Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये रंगलेली ‘RALLY’ – २२ जानेवारी २०१८ ते २६ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या आठवड्यात मार्केटमध्ये खूप मजा आली. VERTICAL RALLY सुरु झाली. प्रथम HDFC बँक, आणी ICICI बँक यांनी नंबर लावला. त्यानंतर ONGC रिलायंस इंडस्ट्रीज यांनी नंबर लावला. त्यानंतर मेटल आणी IT क्षेत्रातील शेअर्स वाढू लागले. म्हणजे एकाने ‘BATTON’ दुसर्याकडे द्यायचा आणी दुसर्याने दुसरा टप्पा पुरा केल्यावर तिसर्याकडे देत ‘RELAY’ पुरा करायचा. त्यामुळे सेन्सेक्सने ३६००० च्या वर निफ्टीने १११०० च्या वर तर बँक निफ्टीने २७००० च्या वर बस्तान बसवले. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या डावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ च्या उद्घाटनाच्या भाषणात परदेशी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आपण ‘रेड टेप’ काढून त्यांच्या साठी ‘रेड कार्पेट’ घातले आहे आणी भारतामध्ये त्यांना ‘वेल्थ विथ वेलनेस’ , ‘हेल्थ विथ WHOLENESS’ आणी ‘प्रॉस्पेरीटी विथ PEACE’ मिळेल असे आश्वासन देत भारताच्या आर्थिक परिस्थितीचे,  प्रगतीचे सुंदर चित्र रेखाटले. भारताने जवळ जवळ सर्व औद्योगिक क्षेत्रांमध्ये ऑटोमटीक रूटने FDI ला परवानगी दिली आहे असे सांगितले.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने आपण एकूण Rs ८८००० कोटी (Rs ८०००० कोटींचे रीकॅपिटलायझेशन BONDS आणी Rs ८१३९ कोटी अंदाजपत्रकातील तरतूद) २० सरकारी बँकाना देऊ असे जाहीर केले. सरकारने या बँकांना Rs १०३१२ कोटी मार्केटमधून उभारायला सांगितले. यात PCA (प्रॉम्प्ट करेकटीव एक्शन) खाली असलेल्या ११ बँकांना Rs ५२३११ कोटी तर ९ नॉन PCA बँकांना ३५८२८ कोटी प्रगतीसाठी भांडवल पुरविण्याची घोषणा केली. PCA खाली असलेल्या बँकांमध्ये IDBI ला सगळ्यात जास्त (Rs १०६१० कोटी) तर नॉन PCA बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला Rs ८८०० कोटी भांडवल पुरवले जाईल.
 • याबरोबरच सरकारने भांडवल दिलेल्या बँकांना एक ३० कलमी कार्यक्रम राबवण्यास सांगितले आहे. यामध्ये ग्राहकांप्रती प्रतिसाद, जबाबदार बँकिंग, क्रेडीटमध्ये वाढ, उद्योगांबरोबर मैत्री आणी सौहार्दपूर्ण नाती, सर्वसमावेशक आणी डिजिटल टेक्नोलॉजी समवेत बँकिंग सेवांची अपेक्षा सरकारने प्रगट केली आहे. याबरोबरच अशी सेवा देणारा कर्मचारी वर्ग तयार करून स्वतःची ‘BRAND VALUE’ प्रत्येक सरकारी बँक तयार करेल असे सुचविले आहे याबरोबरच Rs २५० कोटीपेक्षा जास्त कर्जांचे परिचालन करण्यासाठी आणी NPA साठी वेगळा विभाग उघडण्यास सांगितले.
 • बँकांनी आपले नॉनकोअर ASSET विकावेत आणी परदेशी शाखांच्या बाबतीत साकल्याने विचार करून निर्णय घ्यावा. कनसॉर्शियममध्ये प्रत्येक बँकेने किमान १०% कर्ज द्यावे असे सुचवले.
 • हे भांडवल सरकारने पुरविल्यामुळे सरकारी बँका आता Rs ५ लाख कोटी अधिक कर्ज देऊ शकतील असे सरकारने जाहीर केले.
 • या सर्व उपायांमुळे सरकारी बँका आता खाजगी बँकांशी स्पर्धा करू शकतील अशी सरकारला आशा आहे. त्यामुळे तात्पुरते सरकारी बँकांचे शेअर्स वाढले आणी खाजगी बँकांचे शेअर्स कमी झाले.
 • आशा करू या की आता आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला हसतमुख नाहीतरी सर्व सेवा समाधानकारकरीत्या सरकारी बँकेत मिळतील.
 • सरकारने राज्य सरकारांना इंडस्ट्रीयल डीस्प्यूट कायद्यात काही सुधारणा करण्यास सांगितले आहे. त्यात फिक्स्ड लेबर कॉन्ट्रकट आणी कारखाना बंद करण्याच्या काही तरतुदी सोप्या करायला सांगितले आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की यामुळे ‘EASE OF DOING BUSINESS’ मध्ये सुधारणा होईल.
 • सरकारने डायव्हेस्टमेंटचे लक्ष्य Rs ९२००० कोटी केले.
 • सरकार IFCI ला Rs १०० कोटी देईल. IFCIने त्यांचा ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील स्टेक विकण्यासाठी बोली मागविल्या आहेत.
 • सरकार कोल इंडियाला आणखी ११ खाणी देणार आहे.
 • GST मधून अपेक्षित पैसा गोळा होण्याची शक्यता कमी असल्यामुळे सरकार इम्पोर्ट ड्युटीचे अस्त्र बाहेर काढण्याची शक्यता आहे. यामुळे स्वदेशी कंपन्याना सरंक्षण मिळेल असे वाटते.
 • सरकार बॉयलरवर ‘ANTI DUMPING DUTY’ लावण्याच्या विचारात आहे. याचा परिणाम L& T, भारत बिजली, थर्मक्स, भेल, त्रिवेणी टर्बाईन्स, ABB, EMKO या कंपन्यांवर होईल.
 • सरकार प्लास्टिक बनवण्यासाठी लागणार्या केमिकल्सवर ‘ANTI DUMPING’ ड्युटी लावण्याच्या विचारात आहे. याचा परिणाम नौसिल, टाटा केमिकल्स यांच्यावर होईल.
 • ‘उडान’ या योजनेतून दरभंगा, हरिद्वार, कारगिल, झ्लाहाबाद आणी इतर अनेक मध्यम आणी छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्याचा सरकारचा विचार आहे. यात विमान सेवेबरोबरच हेलिकॉप्टर सेवेचाही समावेश आहे.
 • अंदाजपत्रकीय अधिवेशनात इलेक्ट्रिसिटी संशोधन विधेयक येण्याची शक्यता आहे.
 • बालाजी अमाइन्स या कंपनीला लागणारे केमिकल्स चीन, सौदी अरेबिया, जर्मनी येथून ‘DUMP’ होत असल्याची दखल सरकारने घेतली आहे.
 • सरकारने निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी १०२ वस्तूंवरील ड्युटी DRAWBACK चे दर वाढवले. यात चामडे, मच्छी, धागा, लोकर, टायर यांचा समावेश आहे.
 • सरकारने आता जर तुमच्या कंपनीचे ऑथोराईजड कॅपिटल Rs १० लाखांपेक्षा कमी असेल तर कंपनी इन्कॉर्पोरेट करण्यासाठी फी आकारली जाणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या कंपनीसाठी नाव राखून ठेवू शकता असे सांगितले.

SEBI, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • GST कौन्सिलने २५ जानेवारी २०१८ पासून अफोर्डेबल हौसिंग वरील GSTच्या दरात १२% वरून ४% कपात करून ८% केला.
 • NSE ने असे जाहीर केले आहे की मार्केटमध्ये पोझिशन लिमिट वापराविषयी वेगवेगळ्या पातळ्यांवर (उदा ७५% ८०%) गुंतवणूकदारांना आणी ट्रेडर्सना माहिती देऊन सावध केले पाहिजे म्हणजे ते बेसावध न राहता सेबीने किंवा एक्स्चेंज ने आपली REGULATORY आणी SURVEILLANCE एक्शन सुरु करण्याआधी आपल्या पोझिशन विषयी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. पोझिशन लिमिट्ससाठी मार्जिन वाढवले. ९०% लिमिट युटीलायझेशन असेल तर ३००% मार्जीन ठेवावे लागेल असे जाहीर केले. F & O मार्केट मधील VOLATILITY कमी करण्यासाठी NSE ने हे पाउल उचलले आहे.
 • RBI ने बीटकॉईन आणी इतर CRYPTO CURRENCY मध्ये व्यवहार करणार्या कंपन्यांशी व्यवहार करणार्या बँकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. उदा ZEBPAY, UNOCOIN, COINSECURE, BCTX इंडिया

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इंटरग्लोब, फायझर, OMAX ऑटो (ही कंपनी टर्न अराउंड झाली), फोर्स मोटार, पिडीलाईट, GNFC, वक्रांगी, मारुती, EDELWIESS. मोतीलाल ओसवाल, FACT, अव्हेन्यू सुपरमार्केट यांचे निकाल चांगले आले.
 • कॅनरा बँक, आयडीया सेल्युलर,बायोकॉन,KPIT, युनायटेड स्पिरीट यांचे तिमाही निकाल असमाधानकारक होते
 • जे पी असोसिएट्सने कोर्टात Rs १२५ कोटी जमा केले.
 • प्रीकॉल या कंपनीने इलेक्ट्रिक WATER पाईप साठी चीनच्या कंपनी बरोबर करार केला.
 • इन्फोसिसने A S WATSON या कंपनीबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला.
 • बजाज कॉर्पने ‘जस्मिन हेअर ऑईल’ हे नवीन प्रोडक्ट बाजारात आणले.
 • कल्पतरू पॉवरला Rs ८७० कोटींची मिळाली.
 • M मेटलनी जमिनीचां एक वाद सोडवला
 • NHAI च्या ओडिशामधील प्रोजेक्टसाठी दिलीप बिल्डकॉनने Rs १८५२ कोटीची बोली लावली.

कॉर्पोरेट एक्शन

 • टाटा स्टील १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २९१८ दरम्यान Rs १२८०० कोटींचा Rs ५१० प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणत आहे.
 • ONGC ही कंपनी HPCL मधील सरकारचा ५१.१२ % स्टेक Rs ४७३.९३ प्रती शेअर या भावाने Rs ३६९२० कोटीला खरेदी करणार आहे. हे डील या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरे होईल. हा स्टेक खरेदी करण्यासाठी ONGC त्यांच्या BALANCESHEET मधील कॅश वापरेल आणी सात बँकांकडून कर्ज घेईल.
 • बँक ऑफ बरोडा आपला NSE मधील स्टेक (४३.९ लाख शेअर्स) प्रती शेअर्स फ्लोअर प्राईस Rs ९०० भावाला विकणार आहे.
 • IOC आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या ३० जानेवारीच्या बैठकीत बोनस इशूवर विचार करण्याची शक्यता आहे.
 • LIC ने TCS मधील आपला स्टेक वाढवला.
 • अलेम्बिक प्रती शेअर Rs ८० या भावाने १.०२ कोटी शेअर्स ‘BUY BACK’ करेल.
 • सविता ऑईल Rs १६०५ प्रती या भावाने शेअर ‘BUY BACK’ करेल.
 • BEL या कंपनीने ३० जानेवारी २०१८ रोजी शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. (माझ्या मार्केट आणी मी या पुस्तकामध्ये बोनस ‘BUY BACK’ राईट्स इशू बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.)
 • कॅनरा बँक आपला कॅनफिना होम्स मधील स्टेक विकणार आहे

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO आणी लिस्टिंग

 • NCC ने QIP Rs १२९.४७ प्रती शेअर या भावाने तर MAJESCO या कंपनीने Rs ५३२ प्रती शेअर या भावाने QIP आणला.
 • भारत डायनामिक्सने IPO साठी अर्ज केला.
 • न्यू जेनच्या शेअर्स चे लिस्टिंग सोमवार २९ जानेवारी २०१८ रोजी होईल.
 • GALAXY SURFACTANTS लिमिटेड या कंपनीचा ६३३१६७० शेअर्स साठी IPO २९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ओपन राहील. प्राईस BAND Rs १४७० ते Rs १४८० आहे. मिनिमम लोट १० शेअर्सचा आहे.

तांत्रिक विश्लेषण

निफ्टीमध्ये गुरुवारी ‘HANGING MAN’ हा PATTERN तयार झाला. किमती वाढल्यावर पुरवठा आल्यामुळे विक्री होत होती पण भाव कमी झाल्यावर पुन्हा खरेदीही होत होती. त्यामुळे निफ्टी ११००० च्यावर राहिला. मार्केटच्या वाढीची दिशा आणी वेग याविषयी अनिश्चितता गुंतवणूकदारांच्या मनात आहे असे जाणवले.

मार्केटने काय शिकवले

VRL लॉजिस्टिक्सने अशोक LEYLAND या कंपनीला १२०० ट्रकसाठी Rs ३५० कोटींची ऑर्डर दिली, नेहेमी ज्या कंपनीला ऑर्डर मिळाली असेल त्या कंपनीचा शेअर वाढतो येथे मात्र VRL लॉजिस्टीक्सचा शेअर Rs २२ ने वाढला. कारण त्यांचा बिझिनेस फार वेगाने वाढतो आहे हे या ऑर्डरवरून स्पष्ट झाले

इंडेक्स फ्युचर्समध्ये विक्री पण स्टॉक फ्युचर्समध्ये खरेदी दिसते आहे. याचा अर्थ इंडेक्स वाढण्याचा वेग कमी होईल पण त्याचवेळी रिलायंस, TCS सारख्या शेअर्समध्ये खरेदी दिसते आहे.

बँक निफ्टीमध्ये रोलओव्हर जास्त आहे. त्यामानाने निफ्टी मध्ये रोल ओव्हर कमी आहे. बँक निफ्टी मध्ये तेजीची शक्यता दिसते आहे.

F & O ट्रेडिंग BAN मध्ये कोणते शेअर्स आहेत आणी BAN मधून कोणते शेअर्स बाहेर पडणार आहेत. हे पहावे लागते. जर शेअर्स ट्रेडिंग BAN मध्ये असतील तर फ्युचर्समध्ये शॉर्ट करता येत नाही.

बहुतेक कंपन्यांचे निकाल डीमॉनेटायझेशन आणी GST याचे परिणाम कमी झाल्यामुळे आणी गेल्या तिमाहीचे निकाल कमी असल्यामुळे तुलनात्मक चांगले दिसत आहेत. US $ १=Rs ६३.५२ हा विनिमय रेट असल्यामुळे रुपया मजबूत होत आहे. पण US$ कमजोर होत असल्यामुळे सोने चांदी महाग, क्रूड ३७ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे लॉंग वीक एंड आहे, पुढील आठवड्यात अंदाजपत्रकाची धामधूम असेल त्यामुळे मार्केट VOLATILE असेल. अशा मार्केटमध्ये खरी परीक्षा लागते ती ट्रेडर्सची. अशावेळी आपण कोणत्याही शेअर्समध्ये कमी प्रमाणात पोझिशन घ्यावी आणी निकृष्ट दर्जाच्या शेअर्समध्ये नफा होत असेल तर ते शेअर्स विकून नफा घरी आणावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०५० वर तर NSE निर्देशांक निफ्टी ११०७० वर आणी बँक निफ्टी २७४४५ वर बंद झाले.

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये रंगलेली ‘RALLY’ – २२ जानेवारी २०१८ ते २६ जानेवारी २०१८

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -अंदाजपत्रकाची सुनामी – २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s