आजचं मार्केट – २१ मे २०१८

आजचं मार्केट – २१ मे २०१८

१५ मे २०१८ पासून सुरु झालेली पडझड आजही थांबली नाही. खरे पाहता USA आणि चीन ट्रेड वॉर सुटण्याची चिन्हे दिसू लागली होती. पण सेबी च्या मार्गदर्शक तत्वात झालेल्या बदलांमुळे मिडकॅप शेअर्समधील विक्री वाढली. आजचा दिवस सरकारी बँकांचा होता. मार्केट पडत होते. पण सरकारी बँका मात्र वाढत होत्या.

सेंच्युरी टेक्सटाईल्सचा सिमेंट कारभार वेगळा करून अल्ट्राटेक सिमेंट मध्ये मर्ज केला जाणार आहे. सेंच्युरीच्या ८ शेअर्सच्या बदल्यात अल्ट्राटेकचा एक शेअर दिला जाणार आहे. शेअर होल्डरच्या दृष्टीने हा रेशियो फायदेशीर नाही म्हणून शेअर पडला. टाटा स्टीलने Rs ३५२०० भूषण स्टील ही कंपनी खरेदी केली. Rs १२०० कोटी ऑपरेशनल क्रेडिटर्सना मिळणार आहेत. बँक ऑफ इंडियाला Rs १९९३ कोटी मिळतील. SBI ,बँक ऑफ बरोडा , युनियन बँक यांचाही फायदा होईल. दालमिया भारत आणि अल्ट्राटेक यांना बिनानी सिमेंट साठी पुन्हा बोली लावावी लागेल. ही बोली नक्कीच जास्त रकमेची असेल. त्यामुळे कर्ज देणार्या बँकांचा फायदा होईल. अंडरपरफॉर्मर शेअरला सेन्सेक्समधून बाहेर काढले जाते आणि आऊटपरफॉर्मरला सेन्सेक्स मध्ये घातले जाते. या न्यायाने DR रेड्डीज सेन्सेक्स मधून बाहेर पडेल आणि वेदांताचा सेन्सेक्समध्ये समावेश होईल.

आजचे विशेष आणि लक्षवेधी

  • टी सी एस च्या बोनस साठी २ जून २०१८ ही रेकॉर्ड डेट जाहीर झाली.
  • मॅक्लिओड रसेल ची ३० मे रोजी ‘बायबॅक’वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे
  • इंडो स्टार कॅपिटलचे NSE वर Rs ६०० ला लिस्टिंग झाले.
  • कोलगेटने Rs ११ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
    कोलगेट, शोभा, टाटा केमिकल्स गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट यांचे निकाल चांगले आले.
  • निफ्टी बँक आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांचा चार्ट बघितल्यास मार्केट ओव्हरसोल्ड स्थितीत आहे असे जाणवते. बँक निफ्टीचा चार्ट सुधारण्यास सुरुवात झाली आहे. १०४०० च्या स्तरावर निफ्टीमधील पडझड थांबेल असे वाटते.

सेन्सेक्स ३४६१६, निफ्टी १०५१६, आणि बँक निफ्टी २५७५० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – सध्या सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s