आजचं मार्केट – २२ मे २०१८

आजचं मार्केट – २२ मे २०१८

पडझडीतून आज मार्केट थोडेसे सावरले. अशा मार्केटला रिलीफ रॅली असे म्हणतात. ही रॅली मंदीचा ताण थोडासा कमी करते. १४ मे २०१८ पासून ते २२ मे २०१८ पर्यंतच्या निफ्टीच्या चार्टचे निरीक्षण केले असता १५ तारखेला (कर्नाटक विधानसभेच्या मत मोजणीच्या दिवशी) ग्रेव्ह स्टोन दोजी फॉर्म झाला त्यामुळे मंदीची चाहूल लागली. १६मे २०१८चा दिवस अनिश्चिततेत गेला. त्यानंतर ३ नकारात्मक ( लाल) कँडल्स फॉर्म झाल्या या आकाराला ‘थ्री ब्लॅक क्रोज'( १७ मे, १८ मे आणि २१ मे २०१८)  असे म्हणतात. हा आकार छोटया कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी  झाली असे दर्शविते. म्हणजेच ओव्हरसोल्ड पातळी तयार झाली. यानंतर थोडीशी तेजी अपेक्षित असते. आणि ती  तेजी २२ मे २०१८ रोजी दिसली.

आज साखरेला अधिक गोडी आली. सरकारने साखरेचा बफर स्टॉक वाढवण्याचे ठरवले. नाफ्त्याचा उपयोग कमी करून इथेनॉलचे प्रमाण वाढवावे असा सरकारचा विचार आहे. त्यामुळे साखर उत्पादक कम्पन्यांचे सर्व शेअर्स वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ कमी व्हावी म्हणून एक्साईज कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे OMC च्या शेअर्सची किंमत सावरली.  चीनने ऑटोवरील इम्पोर्ट ड्युटी कमी केली. त्यामुळे आज टाटा मोटर्स चा शेअर वाढला. VIP, IOC चे  निकाल चांगले आले.  स्टेट बँक ऑफ इंडियाचे NPA  वाढले, प्रोव्हिजन वाढली आणि बँकेने सतत दुसर्या तिमाहीत लॉसीस रिपोर्ट केले.

आजचे लक्षवेधी

  • DB कॉर्प या कंपनीने ‘बाय बॅक ‘वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २६ मे रोजी बोलावली आहे.
  • भारत फोर्ज च्या निकालात Rs १३५ कोटिचा वन टाइम लॉस होता. पण मार्जिन कमी झाले.
  • बॉशने Rs १०० प्रती शेअर  तर DR  रेड्डीजने Rs २० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

उद्या टाटा मोटर्सचा निकाल चांगला लागण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये थोडीशी तेजी असण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स  ३४६५१ निफ्टी १०५३६ तर बँक निफ्टी २५७७७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – सध्या सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आजचं मार्केट – २२ मे २०१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s