आजचे मार्केट – ५ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचे मार्केट – ५ जून २०१८

मार्केटमध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सवर चांगलीच गदा आली आहे. सुरुवात झाली म्युच्युअल फंडांच्या ‘PLAN RESTRUCTURING’ पासून त्यानंतर ‘ASM’ कॅटेगरीची भीती यामुळे मिडकॅप शेअर्सच्या किमती सातत्याने ढासळत आहेत. याचा फटका किरकोळ गुंतवणूकदारांना बसतो आहे.

सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मूलभूत विश्लेषणाच्या दृष्टीने पाहिले तर काही खराबी नाही. सिमेंट कंपन्यांकडे प्राइसिंग पॉवर नाही. सरकार स्वतःच्या भावाने कंपन्यांकडून सिमेंट खरेदी करत असते . सिमेंट क्षेत्राच्या बाबतीत मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणामध्ये परस्पर विरोध दिसतो आहे. सेक्टरमध्ये काहीही खराबी नसताना या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव पडत आहेत.

WEISMAN फॉरेक्स ही कंपनी आपले शेअर्स Rs ७०२ प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करणार आहे. या शेअरचा भाव Rs १६५० प्रती शेअरवरून सध्या Rs ५६२ प्रति शेअर झालेला आहे. हा ‘BUY BACK’ केवळ शेअर्सची प्राईस टिकावी या हेतूने केलेला दिसतो आहे. या शेअरलाही ASM मध्ये घातला आहे.

BSE आणि NSE मध्ये मिळून एकूण १०९ शेअर्स ‘ASM’ कॅटेगरी मध्ये घातले आहेत. हे सर्व शेअर्स मार्जिनसाठी ब्रोकरकडे ठेवले जात होते. हे शेअर्स ABNORMAL स्तरावर म्हणजेच ब्ल्यू स्काय टेरिटरीमध्ये चालले होते. ही शेअर्स मध्ये झालेली वाढ अवाजवी वाटत होती. या शेअर्समधील ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदार फसतील आणि त्यांना जबर तोटा सहन करावा लागेल ही शक्यता ध्यानात घेऊन हे शेअर्स सेबीने आणि स्टॉक एक्स्चेंजनी ASM कॅटेगरी मध्ये टाकले. हे शेअर आता ‘टी टू टी’मध्ये घातले जातील. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आता १००% मार्जिन ठेवावे लागेल. या शेअर्सचे सर्किट ५% चे केले आहे. ASM कॅटेगरीत टाकल्यामुळे कंपनीच्या आर्थीक परिस्थितीत किंवा कार्यक्षमतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. या शेअर्सच्या किमतीत झालेली अवाजवी वाढ गुंतवणूकदारांच्या लक्षात आणून द्यावी आणि त्यांना सावध करावे हा सेबी आणि स्टॉक एक्स्चेंजचा हेतू आहे. वेंकी’ज आणि गोदरेज अग्रोव्हेट यामध्ये वेंकी’ज या कंपनीला ( हा शेअर Rs ४०० प्रती शेअर पासून Rs ४००० प्रती शेअर पर्यंत वाढला होता) ASM मध्ये टाकला आहे. गोदरेज ऍग्रोव्हेटचा समावेश ASM मध्ये केला गेला नाही.

‘PEGFILGRASTIM’ ह्या बायोकॉन कंपनीच्या कर्क रोगावरील औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली. IDEA या कंपनीमध्ये FDI मर्यादा १००% केली. HUL आपल्या फूड आणि रिफ्रेशमेंट डिव्हिजनचा विलय करणार आहेत. युनिकेम लॅबच्या गाझियाबाद युनिटलाUSFDA ने मंजुरी दिली. या युनिट चे एप्रिल २०१८ मध्ये USFDA ने तपासणी केली होती.

मी आपल्या अभ्यासासाठी एक चार्ट देत आहे. ह्या चार्टमध्ये ‘BEARISH ENGULFING PATTERN’ आढळतो. शुक्रवार तारीख १ जूनची कँडल सोमवार तारीख ५ जूनच्या कँडलमुळे पूर्णपणे झाकली जाते. सोमवारची कँडल बेअरींश आहे त्यामुळे मंदी येणार असे हा पॅटर्न दाखवतो आहे म्हणून आपल्याला मंगळवार तारीख ५ जून २०१८ रोजी मंदी आढळली. उद्या दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल. भीती काही ट्रेडर्सची पाठ सोडताना दिसत नाही.

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९०३ NSE निर्देशांक निफ्टी १०५९३ आणि बँक निफ्टी २६२५१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s