आजचे मार्केट – १ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचे मार्केट – १ जून २०१८

३१ मे रोजी ४०० पाईंटची लांबलचक उडी मारल्यामुळे मार्केट थकले, थोडेसे सुस्तावले सुद्धा! मागचा पुढचा अंदाज घेत पाऊले टाकू लागले. युरोप कॅनडा ,मेक्सिको येथून USA मध्ये आयात होणाऱ्या अल्युमिनियमवर १०% आणि स्टील वर २५% इम्पोर्ट ड्युटी लावली म्हणजे USA ने सुरु केलेले ट्रेड वॉर पुरते ओसरले नाही.

व्हेनिझुएलाकडे बाकी असलेली ONGC विदेशचे पेमेंट या देशाने केले नाही. ONGC चा ONGC विदेशमध्ये ४०% स्टेक आहे. त्यामुळे ONGC चा शेअर पडला. सरकार त्यांचा SUTTI योजनेतील मारुती लिमिटेड, ITC, लार्सन अँड टुब्रो तसेच ऍक्सिस बँकेमधील स्टेक विकायचा विचार करत आहे. जानेवारी ते मार्च २०१८ या वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारताची GDP ग्रोथ ७.७% झाली.

१ जून रोजी मे महिन्याच्या ऑटो विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटोची विक्री ३०% ने वाढली तसेच निर्यातही वाढली. अशोक लेलँडची विक्री ५१% ने वाढली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री वाढली. मारुतीची विक्री ३०% ने वाढली. आयशर मोटर्सची विक्री थोड्या कमी प्रमाणात वाढली. जून १२ २०१८ पर्यंत अधिक महिना असल्यामुळे या महिन्यात कार्स आणि इतर वाहनांची खरेदी शुभ मानत नसल्यामुळे ऑटो विक्रीचे आकडे थोडे कमी प्रमाणावर आले. टाटा मोटर्स ची कमर्शियल आणि घरगुती वाहनविक्रीचे आकडे चांगले आले. TVS मोटर्सची विक्री १०% वाढली.

IGL ने पेट्रोनेट LNG बरोबर LNG व्हेईकल साठी करार केला. फॉस्फेटिक व्यवसाय विकून टाटा केमिकल्सला Rs ८७३ कोटी मिळाले.  पंजाब नॅशनल बँक त्यांचे भिकाजी कामा रोड वरील हेड ऑफिस Rs १३०० कोटींना विकणार आहे. तसेच ही बँक त्यांचा PNB हौसिंग मधील स्टेक विकणार आहे. पॉवर जनरेटिंग आणि डिस्ट्रिब्युशन कंपन्यांचे सरकारकडून येणे असलेले पैसे लक्षात घेऊन RBI च्या नव्या नियमाप्रमाणे त्यांना NPA घोषित करू नये असा निर्णय हायकोर्टाने दिला. यांचा या कंपन्यांना कर्ज दिलेल्या बँकांवर नकारात्मक तर या कंपन्यांवर सकारात्मक परिणाम होईल. दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या ऑडिटर्सने राजीनामा दिला ही शेवटी अफवाच निघाली. टी व्ही वाहिनीवर कंपनीने सांगितले की आमच्या ऑडिटरने राजीनामा दिलेला नाही आणि कंपनीचे रस्ते बांधणीचे काम व्यवस्थित चालू आहे.

विशेष लक्षवेधी

  • पुढील आठवड्यात RBI आपले तिमाही वित्तीय धोरण जाहीर करेल.
  • USA ची सेंट्रल बँक फेडची मीटिंग १२ आणि १३ जूनला होईल. या मीटिंग मध्ये व्याजाच्या दरवाढीविषयी फेड निर्णय घेईल. फेड यावेळी व्याजाचा दर वाढवेल ही जवळ जवळ निश्चिती आहे.
  • १४ जून च्या आसपास किरकोळ महागाई, थोक महागाई आणि IIP चे आकडे येतील.

आज कंपन्यांच्या वार्षिक निकालांविषयी असणारे तर्क वितर्क आशा निराशा निकाल जाहीर झाल्यामुळे संपले आणि वास्तव समोर आले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२२७ NSE निर्देशांक निफ्टी १०६९६ आणि बँक निफ्टी २६६९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s