आजचं मार्केट – ६ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ जून २०१८

साखर उत्पादकांसाठी सरकारी पॅकेज मंजूर होणार अशी अनेक दिवस गर्जना चालू होती. कधी मंत्रिमंडळाची बैठक रद्द होत होती तर कधी बैठकीच्या अजेंड्यावर हा विषय नसायचा. आज अखेरीस पॅकेज मंजूर झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने Rs ८००० कोटीचे पॅकेज मंजूर केले. साखरेची किमान किंमत Rs २९ प्रती किलो ठरवली. ३० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकसाठी मंजुरी दिली. यासाठी Rs १२०० कोटींचा फंड स्थापन केला जाईल. इथनॉल ब्लेंडींग साठी परवानगी दिली. साखर उत्पादकांनी इथेनॉलची उत्पादनक्षमता वाढवल्यास त्यांना Rs ४५०० कोटीचे कर्ज मंजूर केले जाईल. इथेनॉलची किंमत प्रती लिटर Rs ६ ते Rs ७ पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. पण बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने साखरेशी संबंधित शेअर्स थोडे वाढले पण नंतर पुन्हा पडले.

RBI ने आपले वित्तीय धोरण जारी केले. यात त्यांनी आपला व्हू ‘न्यूट्रल ‘ ठेवला. RBI ने रेपो रेट ( ६% वरून ६.२५% ) आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये (५.७५% वरून ६%) ०.२५% वाढ केली. CRR ४% आणि SLR १९.५% वर कायम ठेवला. याचाच अर्थ ठेवींवरील आणि कर्जावरील व्याजाचे दर वाढतील. भारताच्या प्रगतीच्या वाढीतील दराचे अनुमान ७.४% कायम ठेवले. पहिल्या सहामाहीत हे अनुमान ७.५% ते ७.६% तर दुसर्या सहामाहीत ७.३% ते ७.४ % ठेवले आहे. RBI ने आपण या दराबद्दल जास्त आश्वस्त नाही असे सांगितले. त्यांनी वाढती महागाई ( ४.९% पहिल्या सहामाहीत आणि ४.७% दुसऱ्या सहामाहीत), क्रूडचे वाढते दर, आंतरराष्ट्रीय जिओपॉलिटिकल ताणतणाव, ट्रेड वार यांच्या विषयी चिंता व्यक्त केली. घरासाठीच्या कर्जाच्या वर्गीकरणात बदल जाहीर केले. बँकांना त्यांचे पहिल्या तिमाहीतील मार्क टू मार्केट लॉसेससाठी वर्षभरात प्रोव्हिजन करण्यास परवानगी दिली.

कॅडीला हेल्थकेअरच्या अहमदाबाद युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली. HCC या कंपनीच्या मॅक्स ग्रुप बरोबरच्या जाईंट व्हेंचरला बांगलादेशात एकूण Rs ७४० कोटींचे न्युक्लीअर प्लांटचे काम मिळाले. यात HCC चा हिस्सा Rs २९५ कोटींचा असेल. इलेक्ट्रो स्टील स्टील या कंपनीने आपल्या कर्जदारांना Rs ७३९९ कोटींचे शेअर्स दिले. औरोबिंदो फार्माच्या मेहबूबनगर प्लांटच्या २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने फॉर्म नंबर ४८३ देऊन तीन त्रुटी दाखवल्या. कॅपिटल १st आणी IDFC बँकेच्या मर्जरला RBI ने मंजुरी दिली. त्याबरोबरच कॅपिटल १st होम फायनान्सच्या कॅपिटल १st मध्ये मर्जरला ही मंजुरी दिली.

बहुतेक उद्या दुपारपर्यंत बँक निफ्टी मध्ये तेजी राहील. कारण १२ जून २०१८ रोजी फेड काय करेल याचा विचार ट्रेडर्स करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१७८ NSE निर्देशांक निफ्टी १०६८४ आणि बँक निफ्टी २६३६७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आजचं मार्केट – ६ जून २०१८

 1. Om Kamalakar Desale

  madam मी तुमच्या ब्लोग चा नियमित वाचक आहे तुमच्या ब्लोग मुळे मराठीत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने मार्केटच्या रोजच्या घडामोडी कळतात. मी सध्या शेअर मार्केट स्वतःच शिकत आहे .मला काही प्रश्न आहेत
  1. इंट्राडे ट्रेड मध्ये शेअर खरेदी व विक्री करताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास गरजेचा आहे ?
  2. दीर्घ कालीन गुंतवणूक करताना शेअर्स चा fundamental analysis कसा करावा ?
  3. मार्केट संदर्भात घडणाऱ्या घडामोडींसाठी कुठले माहितीचे स्त्रोत वापरावे जसे website किंवा वृत्तपत्र channel ?

 2. Omi

  1. Vaishali

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s