आजचं मार्केट – १३ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ जुलै २०१८

कायम दिवाळी नसते तसा कायम शिमगाही नसतो. काल मार्केट उच्चतम स्तरावर पोहोचले होते. आज रुपया मजबूत, कमजोर क्रूड , मजबूत ग्लोबल संकेत ,VIX १२.५० असूनही पुट/कॉल रेशियो १.७३ होता. म्हणजेच ओव्हरबॉट झोनमध्ये मार्केट होते. त्यामुळे मार्केटने आज विश्रांती घेतली.

शेवटी फोर्टिस हेल्थकेअरचे स्वयंवर IHH हेल्थकेअर या मलेशियास्थित कंपनीबरोबर पार पडले. IHH ची बोली Rs १७० ची होती आता ओपन ऑफरही येईल. ४०% ACCEPTANCE रेशियो आहे. फोर्टिस मलारसाठी Rs ५८ ची ओपन ऑफर आहे.

HCL टेक चा ‘BUY बॅक ‘ Rs ११०० प्रती शेअर या दराने जाहीर झाला. १८१ शेअर्स असतील तर आपण किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यात असाल. कमीतकमी ७० शेअर्स आणि जास्तीतजास्त १२५ शेअर्स ‘BUY बॅक’ मध्ये स्वीकृत होतील. शेअरची किंमत Rs ९५० ते Rs ९७० पर्यंत आल्यास ‘BUY बॅक’ फायदेशीर ठरेल.

२१ जुलै २०१८ रोजी GST कौन्सिलची बैठक आहे. GST फिटमेन्ट समिती आणि राजस्व विभाग GST चे दर कमी करायला तयार नाही. त्यामुळे Rs १०,००० कोटींचे नुकसान होईल असे सांगितले जाते. त्यामुळे सिमेंट पेंट आणि मुव्हीज यावरील GST सध्या तरी कमी होण्याची शक्यता दिसत नाही.

महाराष्ट्र राज्यसरकारने असे जाहीर केले की १ ऑगस्ट २०१८ पासून मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे जिन्नस घेऊन जायला परवानगी आहे. त्यामुळे PVR, आयनॉक्स, सिनेलाईन हे शेअर्स दणकून आपटले.

JSPL चे प्रमोटर नवीन जिंदाल यांच्यावर कोळसा घोटाळ्यामध्ये लाच दिली आहे असा आरोप करण्यात आला. त्यामुळे हा शेअर पडला.

IDFC त्यांचा म्युच्युअल फंड बिझिनेस KKR ला विकणार आहेत. टाटा कम्युनिकेशन ( VSNL ) यांना त्यांची ७७३ एकर जमीन हेमिस्फिअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड मध्ये डीमर्ज करायला NCLT ने परवानगी दिली.

विशेष लक्षवेधी

  • इन्फोसिसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल आले. Rs ३६१० कोटी प्रॉफिट झाले. प्रॉफिट ४% ने वाढले. रेव्हेन्यू Rs १९२१८ कोटी (१२ % वाढ) EPS १६.६२ आहे. ऑपरेटिंग मार्जिन २३.७% राहिले कम्पनीचे लिस्टिंग झाल्याला २५ वर्षे झाली म्हणून १:१ बोनस जाहीर केला.
  • HDFC बँकेची १७जुलै २०१८ रोजी प्रेफरंशियल इशूवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
    म्युझिक ब्रॉडकास्ट ची २४ जुलै रोजी BUY बॅक वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

वेध उद्याचा

१७ जुलै २१०८ रोजी अशोक लेलँड, क्रिसिल, फेडरल बँक, गोवा कार्बन, न्यूक्लिअस सॉफ्टवेअर, रॅलीज इंडिया आणि टाटा स्पॉन्ज १८ जुलै २०१८ रोजी बंधन बँक १९ जुलै २०१८ रोजी RBL बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व आणि २०जुलै २१०८ रोजी बजाज ऑटो, सिएट, बाटा,हॅवेल्स, MCX यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील .
RBI येत्या वित्तीय पॉलिसीमध्ये रेट वाढवेल असा अंदाज आहे.

चार्ट


मी आपल्याला गुरुवारचा कँडल स्टिक चार्ट देत आहे. या चार्टमध्ये शूटिंग स्टार पॅटर्न दिसतो आहे. हा पॅटर्न शॉर्ट टर्म करेक्शनची सूचना देतो. सावधानता बाळगावी असे हा पॅटर्न सुचवतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४१ NSE निर्देशांक निफ्टी ११०१८ आणि बँक निफ्टी २६९३५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

4 thoughts on “आजचं मार्केट – १३ जुलै २०१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s