आजचं मार्केट – ३ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३ जुलै २०१८

एक दिवस मार्केट तेजीत तर एक दिवस मंदीत असा ट्रेंड हल्ली आढळतो आहे. ‘कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली’ या म्हणीप्रमाणे आज मार्केट तेजीत होते. सुरुवातीला BSE सेबीच्या आदेशानुसार २२२ कंपन्या डीलीस्ट करणार आहे अशी बातमी आली पण मार्केटने याकडे फारसे लक्ष दिले नाही.

ICICI सिक्युरिटीजच्या IPO मध्ये सेबीला घोटाळा आढळला. शेवटच्या दिवशी दिवशी ५ वेगवेगळ्या स्कीम मधून Rs २४० कोटींची बोली लावली गेला होती. ICICI AMC ला त्यामुळे सेबीने २४० कोटी १५% व्याजासकट या पाच स्कीमला परत करायला सांगितले. आज रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर थोडासा सुधारला सोन्याचा भाव थोडा कमी झाला. सौदीनी आणि रशियाने क्रूडचे उत्पादन वाढवल्यामुळे क्रूडचा भावही थोडा कमी झाला. क्रूडची किंमत US $ ७० ते US $ ८० च्या दरम्यान राहील असा अंदाज आला. इंडिया VIX २.७७% ने कमी झाला. या सगळ्या चांगल्या बातम्यांमुळे वाईट बातम्यांकडे मार्केटने दुर्लक्ष केले.

हिरो मोटो ची विक्री वाढली याचा फायदा हिरोमोटोला तर होईलच पण त्यांना ऑटो पार्ट्स पुरवणारी कंपनी शिवम ऑटोला ही होईल.हिरोमोटो , TVS मोटर्स आणि बजाज ऑटो यांची तुलना करताना P /E रेशियो बघणे जरुरीचे आहे.आहे. हिरोमोटो १८.४ TVS मोटर्स ४०.५२ आणि बजाज ऑटो १९.४७ आहे या दृष्टीने बघितले तर हिरो मोटो स्वस्त आहे.

कॉटनची किंमत वाढत आहे अशा बातमीचा दोन प्रकारे उपयोग करता येतो. ज्यांच्याकडे कॉटनची इन्व्हेन्टरी चांगली आहे त्यांना याचा फायदा होईल. ज्यांना भाव वाढवता येणार नाहीत त्यांचे मार्जिन कमी होतील.

नेस्लेनी NEXPLUS या नावाने नवीन प्रोडक्ट रेंज मार्केटमध्ये आणली त्यात (१)KOKOS (२)CHOCO (३) STRAWBERRY (४) NUTTY HONEY ही प्रॉडक्टस समाविष्ट आहेत. त्यामुळे नेस्लेचा शेअर वाढला. आज पावसाळी हवा असल्यामुळे खतांच्या शेअर्सकडे ट्रेडर्सचे लक्ष गेले. टाटा ग्रुपमध्ये सेक्टरवाईज रिस्टक्चरिंग होईल असा अंदाज मार्केटला आल्यामुळे फूड सेक्टर्समधले शेअर्स वाढले. उदा टाटा ग्लोबल बिव्हरेजीस, टाटा कॉफी, टाटा केमिकल्स. नाल्को वारंवार अल्युमिनियमच्या किमती कमी करत आहे याचा अर्थ मागणी कमी आहे. पर्यायाने कंपनीचे मार्जिन कमी होईल. सरकार गोल्ड सेविंग अकौंट सुरु करायच्या विचारात आहे. आपण जेव्हढे पैसे जमा कराल किंवा काढाल त्यांची सांगड सोन्याशी घातली जाईल. तुम्हाला थोडेसे व्याजही मिळेल. याचा उपयोग CAD (करंट अकौंट डेफिसीट ) कमी करण्यासाठी होईल.

विशेष लक्षवेधी

जेव्हा आजकालच्या सारखे अनिश्चित मार्केट असेल त्यावेळी ट्रेडिंग करण्यासाठी आदल्या दिवशीचा लो आणि आदल्या दिवशीचा हाय अशा लक्ष्मणरेषा ठेवाव्यात. ‘लो’च्या जवळ भाव आल्यास लोचा स्टॉप लॉस लावून खरेदी करावी. हायच्या जवळ आल्यास ‘हाय’चा स्टॉप लॉस ठेवून शेअर्स शॉर्ट करावेत. संधी मिळताच कमजोर शेअरमधून बाहेर पडून स्ट्रॉंग शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३७८ NSE निर्देशांक निफ्टी १०६९९ आणि बँक निफ्टी २६२०४वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s