आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’  – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’  – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८

ट्रंप साहेबाची सिरीयाबरोबर युद्धाची गोष्ट म्हणजे आता तरी ट्वीटर युद्धच ठरले आहे. मार्केटने आता ट्रंप साहेबांच्या गर्जना, वल्गना यांना आपल्या शेअर्सच्या किमतीत सामावून घेतले आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार आणी ट्रेडर्स यांनी या सर्वांकडे कमी लक्ष द्यावे असे ठरवले आहे असे वाटते. आंतरराष्ट्रीय उर्जा फोरममध्ये चीन काय भाष्य करते यावर सगळ्यांचे लक्ष आहे.

USA चे अध्यक्ष ट्रंप यांनी अल्युमिनियम उत्पादनात अग्रेसर असलेली रशियन कंपनी ‘RUSOYA’ वर SANCTION लागू केल्यामुळे अल्युमिनियमचे भाव ४.५ % वाढले. याचा फायदा हिंदाल्को, नाल्को, वेदान्ताला होईल. USA चे अध्यक्ष ट्रंप यांनी रशियाला त्याचा मित्र सिरीयावर आपण करणार असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. पण आता आपण याचा पुनर्विचार करू तसेच चीन बरोबरच्या ट्रेडवॉरचाही शांततेने विचार करू असे सांगितले.

सौदी अरेबियाच्या ‘AARAMCO’ या  कंपनीचा IPO येणार आहे. तो इशू येऊन जाईपर्यंत क्रूडचा दर US $ ८० प्रती BARREL पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरे पाहता क्रूडचा साठा आणी उत्पादन खूप आहे. पण ओपेक आणी इतर ऑईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन क्रूडचे उत्पादन कमी करण्याचा करार केला आहे. RBI च्या पॉलिसी मध्ये महागाईचा अंदाज व्यक्त करण्यासाठी क्रूडचा भाव कमाल US $ ६८ प्रती BARREL होईल असे गृहीत धरले आहे. जर क्रूडचा भाव US $ ६८ च्या पेक्षा जास्त झाला तर RBIच्या अनुमानापेक्षा महागाई वाढेल. महाराष्ट्रातील रीफायनरीमध्ये ‘AARAMCO’  सर्व सरकारी कंपन्यान बरोबर स्टेक घेण्याची शक्यता आहे.

सरकार कोल आणी ऑईल ब्लॉक्सच्या लिलावाची प्रक्रिया सोपी करणार आहे. याचा फायदा ‘कोल इंडिया’ आणी ‘ONGC’ या कंपन्यांना होईल.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकार लवकरच विजेसाठी प्रीपेड मीटर्स लावण्याचा विचार करत आहे. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे जरुरी आहे. तुम्ही वापरलेल्या विजेवर सरकार देत असलेली सबसिडी सरकार वीज कंपनीला देण्याऐवजी थेट तुमच्या (ग्राहकाच्या) खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे विजेची चोरी थांबेल आणी सबसिडीचा दुरुपयोग थांबेल.
 • सरकार यावर्षी शेती आणी संबंधीत उद्योग या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल.
 • सरकार उस उत्पादक शेतकर्यांना Rs ५५ प्रती टन सबसिडी देणार आहे.
 • OMC(ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी) क्रूडच्या भावात झालेली दरवाढ ग्राहकांकडे पास ऑन करू नये. ही दरवाढ आपल्या प्रॉफीट मार्जिनमध्ये सोसावी असे सरकारने सुचवले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • फेब्रुवारी २०१८ या महिन्यात IIP ७.१% ने ( जानेवारी २०१८मध्ये ही वाढ ७.४% होती) वाढले. यावेळी कॅपिटल गुड्स, उर्जा, इन्फ्रा, कन्झ्युमर द्युरेबल्स याचे उत्पादन वाढले. ही वाढ गेले चार महिने ७% च्या वर राहिली आहे.
 • मार्च २०१८ मध्ये CPI मार्च २०१८ मध्ये ४.२८ % (फेब्रुवारी २०१८मध्ये ४.४४% होते). ही CPI मधील वाढ गेल्या ५ महिन्यातील किमान वाढ आहे. याचा अर्थ महागाई कमी झाली आहे त्यामुळे RBI रेट वाढवण्याची शक्यता कमी झाली.

रिझर्व्ह बँक,सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • AXIS बँकेच्या CEO श्री शिखा शर्मा यांनी बँकेला मिळालेल्या सूचनेवरून आपण डिसेंबर २०१८ मध्ये आपले पद सोडू असे सांगितले. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्यांना ५ वर्षाची मुदतवाढ दिली होती.
 • सेबीने CDSL बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला CEO MR. रेड्डी याना दिलेली ५ वर्षांची मुदतवाढ १ वर्षाची करायला सांगितले. स्टॉक एक्स्चेंज तसेच क्लीअरिंग हाउसेसच्या व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून हा निर्णय घेतला असे सांगितले.
 • NCLT मध्ये मॉनेट इस्पात या कंपनीसाठी बोली JSW स्टीलच्या कन्सोर्शियमने जिंकली. मॉनेट इस्पातच्या क्रेडिटर्स नी सुद्धा ही बोली स्वीकारली आहे.
 • सुप्रीम कोर्टाने बिनानी सिमेंटच्या मालमत्तेबद्दल ऑउट कोर्ट ऑफ सेटलमेंट करायला परवानगी देण्यास नकार दिला. ही प्रक्रिया IBC अंतर्गत NCLT मध्येच पुरी करावी असे सांगितले. याप्रकारे सुप्रीम कोर्टाने NCLT ची स्वायत्तता अबाधित ठेवली.
 • TRAI ही टेलिकॉम क्षेत्रातील रेग्युलेटरी संस्था आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चार्जेससाठी आयडिया आणी वोडाफोन यानी US $ ३ बिलियन (Rs १८८७० कोटी) दिल्यावरच त्यांच्या मर्जरला मंजुरी देऊ असे सांगण्याची शक्यता आहे.
 • FSSAI या भारतातील संस्थेने भारतात FAT, साखर आणी मीठ  यांचे प्रमाण जास्त असलेल्या ‘JUNK फूड्स’ ची जाहिरात लहान मुलांसाठी असलेल्या वाहिन्यांवर किंवा कार्यक्रमात करण्यावर बंदी घातली आहे.
 • सेबी लवकरच वायदा बाजारात फिझीकल डिलिव्हरी आणण्याच्या विचारात आहे. जर कंपन्यांनी काही अटी पूर्ण केल्या नाहीत तर त्यांच्या शेअर्सची वायदा बाजारात फिझीकल डिलिव्हरी करावी लागेल. आता वायदा बाजारात शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी न होता वायदे कॅशबेसिसवर सेटल केले जातात.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • बँक ऑफ इंडिया आपली UAE मधील आपली शाखा बंद करणार आहे.
 • ICICI बँकेच्या अडचणी वाढतच आहेत. आता NCLTने ICICI बँकेने JP असोसिएटला दिलेल्या कर्जामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. बँकेने ७ दिवसाच्या आत NCLT ला स्पष्टीकरण द्यावे असा आदेश दिला आहे. ICICI बँकेने जे पी इन्फ्राची ८५८ एकर जमीन तारण ठेवून जे पी असोसिएटला कर्ज दिले. या जमिनीची किमत Rs ५००० ते ६००० आहे.
 • युरोपियन पेटंट ऑफिसकडून ऑईल इंडियाला पेटंट मिळाले.
 • रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चरला तामिळनाडूमध्ये Rs १०८० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • ITC आणी पेप्सिको या दोन्ही कंपन्यांमध्ये जाहिरातींवरून वाद चालू आहे. ITC आता ‘ट्रापिकाना’ची जाहिरात बदलण्यास तयार आहे.
 • फ्युचर सप्लाय चेनमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • एअरसेल ही आपला एक महत्वाचा ग्राहक असलेली कंपनी NCLT मध्ये गेल्यामुळे विप्रो या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपला प्रॉफीट गायडंस कमी केला आहे.
 • क्रुडऑइल, अल्युमिनियम, आयर्न ओअर यांचे भाव वाढल्यामुळे वेदान्ता या कंपनीला फायदा होईल.
 • GRAVITA या कंपनीने आंध्रप्रदेशातील युनिटमधून GRANUALS चे उत्पादन सुरु केले.
 • झेन टेक ही कंपनी सिम्युलेशन सर्विसेस देण्याचे तसेच ‘DRONE’ पुरवण्याचे काम करते. सरकारला ४६० DRONची जरुरी आहे.
 • मारुतीने गुजराथमधून स्विफ्ट गाड्यांची निर्यात सुरु केली.
 • WATER प्रोजेक्ट साठी वेलस्पन कॉर्पला Rs ९५४४ कोटींची मोठी ऑर्डर मिळाली.
 • DR रेड्डीज या कंपनीला त्यांच्या मेक्सिकोमधील प्लांटसाठी USFDA कडून EIR मिळाला.
 • बोईंग कंपनी, HAL(हिंदुस्थान एअरोनॉटिक्स LTD) आणी महिंद्र डिफेन्स सिस्टम्स यांनी F/A -१८ ही लढाऊ विमाने बनवण्यासाठी करार केला.
 • ITI या कंपनीचा निकाल चांगला आला. पुष्कळ वर्षानी कंपनी प्रॉफीट मध्ये आली.
 • इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे निकाल आले एकूण उत्पन्न Rs १८०८३ कोटी , EBITD Rs ४४७२ कोटी, एकूण नफा Rs ३६९० कोटी, तर ऑपरेटिंग मार्जिन २४.७% होते. कंपनीने FY २०१९ साठी CONSTANT करन्सी गायडंसमध्ये ६% -८%, डॉलर्स टर्ममध्ये ७% -९%  आणी मार्जिन  गायडंस २२% ते २४% दिला. कंपनीने Rs २०.५० प्रती  शेअर फायनल लाभांश आणी Rs १० प्रती शेअर स्पेशल लाभांश जाहीर केला. इन्फोसिस या कंपनीचे  निकाल अपेक्षेप्रमाणे लागले.

कॉर्पोरेट एक्शन

 • स्मार्ट लिंक या कंपनीने Rs १२० प्रती शेअर या भावाने ‘शेअर BUY BACK’ जाहीर केला. (‘BUY BACK’ या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’या पुस्तकात दिली आहे)
 • फेडरल बँक फेडरल इन्शुरन्स या कंपनीमधील आपला ४८% स्टेक विकणार आहे.
 • सेंट्रल बँकेने आपला होम फायनान्स बिझिनेस विकण्याची योजना रद्द केली. सेन्ट्रल बँकेने ARSS इन्फ्रा विरुद्ध ६२.८३ कोटी घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला.
 • फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी विकत घेण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल्सने आपली योजना जाहीर केल्यावर काही मायनॉरिटी शेअरहोल्डर्सनी आपली नाराजी व्यक्त केली होती. यावर उपाय म्हणून मणिपाल हॉस्पिटल्सने आपली सुधारीत ऑफर जाहीर केली. आता या स्पर्धेत मलेशियाची कंपनी IHH हेल्थकेअरने प्रती शेअर Rs १६० भावाने शेअर्स खरेदी करण्याची एक आठवड्याची मुदत दिली. आता हिरो ग्रूपचे मुंजाल आणी डाबर ग्रुपचे बर्मन यांनी Rs १२५० कोटी फोर्टिसमध्ये गुंतवण्याची ऑफर दिली आहे. यातील Rs ५०० कोटी लगेच तर Rs ७५० कोटी ड्यू डीलीजन्स केल्यानंतर ऑफर केले आहेत.
 • MAX इंडिया चा प्रमोटर अनालजितसिंग MAX हेल्थकेअर मधील मधील ४७.५% स्टेक लाईफ हेल्थकेअर ग्रूप कडून US $ ४५० ते ५४० मिलियनला विकत घेण्याचा विचार करत आहे.

या आठवड्यात झालेली लिस्टिंग

 • लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्सचे लिस्टिंग चांगले झाले. ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्याना Rs १० प्रती शेअर लिस्टिंग गेन झाला.

मार्केटने काय शिकवले

गुंतवणूक करत असताना एखाद्या कंपनीचा शेअर केवळ स्वस्त मिळतो आहे म्हणून विकत घेऊ नये. नेहेमी कंपनीने आपले कार्यक्षेत्र, व्यवस्थापन, ध्येयधोरणे, विस्तारयोजना असे काही बदल केले आहेत कां ? ज्यायोगे कंपनीची प्रगती होईल याचा आढावा घ्यावा जर शेअरची किमत खूपच कमी झाली असेल तर त्यामागच्या कारणांची माहिती करून घेऊन मगच असा शेअर खरेदी करणे योग्य ठरते. आपली धोका पत्करण्याची तयारी आणी दीर्घ मुदतीसाठी थांबण्याची तयारी यांचाही विचार करावा.

जेव्हा एखादा सेक्टर प्रकाशात असतो तेव्हा विविध वर्तमानपत्रात, दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून या क्षेत्रातील कंपन्यांची माहिती आपल्या संग्रही ठेवावी. हा सेक्टर जोपर्यंत प्रगतीच्या प्रकाशात असतो तोपर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो.  उदा. आता होजीयरी सेक्टर प्रकाशात आहे यामध्ये LUX, VIP क्लोदिंग, बॉम्बे डाईंग, पेज इंडस्ट्रीज.

PC ज्युवेलर्सच्या शेअरमध्ये ‘डेड कॅट बाउन्स’ ची लक्षणे आढळत आहेत. हा शेअर कोणताही विशिष्ट ‘PATTERN’ नसताना वाढत आहे. सिंडीकेट बँकेचे बरेच NPA अकौंट NCLT मध्ये गेले. त्यामुळे बँकेच्या शेअर्सचा भाव ३०% ने पडला. जसजशी या अकौंटविषयी  NCLTमध्ये रेझोल्युशन होतील तसा हळू हळू या शेअर चा भाव सुधारत जाईल.

आता भारताच्या कॉर्पोरेट जगतात वार्षिक निकाल जाहीर होण्याचा काळ आहे.गोवा कार्बन, GM ब्रुवरीज आणी VST इंडस्ट्रीज यांचे वार्षिक निकाल चांगले आले. VST इंडस्ट्रीज ने Rs ७७.५० प्रती शेअर लाभांश दिला. आपल्याला वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे वार्षिक निकाल कधी जाहिर करतील याची माहिती BSE किंवा NSE च्या साईटवर जाऊन रिझल्ट कॅलेंडरमध्ये मिळू शकते. मार्केट या वर्षी कॉर्पोरेट रिझल्ट्सच्या बाबतीत आशावादी आहे. आपण कंपनीचे गेल्या तीन तीमाहींचे निकाल तसेच अग्रिम आयकराचे आकडे बघून निकालाच्या आधी शॉर्ट टर्म ट्रेड करू शकता.

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अक्षय पात्राची आठवण होते. या पात्रातील अन्न असो संपत्ती असो नाहीशी कधीच होत नाही. आपण ठेवलेल्या अन्न किंवा धनाच्या कितीतरी पट हे पात्र आपल्याला देते. शेअर मार्केट जवळ जवळ असेच अक्षय पात्र आहे. यातील संपत्ती प्रत्येकासाठी त्याला झेपेल त्या त्या प्रमाणात उपलब्ध आहे अर्थात अभ्यास, व्यासंग याची गुंतवणूक आपणाला करावीच लागते. प्रत्येकाला त्याच्या गुंतवणुकीच्या, अभ्यासाच्या आणी व्यासंगाच्या प्रमाणात शेअर मार्केट देते. पडले तरी वाढते, पडले तरी देते आणी वाढले तर देतेच देते. आपण अक्षय तृतीयेला ज्या कंपन्यांचे शेअर्स पिढ्यांनपिढ्या गुंतवणूकदारांच्या आणी ट्रेडर्सच्या संपत्तीमध्ये वाढ करीत आहेत अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. म्हणजे या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर सुरु केलेली आपली संपती आणी समृद्धीची वाढ अक्षय टिकेल. आणी पुढील पिढ्यांसाठी एक अक्षय ठेवा होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१९२ वर NSE निर्देशांक निफ्टी १०४८० वर आणी बँक निफ्टी २५२०० वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – शेअर मार्केट एक ‘अक्षय पात्र’  – ९ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८

 1. पिंगबॅक अनामित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s