आजचं मार्केट – २ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ जुलै २०१८

मार्केटच्या अस्थिरतेला ट्रेडर्स कंटाळलेत आणि मार्केटची अवस्था एखाद्या पेशंट सारखी झालीये. एक दिवस तब्येत सुधारतीये आणि एक दिवस बिघडतीये … आज मार्केटमध्ये मंदी होती आणि मार्केट ३०० पॉईंट पडलं.

मार्केटच आहे ते त्यामुळे तिथे रोज काहीतरी घडायचंच. मी शुक्रवारी सांगितलं तसं Rites आणि Fine Organic चं लिस्टिंग सोमवारी झालं. Rites १९० वर तर fine organic ८१५ वर लिस्ट झाला. Rites २२४ पर्यंत वाढला. दोन्ही शेअरमध्ये चांगला लिस्टिंग gain मिळाला.

HDFC AMC ( Asset Management Company ) चा IPO ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान येत आहे. याचा price band १३४५ ते १३६० आहे. ११ शेअरचा लॉट आहे. face value ५ रुपये आहे. हा शेअर NSE आणि BSE दोन्हीकडे लिस्ट होईल.

आज ऑटो सेल्स चे आकडे आले आणि ते हि चांगले! टाटा मोटर्स, मारुती, अशोक ले लँड ची विक्री वाढली. Dr रेड्डीसला कॉलेस्ट्रॉच्या औषधाच्या २.३६ लाख बाटल्या परत मागवाव्या लागल्या. टाटा स्टील आणि thysenkruup यांचे डील झाले त्यामुळे टाटा स्टील चा भाव वाढला. LIC IDBI मधला stake घेणार हे नक्की झाल्यामुळे IDBI चा शेअर वाढला.

GST लागू होऊन १ वर्ष झालं. collection चांगलं आहे त्यामुळे दर कमी होईल अशी आशा आहे. टॅक्स चा base वाढला आहे पण एकाच दर ठेवणे भारतात शक्यनाही असं सांगितलं जात आहे.

ट्रेड वॉर, रुपया, क्रूड आणि FPI चे सेलिंग चालू आहे. फक्त ९ शेअरनी मार्केट सांभाळलं आहे नाहीतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं असतं. त्यात HDFC, HDFC Bank, TCS, Infosys, Kotak बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो यांचा समावेश आहे. जिथे प्रॉफिट मिळेल तो बुक करा आणि चांगले शेअर कमी भावात जमा करा हाच माझा सल्ला.

आज सेन्सेक्स ३५२६४, निफ्टी १०६५७ आणि बँक निफ्टी २६२३० ला close झाला.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s