आजचं मार्केट – १० जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० जुलै २०१८

एक दिवस तेजी एक दिवस मंदी हा खेळ मार्केटने थांबवला असे दिसते.निफ्टीचे १०८५०, १०९३० हे दोन्ही रेझिस्टन्स मार्केटने पार केले. आणी निर्णायक ब्रेकआऊट दिला. गेले आठ आठवडे चाललेले रेंज बॉउंड ट्रेडिंग थांबले. त्यामुळे पुन्हा मार्केट निफ्टी १११७०ची पातळी गाठेल अशी आशा लोकांना वाटू लागली. चांगले आंतरराष्ट्रीय संकेत, जून तिमाहीच्या निकालांविषयी आशादायी वातावरण आणि रिलायन्स आणि HDFC ची जोडी आणि मारुती या शेअरमध्ये आलेली तेजी त्यामुळे सेन्सेक्स ३०० पाईंट वाढले आणि सेन्सेक्सने ३६००० ची पातळी पार केली.

रिलायन्स ब्रिटिश पेट्रोलियम बरोबर जॉईंट व्हेंचर करून सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बोली लावणार आहे. इंडसइंड बँकेचा नफा २४% वाढला, NPA आणि प्रोव्हिजन यांच्यात नगण्य वाढ झाली. पण मार्केटची अपेक्षा जास्त असल्यामुळे शेअर पडला.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी फार्मा कंपन्यांना धडा शिकवण्याचा इरादा स्पष्ट केला. PFIZER या कंपनीचा उल्लेख USA मध्ये औषधाच्या किमती कारण नसताना वाढवल्या म्हणून आवर्जून केला. त्यामुले फार्मा क्षेत्रात मंदी आढळली

चीनमध्ये मेटल्सचे भाव वाढल्यामुळे टाटा स्टील, मिश्र धातू निगम, हिंडाल्को, SAIL हे शेअर्स तेजीत होते. चीन मधून येणाऱ्या पॉलिएस्टर यार्नवर सरकारने अँटी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा SRF, रिलायन्स, आणि गरवारे पॉलिएस्टर यांना होईल.

निफ्टीमध्ये काही बदल नजीकच्या काळात संभवतात. HPCL आणि ल्युपिन निफ्टीतुन बाहेर पडतील आणि ब्रिटानिया, गोदरेज कंझ्युमर किंवा JSW स्टील यांचा समावेश होईल.

आयडिया आणि वोडाफोन यांच्या मर्जरला सरकारने सशर्त परवानगी दिली. स्पेक्ट्रमसाठी Rs ३४०० कोटी आणि Rs ३३०० कोटींची बँक गॅरंटी द्यायला सांगितली.

विशेष लक्षवेधी

  • CHEVIOT या तागाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
  • HCL टेकची ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी १२ जुलै २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. पूर्वी १७% प्रीमियमवर HCL टेकने मार्च २०१६ मध्ये BUY BACK केला होता. HCL टेक कडे Rs १०७०० कोटी एवढी कॅश आहे.
  • शालिमार पेंट्सने राईट्स इशूवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
  • डिश टी व्ही चा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. Rs ११ कोटी तोट्यावरून Rs २८ कोटी फायदा झाला.
  • एल आय सी IDBI साठी ओपन ऑफर आणेल किंवा प्रेफरेन्सियल अलॉटमेन्ट होईल.
  • टी सी एस चे पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. PAT Rs ७३४० कोटी, विक्री Rs ३४२६१ कोटी, EBIT Rs ८५७८ कोटी, मार्जिन २५.०४% ( २५.४०% वरून ) झाले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. उद्या या निकालाचे मार्केट कसे स्वागत करते याची उत्सुकता सगळ्यांना राहील.

वेध उद्याचा

मार्केटला चांगली गती आली आहे. कारण क्रूडची किंमत US$ ७९ वर पोहोचूनही मार्केटने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मार्केटचा बदललेला रागरंग स्वीकारून ‘BUY ON DIPS’ ही पॉलिसी अवलंबावी.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s