आजचं मार्केट – १२ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ जुलै २०१८

आज मार्केटने कमाल केली. बुल्सनी आपली ताकत अजमावली. १ फेब्रुवारी २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११००० चा झेंडा फडकावला. आज सकाळी ११-३० च्या आसपास सेन्सेक्स ४२० पाईंट वर होते. तर निफ्टी ११०७३ वर होता. याला कारण ठरले क्रूड. क्रूड US $ ७४ वर पोहोचले , रुपया २३ पैसे सुधारला. त्यामुळे पेंट, टायर, प्लास्टिक, OMC आणि लेदर गुड्स बनवणाऱ्या कंपन्या,विमान वाहतूक कंपन्या यांच्यावर चांगला परिणाम झाला. आजच्या वाढीमध्ये रिलायन्सचा प्रमुख सहभाग होता. त्यातच भारत जगातील ६ वी मोठी अर्थव्यवस्था ठरली. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारताने फ्रान्सलाही मागे टाकले.चीन ट्रेडवॉरच्या बाबतीत USA विरुद्ध वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशनकडे तक्रार करणार आहे.

आज फार्मा सेक्टरच्या बाबतीत मात्र सातत्याने खराब बातम्या येत होत्या.नोव्हार्टीसच्या व्होवोरोन इंजेक्शनला ड्रॅग कंट्रोल ऑथॉरिटीजने बॅन केले. या औषधात एक असे केमिकल मिळाले की ज्याचा मूत्रपिंडांवर परिणाम होतो. या औषधाची Rs ४०० कोटींची विक्री झाली आहे. अजंता फार्मा विरुद्ध ड्रग कंट्रोलरने पोलीस कम्पलेंट केली. मंजुरी न घेता परवाना न काढता भारतात औषध विक्री केल्याचा गंभीर आरोप अजंता फार्मावर केला. सन फार्माच्या १६ एप्रिल ते २० एप्रिल २०१८ या कालावधीत झालेल्या अहमदनगर युनिटच्या तपासणीत USFDA ने एक त्रुटी दाखवली.

सरकार ३१ ऑगस्ट पर्यंत कोल इंडियातला १ % ते १.५% स्टेक तर NLC मधील ७% ते १०% स्टेक विकणार आहे. यातून सरकारला Rs ३३०० कोटी ते Rs ३६०० कोटी मिळतील. प्रमोटर होल्डिंग ७५% आणि पब्लिक होल्डिंग २५% ठेवण्यासाठी दिलेली मुदत वाढवली जाणार नाही असे सेबीने स्पष्ट केले.

विशेष लक्षवेधी

  • बर्याच कालावधीनंतर बँकांचे चांगले निकाल येऊ लागले आहेत. आज कर्नाटक बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफीट वाढले आणि NPA कमी झाले.
  • आज रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप Rs ६.८६ लाख कोटींच्या पलीकडे गेली. टी सी एस नंतर US $ १०० बिलियन वर असलेली भारतातली दुसरी कंपनी ठरली. कंपनीच्या शेअरचा भाव Rs १०९० या लाईफ टाइम हाय स्तरावर होता.
  • टाटा मोटर्सला दिलेली १०००० इलेक्ट्रिक व्हेईकल्सची ऑर्डर रद्द झाली.
  • आज जून २०१८ या महिन्यासाठी CPI चे आकडे आले हे आकडे किरकोळ बाजारांत महागाई किती वाढली त्याचे द्योतक असतात. जून २०१८ मध्ये हा आकडा ५% ( मे २०१८ मध्ये ४.८७%) आहे. त्यामुळे महागाई फारशी वाढली नाही
  • या उलट मे २०१८ साठी IIP चे आकडे खूपच निराशाजनक आहेत. IIP ३.२% (एप्रिलमध्ये ४.९% )म्हणजे ८ महिन्यातील किमान स्तरावर आहे. हे आकडे औद्योगिक उत्पादनाविषयी कल्पना देतात.

वेध उद्याचा

  • उद्या इन्फोसिस चा पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर होईल. टी सी एस च्या पाऊलावर पाऊल ठेवून इन्फोसिसही आपले निकाल आणि भविष्यातील गायडन्स (US $ विषयीच्या गायडन्सविषयी आशंका असेल) चांगला देईल अशी अटकळ बहुसंख्य ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स धरून आहेत.
  • निफ्टी आणि सेन्सेक्स जरी अत्युच्च स्तरावर पोहोचले असले तरी मिडकॅप आणि स्माल कॅप निर्देशांकात मात्र हवी तेवढी वाढ दिसली नाही. त्यामुळे फक्त निवडक शेअर्समध्येच ही तेजी आली असे सामान्य गुंतवणूकदाराचे मत झाले.
  • फोर्टीज हेल्थकेअर या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची महत्वाची बैठक उद्या आहे. या मीटिंग मध्ये फोर्टीजसाठी बीड केलेल्या IHH हेल्थकेअर आणि मणिपाल ग्रुप यापैकी कोणाची बीड यशस्वी होते आणि स्वीकारली जाते यावर निर्णय होईल. तसेच या बैठकीत प्रेफरंशियल अलॉटमेंटवर विचार केला जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४८ NSE निर्देशांक निफ्टी ११०२३ आणि बँक निफ्टी २७०२६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s