आठवड्याचे-समालोचन – रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग – ५ फेब्रुवारी २०१८ ते ९ फेब्रुवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा आठवडा वादळी गेला. जग जवळ आले आहे याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. शेजारच्या इमारतीत आग लागल्यावर आपल्यालाही धग लागतेच. पूर्णपणे होरपळले गेलो नाही तरी थोडाफार परिणाम होतोच. तसे सध्या झाले आहे.USA मधील मार्केटमध्ये मंदी आहे. ‘BOND YIELD’ वाढते आहे त्यामुळे व्याजाचे दर वाढतील, महागाई वाढेल ही कारणे मंदीसाठी दिली जात आहेत. भारताच्या दृष्टीने क्रूडचा दर कमी होत आहे ही जमेची बाजू आहे.पण याकडे सध्या तरी कोणाचेही फारसे लक्ष नाही. २०० Day Moving Average निफ्टी १००४० आहे. या ठिकाणी मार्केट स्थिर होईल असे वाटते. म्युच्युअल फंडवाले सायकल चालवतील आणी शेतकरी फेरारी घेऊन फिरतील असे दृष्य दिसण्याची शक्यता अंदाजपत्रकाच्या स्वरूपावरून जाणवत आहे. भारतात निवेशक पैसे गुंतवत आहेत आणी अमेरिकन निवेशक बाहेर पडत आहेत. ‘Fear’ खूप आहे अशावेळी भीतीवर मात करून आपण चांगल्या शेअर्सच्या बाबतीत ‘greedy’ झाले पाहिजे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ५ फेब्रुवारी २०१८ रोजी USA ची मार्केट ११७५ पाईंट पडली. CBOE VOLATILITY निर्देशांक एका दिवसात २८% वाढला. जागतिक मार्केटमध्ये ‘BOND YIELD’ सतत वाढत आहे. BOND YIELD ८% ने वाढले याचा अर्थ BOND च्या किमती कमी झाल्या. कॉस्ट ऑफ बॉरोइंग वाढली. बँका आणी NBFC यांना  ट्रेजरी लॉस होतील.
 • सतत वाढणारी ‘BOND YIELD’, आणी महागाई आणी व्याजाच्या दरात होणारी संभाव्य वाढ यामुळे USA मधील मार्केट्स गुरुवारी पुन्हा ६०० पाईंट पडली.
 • SPENDING बिल USA कॉंग्रेसमध्ये मंजूर न होऊ शकल्यामुळे पुन्हा एकदा ‘गवर्नमेंट शट डाऊन’ ची आफत ओढवली होती. पण उशिरा हे बिल मंजूर झाल्यामुळे आता हे संकट टळले आहे.
 • चीनच्या युआन या चलनाच्या विनिमय दरात झालेली १,२% घट यामुळे चीनच्या मार्केटमध्येही सेलऑफ झाला.

सरकारी अन्नौंसमेंट

 • आज सरकारने ‘DISCOVERED SMALL FIELDS पॉलिसी जाहीर केली. ONGC आणी ऑईल इंडिया या कंपन्यांकडे काही ऑईल ब्लॉक्स आहेत ते वापरात नाहीत कारण त्यातून ओईल काढणे या दोन कंपन्यांना फायदेशीर वाटत नाही. ह्या ऑईल ब्लॉक मधील ६० विहिरी विकणार आहेत
 • सरकारने साखरेवरील इम्पोर्ट ड्युटी १००% केली आणी साखर कारखान्यांसाठी स्टॉक लिमिट बसवली.
 • सरकारने नैसर्गिक रबराच्या आयातीवरील ड्युटी १०% वाढवून २७.५% केली.
 • ऑईल आणी GAS क्षेत्रातील सरकारी कंपन्या २०१८-२०१९ या वर्षात Rs ८९००० कोटींची गुंतवणूक करतील. यातील Rs ४८००० कोटी ऑईल शोधण्यासाठी आणी ऑईलचे उत्पादन करण्यासाठी गुंतवले जातील.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने गोव्यामध्ये आयर्न ओअरच्या खाणींवर बंदी घातली. गोवा राज्य सरकारला या खाणींसाठी पुन्हा लिलाव करायला सांगितला. या खाणींमध्ये १५ मार्चपर्यंत मायनिंगला परवानगी दिली आहे.
 • RBI ने आपल्या वित्तीय पॉलिसीत रेपोरेटमध्ये, रिव्हर्स रेपो रेटमध्ये आणी CRR मध्ये काहीही बदल केला नाही.
 • RBI ने बँकांना त्यांचा बेस रेट MCLR बरोबर लिंक करायला सांगितला. तसेच ATM साठी दिली जाणारी सबसिडी रद्द केली. RBI ने महागाई वाढीचे लक्ष्य २०१८-२०१९ च्या पहिल्या सहामाहीसाठी ५.१% ती ५.६% केले. यासाठी त्यांनी फिस्कल स्लीपेज, वाढणाऱ्या अनधान्याच्या किमती ही कारणे दिली. गुंतवणुकीवर LTCG कर लावल्यामुळे विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली. सध्या गुंतवणुकीवर ५ प्रकारचे कर आकारले जातात. कॉर्पोरेट कर, DDT, STT, LTCG, GST असे ५ प्रकारचे कर लागतात. RBI ने Rs २५ कोटींपेक्षा कमी लोन घेतलेल्या आणी GSTसाठी रजिस्टर केलेल्या MSMEना (मेडियम आणी स्माल एन्टरप्रायझेस) कर्जफेडीसाठी १८० दिवस जादा वेळ देण्याचे जाहीर केले. तसेच MSME ना दिलेली सर्व लोन ‘PRIORITY’ क्षेत्र म्हणून घोषित केली. MSMEसाठी मर्यादा Rs २५० कोटी केली.
 • सेबीने वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने २२ संबंधीत कंपन्यांच्या मदतीने जानेवारी २०१६ ते जून २०१६ या काळात वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीच्या शेअरचे VOLUME आणी पर्यायाने किमत वाढवण्याचा प्रयत्न केल्याच्या बाबतीत कारवाईची सुरुवात केली. वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने P C ज्युवेलर्स या कंपनीचे २० लाख शेअर्स ओपन मार्केटमधून खरेदी करण्याचा सपाटा लावला. वक्रांगी सॉफटवेअर या कंपनीने PC ज्युवेलर्स हे आमचे पार्टनर्स आहेत असे सांगितले, PC ज्युवेलर्सच्या प्रमोटर्सनी या गोष्टीचा साफ इन्कार केला. हा सर्व कॉर्पोरेट गव्हर्नन्स चा प्रश्न असल्यामुळे वक्रांगी सॉफटवेअर चा शेअर वेगाने पडू लागला आणी त्याला ४ ते ५ दिवस सतत लोअर सर्किट लागली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी 

 • BOSCH, कोलगेट, HEG, ACC, गुजरात अल्कली,HERO मोटो CORP, रिलायन्स होम फायनान्स, फर्स्ट सोर्स इनफॉरमेशन, टॉरंट पॉवर, ACC, पराग मिल्क, SAIL, पेट्रोनेट LNG, SKF, टी व्ही टुडे, HPCL, टाटा स्टील, ONGC ( मार्जिन आणी प्रॉफीट कमी झाले) या कंपन्यांचा तिमाही निकाल चांगला आला.
 • हायडलबर्ग सिमेंट, हॉटेल लीला या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.
 • REC, ल्युपिन, डिश टी व्ही बलरामपुर चीनी,ग्लेनमार्क, ड्रेजिंग कॉर्प या कंपन्यांचे तीमाही निकाल खराब आले.
 • PNB चे तिमाही निकाल चांगले आले. PNB मधील मुंबईतील Rs २८० कोटीच्या फसवणूकीची चौकशी सुरु झाली.
 • फोर्टिस हेल्थकेअर च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधून मलविंदर आणी शिविंदर सिंग यांनी राजीनामा दिला.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया चे तिमाही निकाल काल असमाधानकारक आले. ग्रॉस NPA आणी नेट NPA मध्ये वाढ, Rs २४३६ कोटी तोटा ही कामगिरी खचितच समाधानकारक म्हणता येणार नाही.
 • MACNALLY भारत या कंपनीला Rs ६८ कोटींची ऑर्डर मिळाली. कंपनीच्या साईझच्या मानाने ही ऑर्डर मोठी आहे.
 • बँक ऑफ इंडिया Rs २१६६ कोटींचे NPA विकणार आहे.
 • KEC INTERNATIONAL या कंपनीला Rs २०३५ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • आजपासून ऑटो एक्स्पो सुरु झाला. मला काय करायचं ‘AUTO एक्स्पो’ ची खबर ठेवून असा विचार न करता कोणती ऑटो क्षेत्रातील कंपनी कोणकोणती नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत हे बघावं. यावरून प्रत्येक कंपनी किती नवीन गुंतवणूक करणार आहे याचा अंदाज येतो. उदा. महिंद्र & महिंद्र १ वर्षाच्या आत इलेक्ट्रिक बस बाजारात आणत आहे. कंपनीने THREE WHEELER वाहन या प्रदर्शनात शोकेस केली आहे. मारुतीने आपण भारतात Rs २०००० कोटींची गुंतवणूक करू असे जाहीर केले. अशोक LEYLAND या कंपनीने इलेक्ट्रिक बस शोकेस केली.
 • एल आय सी ने आपला एशियन पेंटसमधील स्टेक २% ने वाढवला. ५% वरून ७% केला.
 • हरयाणातील कर्नालमध्ये IGL ला GAS डीस्ट्रीब्यूशनसाठीचे काम मिळाले.
 • AXIS  बँकेला ‘NSDL’ चे शेअर्स विकून Rs १६५ कोटी मिळतील.
 • ‘महिंद्र सन्यो’ या कंपनीतील महिंद्र आणी महिंद्र या कंपनीचा स्टेक ५०% वरून २९% होईल. कंपनीचे २६ लाख शेअर्स Rs १४६ कोटींना विकणार.
 • सिंगापूरची सिंगटेल ही कंपनी आपला भारती टेलिकॉममधील स्टेक वाढवण्यासाठी Rs २६५० कोटी गुंतवणार आहे.
 • ITC ही FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी आता दुग्ध व्यवसायात उतरण्याची तयारी करत आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • HEG ह्या कंपनीने ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली होती कंपनीने Rs ३० अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • MOIL या कंपनीने Rs २४० प्रती शेअर या भावाने ८८ लाख शेअर्स ‘BUY BACK’ जाहीर केले.
 • HERO MOTO कॉर्प ने Rs ५५ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
 • FDC ही कंपनी Rs ३५० प्रती शेअर या भावाने ३४ लाख शेअर्स ‘BUY BACK’ करणार आहे.
 • १२ फेब्रुवारी २०१८ रोजी GAIL या कंपनीने बोनसवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • NBCC या कंपनीने १३ फेब्रुवारी २०१८ रोजी स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • बलरामपुर चीनी या कंपनीने ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • HPCL ने Rs १४.५० प्रती शेअर लाभांश दिला. (स्प्लिट बोनस, लाभांश BUY बक्क इत्यादी कॉर्पोरेट एक्शनविषयी  ‘माझ्या मार्केट आणी मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.)

या आठवड्यातील लिस्टिंग

 • GALAXY SARFECTANT या कंपनीचा शेअर Rs १५२५ ला लिस्ट झाला. (IPO मध्ये Rs १४८० ला शेअर्स दिले होते)

या आठवड्यात येणारे IPO

 • ASTER DM ही हॉस्पिटल्स क्षेत्रातील आपला IPO १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या दरम्यान आणून Rs ९८० कोटी भांडवल उभारेल. प्राईस BAND Rs १८० ते Rs १९० असेल. या कंपनीची मध्यपूर्वेतील देश, भारत आणी थायलंड या देशात हॉस्पिटल्स आहेत.

मार्केटने काय शिकवले

मंगळवार तारीख ६ फेब्रुवारी २०१८ रोजी तुम्ही निरीक्षण केले असेल तर बऱ्याच शेअर्सची किमत अशी होती की ‘DEATH CROSS’ ची स्थिती दिसत होती. ५० दिवसाच्या MOVING AVERAGE ची रेषा २०० दिवसांच्या MOVING AVERAGE च्या रेषेला DOWNWARD छेदते तेव्हा DEATH CROSS होतो. अशा वेळेला शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता असते  ५० दिवसांच्या MOVING AVERAGEची रेषा २०० दिवसांच्या MOVING  AVERAGE च्या रेषेला UPWARD छेदते तेव्हा ‘गोल्डन क्रॉस’ होतो. अशा वेळी या शेअर्सचा भाव वाढतो.

बुधवार तारीख ७ फेब्रुवारी २०१८ रोजी मार्केटमध्ये तेजी होती. याला ‘टेक्निकल बाउंस’ म्हणता येईल. पण सलग तीन दिवस एखादा ट्रेण्ड चालू राहिला तरच ट्रेंड बदलला असे म्हणता येते. अशा तेजीमध्ये न फसता जर आपण आपल्याकडील कमी गुणवत्ता असलेले शेअर्स विकून चांगल्या शेअर्समध्ये प्रवेश करण्यासा/ठी रक्कम गोळा केली तर ती योग्य त्या वेळेला गुंतवता येते.

‘CONTRA ट्रेड’ घेण्याचा जमाना सुरु झाला आहे. ‘GAP UP’ आणी ‘GAP DOWN’ मार्केट उघडते आहे. तेजी आणी मंदीमधील ‘GAP’ खूप आहे. अशावेळी ‘GAP DOWN’ मार्केट उघडले तर कमी झालेल्या किमतीला चांगले शेअर्स खरेदी करावेत आणी ‘GAP UP’ उघडताच विकून टाकावेत असा ट्रेडच काही दिवस फायदा देईल असे दिसते. LTCG, GST, STT लागत असल्यामुळे इंट्राडे किंवा दीर्घ मुदतीच्या ट्रेडपेक्षा शॉर्ट टर्म ट्रेड करून फायदा मिळवावा असा मार्केटचा कल दिसतो आहे. मार्केटमधील सध्याची VOLATALITY बघता ज्या ट्रेडर्सना आर्थिक आणी अनुभवाच्या दृष्टीने ट्रेड करता येईल त्यांनीच या मार्केटमध्ये ट्रेड करावा. ही मार्केटमधील स्थिती सुधारणार नाही कारण मार्केट तेजीत येताच गुंतवणूकदार १ एप्रिल २०१८ पर्यंत प्रॉफीट  बुक करत राहतील. कारण हे  प्रॉफीट LTCG कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे.

जणू काही ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे मार्केटमधील काही मोठे ट्रेडर्स म्हणत असतील. कारण ते रात्री ‘USA’ मधील मार्केट्ची खबर ठेवतात आणी दिवसा भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. या आठवड्यात ‘अवघे विश्वची माझे घर’ याची प्रचीती भारतीय शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार यांना आली. पुढील आठवड्यात काय पान वाढून ठेवले आहे कोणास ठाऊक !

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४००५ वर, NSE निर्देशांक निफ्टी १०४५५ वर आणी बँक निफ्टी २५४६३ वर बंद झाले.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे-समालोचन – रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग – ५ फेब्रुवारी २०१८ ते ९ फेब्रुवारी २०१८

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८ |

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s