आठवड्याचे समालोचन – आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८

मार्केटला ग्रहण लागले की साडेसाती आली म्हणायची की दृष्ट लागली म्हणायची हे कळेनासे झाले आहे. पण होते ते भल्यासाठीच! २०११ या वर्षात सुरु झालेला PNB मधील घोटाळा उघडकीस यायला बरोबर साडेसात वर्षे लागली. याला साडेसाती संपली असेच म्हणावे लागेल. नाहीतर असे सांगितले जाते की हा घोटाळा आणखी कित्येक वर्षे बिनबोभाट चालूच राहिला असता. बँकेच्या विदेशविनिमय विभागातील एकूण प्रक्रिया फक्त ग्रहतारेनक्षत्र यांच्या भरोश्यावर चालते असेच म्हणावे लागेल. यातून PNB चे व्यवस्थापन काही शिकते कां ? ते पहाणे सोयीस्कर होईल.  गुंतवणूकदारांसाठी बँकिंग आणी फायनांसियल क्षेत्रामध्ये किती अभ्यासपूर्वक आणी काळजीपूर्वक गुंतवणूक करायला हवी आणी आपले मन कोणत्याही गोष्टीसाठी किती तयार पाहिजे,ह्यासाठी हा धडा आहे. येथे एका क्षणात Rs ११००० कोटी गेले अशी बातमी येऊ शकते. आपल्या शेअरची किमत प्रती शेअर Rs ४० इतकी खाली येऊ शकते. काहीवेळा साक्षात्कार आल्हाददायक असतो तर काही वेळेला भीतीदायक असतो. कारण ईश्वर कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. फक्त एकाच दिलासा म्हणजे LIC ने असे जाहीर केले की त्यांचा PNB मधील ११% स्टेक ते  कमी करणार नाहीत किंवा वाढवणारही नाहीत.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकार PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड्स) कॅमेरा मोड्यूल्स, आणी कनेक्टर्स या मोबाईल्सच्या सुट्या भांगांवर बेसिक कस्टम्स ड्युटी १ एप्रिल २०१८ पासून बसवण्याच्या विचारात आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने PNB ला Rs ११३०० कोटींच्या LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) च्या हमीवर इतर बँकांनी दिलेली कर्ज विनाअट परत करायला सांगितली. यात AXIS बँक, येस बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर बँकांविषयी लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे सांगितले.
 • हा घोटाळा जेम्स आणी ज्युवेलरी क्षेत्राशी संबंधीत असल्यामुळे या क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल. RBI, SEBI ची करडी नजर या क्षेत्रातील कंपन्यांवर राहील
 • RBI ने आतापर्यंत प्रचलीत असलेले सर्व RESTRUCTURING प्लान्स रद्द केले आणी BANKRUPTCY कोर्ट ही याबाबतीत एकमेव आणी अंतिम ऑथोरिटी असेल असे सांगितले. या सर्व कर्जांना NPA  जाहीर केल्यामुळे Rs २ लाख कोटींची NPA BANKRUPTCY कोर्टात दाखल होतील. यासाठी बँकांना जादा प्रोविजन करावी लागेल. याचा परिणाम सरकारी बँकांच्या प्रॉफीटवर आणी त्यांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर होईल याचा फायदा NBFC सेक्टरला होईल. जर NPA ची रक्कम १ मार्च २०१८ रोजी Rs २००० कोटींवर असेल तर त्या NPA चे रेझोल्युशन १८० दिवसात झाले नाहीतर BANKRUPTCY कोर्टात अर्ज दाखल करावा लागेल. Rs ५ कोटींपेक्षा जास्त कर्जाची थकबाकी असेल तर अशा कर्जांबाबत दर आठवड्याला RBI ला रिपोर्ट पाठवावा लागेल.
 • सेबीने असे जाहीर केले की चुकीचे फायनल अकौंट सादर करणाऱ्या कंपन्यांवर आणी हे चुकीचे अकौंट बरोबर म्हणून प्रमाणित करणाऱ्या ऑडीटरवर कारवाई केली जाईल. काही का असेना काही प्रमाणात का होईना स्वच्छता मोहीम सुरु होईल हे नक्की

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • USA चे CPI जानेवारीत ०.५% ने वाढले. १० वर्षाच्या ट्रेजरी BONDS वरील ‘YIELD’ २.८६% ने वाढली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे फेड आपले व्याज दर अपेक्षेपेक्षा वेगाने वाढवील. त्यामुळे USA चे मार्केट पडले.
 • भारत सरकारने असे जाहीर केले की GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) आणी IIP निश्चित करण्यासाठी पायाभूत वर्ष (बेस इअर) २०१७- २०१८ असेल तर CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) साठी बेस इअर २०१८ असेल.
 • जानेवारी २०१८ साठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सहा महिन्यातील किमान स्तरावर म्हणजे २.८४% (डिसेंबर २०१७ मध्ये ३.५८%) वर होता. घाऊक मार्केटमधील अन्नधान्य, भाजीपाला आणी इंधन यांच्या बाबतीत महागाई कमी झाली.
 • जानेवारी २०१८ मध्ये ट्रेड डेफिसिट ५६ महिन्यांच्या कमाल स्तरावर होती. भारताची निर्यात ९% ने वाढून US $ २४.३ बिलियन झाली. भारताची आयात २६% ने वाढून US$ ४०.६ बिलियन झाली. जानेवारी २०१८ साठी ट्रेड GAP US $ १६.३ बिलियन झाली. पेट्रोलियम, क्रूड, आणी जेम्स आणी ज्युवेलरी यांचे आयात वाढली तर सोन्याची आयात कमी झाली.
 • जानेवारी २०१८ साठी CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ५.०७% ने वाढले (डिसेंबरमध्ये ५.२१%) होती. अन्नधान्य, भाजीपाला यांच्या किमती कमी झाल्या.
 • भारतातील IIP (FACTORY उत्पादन) ७.१ % ने वाढले. नोव्हेंबर मध्ये ८.८% होती. धातू आणी उर्जा यांचे उत्पादन कमी झाले.
 • BSE आणी NSE आणी MCX या तीन्ही स्टॉक एक्स्चेंजनी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजला कळवले की सेन्सेक्स आणी निफ्टी या निर्देशांकाबद्दल कोणताही डाटा घेऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे लिक्विडीटी वाढेल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले. त्यांनी या इन्स्पेक्शनमध्ये ८ त्रुटी दाखवल्या. पण हंगेरीच्या रेग्युलेटरी ऑथोरीटीने इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटला क्लीन चीट दिली.
 • अजंता फार्माच्या दाहेज प्लांटचे इन्स्पेक्शन ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान USFDA ने केले. कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • कॅडिला हेल्थकेअर च्या मोरया प्लांटचे इन्स्पेक्शन केले कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • क्रूड आणी खोबरे यांचे दर वाढल्यामुळे मार्जिनवर परिणाम झाला असे मेरिकोच्या व्यवस्थापनाने सांगितलं.
 • फ्युचर एन्टरप्रायझेस, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, GSK कंझ्युमर्स, टाटा स्टील, महिंद्र आणी महिंद्र, GAIL यांचे निकाल चांगले आले.
 • प्रिझम सिमेंट, ITI या कंपन्या टर्न अराउंड झाल्या.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, BPCL बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, UCO बँक जेट एअरवेज, अलाहाबाद बँक सन फार्मा यांचे निकाल खराब आले.
 • बँक ऑफ इंडिया आणी बँक ऑफ बरोडा यांनी आपल्या परदेशातील काही शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला.
 • AXIS बँक येस बँक आणी RBL बँक फोर्टीज हेल्थकेअरने गहाण ठेवलेले शेअर्स विकू शकतील.
 • अक्झो नोबेल या कंपनीने ठाण्याला पॉवडर कोटिंग प्लांट सुरु केला.
 • झी लर्न या कंपनीने MT EDUCARE या कंपनीमधील ४४.५% स्टेक प्रती शेअर Rs ६२.५७ भावाने खरेदी केला.

कॉर्पोरेट एक्शन   

 • NBCC आणी अमृतांजन हेल्थकेअर या दोन कंपन्यांनी आपल्या एका शेअरचे दोन शेअर्समध्ये विभाजन करणार असे जाहीर केले.
 • सोना कोयो या कंपनीने आपले नाव ‘JTEKT’ असे बदलायचे ठरवले आहे.
 • GAIL या कंपनीने आपल्या जवळ तीन शेअर्स असतील तर १ बोनस शेअरची घोषणा केली.
 • ONGC विदेश Rs ६० कोटींना अबुधाबी ऑईलफिल्ड मधला १०% हिस्सा घेणार आहेत.
 • ऑईल इंडिया या कंपनीने २ शेअर्सला १ शेअर बोनस दिला आणी Rs १४ लाभांश दिला.

या आठवड्यातील IPO

 • टाटा स्टीलचा राईट्स इशू १४ फेब्रुवारी २०१८ला ओपन झाला . कंपनीने आपल्याकडे असलेल्या २५ शेअर्स मागे आपल्याला Rs ५१० प्रती शेअर्स या भावाने ४ फूलली पेड शेअर्स आणी प्रती शेअर Rs ६१५ या भावाने २ पार्टली पेड शेअर्स ऑफर केले आहेत. आपल्याला पार्टली पेड शेअर्सकरता प्रथम Rs १५४ प्रती शेअर भरायचे आहेत. आपल्याला आपल्याला घरी फॉर्म आले पाहिजेत. आपण ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत भरून द्यायचे आहेत. (राईट्स इशू, स्प्लीट, बोनस इशू आणी IPO याबद्दल सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे)
 • HG इन्फ्रा इंजिनिअरिंग हा IPO २६ फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ओपन असेल. प्राईस BAND Rs २६३ ते Rs २७० असेल हा इशू Rs ४६२ कोटींचा असेल. त्याच्या प्रोसिडमधून कॅपिटल इक्विपमेंट कर्जफेड आणी इतर कॉर्पोरेट खर्चासाठी रक्कम वापरली जाईल. हा शेअर BSE आणी NSE यु दोन्हीवरही लिस्ट होईल.
 • या आठवड्यात बंद झालेला ASTER DM हेल्थकेअरचा इशू एकूण १.३३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला रिटेल कोटा १.१९ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी मालकीच्या भारत डायनामिक्स या कंपनीचा IPO मार्चमध्ये येईल.

मार्केटने काय शिकवले

आर्थिक अपघातांची संख्या वाढली आहे. वक्रांगीचे ढग दूर होतात न होतात तोच फोर्टिस हेल्थकेअरचे ढग जमा झाले त्यानंतर PNB च्या काळ्याकुट्ट ढगांनी शेअर मार्केटचे आकाश वेढून टाकले. आपण एक निरीक्षण केले असेल तर वक्रांगीला प्रथम २०% नंतर १०% आणी नंतर ५% चे खालचे सर्किट लागले. शेअर त्याच्या किमान स्तरावर आल्यावर ‘BUY BACK’ मंजूर झाले अशी घोषणा  झाल्याबरोबर सतत वरची सर्किट लागायला सुरुवात झाली. अशा घटनांपासून काही शिकता आल्यास उत्तम! असे शेअर आपल्याजवळ असल्यास प्रथम विकून मोकळे व्हावे. वादळ थांबल्यावर पुन्हा विकत घ्यावेत. यामध्ये तोटा कमी होतो. साडेसाती आली असे समजा. साडेसाती माणसाला आयुष्यातील चुका समजावून देते, त्या सुधारण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात हे शिकवते आणी पुढील काळात येणार्या धोक्यांची कल्पना देऊन सावध करते. ही मार्केट्ची साडेसातीच समजा.

या आठवड्यात मार्केटमध्ये किती नुकसान होईल याचा अंदाज आला आहे. मार्केट मध्ये धोका कोठे आहे याचाही साधारण अंदाज आला आहे. RBI ने ‘BOND YIELD’ ७.६०% वरून ७.५६% वर आले आहे असे सांगीतल्रे आहे. बँकिंग आणी विशेषतः सरकारी राष्ट्रीयकृत बँकांची नॉन पर्फोर्मिंग फरफट मात्र संपता संपत नाही. RBI च्या अलीकडील आदेशानुसार RECONSTRUCTION योजनांचा ढालीसारखा उपयोग करून NPA अकौंट नजरेआड करणे आता शक्य होणार नाही. RBI ने १८० दिवसांची मुदतही ठरवली आहे. बँक निफ्टी 200 DMA ( डे मूव्हिंग AVERAGE) २४६०० वर आहे बँक निफ्टी येथपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी तारीख १६ फेब्रुवारी २०१८ रोजी VIX निर्देशांक १७ होता. याचा अर्थ असा की मार्केटमध्ये सतत आणी मोठ्या प्रमाणावर चढ उतार होताहेत आणी सामान्यतः मार्केटमध्ये चिंतेचे आणी द्विधा मनस्थितीचे वातावरण आहे.

USA आणी युरोपमधील मार्केट वाढत आहेत. एवढा मोठा हबका बसूनही मार्केटमध्ये खालच्या स्तरावर खरेदी सुरु आहे. काळ हे सर्व दुखः, सर्व व्याधी, सर्व चिंता यावर रामबाण औषध आहे कालाचा महिमा अगाध आहे माणसाच्या मनातली आशा काळावरही कधी कधी मात करते. रात्र संपून पुन्हा नव्या उमेदीने माणूस दिवसाला सुरवात करत असतो.

‘कालाय तस्मै नमः’ असे म्हणून पडत्या काळात जो तरतो तोच चढत्या काळात उची गाठू शकतो हे लक्षात ठेवून मार्केटमध्ये राहणे, आपले फायद्यात असलेले शेअर्स विकून फायदा घरी आणणे. आणी स्वस्त आणी उच्च प्रतीचे शेअर खरेदी करणे हाच ‘अशुभस्य काल हरणं’ याचा मंत्र आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०१० वर NSE निर्देशांक निफ्टी १०४५१ तर बँक निफ्टी २५१६३ वर बंद

 

One thought on “आठवड्याचे समालोचन – आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास – १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – कठीण समय येता कोण कामास येतो – १९ फेब्रुवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८ | Sto

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s