आठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८

हा आठवडा चांगला गेला असेच म्हणावे लागेल. ट्रेडवॉरमुळे मार्केट पडले आणी ट्रेड वॉर हटते आहे असे कळल्यावर सुधारले. RBI च्या वित्तीय पॉलिसीला मार्केटने सुंदर सलामी दिली. सरकारचे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान चालूच आहे. PNB, ICICI बँक, AXIS बँक या पाठोपाठ L & T लाही फटका बसतो काय असे वाटते आहे. आता भारतातील बातम्या पाहण्यापेक्षा ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार रात्री जागून ट्रंप यांचा पुढील पवित्रा काय असेल आणी त्याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल याचा अंदाज घेत असतात. त्यामुळे USA चे अध्यक्ष ट्रंप काय म्हणतात किंवा कोणता विचार करतात हेच आतातरी ‘ट्रंप कार्ड’ बनून राहिले आहे. चांगल्या बातमीची शिडी बघितली की हुरळून मार्केट सरासर वर चढते आणी वाईट बातमीचा साप दिसला की घाबरून तेवढ्याच वेगाने खाली येते. त्यामुळे ट्रेडिंग करणे कठीण जात आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनमधून आयात होणार्या १३०० प्रोडक्ट्सवर इम्पोर्ट ड्युटी लागू केल्यावर चीनने USA मधून आयात होणार्या १०६ वस्तूंवर २५% अतिरिक्त ड्युटी लावली. यात प्रामुख्याने सोयाबीन, कार्स, आणी वेगवेगळ्या केमिकल्स चा समावेश आहे. ट्रंप यांनी आपण चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर नव्याने ड्युटी लावू असे सांगितल्याने जगभरातील शेअरमार्केट पडली.

सरकारी अनौंसमेंट

 • साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्या ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत साखरेची निर्यात करू शकतात.
 • सरकारने १ एप्रिल २०१८ पासून E WAY बिल प्रणाली सुरु केली.
 • सरकारने CNG आणी PNG च्या किमती वाढवल्या.
 • बॉंड यील्ड वाढल्यामुळे बँकांना २०१७ मध्ये जे ‘मार्क टू मार्केट’ लॉसेस झाले ते लॉसेस येत्या ४ तिमाहीत विभागून दाखवलेले चालतील अशी सवलत दिली.
 • CBI, ED, आणी इतर ऑथोरिटीजने जप्त केलेली मालमत्ता डेव्हलप करण्यासाठी NBCC या सरकारी कंपनीकडे सोपवली जाणार आहे.
 • १ सप्टेंबर २०१८ पासून सिगारेट उत्पादन करणार्या कंपन्यांनी सिगारेटच्या पाकिटावर मोठ्या अक्षरात ‘सिगारेटमुळे कॅन्सर होतो सिगारेट सोडा’ असे लिहिले पाहिजे आणी त्यांच्या कॉल सेंटरचा टेलिफोन नंबर दिला पाहिजे अशी तरतूद केली.

 

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • स्कायमेट या सरकारी संस्थेने सामान्य मान्सूनचे अनुमान केले. जोरदार पावसाचे अनुमान ५% तर सरासरीपेक्षा जास्त मान्सूनची शक्यता २०% तर दुष्काळाची शक्यता नाही असे सांगितले. जून २०१८ मध्ये जास्त पाउस पडेल असे सांगितले. यामुळे मार्केट आश्वस्त होऊन मार्केटमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले. चांगल्या मान्सूनच्या अनुमानामुळे ग्रामीण भागातील मागणी वाढेल आणी FMCG, ऑटो, आणी कंझ्युमर क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल. पावसाचे प्रमाण चांगले झाले तर NHPC SJVN या हायड्रोपॉवर कंपन्यांवर अनुकूल परिणाम होईल.
 • बिनानी इंडस्ट्रीजचा सिमेंट कारभार अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिळणार आहे. यामध्ये सर्व कर्जदार बँकांना त्यांची कर्जबाकी १००% मिळेल असे सांगितले.
 • USA कोर्टाने PNB ला नीरव मोदीच्या केस मध्ये पार्टी करून घ्यायला नकार दिला. नीरव मोदीची मालमता विकण्यासाठी या कोर्टाने बोली मागवली आहे.
 • SFIO (सिरीयस फ्राड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस) ने ICICI च्या केसची चौकशी करण्यासाठी कंपनी मंत्रालयाकडे मंजुरीसाठी मागणी केली आहे.
 • RBI ने ५ एप्रिल २०१८ रोजी आपली वित्तीय पॉलिसी जाहीर केली. ही वर्षाच्या सुरुवातीची पॉलिसी असल्यामुळे या पॉलिसीच्या डॉक्युमेंटमध्ये भावी वर्षांविषयी भाष्य केलेले असते. RBI ने CRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR यामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यांनी असे सांगितले की महागाई कमी होईल. महागाईचे अनुमान वर्षभरात ४.७% ते ५.१% राहील तसेच एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या काळात महागाई ४.७% ते ५.१% एवढी तर ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान ४.४% राहील असे सांगितले. CPI मध्ये HRA चा समावेश नसावा अशी सुचना केली. RBI ने वित्तीय वर्ष २०१८- २०१९ साठी GDP ७.४ % ने वाढेल असा अंदाज व्यक्त केला.
 • RBI ने IND–AS (INDIAN ACCOUNTING STANDARD) ची अंमलबजावणी १ वर्ष पुढे ढकलली.
 • AMTEK ऑटोला लिबर्टी ग्रूपकडे सोपवण्याचा निर्णय NCLT ने घेतला.
 • सेबीने काही शेअर्सच्या सर्किट लिमिटमध्ये बदल केले.
 • अलेम्बिक फार्माच्या गुजरातमधील पानेलाव युनिटची USFDA ने १२ मार्च ते २० मार्च २०१८ या काळात तपासणी केली. त्यात ३ त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात आणी प्रोडक्शन प्रोसेस मध्ये त्रुटी आढळल्या.
 • सिक्वेंट सायंटीफिक आणी स्ट्राईडस शासून या दोन्ही कंपन्यांचा APM बिझिनेस एकत्र करून त्याचे लिस्टिंग केले जाईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • NSE चा निर्देशांक निफ्टीमधून २ एप्रिल २०१८ पासून अंबुजा, बॉश आणी ऑरोबिंदो फार्मा या कंपन्या बाहेर पडल्या तर टायटन, ग्रासिम, आणी बजाज फिनसर्व यांचा समावेश झाला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • वेदांता या कंपनीने इलेक्ट्रो स्टील स्टील्स या IBC खाली गेलेल्या कंपनीच्या खरेदीची बोली जिंकली.
 • कॅन फिना होम्स या कंपनीतील आपला स्टेक विकण्याचा आपला निर्णय कॅनरा बँकेने तूर्तास रहित केला आहे.
 • कॅडिला हेल्थकेअर या कंपनीच्या अहमदाबाद येथील चन्गोदार प्लांटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • ऑटो विक्रीचे मार्च २०१८ चे आकडे आले यात मारुती, अशोक LEYLAND, महिंद्र आणी महिंद्र, बजाज ऑटो यांच्या विक्रीचे आकडे चांगले आले.
 • GALAXY SURFACTANT या कंपनीच्या प्लांटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत १४ त्रुटी दाखवल्या.
 • अस्कॉन JV कडून ITI या कंपनीला Rs १२०० कोटींची ऑर्डर मिळाली. ITI चे ऑर्डर बुक Rs १०००० कोटी झाले.
 • रिलायंस जियोने स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबर JV करून ३ एप्रिल २०१८ पासून पेमेंट बँक सुरु केली.
 • कर्नाटक मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने जाहिरातींचा भडीमार होईल. याचा फायदा जागरण, HT मेडीया, टी व्ही टूडे या कंपन्यांना होईल.
 • महिंद्र लाइफस्टाइलने पालघरला जे ८०० घरांचे प्रोजेक्ट सुरु केले होते त्याची विक्री चांगली झाली आहे. यातील ४०० घरे विकली गेली.
 • कन्साई NEROLAC ही कंपनी एक ‘पॉवडर कोटिंग’ करणारी कंपनी विकत घेणार आहे.
 • क्रूडचे वाढते भाव आणी सबसिडीचा ऑईल इंडियावर जास्त भार पडेल.
 • AU SMALL फायनान्स बँकेने इन्शुरन्स प्रोडक्ट विकण्यासाठी जनराली इन्शुरन्स कंपनीबरोबर करार केला.
 • NCC या कंपनीला मार्च २०१८ या महिन्यात Rs १०८५ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
 • सन दियाजीयो या शहरातून झेन्सार टेक्नॉलॉजी या कंपनीला US $ ७.९ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • सलमानखान याला हरणाची शिकार केल्याच्या केसमध्ये ५ वर्ष शिक्षा झाली. त्याच्याशी संबंधीत धर्मादाय ट्रस्ट ‘BEING HUMAN’ याच्याशी संबंधीत असलेली टेक्स्टाईल क्षेत्रातील कंपनी MANDHAANAA रिटेल या कंपनीचा शेअर १५% पडला.
 • मदरसन सुमी या कंपनीने REYDEL ऑटो ग्रूप US $ २०१ मिलियनला विकत घेतला

कॉर्पोरेट एक्शन     

 • स्मार्ट लिंक या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक शनिवार ७ एप्रिल २०१८ रोजी बोलावली आहे.
 • इंडस इंड बँकेने ILFS सिक्युरिटीज सर्विसेसच्या केलेल्या अधिग्रहणाला मंजुरी मिळाली.
 • GM ब्रुअरीज या कंपनीच्या चौथ्या तिमाहीचे आणी वार्षिक निकाल चांगले आले. कंपनीने तुमच्याजवळ ४ शेअर्स असतील तर १ बोनस शेअर देण्याची घोषणा केली. Rs ३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • MAGMA फिनकॉर्प या कंपनीचा QIP इशू ओपन झाला. याचा भाव प्रती शेअर Rs १५४.४७ आहे. (QIP विषयी खुलासेवार माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे.)
 • एप्रिल १४ २०१८ रोजी ICICI सिक्युरिटीज लाभांश देण्यावर विचार करेल.
 • अक्झो नोबेल ही कंपनी Rs २१०० प्रती शेअर या भावाने ११ लाख शेअर्स Rs २३५.२० कोटीना ‘BUY BACK’ करेल.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन या कंपनीचा IPO लवकरच येईल.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • करडा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या शेअर्सचे Rs १३६ वर तर संधार टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs ३४५ वर झाले.
 • ICICI सिक्युरिटीज या कंपनीच्या शेअर्स चे लिस्टिंग Rs ४३५ वर झाले. या कंपनीने IPO मध्ये Rs ५२० प्रती शेअर्स या भावाने शेअर्स दिले होते.
 • मिश्र धातू निगम या सरकारी कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs ८७ वर झाले. या कंपनीने आपले शेअर्स Rs ९० प्रती शेअर या भावाने IPO मध्ये दिले होते.

टेक्निकल विश्लेषण

गुरुवारी निफ्टी ५० चा कॅण्डल स्टीक चार्ट पाहिला तर ‘बुलीश मारुबोझू’ कॅन्डल तयार झाली या दिवसावर पूर्ण दिवस बुल्स चे नियंत्रण होते. अपर किंवा लोअर WICKS नव्हत्या. लो आणी हाय हेच ओपन आणी क्लोज होते.

मार्केटने काय शिकवले

मार्केटमध्ये VOLATILITY भरपूर आहे. मार्केट सतत पडते आहे किंवा वाढते आहे. पडताना ट्रेडिंग VOLUME कमी तर वाढताना ट्रेडिंग VOLUME जास्त असतो म्हणजेच मार्केटचा ट्रेंड बदलत आहे असे वाटते.

मार्केटमधील अस्थिरता सहन होत नसेल किंवा तिच्याशी जुळवून घेता येत नसेल तर स्वस्थ बसा. पण मार्केटमधील घडामोडींवर लक्ष ठेवा म्हणजे परत जेव्हा अशी अस्थिरता येईल तेव्हा तिला तोंड द्यावयाचे उपाय शोधता येतील. आणी होणारे नुकसान टाळता येईल किंवा किमान नुकसान सोसून मार्केटमधून तात्पुरते बाहेर येता येईल.

मार्केटमधून तुम्ही तात्पुरते बाहेर या पण मार्केटला तुमच्या मनातून बाहेर काढू नका. कारण मार्केटमधील स्थितीचा अंदाज यायचा असेल तर मार्केटला आपल्या मनाच्या अंतरी आणी जवळी बसवावे लागते.

आयुष्यात जशा आकस्मिक येणाऱ्या घटनांना, संकटाना, प्रतिकूल प्रसंगांना तोंड द्यावे लागते. तीच बाब मार्केटची  आहे.या प्रसंगातून, संकटातून, घटनातून शक्यतो सुरक्षित आणी फायदेशीररीत्या बाहेर पडण्याच्या वाटा शोधण्याची सवय ठेवा. नाईलाज झाला तर किमान नुकसान सोसून वेळीच बाहेर पडण्याची सवय अंगी बाणवून घ्या. पण मार्केट्ची साथ सोडू नका, त्याच्या वेगाबरोबर आपला वेग जमवण्याचा प्रयत्न करा. कारण ‘थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणी रस्ता सापडे’. हेच खरे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३६२६ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०३३१ वर तर बँक निफ्टी २४८७३ वर बंद झाले

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – साप शिडीचा खेळ – २ एप्रिल २०१८ ते ६ एप्रिल २०१८

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’  – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८ | Stock Market आणि

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s