Gudi Padwa Share Market

आठवड्याचे समालोचन – नवा आरंभ नवा विश्वास हाच गुढीपाडव्याचा मंत्र खास – १२ मार्च ते १६ मार्च २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नवा आरंभ नवा विश्वास हाच गुढीपाडव्याचा मंत्र खास – १२ मार्च ते १६ मार्च २०१८

मार्केटमध्ये अशांतता आहे, गोंधळाचे वातावरण आहे. दर दिवशी कोणती नवीन बातमी येऊन धडकेल हे सांगता येत नाही. जागतिक आणी राजकीय अशा दोन्ही तऱ्हेच्या बातम्यांचा मार्केटवर परिणाम होत आहे. मार्केट महाग झाले होते त्यामुळे आज ना उद्या  पडणार हे सर्वानांच माहीत होते. येऊ घातलेले ट्रेड वॉर, गोरखपूर आणी फुलपूर येथील निकाल, TDP ने NDA तून बाहेर पडण याचा घेतलेला निर्णय त्यामुळे राजकारण चांगले तापले आहे. गेली तीन वर्षे राजकारणात शांती होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या, तसतसे रणशिंग फुंकले जाऊ लागले आहे. मान्सून विषयीचे अनुमानही फारसे चांगले  नाही. त्यामुळे गुंतवणूकदार जपून पाऊले टाकत आहेत. त्याच बरोबर नोंनलीस्टेड शेअर्सवर LTCG करात काही सवलती दिल्यामुळे त्यांचा फायदा घेण्यासाठी IPO. QIP ची रांग लागली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA ने झीन्ग्यांवर ANTI DUMPING ड्युटी वाढवली याचा परिणाम APEX फ्रोझन फूड्स, वॉटरबेस या कंपन्यांवर होईल. ट्रंप यांनी भारत आणी चीनला असा इशारा दिला की त्यांनी जर USA च्या मालावर ड्युटी बसवली तर USA तेवढीच जवाबी ड्युटी त्यांच्याकडून येणार्या मालावर बसवेल.

सरकारी अनौंसमेंट

  • सरकार युरिया साठी DBT योजनेमार्फत सबसिडी चालू ठेवील. Rs १लाख ६४ हजार कोटी दिले जातील.
  • वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून सरकार CONJESTION चार्ज आकारणार आहे. ‘यातायात जाम शुल्क’असे याचे नाव असेल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • जानेवारी २०१८ साठी IIP ७.५% झाला (डिसेंबर २०१७ साठी ७.१ % होता)
  • फेब्रुवारी २०१८ मध्ये CPI मध्ये घट झाली. CPI ४.४४ % झाला.(जानेवारीत ५.०७ % होता.)
  • WPI फेब्रुवारी २०१८ या महिन्यासाठी २.४८ % झाले.(जानेवारी २०१८ साठी २.८४% होते).
  • भारताची निर्यात US $ २५.८ बिलियन झाली तर भारताची आयात US $ ३७.८ बिलियन झाली. त्यामुळे ट्रेड
  • डेफिसीट US $ १२ बिलियन झाली. सोने आणी ऑटो यांची आयात कमी झाली.
  • सेन्सेक्समधील ३० शेअर्सवर १९ मार्च २०१८ या तारखेपासून TRANSACTION चार्ज लागणार नाही.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • GST कौन्सिलची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत निर्यातदारांना अनेक सवलती देण्यात आल्या. त्याच बरोबर मद्यार्कावरील GST वाढवला नाही. लायसेन्ससाठी GST ची गरज नाही असे सांगितले. GSTच्या बैठकीत १ एप्रिल २०१८ पासून EWAY बिल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिअल इस्टेटला GST च्या कक्षेत आणण्याचा निर्णय तीन महिने पुढे ढकलण्यात आला. रीव्हर्स चार्ज यंत्रणा सुद्धा लागू करण्याचा निर्णय १ जुलै २०१८ पर्यंत पुढे ढकलला. सिगारेटवरील GST वाढवला नाही.
  • RBI ने ज्या ज्या बँकांनी LOU आणी LOC दिले होते. अशा सर्व LOU आणी LOC चे स्पेशल ऑडीट करायला सांगितले. RBI ने बँकांवर LOU आणी LOC इशू करण्यावर बंदी घातली.
  • RBI ने इंडसइंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्लुजन यांच्या मर्जरला परवानगी दिली.
  • IBC अंतर्गत घर खरेदीदारांना UNSECURED CREDITORS चा दर्जा मिळेल.

 

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ट्रायडटची मध्यप्रदेशात Rs ७२०० कोटी खर्च करून विस्तार करण्याची योजना आहे.
  • जेट एअरवेज एअर इंडियासाठी बोली लावण्याची शक्यता आहे.
  • ऑरोबिंदो फार्माच्या प्लांटची USFDA ने १२ फेब्रुवारी २०१८ पासून तपासणी केली. यात डास आढळले. USFDA ने १२ त्रुटी दाखवल्या.
  • आंध्र बँकेत स्टर्लिंग बायोटेक् या कंपनीच्या संबंधीत Rs ५००० कोटींचा घोटाळा उघडकीला आला.
  • PNB मधील घोटाळा आता Rs १३००० कोटींवर पोहोचला.
  • स्पाईस जेटने SAFRAN या कंपनीबरोबर इंजिन बनवण्यासाठी आणी इतर सर्व्हिसेससाठी करार केला.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया ने मिनिमम AVAREGE BALANCE साठी चार्ज लावण्याच्या दरात ७५% कपात केली.
  • BPCL ने सरकारला असे सांगितले की ‘GAIL’ बरोबर त्यांचे मर्जर अधिक सोयीस्कर होईल.

कॉर्पोरेट एक्शन

  • रेणुका शुगरमध्ये विल्मर शुगर २६% स्टेक घेत आहे. २६% स्टेक साठी प्रती शेअर Rs १६.२९ या भावाने ओपन ऑफर येईल.
  • कोल इंडियाने Rs १६.५० प्रती शेअर तर वेदांताने प्रती शेअर Rs २१.५० आणी हिंदुस्थान झिंकने प्रती शेअर Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
  • टाटा सन्स ने टी सी एस मधील १.०८% स्टेक Rs २८७२ ते Rs २९२५ प्रती शेअर या भावाने विकला.
  • MMTC ची बोनस इशू वर विचार करण्यासाठी १९ मार्च २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
  • येस बँक फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीमध्ये १७.३१% स्टेक होल्ड करत आहे. हे शेअर्स कंपनीने बँकेकडे गहाण ठेवले होते.

या आठवड्यात येणारे IPO

  • भारत डायनामिक्सचा IPO एकूण १.३० वेळा तर रिटेल पोर्शन १.४१ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • हिंदुस्थान एअरोनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO तारीख १६ मार्च ते २० मार्च २०१८ या दरम्यान ओपन राहील. याचा प्राईस BAND Rs १२१५ ती Rs १२४० असून मिनिमम लॉट १२ शेअर्सचा असून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी Rs २५ सूट ठेवली आहे.
  • ICICI सिक्युरिटीज या कंपनीचा IPO पुढील आठवड्यात येणार आहे. प्राईस BAND Rs ५१९- Rs ५२० ठेवला आहे. २२ मार्च २०१८ ला ओपन होऊन २६ मार्च २०१८ला बंद होईल. मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे.
  • मिश्र धातू निगमचा IPO येत आहे. प्राईस BAND Rs ८७ ते Rs ९० आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना Rs ३ सूट ठेवली आहे. मिनिमम लॉट १५० चा आहे.
  • HDFC AMCने IPO साठी अर्ज केला.
  • संधार टेक्नोलॉजी हा IPO १९ मार्च २०१८ पासून ते २१ मार्च २०१८ दक़्र्म्यान ओपन राहील. याचा प्राईस BAND Rs ३२७ ते Rs ३३२ आहे. मिनिमम लॉट ४५ शेअर्सचा आहे.

मार्केटने काय शिकवले

अडचणींचे गुऱ्हाळ आहे त्यातून मार्ग काढला पाहिजे. ज्या शेअर्सचा संबंध राजकारण किंवा जागतिक अर्थकारणाशी कमी आहे असे शेअर्स शोधता येतील. किंवा चांगल्या गुणवत्तेचे शेअर्स योग्य भावात मिळत असतील तर ते विकत घेण्याची संधी आहे. हे लक्षात घेऊन थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करावी. मंगळवारी मार्केटमध्ये प्रत्यक्षात खूपच volatility होती पण VIX मध्ये फरक नव्हता. FII आणी DII ची खरेदी दिसली पण आकडेवारीचा विचार करता असे दिसले की टाटा सन्सने टी सी एस चे जे शेअर्स विकले ते मार्केटने खरेदी केले.म्हणून VOLATILITY असूनही VIX मध्ये फरक पडला नव्हता. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक जवळ आल्याने लोक ह्या मुहूर्तावर खरेदी करतात. यावर्षी ‘ट्रेडर्स’ बनावे लागेल. कारण मार्केटमध्ये स्पष्ट असा ट्रेंड नाही, फायद्याचे प्रमाण कमी ठेवावे लागेल. कोणतीही फिक्स्ड पोझिशन धरून ट्रेड होणार नाही, लवचिकता ठेवली पाहिजे.‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीनुसार गोरखपूर आणी फुलपूर च्या निकालांवरून काही निरीक्षण करून त्याच चुकांची पुनरावृती होणार नाही अशा प्रकारचे धोरणात बदल केले जातील. अधिक सावधगिरीने पावले उचलली जातील अशी मार्केट्ची अपेक्षा आहे. या पोटनिवडणुकांचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नसला तरी तरी मार्केटने ५०० पाईंट पडून लाल बावटा दाखवला आहे. बघू या मार्केट पुढे पुढे कसे वळण घेते ते ! कितीही नागमोडी वळणे असली तरी आपले ध्येय लक्ष्मीला घेऊन येणे हेच आहे. शेवटी यशाची गुढीच माणसाला सुख समाधान समृद्धी देते. सर्व वाचकांना आणी हितचिन्तकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३१७६ NSE निर्देशांक निफ्टी १०१९५ वर तर बँक निफ्टी २४४८९ वर बंद झाले.

 

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – नवा आरंभ नवा विश्वास हाच गुढीपाडव्याचा मंत्र खास – १२ मार्च ते १६ मार्च २०१८

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – मांजराचा होतो खेळ उंदराचा जातो जीव  – १९ मार्च २०१८ ते २३ मार्च २०१८   | Stock Mark

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s