आजचं मार्केट – ४ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ जुलै २०१८

फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे मार्केट चालू आहे असे वाटते. चेंडू या टीमच्या हातातून त्या टीमच्या हातात जात आहे. गोल होईल असे वाटते तोपर्यंत सर्व फिस्कटून जाते. तक्रार तरी कोणाकडे करायची. हा खेळच असा अनोखा म्हणून गप्प बसावे लागते. फुटबॉलप्रमाणे मार्केटसुद्धा एक दिवस तेजीत तर एक दिवस मंदीत एवढेच नव्हे तर सकाळी तेजी तर मध्यंतरानंतर मंदी आणि काही दिवस सकाळी मंदी तर मध्यंतरानंतर तेजी असा हा ऊनपावसाचा खेळ चालला आहे.

आज सरकारने आपल्या जाहीरनाम्यातील एका महत्त्वाच्या वचनाची पूर्तता केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने खरीप पिकांच्या मिनिमम सपोर्ट प्राईसमध्ये बरीच वाढ केली. खरीप किंवा रब्बी पीक घ्यायला जो खर्च येतो त्याच्यापेक्षा ५०% जास्त किंमत त्या त्या पिकाला दिली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. यावेळी सरकारने तांदुळाची MSP Rs २०० तर ज्वारी बाजरी तीळ कापूस सोयाबीन यांची MSP जास्त प्रमाणात वाढवली. मात्र रागीची MSP ५२.५% वाढवली. याचा फायदा मेघमणी ऑर्गनिक्स, स्पिक , आणि UPL यांच्या शेअर्सना होईल. तसेच तांदूळ निर्यात करणार्या कम्पन्यांचे शेअर्स वाढले

आजचा सर्वात मोठा अपघात म्हणजे श्रीराम ट्रान्सपोर्टचा. श्रीराम ट्रान्सपोर्टने SVL या अनलिस्टेड कंपनीच्या Rs ८७० कोटींच्या NCD साठी गॅरंटी दिली. गॅरंटी देणे हा श्रीराम ट्रान्स्पोर्टचा नियमित व्यवसाय नाही. जर SVL ने या NCD चे पेमेंट केले नाही तर श्रीराम ट्रान्सपोर्टला हे पैसे द्यावे लागतील. २०१९ मध्ये या NCD ड्यू होतील त्यावेळी SVL त्यांचे पेमेंट कसे करील याचा खुलासा कंपनीचे व्यवस्थापन करू शकले नाही. त्यामुळे शेअर Rs २०० ने पडला. देना बँक त्यांची SIDBI, NSDL मधील स्टेक विकणार आहे. क्वालिटीने ‘BUY BACK’ आणि बोनस रद्द केला.

आज ‘ASM’च्या लिस्टमधील बरेच शेअर्स चांगल्यापैकी वाढत होते. त्याचप्रमाणे दिग्गज शेअर्स वाढत असताना त्यांचे व्हॉल्युमही जास्त होते. मारुतीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मारुतीमधील मंदी संपल्यासारखी वाटते. नव्याने तेजीला सुरुवात झाली आहे असे जाणवते. बायोकॉन पुन्हा सिंजीनमधील स्टेक विकणार आहे.

विशेष लक्षवेधी

आता शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना बदललेल्या मार्केटचा विचार करता कंपनी साऊंड तर असलीच पाहिजे पण त्याच बरोबर प्रोडक्शन कॉस्ट जर वाढली तर ती कॉस्ट ग्राहकांना पास ऑन करण्याची कंपनीची कुवत असली पाहिजे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६४५ NSE निर्देशांक निफ्टी १०७६९ बँक निफ्टी २६४३३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s