आठवड्याचे समालोचन – मांजराचा होतो खेळ उंदराचा जातो जीव  – १९ मार्च २०१८ ते २३ मार्च २०१८  

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मांजराचा होतो खेळ उंदराचा जातो जीव  – १९ मार्च २०१८ ते २३ मार्च २०१८

ज्या संकटाची भीती होती तेच संकट दत्त म्हणून समोर उभे ठाकले. काय होईल? काय होईल? हा विचार सतावत होता. त्याचवेळी वाईट बातम्यांची मालिका जणू काही सुरु झाली आहे. त्यामुळे मार्केटमधील पडझड थांबली नाही. पण ही पडझड कधीतरी थांबणार हे नक्की. यावेळी लोकसभेच्या अधिवेशनात काही निर्णय होतील असे वाटत होते. पण अधिवेशन आले तसेच संपले. आता ५१ राज्यसभेच्या जागांच्या निवडणुका आहेत. हवामानाच्या आणी मान्सून विषयीच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष आहे. USA आणी चीनमध्ये ट्रेड वॉर छेडले गेले आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची फरफट होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे कमोडीटी मार्केटमध्ये ही प्रचंड VOLATILITY आहे. क्रूडचे दर सतत वाढत आहेत. रुपया सतत WEAK होत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • फेडने (USA ची सेन्ट्रल बँक) आपले दर ०.२५ बेसिस पाईंटने वाढवून १.५०% – १.७५% या मर्यादेत असतील असे जाहीर केले. तसेच २०१८ सालात व्याजदर आणखी तीनदा वाढवू असे जाहीर केले. त्याने USA च्या GDP तील वाढीविषयी आशादायक वक्तव्य केले आहे. तसेच २०१८च्या शेवटपर्यंत व्याजाचा दर २.९०% असेल असे जाहीर केले.
 • USA चे अध्यक्ष ट्रंप यांनी चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी लावली जाईल असे घोषित केले. चीनमधून US $ ६० बिलीयनची आयात होते त्यावर हे कर बसवले जातील. त्यामुळे USA मध्ये चीनमधून होणारी आयात कमी होईल. चीनने आपणही USA मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी बसवू असे सांगितले. USA च्या अध्यक्षांच्या या घोषणेनंतर जगातील सर्व मार्केट्स पडली.
 • USA ने सुरु केलेल्या ट्रेड वॉरमुळे काही वस्तूंचे भारतात DUMPIMG होईल अशी भीती होती. पण चीनने आपल्या उत्पादनात कपात जाहीर केल्यामुळे ही भीती आता कमी झाली.
 • USA मध्ये २ एप्रिलपासून ते १० सप्टेंबरपर्यंत H1B व्हिसा साठी अर्ज स्वीकारण्यात येतील असे जाहीर केले.
 • कॉल सेंटर मधील लोकांना त्यांचे लोकेशन सांगावे लागेल असे बिल USA मध्ये येण्याची शक्यता आहे.
 • ऑस्ट्रेलिया आणी जपानमधून जो भारतीय मान्सूनविषयी अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या तज्ञांचे मत मान्सून सरासरीपेक्षा कमी पडेल असे होते. पण स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून ठीकठाक असेल.

सरकारी अन्नौसमेंट

 • मंत्रीमंडळाने ‘आयुष्मान भारत’ योजनेला मंजुरी दिली. याचा फायदा आयुर्विमा कंपन्यांना होईल.
 • इराणमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे FY १८ मध्ये Rs २६००० कोटीची निर्यात होईल. याचा फायदा कोहिनूर फूड्स, दावत या कंपन्यांना होईल.
 • सरकारने साखरेवरील एक्स्पोर्ट ड्युटी रद्द केली. याचा फायदा साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल असे वाटले होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर किमान स्तरावर असल्यामुळे साखर निर्यात करणे फायदेशीर होणार नाही असे साखर उत्पादकांचे म्हणणे आहे.
 • सरकारी हॉस्पिटल्सनी त्यांना लागणारी उपकरणे २५% ते ५०% पर्यंत भारतीय उत्पादक कंपन्यांकडून घेतली पाहिजेत असे सरकारने सांगितले. याचा परिणाम BPL, इंद्रप्रस्थ मेडिकल य़ा कंपन्यांवर होईल.
 • ‘मेटा फिनाईन डायमाईन’ वरील ANTI DUMPING ड्युटी १ वर्षासाठी वाढवली. याचा फायदा सुमीत इंडस्ट्रीज आणी इतर फायबर उत्पादक कंपन्यांना होईल.
 • सरकार लवकरच आपली हायड्रोपॉवर पॉलिसी जाहीर करेल. कंपनीने २०२७ पर्यंत प्लांट लावला तर सरकार Rs १६००० कोटी सबसिडी देईल. सरकार २०२२ पर्यंत २५ MV प्रोजेक्ट सुरु करेल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • AXIS बँक कोणतीही GURANTEE ऑनर करीत नाही त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी AXIS बँकेची guarantee देऊ नये असे टेलिकॉम विभागाने कळवले आहे. टेलिकॉम विभागाच्या या ऑर्डर विरुद्ध बँकेने APPELLATE ऑथोरिटीचे दरवाजे ठोठावले.
 • बिनानी सिमेंटसाठी डालमिया भारत आणी अल्ट्राटेक सिमेंट यांच्यात तणातणी निर्माण झाली आहे. दालमिया भारतच्या बाजूने बँकांनी आपला निर्णय घेतल्यावर अल्ट्राटेक सिमेंटने आपली ऑफर वाढवली आणी आम्ही बँकांचे सर्व कर्ज १००% फेडू असे सांगितले. पण यासाठी सेटलमेंट ऑऊट ऑफ NCLT व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
 • सुप्रीम कोर्टाने जे पी असोसिएट्सला कोर्टात Rs २०० कोटी भरायला सांगितले आहेत. यातील Rs १०० कोटी ५ एप्रिलपर्यंत तर राहिलेले Rs १०० कोटी १५ मे २०१८ पर्यंत भरायचे आहेत.
 • मिथेनॉलचे उत्पादन फक्त RCF आणी GNFC सारख्या कंपन्या करतात. सरकार मिथेनॉलच्या वापरासाठी उत्तेजन देत आहे.
 • NCLT मध्ये ज्या कंपन्या गेल्या आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समधील ट्रेडिंगवर सेबी बंदी घालण्याचा विचार करत आहे. कारण NCLT मध्ये जी केस चालते त्याप्रमाणे शेअर्समध्ये खूप VOLATILITY आढळते.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • युनियन बँकेत Rs १३९४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला.
 • MCX मध्ये पितळ या धातूमध्ये वायदा सुरु झाला.
 • शिल्पा मेडिकेअरच्या तेलंगणामधील प्लांटला USFDA ने EIR रिपोर्ट मिळाला.
 • NBCC रस्ते बांधणीच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे
 • इंडिगो या प्रवासी वाहतूक कंपनीच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला असल्यामुळे कंपनीला त्यांची उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.
 • ITC ला दिल्ली येथील ‘हॉटेल पार्क हयात’ विकायला परवानगी मिळाली.
 • कॅनरा बँकेत Rs ६८ कोटींचा घोटाळा उघडकीस आला म्हणून FIR दाखल केला.
 • JSPL या कंपनीने १.०८ कोटी शेअर्स गहाण ठेवले.
 • PNB ने हनुंग टॉइजच्या Rs २००० कोटींचे कर्जासाठी NCLT मध्ये केस दाखल केली.
 • HOCL ही कंपनी आपली रसायनी येथील जमीन BPCL ला विकणार आहे.
 • फ्युचर रिटेलमधील विदेशी निवेशाची मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • फेसबुकवरचा ५ कोटी लोकांचा डाटा लिक झाला.
 • सिप्लाच्या गोवा युनिटची तपासणी USFDA ने 22 ते २५ जानेवारी २०१८ या काळात केली. त्यात त्रुटी आढळल्या. मुख्यत्वे औषधांच्या SAMPLE ची दरवर्षी तपासणी केली गेली नाही.
 • १३ एप्रिल २०१८ रोजी इन्फोसिस आपले चौथी तीमाहि आणी वार्षिक निकाल जाहीर करेल.
 • अशोक LEYLAND ला २१०० इलेक्ट्रिक बस बनवण्यासाठी तामिळनाडू ट्रान्सपोर्ट ऑथोरीटीज कडून Rs ३२१ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • टाटा मोटर्स ला FAME अंतर्गत १९० बसेसची ऑर्डर मिळाली.
 • दिलीप बिल्डकोनला UP मधून Rs ८७१ कोटींची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • IOC आणी BPCL या कंपन्या गेल मधील सरकारी ५४% स्टेक खरेदी करतील. यातून सरकारला Rs ४०००० कोटी मिळतील.
 • MMTC चे २ शेअर्स आपल्याकडे असतील तर आपल्याला १ बोनस शेअर मिळेल.
 • सरकार स्कूटर्स इंडिया मधील आपली हिस्सेदारी लवकरच विक्रीस काढील.
 • सोना कोयो (फ्लोअर प्राईस Rs १०२) आणी आयनॉक्स विंड (फ्लोअर प्राईस Rs ११५) याची OFS सुरु झाली.
 • JSPL ने QIP Rs २२७ प्रती शेअर या भावाने आणला. (QIP, OFS यांची सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे.)
 • ITI मधील सरकारचा २५% स्टेक विकण्याची परवानगी मिळाली.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • भारत डायनामिक्सचे लिस्टिंग Rs ३७० वर झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ४१८ ला दिला होता.
 • बंधन बँकेच्या शेअर्सचे लिस्टिंग २७ मार्च २०१८ रोजी होईल.
 • हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचा IPO LIC ने ऐनवेळी शेअर्ससाठी अर्ज केल्यामुळे कसाबसा पूर्ण सबस्क्राईब झाला.
 • मिश्र धातू निगमचा IPO पूर्णपणे सबस्क्राईब झाला.

मार्केटने काय शिकवले

हनुंग टॉइजचा घोटाळा १० वर्षांनी उघडकीस आला. कॅनरा बँक, आंध्र आणी युनियन बँकेतील घोटाळे उघडकीस आले. त्यामुळे बँकिंग विशेषतः सरकारी बँकिंग क्षेत्रात घबराट निर्माण झाली. त्याचा परिणाम बँक निफ्टीवर झाला. अशा वातावरणात घोटाळा किती मोठा आहे याला महत्व उरत नाही.

क्रूडचा भाव US $ ६७ वर पोहोचला. मार्केट ओव्हरसोल्ड झोन मध्ये पोहोचले. ट्रेडर्स आणी गुंतवणूकदारांना खात्री नाही पण मार्केट थोडावेळ या स्तरावर घालवेल असे वाटते आहे. मार्केट खालच्या लेव्हलवर उघडले तर खरेदी करणे, वरच्या लेव्हलवर उघडले तर विक्री करणे आणी मार्केट सपाट उघडले तर काहीच करू नये. मार्केटमधील बदलाची दिशा समजेपर्यंत थांबणे इष्ट. निफ्टीसाठी १०००० ची लेव्हल महत्वाची आहे. निफ्टीची ही लेव्हल तुटली तर ९७०० पर्यंत खाली जाईल.

FMCG आणी CONSUMPTION क्षेत्राकडे लक्ष ठेवा. या क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही आणी वार्षिक निकाल चांगले येतील. त्यामुळे बाटा, इमामी, GSK कन्झ्युमर, गोद्ररेज कन्झ्युमर,नेस्ले, ब्रिटानिया, कोलगेट, ज्युबिलीयंट फूड्स, D मार्ट,मारुती, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होईल.

अलेम्बिक फार्माच्या गुजरातमधील ‘पानेलाव’ युनिटला USFDA ने फॉर्म नंबर ४८३ इशू केला. ३ त्रुटी आढळल्या. डाटा इंटिग्रीटीविषयी एकही त्रुटी आढळली नाही. या बातमीचा परिणाम म्हणून ट्रेडर्सनी शॉर्ट केले. पण शेअर पाहिजे तेवढा पडत नाही हे बघितल्यावर पोझिशन रिव्हर्स केल्या. त्यामुळे बातमी नुसती ऐकून किंवा वाचून नाहीतर चांगली समजावून घेवून आणी फंडामेंटल आणी तांत्रिक विश्लेषण लक्षात घेवून मगच निर्णय घ्यावा. त्याचबरोबर सपोर्ट आणी रेझिस्टन्सचाही विचार करावा.

फिअर आणी ग्रीड मीटरचा  उपयोग कसा करावा तर जर हे मीटर ३०-३२ च्या आसपास असेल तर ओव्हरसोल्ड झोन समझावा.  अशा ठिकाणी शॉर्ट करू नये. शॉर्ट केले असल्यास कव्हर करावे. हे मीटर ७० च्या पुढे असल्यास ओव्हरबॉट झोन समजावा म्हणजेच आता लवकरच करेक्शन होईल असे समजावे.

माझे आपल्याला सांगणे एवढेच की ज्या लोकांनी तेजीच्या वातावरणात मार्केटमध्ये प्रवेश केला त्याना हे करेक्शन पाहून भीती वाटते पण मार्केटच्या बाबतीत हे सर्व नैसर्गिक आहे. आपल्या पोर्टफोलीओमध्ये लॉस आहे म्हणून त्रास करत बसण्यापेक्षा मार्केटमधला बदल आपल्या बाजूने वळवा.जर पैशाची सवड असेल तर चांगले शेअर्स स्वस्तात विकत घेण्याची संधी आली त्याचा फायदा घ्या. मार्केटमध्ये चांगल्या भावाला विकण्याची संधी आली की विकावे आणी चांगल्या भावाला चांगले शेअर्स विकत घेण्याची संधी आली की विकत घ्या. एकूण काय संधीसाधू होणे फायद्याचे !

तसेच आपण आता आलेल्या काही सरकारी आणी बंधन बँक या IPO मध्ये अर्ज केला असेल तर लिस्टिंग जरी  खालच्या स्तरावर झाले तरी शक्य असले तर आपण काही दिवस थांबा मार्केटचा मूड सुधारला तर ह्या शेअर्सलाही चांगली किमत येईल.

सोमवार तारीख २६ मार्चपर्यंत विकल्यासच  LONG TERM CAPITAL गेन्स वरील करापासून सुटका होणार आहे  त्यानंतर ही विक्री थांबेल. यावेळचे तिमाही आणी वार्षिक निकाल चांगले येण्याची अपेक्षा आहे त्यामुळे मार्केट २७ मार्च २०१८ पासून हळूहळू सुधारेल अशी अशा करू या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२५९६ वर तर NSE चा निर्देशांक निफ्टी ९९९८ वर आणी बँक निफ्टी २३६७० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s