About

Bhagyashree Phatak मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल.

२००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय.

उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

बघूया काय जमतंय ते!!

हि तुमची ब्लोगवर पहिली भेट असेल तर तुम्ही इथून सुरवात करू शकता – ‘भाग १ – याचसाठी केला हा अट्टाहास ..’

Advertisements

44 thoughts on “About

   1. surendraphatak Post author

    मार्केटमध्ये इंवेस्त करायचं तर ब्रोकर हा हवाच. तुमच्या साठी आता कोटक महिंद्रा हाच ब्रोकर आहे. तुम्ही जरी घरून trading कार्य शकला तरी ते कोटक महिंद्रा च्या through होतं. तुम्ही फ़क़्त त्यांची online सुविधा वापरता.

 1. Devendra M Tapkir

  Thank you so much madam for the information, I’ll be glad if you could tell us about Open Interest,P/E ratio,EPS,Beta,and the similar terms & their importance while purchasing or Selling the sales.

  1. vishal

   मॅड्म आपण जे कार्य सुरु केले आहेत शेअर मार्केट ची माहिती मराठीतून देण्याचे ते खरोखरंच प्रशंसनीय आहे. यापूर्वी कोणीही असा प्रयत्न केला असेल असे मला वाटत नाही. सामान्य माणूस शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना प्रचंड घाबरतो केवळ अज्ञानामुळे असे मला वाटते. पण तुमच्या मार्गदर्शनामुळे हे अज्ञान दूर होणार आहे असे मला वाटते. माझी देखील इच्छा आहे कि प्रत्येक सामान्य व्यक्तीने शेअर मार्केट मध्ये थोडे थोडे पैसे गुंतवलेच पाहिजे. असेच मार्गदर्शन आपण आपल्या ब्लॉग मधून करत राहावे.

  1. surendraphatak Post author

   अहो , मला सुरवातीला वाटायचं कि हे लिहून काय उपयोग!! पण तुमच्या अभिप्रायामुळे समजतय की शेअरमार्केट शिकणाऱ्यांना माझ्या लिखाणाचा उपयोग होतोय. तुमच्या अभिप्रायामुळे माझा उत्साह नक्की वाढला.
   तुम्ही माझ्याशी या नंबरवर संपर्क साधू शकता
   ०२२२५३३५८९७ , ९६९९६१५५०७

  1. surendraphatak Post author

   ​टेक महिंद्रा ही कंपनी चांगली आहे. परंतु शेअर खूप महाग झाला आहे . एकंदरीतच १६ मे २०१४ पासून मार्केट खूप वाढले आहे. शेअर्सचा कमीतकमी आणी जास्तीतजास्त भाव पहा. त्यानुसार जेव्हा मार्केट करेक्शन होईल तेव्हा स्वस्तांत खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेव्हढे शेअर्स खरेदी करायचे असतील ते छोट्या छोट्या लॉटमध्ये खरेदी करा. ​त्यामुळे सरासरी भाव कमी बसेल. टेक महिंद्रा या कंपनीने १:१ या प्रमाणांत बोनस आणी १;१ या प्रमाणांत स्प्लिट जाहीर केले आहे. त्यामुळे १ शेअर खरेदी केल्यास त्याचे ४ शेअर होतील. त्यावेळी किमतही त्या प्रमाणांत कमी होईल हे ध्यानांत ठेवावे. बोनस आणी स्प्लिटच्या बातमीमुळे शेअर मुळातच वाढला आहे.तेव्हां अंतिम निर्णय तुमचा आहे.

   तुम्हाला महित नसेल कदाचित पण मी पुण्यांत रहात नाही त्यामुळे मी पुण्यातल्या ब्रोकरची माहिती कशी काय देणार.नाईलाज आहे.

 2. Vaibhav Dhotre

  तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट दिलीत याची तुम्हाला काहीच कल्पना नसेल, शेअर मार्केटचा knowledge घेण्यासाठी मी इंटरनेट च्या कितीतरी websites, links search करत सैरावैरा धावत होतो पण तुमच्या website वर आल्यावर मला वाटलं की बस्स माझा search संपला. खरंच मला कळंत नाहीये की तुम्हाला कोणत्या शब्दात धन्यवाद म्हणू. मी तुम्हाला मनापासून salute करतो. तुम्ही तुमचे experience आम्हाला देणे चालूच ठेवा कारण तुमच्या experience मुळे आम्हाला invest करण्यासाठी खूप daring येते. पण मला जे काही त्रुटी वाटल्यात ते तुम्ही clear करावे असे मला वाटते पण त्यासाठी तुम्ही थोडासा त्रास घ्यावा लागेल अशी मी मनापासून मागणी करतो. तर त्या त्रुटी खालीलप्रमाणे:
  १) एका summery प्रमाणे शेअर मार्केट मध्ये उतरण्यासाठी कोणकोणत्या account ची गरज असते, त्यांचे काय काम असते ह्याची सर्व माहिती सांगणारे कृपया एक page तयार करा.
  २) कंपनी चे category नुसार फेरमांडणी करून त्याचाही नवा page बनवा म्हणजे आम्हाला लगेच निर्णय घेता येईल की कोणत्या वेळी कोणत्या कंपनी चे शेअर्स विकत घ्यावे.
  ३) काही concepts क्लिअर करावे जसे शेअर चे प्रकार, commodities, F&O, Mutual Funds, Equity, Currency, Currency derivatives, MF.
  ४) एका नवीन page मध्ये फक्त येणारे नवीन IPO’s बद्दल माहिती टाकत राहा आणि हो त्यासोबत कोणत्या शेअर च्या किंमती वाढतील व ते आता विकत घेण्याचा चांगला chance आहे अशांची माहिती सांगणारा पण एक page तयार करा.

  अशा प्रकारे याचा फायदा माझ्यासारख्या नवख्या मुलांना stock मार्केट बद्दल आवश्यक बाबातींची पूर्णपणे माहिती मिळेल.

 3. ganesh

  नमस्कार
  मी गणेश आपला ब्लोग वाचून शेअर मार्केट विषयीची
  भिती दूर झाली खरं सांगायच झालं तर आपला ब्लोग वाचायला घेतला तेव्हा खुप महत्त्वाचं काम होते पण एकामागून एक पोस्ट वाचत गेलो आणि कधी आपली सर्व पोस्ट वाचल्या कळले सुद्धा नाही त्याचबरोबर अापला ब्लोग वाचतांना प्रत्यक्ष माझी आई मला मार्केट शिकविण्याचा भास झाला बहुतेक त्यामुळेच सर्व ब्लोग वाचल्यानंतरच माझ्या कामाची मला आठवण झाली. आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटणयाची ईच्छा आहे. तुमच्याकडून भरपुर शिकायचं आहे. तुम्ही मदत कराल ना?
  आपला एक लहानसा वाचक

  1. surendraphatak Post author

   तुम्हा वाचकांना माझा ब्लोग वाचावासा वाटतो , समजतो, आवडतो यातच सारे काही आले. माझ्या श्रमाचे चीज झाले. तुम्ही मला आधी फोन करून कधीही भेटू शकता.
   माझा फोन नंबर : ०२२२५३३५८९७.
   माझा मोबाईल नंबर : ९६९९६१५५०७

   1. Mahesh

    Namaskar,

    The article is very very useful and easy to understand. Request you to provide your thoughts on the chart reading. Ther major confusion is with Moving average and slow Stochastic accuracy w.r.to the candle chart .
    What is the best combination which gives correct buy and sell signals for intraday.

    Warm Regards
    Mahesh

 4. sandip shirsath

  Respected Madam……

  Thanks 4 ur guidance…

  I am an engineering student …

  i have been stared trading in stock market 1 year ago…
  in the past i dont know anything ABCD of this …

  i m also googling to know inormation….
  after lot of search i found ur blog… and my search was over…

  i have read alll u postss .. gudlines and much more..
  really helpful biog …

  i m just only 21 year
  i started trading+investing with 3400 rs made profit 5400 due to modi efect…
  in dec 2014 … i telll my father incrises investment to 50,000 and in mar 15 made 10000+ profit …
  i us these profit to paid my college fees.. my father proud of me only becozz of u .. and ur blogs….many many thanks .to u mam..
  ur method of analysis of market and “aathdyache samalochan” is best one. and really helpful to new investor and treader…
  keep it up …

  thanking u …

  1. surendraphatak Post author

   आज मला खूप खूप आनंद झाला . आपला अभिप्राय वाचून माझ्या श्रमाचे चीज होते आहे, माझा उद्देश सफल होतो आहे, माझ्या प्रयत्नाची दिशा बरोबर आहे हे जाणवले. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद अशीच आपली प्रगती मला कळवत जा. त्यामुळे इतरांनाही ट्रेडिंग आणी गुंतवणूक करायला उत्तेजन मिळेल.

 5. Pramod Dhiware

  सविनय प्रणाम,
  सर्व प्रथम अनंत आभार. शेअर मार्केट च्या या अथांग समुद्रात, जिथे कधी वादळ, कधी भरती तर कधी ओहटी, ज्याची खोली, ज्याच्या लाटांच्या ताकदीचा, जीथे दिशेचा अंदाज बांधता येत नाही अशा समुद्रात आमच्यासाठी तुम्ही एक खंबीर आणि तेजस्वी दिपस्थंब बनुन आम्हाला मार्गदर्शन करीत आहात.
  या समुद्रात मी एक नवीन प्रवाशी आहे. काल पर्यंत या पाण्याला घाबरणारा मी आज आत्मविश्वासाने प्रवासाला निघालोय. वादळ येणार, भरती ओहटी आणि ईतर सगळी संकट समोर उभी राहणार याची खात्री आहे पण तुमच्या तेजस्वी प्रकाशात मला आणि माझ्यासारख्या अनेक प्रवाशांना मार्ग सापडेल.
  खुप स्तुत्य कार्य करीत आहात. आभार..!!

  प्रमोद धिवारे
  माणगाव रायगड

  1. surendraphatak Post author

   ​तुमच्या साहित्यिक कॉमेंट बद्दल आभार. माझ्यासारख्या गृहिणीच्या भाषेत सांगायचे झाल्यास सासर माहेर दोन्हीहीकडच्या लाटा सांभाळत सांभाळत संसाराची नौका कधी प्रवाहाच्या दिशेने तर कधी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे घेवून जावी लागते. कुटुंबाला सुखी समाधानी करणे त्याच बरोबर लाखाचे बारा हजार न करता बारा हजाराचे लाख करायचे असतात. आणी अडचणी कोठे येत नाहीत अडचणींना घाबरलांत तर घराबाहेर पडणे मुश्किल होईल. हे लक्षांत आल्यामुळेच हा ब्लोगचा प्रपंच सुरु केला आहे. आपल्यासारख्याच वाचाकांमुळे नवे नवे विषय हाताळायला उत्साह येतो. ​

 6. सचिन रिसबूड औरंगाबाद

  मार्केट आणि मी हा ब्लॉग खूप चांगला व मार्केट विषयी सविस्तर माहिती देणारा आहे
  कुठली नॅशनॅलिज्ड बँक डिमॅट व ट्रेडिंग साठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन चांगली सेवा देते. याची माहिती द्यावी. मलाही नॅशनॅलिज्ड बँकेतच डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट उघडावयाचे आहे.
  सचिन रिसबूड औरंगाबाद

  1. surendraphatak Post author

   ​सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका ऑन लाईन DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडतात. आपल्याला ऑफ लाईन DEMAT अकौंट उघडायचा असल्यास ट्रेडिंग अकौंट ब्रोकरकडे उघडावा लागेल.​ ऑन लाईन DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट
   उघडताना आपण बँक आपल्या घर किंवा ऑफिस जवळ आहे कां ? बँकेचे टायमिंग आपल्याला सोयीस्कर आहे कां ? आपल्याला मार्केट चालू असताना न थांबता ऑन लाईन सेवा देऊ शकेल कां ? आणी ऑन लाईन प्रक्रिया वापरायला किती सोपी आणी सहज आहे याचा विचार करावा.

  1. surendraphatak Post author

   ​सध्या चालू असलेल्या पेपर सेक्टरमधील  rally ला catch up rally म्हणतात. मार्केट खूप वाढलेले असते प्रत्येक  सेक्टर तेजीत असतो. अशा वेळेला compulsive ट्रेडर्स मार्केटमध्ये कोणत्या सेक्टरमधले शेअर्स स्वस्तांत मिळत आहेत का असा शोध घेतात. अशावेळी पेपर सेक्टर मधील शेअर्स चालतात.योग्य वेळ गाठता आली नाही तर वर्षभर शेअर्स आपल्याजवळ पडून राहतात. त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यांत धोका जास्त आहे.आम्ही गुंतवणूक कोणत्या शेअरमध्ये करावी याबाबत टिपा देत  नाहीत. घडणार्या घडामोडींवरून आपण स्वतःच अभ्यास करून हे ठरवावे.  ​

  1. surendraphatak Post author

   सगळे ब्लोग लक्षपूर्वक वाचा प्रथम कॅश सेग्मेंट मध्ये ट्रेडिंग गुंतवणूक करा त्याच्यात जर यश आले तर F & O मार्केटमध्ये प्रवेश करा

 7. Ajit

  नमस्कार मॕडम,
  शेअर मार्केट बद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण येथे मांडली आहे, ते ही आपल्या मराठी भाषेत. शेअर मार्केट खरच किती positive असते हे आपले ब्लॉग वाचून कळून येते. आपले आभार कारण असे ब्लॉग पहिल्यांदाच वाचत आहे , ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे जसे शेअर मार्केट काय आहे , डीमॕट अकाउंट तसेच रोज घडणाऱ्या घडामोडी आणि या घडामोडींचा मार्केटवर होणारा परिणाम व त्यानुसार पैसे कसे गुंतवावे याबद्दल positivity. वा क्या बात है! अशी माहीती मिळणे कठीणच तेही आपल्या बोली भाषा मराठीमध्ये..

  1. surendraphatak Post author

   ​शेअर मार्केटमधील व्यवहार समजण्यासाठी जर भाषेचा अडसर येत असेल तर तो दूर व्हावा, शेअरमार्केटबद्दल वाटणारी भीती कमी व्हावी आणी सर्वांना गुंतवणुकीचा फायदा मिळावा ह्याच उद्देशाने मराठीतून ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली. आपल्याला ब्लॉग आवडतो आहे हे वाचून आनंद झाला अभिप्रायाबद्दल धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s