आठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८

टी सी एस या कंपनीने MULTI-BAGGER शेअर आणी इन्व्हेस्टर फ्रेंडली कंपनी म्हणजे काय याचा आदर्श घालून दिला.  टी सी एस ही मार्केट कॅप US $ १०० बिलियन असलेली भारतातली पहिल्या नंबरची लिस्टेड कंपनी झाली. कंपनीच्या शेअर्सचा भाव सतत वाढत असल्यामुळे  डे ट्रेडर्स, अल्प मध्यम आणी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या सर्वांना कंपनीने लाभ करून दिला. कंपनीने IPO आल्यापासून चौथ्या वेळी एकास एक बोनस आणी Rs २९ च्या लाभांशाची घोषणा केली. ‘सबका साथ सबका लाभ’ या म्हणण्याप्रमाणे आपल्या कर्तुत्वामुळे झालेला फायदा शेअरहोल्डर्समध्ये वाटून सगळ्यांना आनंदित केले. यावेळी आतापर्यंत आलेले चौथ्या तिमाहीचे सर्व निकाल चांगले आले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडन, UK च्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे या देशांबरोबर काही व्यापारी क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे.

USA ने रशियावर आणखी निर्बंध घालण्याचा तसेच सिरीयावरील हल्ला अधिक तीव्र करण्याचा आपला विचात तूर्तास तरी पुढे ढकलला आहे.

USA ने ‘रुसोया’ या धातू क्षेत्रातील रशियन सरकारी कंपनीवर घातलेले निर्बंध या कंपनीला लागू होऊ नयेत म्हणून आपण ह्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण करू असे रशियन सरकारने जाहीर केल्यावर मेटल क्षेत्रातील सर्व शेअर्स पडले.

आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड या संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे अनुमान वित्तीय वर्ष २०१९ साठी ७.४% तर वित्तीय वर्ष २०२० साठी ७.८ % केले आहे.

चीन कोळसा उत्पादनात १५ कोटी टनाची कपात करणार आहे. याचा परिणाम कोल इंडियावर होईल.

सरकारी अनौंसमेंट

सोडा ASH वर लावलेली ANTI DUMPING ड्युटी सरकारने १ वर्षासाठी वाढवली याचा फायदा DCW, कनोरिया केमिकल्स, टाटा केमिकल्स, दीपक नायट्रेट, नोसिल, GHCL या कंपन्यांना होईल.

एअर इंडियासाठी सरकारने EOL १४ मे २०१८ पर्यंत देण्यास सांगितले आहे. जेट एअर वेज, टाटा, इंडिगो आणी काही परदेशी विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी आणी २ ते तीन फंडानी रुची दाखवली आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

GST कौन्सिलने २० एप्रिलपासून  आणखी ६ राज्यांमध्ये E WAY बिल प्रणाली लागू करण्याचे ठरवले आहे.

IMD ने सुद्धा सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. सरासरी ९७% पाउस पडेल असा अंदाज वर्तवला. पावसाची भारतभर विभागणीही समाधानकारक असेल असे अनुमान सांगितले. जुलै ते सप्टेंबर या काळात अनावृष्टी किंवा अतिवृष्टी न होता सामान्य मान्सून राहील असा अंदाज वर्तवला. या अनुमानामुळे खरीप पीक चांगले येऊन ग्रामीण भागातील उत्पन्न वाढल्यामुळे ऑटो, TRACTOR , खते बीबियाणे, सोने आणी जवाहीर, आणी FMCG सेक्टरमधील कंपन्यांना फायदा होईल.

RBI ने ठरवलेले अकौंट NPA होण्याचे नियम शिथिल करण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्ज/व्याज परतीच्यामधील DEFAULT चा काल वाढवणे तसेच रेझोल्युशन प्लान मंजूर करण्यासाठी लागणार्या कर्जदारांच्या सहमतीची अट ( १००% वरून ७५%) याचा समावेश असू शकतो. हे नियम शिथिल करण्यास RBI ने आपली असमर्थता जाहीर केली.

एव्हरेडी बॅंट्री या कंपनीला CCI ने Rs १७१ कोटी दंड ठोठावला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताची निर्यात मार्च २०१८ या महिन्यात  US $ २९.१ बिलियन इतकी तर आयात US $ ४२.८ बिलियन झाली. त्यामुळे ट्रेड डेफिसिट US $ १३.७ बिलियन झाली.
 • मार्च २०१८ मध्ये WPI २.४७% होता (फेब्रुवारी २.४८% होता.) अन्नधान्य, भाज्या यांचे भाव कमी झाले. तर क्रूडचा भाव वाढला.
 • रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर ७ महिन्याच्या किमान स्तरावर पोहोचला. हा दर US$ १ = Rs ६६.०० इतका होता.
 • कारडा कन्स्ट्रकशन या कंपनीचा शेअर ‘T टू T’ ग्रूप मधून ‘B’ ग्रूप मध्ये गेला. त्याच्या सर्किटचे लिमिट २०% केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सुट्यांचा मोसम जवळ आल्याने ऑक्युपन्सी रेट आणी रूमचे भाडे वाढेल असा अंदाज असल्याने सर्व हॉटेल्स कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढत आहेत.
 • अल्युमिनियम आणी अल्युमिना यांच्या किमती वाढत आहेत. याचा फायदा नाल्को आणी हिंदाल्को यांना होईल.
 • जीनस पॉवर ही कंपनी लाईटची मीटर्स बनवते. सरकारच्या नव्या पॉलिसीचा फायदा या कंपनीला होईल.
 • टाटा स्पॉंज ( Rs २० प्रती शेअरलाभांश), ICICI सिक्युरिटीज, भन्साली इंजिनिअरिंग, DCB, टी सि एस, इंडस इंड बँक, HDFC STANDARD लाईफ, ACC या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • सिप्लाच्या इंदोर युनिटसाठी केलेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चीट दिली.
 • टाटा मोटर्स UK मधील १००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
 • ANDREW YULE या कंपनीने आपला सर्वात उत्तम चहा रेकॉर्ड किमतीला विकला.
 • GAIL या कंपनीला पाईप लाईन टाकण्यासाठी Rs ७८० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • मध्यांचल विद्युत निगमकडून बजाज इलेक्ट्रिकल्सला Rs ३५७७ कोटींचे काम मिळाले.
 • गोवा कार्बन च्या पारादीप युनिटचे काम पुन्हा सुरु झाले.
 • २०२१ या वर्षापर्यंत ‘ओला’ही कंपनी M & M कडून १० लाख इलेक्ट्रिकल वाहने विकत घेईल.
 • अदानी पोर्टने RIGASIFIKETION साठी IOC बरोबर २० वर्षांसाठी करार केला.
 • PNB, पंजाब आणी सिंध बँक या बँकानमध्ये कर्ज देण्याच्या बाबतीत अनियमिततेचे घोटाळे उघडकीस आले आहेत.
 • सरकारला बुलेटप्रूफ JACKETची मोठी आवश्यकता असल्याने यासाठी लागणारे स्पेशल स्टील, हाय VALUए अलॉय बनवणाऱ्या मिश्र धातू निगम या कंपनीला सरकारकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता असल्याने या कंपनीचा शेअर ५०%ने वधारला.
 • J B केमिकल्स या कंपनीला त्यांचे दमण युनिट बंद करायला सांगितले आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • गृह फायनान्स या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला.
 • युनायटेड स्पिरीट या कंपनीने आपल्या एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
 • ONGC त्यांचा पवन हंस या कंपनीमधील आपला स्टेक विकणार आहे.
 • सिक्का CEO असताना इन्फोसिसने खरेदी केलेली पनाया ही कंपनी विकण्याचा निर्णय इन्फोसिसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने घेतला आहे.
 • NCLTने इलेक्ट्रोस्टील्स स्टील या इनसॉलवन्सीमध्ये गेलेल्या कंपनीसाठी वेदान्ता लिमिटेड यांची बोली मंजूर केली. यामुळे वेदान्ता या आंतरराष्ट्रीय कंपनीचा झिंक अल्युमिनियम सिल्व्हर आयर्न ओअर या बरोबरच स्टील उत्पादनात प्रवेश झाला. या कंपनीत ९०% स्टेक वेदांताचा असेल. वेदान्ता या कंपनीत Rs ३०० ते Rs ४०० कोटींची गुंतवणूक करेल.
 • जागरण प्रकाशन या कंपनीने ‘BUY BACK’ ऑफ शेअर्स विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २७ एप्रिल रोजी बोलावली आहे.
 • लक्षद्वीप PVT लिमिटेड या कंपनीने जेपी असोसिएट आणी जे पी इन्फ्रा या कंपन्यांसाठी Rs ७३५० कोटींची बोली दिली आहे.
 • फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी खरेदी करण्यासाठी आता चीनमधील ‘फोसून’ या कंपनीने Rs १५६ प्रती शेअर या भावाने शेअर खरेदी करण्यासाठी ऑफर दिली आहे. याआधी मणिपाल हॉस्पिटल्स, IHH हेल्थकेअर, आणी मुंजाल आणी बर्मन याची संयुक्त ऑफर या कंपनीसाठी आलेली आहे. फोर्टीस हेल्थकेअर च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने IHH हेल्थकेअरची ऑफर नाकारली आहे. फोर्टिसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने २५ एप्रिलपर्यंत येणार्या बाइंडीग ऑफरवर विचार केला जाईल असे सांगितले.
 • KPIT टेक्नोलॉजी ही कंपनी Rs १८६ प्रती शेअर्स या भावाने ओपन ऑफर आणत आहे. ही ऑफर २७ एप्रिलला बंद होईल.
 • टी सि एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला. कंपनीने, कंपनीच्या ५० साव्या वाढदिवशी शेअरहोल्डरना १:१ बोनस दिला आणी Rs २९ लाभांश जाहीर केला.
 • कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने ३० एप्रिल २०१८ रोजी स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी बोर्ड ओड डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • किर्लोस्कर ऑईलसाठी BLACKSTONE ने बोली लावली आहे अशी बातमी आहे.
 • युनिलिव्हर मे महिन्यात ६०० कोटी युरो इतकी रक्कम शेअर ‘BUY BACK’ साठी खर्च करेल.
 • अवंती फीड्स या कंपनीने ९मे २०१८ रोजी बोनसवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

मार्केटने काय शिकवले.

 

शेअरमार्केट हे असे कोडे आहे की ते कितीही उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी पूर्णपणे उलगडा होणे अशक्य आहे. शेअरमार्केटमध्ये राजकीय, सामाजिक. आर्थिक. जागतिक. एत्ततदेशीय, वर्तमान तसेच भविष्यात ज्या घटनांचा वेध घेऊ शकतो अशा घटनांचे प्रतिबिंब, परिणाम इतक्या वेगाने होत असतो की शेअरमार्केटचे रूप क्षणाक्षणाला बदलत असते असे म्हटले तर सत्यापासून फार दूर असणार नाही. या वेगाने सामान्य गुंतवणूकदार गोंधळून जातो. माझ्याकडे प्रशिक्षण वर्गाला येणाऱ्या लोकांची गोंधळाची मनःस्थिती असते. यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेवून तो कार्यान्वित करण्याची जरुरी आहे. पांच मिनिटात दिसणारे Rs ५००० चे प्रॉफीट नाहीसे होऊन त्या जागी Rs २००० चा लॉस दिसू लागतो. यासाठी मार्केटचे निरीक्षण करा, कोणत्या सेक्टरमध्ये ट्रेडिंग/गुंतवणूक करायचे ते ठरवा, करेक्शन संपण्याच्या वेळी  विकत घ्या आणी RALLY संपण्याच्या वेळी विका. आपल्याला किती फायदा हवा आहे याचा अंदाज बांधा तसेच आपण किती लॉस सोसू शकतो याचा अंदाज घ्या आणी आपापले टार्गेट आणी स्टॉप लॉस ठरवा. मार्केटचा अंदाज घेत घेत थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी आणी विक्री करा. स्वतःवरचा, स्वतःच्या अभ्यासावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. दुसर्याने सरी बांधली म्हणून आपल्या गळ्याला दोरी लावून घेऊ नका. मार्केटमधील चढ उतार आणी त्यांचा वेग यांचे आकलन होत नसेल तर काही काल स्वस्थ बसा.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधी येणार हे आपल्याला माहीत असते. बालपण, तारुण्य वार्धक्य हे शारिरीक बदलानुसार जाणवते. पण मार्केटमध्ये बदलणारे हवामान समजायला वेळ लागतो. यावर्षी तर मार्केट्च्या  हवेत आमुलाग्र बदल होताहेत. जग जवळ आले त्याचे काही फायदे तर काही तोटे होत आहेत. या आठवड्यात तर क्रूड, करन्सी,मेटल, USA आणी चीन यांच्यामधील ट्रेड वॉर, ट्रंप साहेबांचे विजेच्या गतीने बदलणारे निर्णय, सरकारी बँकांमधील घोटाळे, विविध राज्यातील निवडणुका असे विविध प्रकारचे आणी विविध तीव्रतेचे धक्के मार्केटने पचवले.

या सर्व अतिशय व्होलटाईल मार्केटमध्ये आपले एक सुरक्षित आणी फायदेशीर घरटे (पोर्टफोलियो) कसे बांधायचे ते हळूहळू अनुभवाने आणी अभ्यासाने येणार्या शहाणपणाने समजते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४४१५ NSE निर्देशांक निफ्टी १०५६४ आणी बँक निफ्टी २४९४३ वर बंद झाले.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – सुवर्ण महोत्सव टी सी एस चा आणी गुंतवणूकदारांचा – १६ एप्रिल २०१८ ते २० एप्रिल २०१८

 1. devendra

  फारच उपयुक्त आणि तरीही सहज, सोपे विश्लेषण.
  TCS च्या बोनस शेअर चा फायदा कोणाला होईल ?
  म्हणजे त्यासाठी eligibility criteria काय आहे ?
  अगोदरच शेअर्स विकत घेतलेले पाहिजेत की अजूनही आपण शेअर्स विकत घेऊ शकतो ?
  आभारी आहे.
  देवेंद्र बागुल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s