Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन – अपेक्षा आणी वास्तव शेअर मार्केटचे – ३० एप्रिल २०१८ ते ४ मे २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

**** हे समालोचन ‘मार्केट आणि मी’ (www.marketaanime.com) या ब्लॉग वर भाग्यश्री फाटक यांनी प्रकाशित केलेलं आहे. जर तुम्ही इतर माध्यमात हि माहिती share करत असाल तर मूळ लेखक आणि ब्लॉग यांची नोंद करून share करा ***

अपेक्षा आणी वास्तव शेअर मार्केटचे – ३० एप्रिल २०१८ ते ४ मे २०१८

हा आठवडा अनेक घटनांनी व्यापलेला, गोंधळाचा गेला. GST कौन्सिलची बैठक, फेडची बैठक, अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल,सोमवारी बौद्ध पौर्णिमेनिमित्त चीन, जपानची मार्केट्स तसेच भारतातील करन्सी मार्केट बंद आणि बरंच काही. १ मे रोजी BSE आणी NSE ह्या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजना महाराष्ट्रदिनानिमित्त सुट्टी होती.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • उत्तर कोरिया आणी दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या शिखर परिषदेत उत्तर कोरियाने घोषणा केली की त्यांच्या देशातील जेथे अणुचाचण्या करण्यात येतात अशी सर्व केंद्रे मे २०१८ पर्यंत बंद केली जातील. एवढेच नाही तर पारदर्शकतेसाठी USA आणी दक्षिण कोरियाच्या तज्ञांना आणी पत्रकारांना निमंत्रण दिले.
 • फेड ची दोन दिवसांची बैठक संपली.या वर्षात ४ वेळा दर वाढवले जातील असे सांगितले. दर वाढवले तरी USA च्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येईल असे फेडला वाटत नाही.
 • चीन आणी USA यांच्यात ट्रेड वॉर थांबवण्यासाठी चर्चा सुरु झाली.

सरकारी अनौंसमेंट

 • या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता भारतातील प्रत्येक गावात विजेची जोडणी झाली असल्याची घोषणा केली. भारतात आता १००% इलेक्ट्रिफिकेशन झाले. याचा अनुकूल परिणाम पॉवर आणी पॉवर अक्सेसरीज बनवणाऱ्या कंपन्यांवर होईल उदा KEI, KEC INTERNATIONAL, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, HPL इलेक्ट्रिक, V गार्ड, हवेल्ल्स, फिनोलेक्स केबल्स, SCHNEIDER इलेक्ट्रिक, CROMPTON कंझुमर.
 • सरकार लवकरच नवीन टेलिकॉम पॉलिसी आणत आहे. या पॉलिसीप्रमाणे टेलिकॉम कंपन्या आणी सोशल मेडीया कंपन्यांना भारतात सन २०२२ पर्यंत वेगळा सर्व्हर बसवावा लागेल. टेलिकॉम क्षेत्रात US $ १०० बिलियन गुंतवणूक, सर्वाना पटेल अशी स्पेक्ट्रम पॉलिसी, मर्जर आणी अक्विझिशन साठी सोपी पद्धत,रोजगार निर्मिती आणी GDPमध्ये ८% सहभाग ही या पॉलिसी ची मार्गदर्शक तत्वे असतील. तसेच टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारीं निवारण करण्यासाठी आता एक टेलिकॉम OMBUDSMAN ही सर्वोच्च ऑथोरिटी स्थापन करण्यात येईल.
 • सरकार उस उत्पादक शेतकऱ्यांना Rs ५५ सबसिडी देणार आहे. सरकार प्रती क्विंटल Rs ५.५० एस्क्रो खात्यात जमा करायचे आहेत. शुगर सेस प्रती क्विंटल Rs ३ आकारला जावा आणी इथनॉल वर आता ५% प्रमाणे GST आकारला जावा. असा GST कौन्सिलच्या बैठकीचा अजेंडा होता.
 • सरकारने चेन्नई एअरपोर्ट टर्मिनलसाठी Rs २४६७ कोटी, लखनौ एअरपोर्ट टर्मिनलसाठीसाठी Rs १२३२ कोटी तर गौहाती एअरपोर्ट टर्मिनलसाठी साठी Rs १३८३ कोटी मंजूर केले.
 • सरकार आपला कृषी उन्नती कार्यक्रम पुढील तीन वर्षासाठी चालू ठेवणार आहे. तसेच मायक्रो इरिगेशनवर सबसिडी, बिबियाणे सुलभ अटींवर उपलब्ध करून देईल. याचा फायदा जैन इरिगेशन, सिंटेक्स, ASTRAL पॉली या कंपन्यांना होईल.
 • बिअरसाठी मागणी UP आणी कर्नाटक मध्ये वाढते आहे. बॉटलिंग मध्ये बदल केले आहेत, बॉटलवर बारकोड असणे सक्तीचे केले आहे. तेव्हढ्या बॉटल्स परत मागवल्या गेल्यामुळे मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली. म्हणून मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले.
 • विमानाच्या इंधनाच्या भावात ६% वाढ झाली. याचा परिणाम जेट, स्पाईस जेट, इंडिगो या कंपन्यांवर झाला.
 • कर्ज देणाऱ्या बँका,PFC, आणी REC पॉवर सेक्टरमधील १४ NPA खात्यांसाठी एक फंड बनवतील.

RBI, सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने टाटा केमिकल्स मध्ये FPI ला मंजुरी दिली.
 • NCLT ने वेदान्ताच्या इलेक्ट्रोस्टील्स स्टील्स या कंपनीच्या अक्विझिशनसाठी स्टे दिला आहे.
 • भूषण स्टील आणी पॉवर या कंपनीच्या कर्जदारांनी दुसऱ्या राउंडमध्ये बोली मागविण्यास विरोध दर्शवला आहे. आता लिबर्टी हाउस, टाटा स्टील, आणी JSW स्टील यांच्या ऑफर्सवर विचार होईल.
 • सेबीने सांगितले की १ जून २०१८ पासून ‘SPAN’ मार्जिन बरोबर एक्स्पोजर मार्जिनसुद्धा घ्यावे लागेल. त्यामुळे ऑप्शन ट्रेडर्सना जास्ती खर्च येईल.
 • बिनानी सिमेंटच्या ASSET साठी आता अल्ट्राटेक सिमेंट आणी दालमिया भारत यांच्यात चढाओढ सुरु आहे.
 • GST कौन्सिल च्या ४ मे २०१८ च्या बैठकीत साखरेवर सेस लावणे आणी इथनॉलवरचा GST कमी करणे आणी डिजिटल पेमेंटवर इन्सेनटिव्ह देण्यावर सर्वसहमती होऊ शकली नाही. GSTN ही आता संपूर्णपणे सरकारी कंपनी होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ‘फिच’ या रेटिंग एजन्सीने भारताच्या अर्थव्यवस्थेला दिलेले ‘BBB’ हे रेटिंग कायम ठेवले असून भारताची अर्थव्यवस्था या यावर्षात ७.३% ने तर पुढील वर्षात ७.५% ने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • एप्रिल २०१८ साठी ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले. मारुती, महिंद्र आणी महिंद्र, टाटा मोटर्स यांचे कार्सविक्रीचे तर महिंद्र आणी महिंद्र आणी टाटा मोटर्स यांचे कमर्शियल व्हेईकल्सच्या विक्रीचे आकडे चांगले आले.
 • इंटरग्लोब एव्हीएशन या कंपनीचे CEO आदित्य घोष यांनी राजीनामा दिला. राहुल भाटीया हे नवीन CEO असतील. ही बातमी मार्केटला माहीत होती म्हणून इंडिगोचा शेअर पडला.
 • इक्विटास होल्डिंग्स, थायरो केअर, CYIENT, MCX, मर्क, कोटक महिंद्र बँक,दिवाण हौसिंग, सिएट, डाबर, सोम डीस्टीलरिज,HDFC, हिरो मोटो, सिमेन्स, वरुण बिव्हरेजीस, VENKY’ज, कॅपिटल फर्स्ट, वेदान्ता, BSE( Rs ३१ प्रती शेअर लाभांश) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ऑपटो सर्किट,वेलस्पन, टाटा पॉवर(प्रोविजन WRITE BACK) TBZ (सणासुदीचे दिवस)  ह्या कंपन्या टर्नअराउंड झाल्या.
 • लवासाचा घाटा चौपट झाल्यामुळे HCC या कंपनीचा शेअर पडला.
 • P C ज्युवेलर्सचा प्रमोटर बलराम गर्ग यांना अटक झाली अशी बातमी पसरल्यामुळे शेअर खूपच पडला. नंतर प्रमोटरने स्वतः येऊन असे काही झाले नसल्याचे आणी CBI ने कोणतीही चौकशी केली नसल्याचे सांगितल्यावर शेअर पुन्हा काही प्रमाणात सुधारला. P C ज्युवेलर्सचे प्रमोटर ‘शेअर BUY BACK’ मध्ये सहभागी होणार नाहीत.
 • HCL टेक चा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. गेल्या वर्षभरात कंपनी ORGANIC आणी INORGANIC ग्रोथ चांगली केली. बऱ्याच कंपन्यांचे अक्विझिशन केले.
 • NBCC ला Rs २००० कोटींची ऑर्डर पूर्व आफ्रिकन देशातून मिळाली. ही कंपनी नोडल एजन्सीसारखे काम करते.
 • हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या डीटरजंटचे भाव वाढवले
 • IDFC,हिंदुस्थान झिंक,इंडिगो, कॅस्ट्रोल या कंपन्यांचा चौथ्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता. मेरिको, अजंता फार्मा यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत.
 • मारुती ही ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी आता रॉयलटीचे पेमेंट भारतीय करन्सी मध्ये करेल. त्यामुळे करन्सी रिस्क कमी होईल. आतापर्यंत कंपनी जापनीज येन मध्ये पेमेंट करत आहे.
 • हौसिंग फायनान्स कंपन्या ECB चा उपयोग करून पैसा उभा करू शकतील.त्यामुळे त्यांच्या व्याजाच्या खर्चात बचत होईल.
 • USFDA ने बायोकॉन च्या बंगलोर येथील युनिटच्या केलेल्या तपासणीत ७ त्रुटी दाखवल्या आणी फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
 • सिकल लॉजिस्टिक या कंपनीला Rs १३४५ कोटींची ऑर्डर मिळाली.या कंपनीच्या शेअरची मार्केट कॅप Rs ११७५ कोटी आहे. त्यामानाने ही ऑर्डर मोठी आहे.
 • अदानी पोर्टच्या हाझिरा पोर्टसाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • सन फार्माच्या दादरी प्लांटमध्ये तयार होणाऱ्या औषधांना USFDA कडून अनुमती मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • LG बाळकृष्ण या कंपनीने १:१ बोनस दिला.
 • जागरण प्रकाशन या कंपनीने Rs १९५ प्रती शेअर या भावाने शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला.
 • HDFC ने Rs १६.५०, MCX ने Rs १७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • SCHNEIDER इलेक्ट्रिक ही फ्रेंच कंपनी लार्सन आणी टुब्रो चा इलेक्ट्रिकल आणी ऑटोमेशन कारभार Rs १४००० कोटींना विकत घेणार आहे. या साठी कंपनीने सिंगापूरच्या तमासेकबरोबर कनसॉरशियम स्थापन केले आहे. नवीन कंपनी ही एनर्जी व्यवस्थापन आणी औद्योगिक ऑटोमेशनमध्ये काम करील.
 • फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीसाठी वेगवेगळ्या बीडर्समध्ये बीड्स वाढवून देण्यासाठी स्पर्धा चालू झाली आहे. IHH ने आपली ऑफर Rs १७५ प्रती शेअर तर बर्मन आणी मुंजाल यांच्या जोडीने आपण कंपनीत Rs १८०० कोटी गुंतवू असे सांगितले. रेडीयंट या कंपनीने मात्र आपण आपली ऑफर रिव्हाईज करणार नसल्याचे सांगितले.
 • IDBI ने आपला IDBI फेडरल मधील ४८% स्टेक विकण्यासाठी MAX आणी एक्साईड लाईफ यांच्याशी बोलणी चालू केली आहेत. IDBI बँकेला या व्यवहारातून Rs ३००० कोटी मिळण्याची शक्यता आहे.
 • ३ मे २०१८ पासून MMTC एक्स बोनस झाला.
 • इमामी या कंपनीने १:१ असा बोनस जाहीर केला. ( माझ्या मार्केट आणी मी या पुस्तकात बोनस स्प्लिट मर्जर इत्यादी सर्व कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती दिली आहे.)

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • SREI पॉवर इक्विपमेंट फायनान्स कंपनीचा IPO आणणार आहे.
 • JOHN एनर्जी या कंपनीने Rs ३५० कोटी रकमेच्या IPO साठी सेबीकडे अर्ज दिला.

मार्केटने काय शिकवले

 • कोटक महिंद्र ही बँक AXIS बँकेचे अधिग्रहण करणार आहे अशी बातमी मार्केटला असल्यामुळे या दोन बँकांचे शेअर वाढण्यास सुरुवात झाली. तांत्रिक सल्लागारांनी या बातमीच्या आधारे आपापले चार्ट बघून दोन्ही बँकांसाठी वरच्या लेव्हलची टार्गेट्स दिली. AXIS बँकेने या बातमीचा इन्कार केल्याबरोबर या दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये पडझड झाली. अशा अनिश्चिततेचा सामना ट्रेडर्सना नेहेमी करावा लागतो.
 • VIX (वोल्टालिटी इंडेक्स ) १२ च्या जवळ आला आहे. त्यामुळे मार्केट बुधवारी VOLATILE होते. अशावेळी धैर्य करून कॉनट्रा ट्रेड घ्यावा.
 • VIX १२च्या पुढे गेल्यास ट्रेंड रिव्हर्सलचे चिन्ह असते. १३.५० च्या वर गेल्यास धोक्याची घंटा समजावी.
 • शुक्रवारी GST कौन्सिलची बैठक होती. या बैठकीत सिमेंट, पेंट, आणी होम अप्लायन्सेस यांच्यावरील GST बाबत विचार केला जाईल असे गाजत होते. पण तारीख ४ मे २०१८ रोजी GST कौन्सिलच्या बैठकीच्या अजेंडावर हे विषय नव्हते आणी यावर कुठलीही चर्चा होणार नाही असे जाहीर झाले. या बातमीमुळे पेंट, सिमेंट आणी होम अप्लायन्सेसच्या कंपन्यांचे शेअर वाढत होते. त्यामुळे कधी कधी निश्चित वाटणाऱ्या बातम्या रद्द होऊ शकतात. यामुळे होणारा तोटा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ ठेवणे जरुरीचे आहे.
 • जो शेअर कॅशमार्केटमध्ये खरेदी केला आणी त्याचाच कॉलही घेतला असे केल्यास दोन्हीकडून तोटा व्हायची शक्यता असते. वायदा बाजार आणी कॅश मार्केटमध्ये एकाच प्रकारचा ट्रेड घेऊ नये
 • लार्सन आणी टुब्रोने इलेक्ट्रिकल आणी ऑटोमेशन बिझिनेस विकल्यामुळे त्या शेअरच्या EPS मध्ये Rs ४५चा फरक पडेल.

हा आठवडा म्हणजे फक्त प्रश्नचिन्ह आणी उत्तरे शोधण्यासाठी झालेली तारांबळ! असं कां झालं! आपलं काय चुकलं! शेअर खरे पाहता वाढायला पाहिजे होता तो कां पडला ? चांगले तिमाही निकाल येउनही शेअर का पडला आणी असमाधानकारक निकाल येउनही शेअर का वाढत आहे ? PC ज्युवेलर्स चा शेअर दोन दिवस का तुफान पडला आणी नंतर त्याच वेगाने पुन्हा का वाढला ? भरल्या पोटीही माणूस रडतो आणी उपाशीपोटी माणूसही रडतो. चांगले मार्क मिळतात पण अपेक्षेप्रमाणे नसतात, कोणाचा पेपर गहाळ होतो तर कोणी नशिबाच्या घोड्यावर बसून पास होतो. अशीच काहीशी मार्केट्ची अवस्था होती. काही लगाम कोणाच्या हातात असतात हेच कळत नाही. प्रश्नाची उत्तरे शोधू शकतो पण या उत्तरांनी पुन्हा प्रश्न कसे निर्माण होतात हे कळणे कठीण आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९१५ वर, NSE निर्देशांक निफ्टी १०६१८ वर तर निफ्टी बँक २५६४५ वर बंद झाला.

**पुढील आठवड्याचं समालोचन Facebook वर मिळण्यासाठी Facebook page like करा **

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – अपेक्षा आणी वास्तव शेअर मार्केटचे – ३० एप्रिल २०१८ ते ४ मे २०१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s