४.९६% तर इंधनाची महागाई ७.९% तर हौसिंग महागाई ८.२५% वाढली या CPI मधील वाढीमुळे (जी RBI च्या ४% अंदाजापेक्षा) जास्त आहे आता RBI रेट कट करण्याची शक्यता दुरावली आहे. तसेच सरकारला फिस्कल डेफिसिट मर्यादेत ठेवण्यासही  कठीण जाईल.
 • डिसेंबर २०१७ या महिन्यात WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) ३.५८% ने वाढला (नोव्हेंबर २०१७ मध्ये ३.९३% ने वाढला होता.) अन्न धान्य भाजीपाला इंधन यांच्या किमती स्थिरावल्यामुळे यावेळी WPI मध्ये कमी वाढ झाली.
 • डिसेंबर २०१७ मध्ये भारताची निर्यात १२.३% ने वाढून US $४२७ बिलियन झाली. परंतु सोने आणी क्रूड यांची आयात वाढल्यामुळे आयात २१.१% ने वाढून US $४ ४१.९ बिलियन झाली. ट्रेड डेफिसिट US $ १४.८८ बिलियन झाली. इंजिनिअरिंग गुड्स, जेम्स & ज्युवेलरीज, केमिकल्स ड्रग्स आणी फार्मास्युटिकल यांच्या निर्यातीत वाढ झाली.

RBI, SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • BANKRUPTCY कोर्टाच्या कोलकाता बेंचने आधुनिक ग्रूपच्या कंपन्यांना ९० दिवसाची मुदतवाढ दिली
 • GST कौन्सिल ने आपल्या १८ जानेवारी २०१८ च्या बैठकीत २९ गुड्सवरील GST कमी केला आणी ५३ सेवांवरील GST करात कपात केली. या मध्ये जुन्या आणी वापरलेल्या मोटार कार्स, बायोडिझेल आणी बायोपेस्टीसाइद्स, ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम्स,मेकॅनिकल स्प्रेयर्स, सायंटीफिक आणी टेक्निकल INSTRUMENTS, हळद आणी मेहेन्दिची पावडर, हिअरिंग एड्स, हिरे आणी मौल्यवान खडे, प्रायव्हेट LPG यांच्यावरील GST कमी केला. तर सिगारेट्स फिल्टर्स आणी राईस bran,  वरील GST वाढवला. तर शिंपीकाम, चर्मोद्योगातील जॉब वर्क, संगीत नृत्य नाटक यांचे थींएटर कार्यक्रम, ऑन लाईन शैक्षणिक संस्थाच्या नियतकालीकांची वर्गणी., स्वस्त घरबांधणी, शुगर कॅन्डी यावरील GST मध्ये कपात केली. तसेच आणखी कोणत्या गुड्स आणी सेवां GSTच्या परिघात आणता येतील तसेच GST रिटर्न भरण्याची प्रक्रिया सोपी कशी करता येईल इत्यादी गोष्टींवर चर्चा झाली.
 • इंडियन फार्मास्युटिकल कंपन्या आपला कच्चा माल चीन आणी इतर देशातून आयात करतात. हा कच्चा माल अपेक्षित मानकांप्रमाणे नसल्यामुळे आता या कंपन्यांच्या उत्पादन युनिट्सची तपासणी केली जाईल.
 • SAT (SECURITIES APPELLATE TRIBUNAL) ने PWCवर सेबीने घातलेली बंदी उठवण्यास नकार दिला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टी सि एस या कंपनीने US$ २ बिलियनपेक्षा जास्त रकमेच्या सिस्टीम सोल्युशन्स पुरवण्यासाठी ट्रान्सअमेरिका या कंपनी बरोबर करार केला. या कराराद्वारे TCS ने अतिशय स्पेसिअलाइझ्ड थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रशासन बिझिनेसमध्ये पदार्पण केले. तसेच टी सी एस ने डीजीटल सर्विस पुरवण्यासाठी  मार्क स्पेन्सर PLC बरोबर करार केला.
 • ब्राझीलच्या REAL या चलनाची किमत कमी झाल्यामुळे UPL या कंपनीच्या उत्पन्नात लक्षणीय घट होईल. कारण UPL चा २०% बिझिनेस ब्राझील बरोबर आहे.
 • सुझलॉन या कंपनीने तारण ठेवलेले १६ कोटी शेअर्स सोडवले.
 • YAARAA ASA या नॉर्वेजियन कंपनीने टाटा केमिकल्सच्या युरिया बिझिनेसचे अक्विझिशन पूर्ण केले.
 • सेलने चार शहरांमध्ये लोखंडी सळ्यांचे भाव वाढवले.
 • ICICI बँकेला मॉर्गन स्टेनलेने आपल्या मॉडेल बँक पोर्टफोलीओमध्ये सामील केले. HDFC बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने QIP आणी प्रेफरन्स इशूला मंजुरी दिली.
 • फेडरल बँकेचा नफा वाढला पण NPA वाढले.
 • ‘MAIN LAND CHINA’ या नावाने स्पेशालिटी रेस्टॉरंटने नवीन हॉटेल सुरु केले.
 • GNFC च्या दाहेज प्लांट मध्ये GAS लिकेज असल्यामुळे हा प्लांट काही काळासाठी बंद करावा लागला.
 • HUL ने आयुष आणी इंदुलेखा हे ब्रांड भारतभर लागू केले. HUL चे तिमाही निकाल चांगले आले.HUL चे VOLUME खूप वाढले. परंतु त्यांनी या प्रगतीच्या स्थिरावण्यासाठी आम्हाला आणखी दोन तिमाही वाट पहावी लागेल असे सांगितले.
 • बंगालमध्ये ‘SEA PLANE’ उत्पादन सुरु करण्याची स्पाईस जेटची योजना आहे.
 • झेन्सार टेक्नोलॉजी, हिंदुस्थान झिंक, अडाणी पोर्ट यांचे निकाल समाधानकारक आले.
 • अल्ट्राटेक सिमेंटचे निकाल पेटकोक वरील बंदी आणी कच्च्या मालाच्या भावातील वाढ यामुळे अपेक्षेपेक्षा कमी आले परंतु त्यांनी चौथ्या तिमाहीसाठी चांगला गायडंस दिला आहे.
 • USA मधील पेटंटचा वाद सन फार्माने सोडवला.
 • सिम्फनीच्या एअरकुलरच्या ‘CLOUD’ मॉडेलला दक्षिण आफ्रिकेत पेटंट मिळाले.
 • पिट्टी LAMINATION या कंपनीने औरंगाबाद येथे कमर्शियल उत्पादन सुरु केले.
 • 5 पैसा कॅपिटलला कमोडीटी ट्रेडिंगसाठी सेबी आणी MCX ची परवानगी मिळाली.
 • हेल्थकेअर ग्लोबलची FDI मर्यादा २४% वरून १००% केली.
 • दिलीप बिल्डकॉन ला NHAI कडून Rs ७३० कोटीची ऑर्डर मिळाली.
 • भारती एअरटेल या कंपनीचे निकाल असमाधानकारक लागले. टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा आणी इंटरकनेक्शन चार्जेस मधील कपात ही कारणे दिली. IDFC बँकेचा, विप्रोचा तिमाही निकाल असमाधानकारक आला.
 • HDFC बँक आणी ITC, HCL टेक, कोटक महिंद्र बँक, ज्युबिलंट फूड्स, येस बँक, यांचे तिमाही निकाल त्यांच्या लौकिकाला साजेसे आले. रिलायंस इंडस्ट्रीजचा नफा २५% ने वाढला आणी रिलायंस JIO टर्नअरौन्ड झाली.
 • A TO Z या कंपनीला कर्जाचे शेअर्समध्ये रुपांतर करण्याची परवानगी मिळाली. अलाहाबाद बँक कर्ज वसुलीसाठी CHEMROK इंडस्ट्रीची तर IDBI बँक लूप मोबाईल्सची मालमत्ता विक्रीस काढणार आहे.
 • भेलला महाराष्ट्रामध्ये 660MV स्टेशनसाठी Rs २८०० कोटींची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • बियाणी ग्रुपची कॅपिटल फर्स्ट आणी IDFC बँक यांनी आपल्या मर्जरची घोषणा केली. यामुळे कॅपिटल फर्स्टला बँकिंग सेक्टरमध्ये प्रवेश करता येईल आणी IDFC बँकेकडे असलेले लो कॉस्ट डीपॉझीट आणी शाखा कॅपिटल फर्स्टला उपलब्ध होतील. तर IDFC बँकेला कॅपिटल फर्स्टच्या SME सेक्टर, ग्राहक लोन क्षेत्राचा फायदा होईल. यामुळे मर्जड कंपनीला IDFC BANK आणी कॅपिटल फर्स्ट यांच्यातील सिनर्जीचा फायदा होईल. म्हणजेच ही दोघांच्याही दृष्टीने ‘WIN WIN SITUATION’ आहे.   IDFC बँकेच्या १३९ शेअर्सच्या बदल्यात कॅपिटल फर्स्टचे १० शेअर्स मिळतील. हे मर्जर १ एप्रिल २०१८ पासून लागू होईल. नवीन कंपनीचा भार वैद्यनाथन संभाळणार आहेत.
 • BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी १५.०९ लाख शेअर्स Rs ११०० प्रती शेअर या किमतीपर्यंत BUY BACK करण्यास मंजुरी दिली. कंपनी एकूण Rs १६६ कोटी ‘BUY BACK’ वर खर्च करेल.
 • ला ओपाला ह्या कंपनीने बोनस शेअर्स इशुवर विचार करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी बैठक बोलावली आहे.
 • IDBI बँक सरकारला Rs २७३० कोटींचे शेअर्स अलॉट करील.
 • आलेम्बिक फर्माने शेअर्स ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बैठक बोलावली आहे.
 • सविता ऑईल या कंपनीची ‘BUY BACK’वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंगळवार २३ जानेवारी २०१८ रोजी मीटिंग आहे.

IPO

 • रेल इंडिया टेक्निकल आणी इकॉनॉमिक सर्विसेस LTD या कंपनीने IPO साठी सेबीकडे अर्ज दिला.
 • अंबर एन्टरप्रायझेस या AC आणे AC चे पार्टस आणी इतर व्हाईट गुड्सचे पार्टस बनवणाऱ्या कंपनीचा IPO १७ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान ओपन होता. प्राईस BAND Rs ८५५ ते Rs ८५९ होता. मिनिमम लॉट १७ शेअर्सचा होता. हा IPO १६५ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • अपोलो मायक्रोसिस्टीमचा IPO २४८ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला तर रिटेल कोटा ४० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग २२ जानेवारी २०१८ रोजी होईल.
 • टाटा स्टील्सच्या Rs १२८०० कोटीच्या राईट्स इशुला परवानगी मिळाली.
 • अडानी GAS ही कंपनी BSE आणी NSE वर लिस्ट होईल अडाणी GAS डीस्ट्रीब्युशनचा कारभार पुन्हा सुरु करत आहेत.

मार्केटने काय शिकवले

मंगळवार तारीख १६ ०१ २०१८ रोजी PUT/CALL रेशियो १,७८ झाला. या रीशियोचा कमाल स्तर १.८२ आहे अशा परिस्थितीत VOLATALITY वाढते. VIX वाढत आहे सावध राहावे. बँक निफ्टी Rs २५ डीसकौंट वर ट्रेड होतो आहे. याचा अर्थ वरील स्तरावर विक्री होत आहे. ट्रेड डाटा खराब आल्यामुळे रुपया घसरला. क्रूड US $ ७० च्या पातळीवर राहिले. इतके दिवस रुपयाची किमत कमी होत नव्हती त्यामुळे क्रूडचा परिणाम दिसत नव्हता. रुपया घसरायला लागल्या बरोबर मार्केटही घसरू लागले. आणी सर्वात जास्त मिडकॅप निर्देशांक ४०० पाईंट पडला. यात नवीन काहीच नाही मार्केट पडू लागले की मिडकॅप निर्देशांक पडण्याचे प्रमाण जास्त असते. बर्याच मिडकॅप शेअर्सला लोअर सर्किट लागते. आज फिअर आणी ग्रीड मीटर ४३ होते.

बुल्स आणी बेअरची लढाई फार सुंदर रंगली. सरशी झाली बुल्ल्स्ची. काही शेअर्समध्ये कॉन्फिडन्स तर काही शेअर्स मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स दिसून आला. सरकारच्या अतिरिक्त कर्ज कमी घेण्याच्या निर्णयामुळे मार्केटला गती आली आणी मार्केटने नव्या दमाने जोराची उसळी मारली.

नेहेमी चांगला निकाल लागला की त्या शेअरची किमत वाढते तसेच जर निकाल असमाधानकारक असला की कमी होते. पण यावेळी मात्र असे आढळले नाही. निकाल लागल्यानंतर बहुतेकवेळा शेअर पडले. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या शर्यतीत खरच आपण शेअर्सचे भाव इतके वाढवून बसलो की आता चांगला निकाल, ‘BUY BACK’ असो नाहीतर बोनसची घोषणा होवो शेअर्सची किंमत कमी होते. वाढलेली किंमत जास्त काळ टिकत माही.

आपण मात्र सावध रहा. चांगल्या कंपनीचे शेअर्सच (भले शेअर्सची संख्या कमी असो) खरेदी करा. येणाऱ्या SMS वर अवलंबून किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन आपला कष्टाने कमावलेला पैसा गुंतवू नका. शक्य असल्यास मार्केट मधून वेळीच होत असलेला फायदा घेवून बाहेर पडा. सध्याचे मार्केट ट्रेडिंग मार्केट आहे गुंतवणुकीसाठी  योग्य नव्हे.

अंदाजपत्रकाचा बिगुल वाजतो आहे. फार्म प्रोडक्ट्सची आयात वाढली आहे आणी निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात या सबंधी एखादी योजना येईल असे वाटते. पण यावेळी अनिश्चितता आहे GST च्या रेटमध्ये सातत्याने बदल होत आहेत. राज्य सरकारांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. आणी GSTचे कलेक्शन किती असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकार दरबारीही निश्चितता नाही. गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक याची बरोबर निवड केली तरी गोलंदाज फलंदाजासारखा आणी फलंदाज गोलंदाजासारखा कधी खेळेल हे माहीत नाही. शेवटी सामना जिंकतो की हरतो याच्याशी मतलब!

आज BSE सेन्सेक्स, NSE निफ्टी आणी बँक निफ्टी इंट्राडे कमाल स्तरावर होते. शेवटी सामना जिंकलाच! यशासारखे दुसरे सुख नाही हेच खरे!

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५११ NSE निर्देशांक निफ्टी १०८९४ तर बँक निफ्टी २६९०९ वर बंद झाले.

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केटच्या पिचवर कसोटी क्रिकेट की एक दिवसाचा सामना! – १५ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी २०१८

 1. sagar baravkar

  आम्हाला इन्व्हेटमेंट करण्या पूर्वी हि माहिती कोठे मिळेल हे कृपा करून
  सांगावे मंझे share मार्केट मध्ये इन्वेसमेंट करणे सोपं जाईल.

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये रंगलेली ‘RALLY’ – २२ जानेवारी २०१८ ते २६ जानेवारी २०१८ | Stock Market आण

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s