Author Archives: surendraphatak

About surendraphatak

Social Media consultant by profession , a marketing professor by passion.. My interests are varied from Poetry, Politics and Sports..

आजचं मार्केट – २० जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जून २०१८

आज विदेशी बाजार सुधारल्यामुळे स्थानिक शेअरमार्केटमध्येही तेजी आली. आज बुल्स नी चांगलीच मुसंडी मारली. स्वतःचा मार्केटवरील ताबा सुटू दिला नाही. मार्केट थोडे पडले तरी खरेदी होत होती. आणि दिवसअखेरी पर्यंत  तेजीचा किल्ला लढवला. यामुळे बुलिश हरामी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला. १९ जून २०१८ ची कँडल मोठी पण मंदीची होती पण आजची कँडल मात्र तेजीची आणि कालच्या कँडलमध्ये मावणारी अशी होती. हरामी याचा अर्थ जापनीज भाषेत गरोदर स्त्री असा होतो. हा रिव्हर्सल पॅटर्न आहे.   
आता ट्रेंड वॉरमध्ये यूरोपीय देशही सामील झाले.  USA मधून आयात होणाऱ्या युरो २००० बिलियन किमतीच्या मालावर आपण ड्युटी लावू असे त्यांनी  जाहीर केले.
या वर्षभरात सरकार MMTC (१०%), NHPC (१०% ), NTPC (५%), कोल इंडिया (५%) या प्रमाणे विनिवेश करेल.  IPO विषयीच्या नियमात बदल करण्यावर विचार विनिमय करण्यासाठी उद्या सेबीची बैठक आहे. वेदांताने तुतिकोरिन येथील प्लांटवरील  बंदी उठवण्यासाठी मद्रास हायकोर्टात अर्ज दिला. कोर्टाने २५ जून २०१८ रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे. सिप्ला या कंपनीच्या HIV वरील औषधासाठी मंजुरी मिळाली.
सरकारने इंटरनेट टेलिफोनीला मंजुरी दिली. आणि टेलिकॉम कंपन्यांना सरकारने जरुरी आदेश दिले आहेत.  टेलिकॉम कंपन्यां एप्सच्या सहाय्याने टेलिफोनी सेवा देतील. यामुळे आता तुम्हाला  सिमकार्ड शिवाय कॉल करता येतात.
ज्वेलरी क्षेत्रात हॉलमार्किंग सक्तीचे केले. यासाठी सरकारने ज्वेलर्सना सहा महिने ते एक वर्ष मुदत दिली आहे.
एव्हिएशन सेक्टर मध्ये गेल्या  मे  महिन्यात  गेल्या चार वर्षातील किमान संख्येपेक्षा प्रवाश्याची संख्या कमी होती. इंडिगोचा मार्केट शेअर  ४०.९% झाला. येत्या डिसेंबरपर्यंत १४ विमानतळ उडाण योजनेअंतर्गत तयार केले जातील.
पॉवर सेक्टरमधील NPA वर विचार करण्यासाठी DFS ने संबंधित पार्टिजची बैठक बोलावली आहे. यात ऊर्जा मंत्रालय, PFC, REC, पॉवर कंपन्या आणि त्यांना कर्ज देणार्या बँकांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील.
सरकारने पब्लिक प्रॉक्युअरमेंट योजनेखाली संरक्षण खात्यासकट सर्व खात्यांना स्थानिक लेदर प्रोडक्टसचा समावेश करण्यासाठी आदेश दिले आहेत. पादत्राणांमध्ये ७०% तर लेदर वस्त्रप्रावरणा मध्ये ६०% स्थानिक लेदर प्रोडक्टस खरेदी करावेत असे आदेश दिले. या सरकारच्या निर्णयामुळे बाटा, खादिम’s, तसेच मिर्जा इंटरनॅशनल या शेअर्स वर अनुकूल परिणाम झाला.
BOSCH ही कंपनी येत्या ३ वर्षात Rs  ७०० कोटींची गुंतवणूक करेल. JSW स्टिल्स च्या प्रमोटर्सनी आज ३२ लाख शेअर्स गहाण ठेवले.
ज्या ४८३८ कंपन्यांच्या कर्ज घेण्यावर मर्यादा घालण्यात आली होती त्या कंपन्यांना आता सरकार काही सवलती देण्याचा विचार करत आहे. आजच्या मार्केटचे अवलोकन करताना बुल्सची सरशी झाली असे आढळते. हरामी पॅटर्न बघताना ट्रेंड बदलला पाहिजे असे वाटते. पण मूलभूत काही बदल झाले तर काही सांगता येत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५४७ वर  NSE  निर्देशांक निफ्टी १०७७२ वर तर बँक निफ्टी २६५५७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

आठवड्याचे समालोचन – घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घोडदौड तेजीची परीक्षा संयमाची  – ८ जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८

क्रूडने वाढता वाढता US$ ७० प्रती BARREL(तीन वर्षातील कमाल भाव) ची पातळी गाठली. USA मध्ये थंडीचे प्रमाण खूपच वाढले आहे. नायगारा धबधबा गोठला असल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच. मार्केट प्रत्येक बातमीची नाळ आर्थिक बाबींशी जोडते. आणी अर्थव्यवस्थेवर प्रत्येक घटनेचा काय परिणाम होईल आणी कोणत्या कंपन्यांवर किती आणी कसा परिणाम होईल, हे पहाते आणी आपणही स्वतःच्या पोर्टफोलीओवर काय परिणाम होईल हे पहाणे गरजेचे असते.

सध्याच्या मार्केटचे वर्णन ‘गंगा आली रे अंगणी’ या शब्दात करता येईल. घरात लग्न कार्य आले की लोक खूप, गरज असो वा नसो खरेदीवर खर्च करतात त्यात हौस, प्रतिष्ठा, व्यवहार शास्त्र स्पर्धा या सर्व गोष्टी येतात. विचार बाजूलाच राहतात. ‘केलाच पाहिजे खर्च, आयुष्यात एकेकदाच होतात या गोष्टी’ असे म्हणत ऋण काढून खरेदी करतात. पैशाची आवक वाढली की विचार खुंटतो. योग्य अयोग्य सर्वच गोष्टींना मागणी येते. एखाद्याने टोकले तर सर्वांनाच त्याचा राग येतो. याचाच प्रत्यय सध्या येतो आहे. सर्व निगेटिव्ह गोष्टी दिसत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करून मार्केट वाढतेच आहे. हीच खरी परीक्षेची वेळ आहे.

डावोसला होणाऱ्या मीटिंगच्या आधी FDI चे नियम सरळ सोपे आणी गुंतवणुकीसाठी आकर्षक करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे.

या अंदाजपत्रकात STANDARD DEDUCTION आणी कॅपिटल गेन्स कर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे नैसर्गीक वायुसाठी मागणी वाढली. पाईप मधून केला जाणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा गोठून गेला आहे
 • ट्रम्प प्रशासनाने H1B व्हिसाच्या नियमात बदल करणे रद्द केले आहे. फक्त आता दरवर्षी H1B व्हिसाचा रिव्यू घेतला जाईल.
 • चीनने USA ट्रेजरी BONDS ची खरेदी नजीकच्या भविष्यात कमी करण्याची किंवा थांबवण्याची शिफारस केली आहे.

सरकारी अनौंसमेट

 • रेल्वे ८५०० स्टेशन्सवर WI-FI सुविधा देणार आहे. याचा परिणाम डी-लिंक, तेजस नेटवर्क या कंपन्यांवर होईल.
 • रेल्वे WI –FI वर Rs ७०० कोटी खर्च करेल.
 • १८ जानेवारीला GST कौन्सिलची बैठक आहे. यात निर्यातीला उत्तेजन मिळण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकात सरकार पर्यटन आणी पर्यटनाशी संबंधी उद्योगांना उत्तेजन देण्याची शक्यता आहे. याचा परिणाम TFCIL सारख्या पर्यटनाशी संबंधीत कंपन्यांवर होईल.
 • भारत नेटचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सरकार Rs ३४००० कोटी खर्च करणार आहे याचा परिणाम नेल्को वर होईल.
 • IRCTC रेल्वेमध्ये रेडी-टू-इट खाद्यपदार्थांसाठी टेंडर मागवत आहे. याचा परिणाम कोहिनूर फूड्स, नेस्ले आणी ITC यांच्यावर होईल.
 • सोलर सेलवर ७०% सेफगार्ड आयात ड्युटी लावण्याचा सरकार विचार करत आहे याचा परिणाम WEBSOL एनर्जी, इंडोसोलर आणी सुझलॉन या कंपन्यांवर होईल.
 • सरकार नवीन ‘GOLD POLICY’ आणणार आहे या पॉलिसीची घोषणा मार्च २०१८ पर्यंत होईल. सरकार सोन्यावरील. आयात ड्युटी कमी करण्याचा विचार करत आहे. PNB ने बुलियन बँक चालू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या पॉलिसी मध्ये GOLD बोर्ड तसेच गोल्ड स्पॉट एक्स्चेंज वरही विचार केला जाईल.
 • सरकारने GDP मधील वाढीचे अनुमान वित्तीय वर्ष २०१८ साठी ६.५ % केले.
 • सरकारने आपल्या FDI पॉलिसीमध्ये बदल केले.
 • सिंगल ब्रांड रिटेलमध्ये १००% FDI ऑटोमटिक रूटने परवानगी दिली. याचा परिणाम इंडियन टेरेन FASHION, VMART रिटेल, शॉपर्स स्टॉप, TRENT, ZODIAC क्लोथिंग कंपनी यांच्यावर होईल
 • रिअल इस्टेट ब्रोकिंगमध्ये १००% FDI ला परवानगी दिली.
 • वैद्यकीय उपकरणांचे वर्णन आता FDI पॉलिसीमध्ये केल्याप्रमाणे होईल.
 • FII /FPIज आता पॉवर एक्स्चेंजच्या IPO मध्ये गुंतवणूक करु शकतील
 • परदेशी रिटेलर्ससाठी ३०% स्थानिक सोर्सिंगची अट आता ५ वर्षे पुढे ढकलली.
 • सरकारने आता एअर इंडियामध्ये ४९% FDI ला काही अटींवर परवानगी दिली
 • नौकानयन मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे ड्रेजिंग कॉर्पोरेशन खाजगी क्षेत्राला विकण्याचा विचार सरकारने स्थगित ठेवला आहे.
 • सरकारने स्पेक्ट्रमवर असलेली कॅप वाढवली आहे. याचा फायदा या सेक्टरमधील मर्जर आणी अक्विझिशन मध्ये होईल. IDEA आणी व्होडाफोन मर्जरमध्ये याचा फायदा होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

वर्ल्ड बँकेने भारताची अर्थव्यवस्था वित्तीय वर्ष १९ मध्ये ७.३% ने तर पुढील दोन वित्तीय वर्षात ७.५ % ने वाढेल असे भाकीत केले आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • तंबाखू प्रॉड्क्टसाठी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय डावलून ८५ % वेष्टनावर pictorial WARNING असली पाहिजे असे जाहीर केले.
 • सेबीने नवीन जिंदाल यांना लाच आणी भ्रष्टाचार या दोन्ही प्रकरणात दोषी ठरवले आहे.
 • सेबीने सत्यम केसमध्ये PRICE WATERHOUSE या ग्लोबल ऑडीटिंग फर्मला लिस्टिंग कंपनीचे ऑडीट करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे ऑडीट सर्टिफिकेट देण्यावर २ वर्षेपर्यंत बंदी घातली. तसेच Rs १३ कोटी परत द्यायला सांगितले.
 • सुप्रीम कोर्टाने JP ASSOCIATES ची संपत्ती विकण्यावर स्थगिती दिली. तसेच या केसमध्ये तिसऱ्या पार्टीला समाविष्ट करून घेण्यास नकार दिला. घर खरेदीदारांसाठी वेगळे पोर्टल बनेल असे सांगितले.
 • आयडीया आणी वोडाफोन यांच्या मर्जरला NCLT ने मंजुरी दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सन फार्माच्या हलोल येथील प्लांटची नोव्हेंबरमध्ये तपासणी झाली होती. त्यावेळी ९ त्रुटी दाखवल्या होत्या. आता USFDA फेब्रुवारी २०१८मध्ये तपासणी करणार आहे.
 • HCC ला मेट्रोसंबंधीत Rs ४८४ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • NBCC ला कोटद्वार ते रामनगर रोडसाठी Rs २००० कोटींची ऑर्डर मिळाली
 • ABAN ऑफशोअर या कंपनीने कर्ज देणाऱ्या बँकांना Rs ६० कोटी देण्याची तयारी दाखवली
 • शोभा डेव्हलपर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. याचा परिणाम प्रेस्टीज इस्टेट आणी ब्रिगेड एन्टरप्रायझेस या दक्षिण भारतातील कंपन्यांवर होईल.
 • जे पी इन्फ्राटेकच्या रिअल इस्टेटमध्ये टाटा आणी लोढा यांनी रुची दाखवल
 • कोल इंडियाने कोळशाच्या भावात ९% वाढ केली. ह्या बातमीचा अनुकूल परिणाम कोलइंडियावर आणी प्रतिकूल परिणाम सिमेंट आणी पॉवर, फरटीलायझर सेक्टरवर होईल.
 • वेलस्पन इंडिया ने आपली सबसिडीअरी इंडोस्पन नेक्स्टजेनचे युनिट USA मध्ये सुरु केले.
 • ‘धनुका अग्रीटेक’ या कंपनीने आपले गुरूग्राम युनिट पूर्णपणे बंद करून उत्पादन राजस्थान मध्ये सुरु केले.
 • साउथ इंडियन बँकेचे NPA कमी झाले.
 • IOB आपल्याजवळील सरप्लस फंडाचा उपयोग घाटा काढून टाकण्यासाठी करू शकते. बँकेजवळ Rs ७६५० कोटी शेअर प्रीमियम अकौंटमध्ये आहेत कंपनी कायद्याप्रमाणे याचा उपयोग बोनस शेअर्स, लाभांश यासाठी किंवा इतर विशीष्ट कारणांसाठी करणे कंपनीवर बंधनकारक असते. पण IOB ही बँकिंग रेग्युलेशन कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे IOB वर ही बंधने नाहीत कंपनी आपला Rs ६९७८ कोटींचा घाटा काढून टाकण्यासाठी हे सरप्लस वापरू शकते.
 • चीन डेव्हलपमेंट बँकेने RCOM च्या INSOLVENCY साठी केलेला अर्ज मागे घेतला
 • GMR इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा छत्तीसगढ मधील 1370MW पॉवर प्लांट मध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी अडानी पॉवर, JSW एनर्जी आणी टाटा पॉवर यांनी बीड सादर केल्या.
 • बलासोर ALLOYS ही कंपनी झिम्बाब्वे ALLOYS या कंपनीमध्ये ७०% स्टेक खरेदी करणार आहे. यासाठी कंपनी US $ ९०.73 मिलियन एवढे पेमेंट करेल.
 • एव्हररेडी ही कंपनी कन्फेक्सनरी बिझिनेसमध्ये उतरणार आहे. जेलीची TROPHY बनवणार आहे.
 • अपोलो टायर्स ही कंपनी आंध्र प्रदेशात Rs १८०० कोटी खर्च करून नवीन युनिट सुरु करणार आहे.
 • कोची शिपयार्ड मुंबई येथील शिपयार्ड भाड्याने घेणार आहे.
 • मुंबईमध्ये बीअरच्या किमती ८% ती ९% ने वाढल्या. याचा परिणाम युनायटेड ब्रुअरीजवर होईल.
 • सिमेंटवर इम्पोर्ट ड्युटी लावावी अशी मागणी सिमेंट सेक्टरमधील कंपन्या करत आहेत. JK सिमेंट, JK लक्ष्मी सिमेंट, RAMKO, क्कातीया, सागर, ग्रासिम , अंबुजा, ACC, श्री सिमेंट, अल्ट्राटेक, हैडलबर्ग सिमेंट
 • इंडसइंड बँकेचा तिमाही निकाल चांगला म्हणता येणार नाही. NPA वाढले. भरवश्याच्या म्हशीला अशी गत झाली. मार्केट अशावेळी दया दाखवत नाही.
 • श्री सिमेंट, H T मेडीया व्हेन्चर यांचे निकाल चांगले आले. श्री सिमेंटने Rs २० प्रती शेअर लाभांश दिला.
 • टी सी एस ने Rs ७ प्रती शेअर लाभांश दिला.

कॉर्पोरेट एक्शन

 • नवीन फ़्लुओरिनने नोसिल मधील १% स्टेक (१६ लाख शेअर्स) विकला.
 • JSPL ही १००० कोटींचा QIP आणत आहे. (QIP विषयी सविस्तर माहिती माझ्या ‘ मार्केट आणी मी ‘या पुस्तकात दिलेली आहे).’ओमानमधील बिझिनेसचे लिस्टिंग करणार आहे यातून Rs २००० कोटी मिळतील.
 • युनिकेम LAB Rs ४३० प्रती शेअर या भावाने २.०६ कोटी शेअर्सचा BUY BACK करेल.
 • आरती ड्रग्ज ही कंपनी Rs ८७५ प्रती शेअर या भावाने २.७५ कोटी शेअर्स BUY BACK करेल.
 • IDFC बँक आणी फर्स्ट कॅपिटल याचे मर्जर होईल अशी वदंता आहे.
 • TCS या IT क्षेत्रातील कम्पनीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. कंपनीचा रेव्हेन्यू Rs ३०९०४ कोटी तर नफा Rs ६५३१ कोटी झाला. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन २५.२% राहिले. कंपनीने फ्युचर गायडंस आशादायी दिला. कंपनीला आशा आहे की बिझिनेस ENVIRONMENT सुधारेल, USA मध्ये करकपात जाहीर झाल्यामुळे IT सेक्टरवरचा खर्च वाढेल, रिटेल सेक्टरमध्ये प्रगती होईल आणी एकूण ऑपरेटिंग मार्जिन २६% ते २८% राहील
 • इन्फोसिसया कंपनीला तिसर्या तिमाहीसाठी Rs ३७२६ कोटी नेट प्रॉफीट झाले रेव्हेन्यू Rs१७७९४ कोटी झाला.
 • ऑपरेटिंग मार्जिन २४.३%. ऑपरेटिंग मार्जिनविषयी गायडंस २३% ते २५% दिला.

या आठवड्यात येणारी IPO आणी OFS

 • NMDC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीतील आपला स्टेक सरकारने OFS च्या माध्यमातून स्टेक विकला. याची सपोर्ट प्राईस Rs १५३.५० होती किरकोळ गुंतवणुकीसाठी ५% डीस्कॉउंट ठेवला होता. मंगळवार तारीख ९ जानेवारी २०१८ पासून संस्थागत गुंतवणूकदारांसाठ्री तर बुधवारी तारीख १० जानेवारी २०१८ रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन होता. OFSमधील संस्थागत इन्व्हेस्टरसाठी असलेला कोटा १.६८ वेळा तर रिटेल इंव्हेस्टरसाठी असलेला कोटा ५.४ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला. या OFS मधून सरकारला Rs १२०० कोटी मिळाले.
 • एअर एशिया इंडिया ही प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कंपनी IPO आणण्याचा विचार करत आहे.
 • JSPL ही कंपनी Rs १००० कोटींचा QIP करणार आहे. (QIP विषयी सविस्तर माहिती मी माझ्या ‘मार्केट आणी मी’ पुस्तकात दिली आहे) ओमानमधील बिझिनेसचे लिस्टिंग करणार आहे. यातून कंपनीला Rs २००० कोटी मिळतील.
 • अपोलो मायक्रो सिस्टिम्स ह्या सरंक्षण क्षेत्रात (इलेक्ट्रोनिक सिस्टीम आणी डिझाईन उत्पादन) काम करणाऱ्या आणी एव्हीयॉनिक सिस्टम, मिसाईल उपग्रह सिस्टिम्सना हार्डवेअर पुरवणार्या कंपनीने  आपला IPO १० जानेवारी ते १२ जानेवारी या काळात आणला. प्राईस BAND Rs २७० ते २७५ चा होता मिनिमम लॉट ५० शेअर्सचा होता. IPO  Rs १५६ कोटीचा होता. कंपनीचा गेल्या पांच वर्षातील परफॉर्मन्स चांगला आहे. पण IPO माहाग आहे असे तज्ञाचे मत आहे. हा IPO १३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला
 • NEWGEN SOFTWEAR हा Rs ४२४ कोटींचा IPO १६ जानेवारी ते १८ जानेवारी या काळात ओपन असेल. याचा प्राईस BAND Rs २४० ते Rs २४५ आहे. ही कंपनी BSE आणी NSE वर लिस्ट होईल. ही कंपनी आपले बिझिनेस प्रोसेस MANAGEMENT SOFTWARE, बँकांसाठी, सरकारी संस्थांसाठी बनवते आणी ६० देशात विकते. ही कंपनी १९९२ साली स्थापन झाली.
 • SREI इन्फ्रा त्यांच्या इक्विपमेंट फायनान्सच्या व्यवसायासाठी IPO आणणार आहेत.

मार्केटने काय शिकवले

सरकार ‘SCRAPING POLICY’ आणण्याचा विचार करत आहे. १५ ते २५ वर्षे जुनी असलेली वाह्ने चालवायला परवानगी असणार नाही. जर ही पॉलिसी अमलात आणली तर प्रदूषण कमी होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रद्द झालेल्या वाहनाच्या संख्येइतकी वाहनांची मागणी वाढेल. याचा परिणाम ASHOK LEYLAND, आणी इतर ऑटो उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.

प्रमोटर्सने जर एखाद्या कंपनीत आपला स्टेक वाढवला तर त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येते. कारण प्रमोटर्सच्या स्टेकमधील वाढीत त्यांचा कंपनीच्या उज्वल भविष्यावर विश्वास दिसतो. तर प्रमोटर्सनी स्टेक विकला तर कंपनीच्या चांगल्या भविष्याबद्दल त्यांना विश्वास नाही असे दिसते.

जेट एअरवेजच्या विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांजवळ बेकायदेशीररीत्या ठेवलेले परदेशी चलन सापडले. यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो त्या एअरहोस्टेसवर कंपनीने योग्य ती कारवाई केली या प्रकरणाचा कंपनीच्या आर्थिक बाबींशी काहीही संबंध नाही. शेअर्सचा भाव तात्पुरता कमी झाला. कारण शेवटी शेअरमार्केट हे गुंतवणूकदार आणी ट्रेडर्सच्या अपेक्षांचे आशा निराशेचे प्रतिबिंब असते.

शुक्रवार तारीख १२-०१-२०१८ रोजी PUT /CALL रेशियो १.६६ वरून १.७५ वर गेला. ओव्हर बॉट स्थिती झाली होती FIIची इंडेक्स फ्युचरमध्ये विक्री सुरु आहे. अंदाजपत्रकाची तारीख जवळ जवळ येत असल्यामुळे कॅश मार्केटमध्ये विक्री दिसत नाही. थोडा थोडा फायदा घेत घेत ट्रेड करावा. ज्यावेळी तेजीचे म्युझिक थांबेल तेव्हा तुम्ही खुर्चीत बसलेले असले पाहिजेत आणी धावता धावता पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मार्केट कधीही पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे पण त्यासाठी तात्कालिक कारण कोणते असेल याचा नेम नाही. सुप्रीम कोर्टाच्या चार वर्तमान न्यायाधीशांनी प्रेस कॉनफरंस घेऊन काही गोष्टी सांगितल्या याचा शेअर मार्केटशी काहीही संबंध नसतानाही मार्केट ३०० पाईंट पडले. त्यामुळे सावध रहा संयम ठेवा एवढेच सुचवावेसे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४५९२ NSEचा निर्देशांक निफ्टी १०६८१ तर बँक निफ्टी २५७४९ वर बंद झाले.

 

आठवड्याचे समालोचन – बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बदलते वारे बजेटचे – १ जानेवारी २०१८ ते ५ जानेवारी २०१८

शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी आणी त्यांच्या क्षेत्रीय निर्देशांकांनी (उदा मिडकॅप,स्मालकॅप) उच्चांक प्रस्थापित केला. सध्या प्रीबजेट RALLY सुरु आहे. २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकाभिमुख आणी लोकप्रिय अंदाजपत्रक सादर केले जाईल असा मार्केटचा अंदाज आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून किंवा ग्रामीण भागाला खुश करण्यासाठी शेती आणी इतर ग्रामीण क्षेत्राना प्राधान्य देऊन सरकार आपल्या अंदाजपत्रकाची आखणी करेल. प्रत्येकजण आपापला अंदाज व्यक्त करत आहे. सरकारने जाहीर केले आहे की शेती, सिंचाई, इन्फ्रास्ट्रक्चर, निर्यात, लघुउद्योग, मेक इन-इंडिया, आणी रोजगारनिर्माण यावर सरकारचा भर असेल. शुक्रवारी तारीख ५ जानेवारी २०१८ रोजी संसदेचे शीतकालीन अधिवेशन संपले  आता थेट संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होईल. मार्केटमध्ये अंदाजपत्रकात कोणत्या क्षेत्राना उत्तेजन दिले जाईल, सरकार आपला पब्लिक एक्स्पेन्डीचर कोणत्या क्षेत्रात जास्तीतजास्त करेल. याच्या अंदाजावर निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात चढ उतार होत आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA आपल्या व्हिसासंबंधीत नियमांमध्ये बदल करणार आहे. जर USA मध्ये ६ वर्ष राहत असलेल्या आणी ग्रीन कार्डासाठी अर्ज केलेया H1B व्हिसा धारकांना त्यांच्या अर्जाविषयी USA सरकारने काही उत्तर दिले नसले तर ग्रीन कार्ड विषयावर अंतिम निर्णय होईपर्यंत अशा H1B व्हिसाधारकांना USA मध्ये राहण्याची मुभा दिलेली होती. पण आता मात्र ज्या H1B व्हिसा धारकांच्या ग्रीन कार्डाविषयी अंतिम निर्णय सहा वर्षानंतर झाला नसेल अशा H1B व्हिसा धारकांना आपल्या देशात ताबडतोब परतावे लागेल. त्यांच्या ग्रीन कार्डासंबंधात अंतिम निर्णय झाल्यावर त्यांना परत व्हिसा काढून USA मध्ये जाता येईल. USA मधील ग्रीन कार्ड मंजुरीची प्रक्रिया खूप वेळ घेते. त्यामुळे या बाबतीत अंतिम निर्णय होईपर्यंत सहा वर्षानंतरचा काल H1B व्हिसा धारकांना आपल्या देशात व्यतीत करावा लागेल. या घडीला अंदाजे ५ लाख भारतीय H1B व्हिसा धारक ग्रीन कार्डासंबंधीत अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ग्रीन कार्डवर अंतिम निर्णय होईपर्यंत भारतात परत यावे लागेल. तसेच त्यांच्या व्हिसावर डीपेंडट व्हिसा असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बरोबर भारतात परतावे लागेल. याचा परिणाम पर्यायाने IT क्षेत्रातील कंपन्यांवर होईल. या नियमातील बदलांचा ORACLE या कंपनीवर कमीतकमी परिणाम होईल.
 • USA मध्ये क्लास 8 TRUCK ची विक्री ७७% ने वाढली. याचा फायदा भारत फोर्जला होईल.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने जून २०१८ पासून PACKINGमध्ये तागाचा उपयोग केला पाहिजे अशी सुचना केल्यामुले LUDLOW , CHEVIOT आणी GLOSTER या ताग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम झाला.
 • टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांना काही सवलती देण्याचा सरकार विचार करत आहे. स्पेक्ट्रमवर असलेली कॅप काढून टाकण्याचा सरकार विचार करत आहे. यामुळे टेलीकॉमक्षेत्रात मर्जर आणी अक्विझिशनची प्रक्रिया सोपी होण्यास मदत होईल. तसेच सरकार टेलिकॉम क्षेत्रात ऑटोमटिक रुटने १००% FDI आणण्यासाठी मंजुरी देण्यावर विचार करत आहे.
 • तसेच TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) १ फेब्रुवारीपासून इंटरकनेक्शनविषयी नवीन नियम जारी करेल. या नियमानुसार अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत करार केला पाहिजे.
 • सरकारने UCO बँकेत Rs १३७५ कोटी तर IDBI बँकेत Rs २७२९ कोटी भांडवल दिले.
 • क्रुडऑइलच्या वाढत्या किमती लक्षात घेवून राज्य सरकारांनी आपल्या VAT चा दर कमी करावा असे पेट्रोलियम मंत्र्यांनी राज्य सरकारांना आवाहन केले. या आधीच महाराष्ट्र गुजरात आणी उत्तराखंड या राज्यांनी आपले VAT चे दर कमी केले आहेत.
 • अर्थमंत्र्यांनी असे सांगितले की २०१८ मध्ये खेड्यांचा विकास करण्यावर आणी खेडी रस्त्यांद्वारे शहरांना जोडण्यावर भर दिला जाईल. प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे काम अग्रक्रमाने हाती घेतले जाईल. ग्रामीण क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी अग्रक्रम दिला जाईल. याचा परिणाम पॉवर सेक्टरवर आणी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर होईल
 • सरकारने फरटीलायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना DBT योजनेखाली सबसिडी द्यायला सुरुवात केली.
 • तसेच सरकारने कस्टमाइझ्ड फरटीलायझर बनवण्यासाठी टाटा केमिकल आणी इंडोगल्फ फरटीलायझर या कंपन्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे सरकारला सबसिडी द्यावी लागणार नाही. ‘जशी जमीन जसे पीक तसे खत बनवावे’ अशी सरकारची ऑर्डर आहे. टाटा केमिकल्सने ‘पारस’ या नावाने खत बनवून विकण्यास सुरुवात केली आहे. हे खत मार्केट प्राईसला विकता येईल.
 • सरकार ITI (इंडिअन टेलिफोन इंडस्ट्रीज) मध्ये दोन टप्प्यात डायव्हेस्टमेंट करणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकार FPO च्या माध्यमातून १८ कोटी नवे शेअर्स इशू करेल. तर दुसर्या टप्प्यात OFS च्या माध्यमातून ९ कोटी शेअर्स डायव्हेस्ट करेल. या सर्व प्रक्रीयेनंतर ITI मध्ये सरकारचा ७४.८६ % स्टेक राहील.
 • सरकार पोर्ट कंपन्यांना पोर्ट वापरण्यासाठी त्यांना आकारल्या जाणार्या फीमध्ये सवलत देण्याचा सरकार विचार करत आहे. मॉडेल कन्सेशन कराराचा रिव्हू घेतला जाईल. मोठ्या पोर्टमध्ये PPP योजनेअंतर्गत सूट दिली जाईल.
 • सरकारने जनरल PROVIDENT फंडावरील व्याजाचा दर ०.२०% ने कमी केला.
 • सरकार एअरइंडियाच्या ३३ मालमत्ता विकणार आहे.
 • दिल्ली राज्य सरकारने दुचाकी इलेक्ट्रीक व्हेईकलसाठी Rs ३०००० सबसिडी देण्याची घोषणा केली.
 • सरकारने जोझीला टनेलसाठी Rs ६९०० कोटी मंजूर केले. या टनेलचे काम ITNL या कंपनीला मिळाले.
 • ‘मीडडे मील’ या योजनेखाली दिल्या जाणार्या आहारात आता दुधाचा समावेश केल्यामुळे डेअरी कंपन्यांवर परिणाम होईल – प्रभात डेअरी, पराग मिल्क, क्वालिटी
 • ज्या कंपन्यांनी GST चे दर कमी केल्यानंतर त्यांच्या उत्पादनाचे दर त्या प्रमाणात कमी केले नाहीत म्हणजेच GST कमी केल्याचा फायदा अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवला नाही अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सरकारने कळवले आहे. उदा HUL ज्युबिलंट फूड्स, वेस्ट लाईफ, स्पेशालिटी रेस्टॉरंट
 • सरकार सहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल बँकामध्ये Rs ७५७७ कोटी भांडवल घालणार आहे ते या प्रकारे बँक ऑफ इंडिया Rs २२५७ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र Rs ६५० कोटी, देना बँक २४३ कोटी, सेन्ट्रल बँक Rs ३२३ कोटी.
 • सरकारने Rs ८०००० कोटींचे रीकॅपिटलायझेशन BONDS इशू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेमध्ये मंजुरी मिळाली. सरकारने असेही सांगितले की या रीकॅपिटलायझेशन BONDच्या इशूमुळे सरकारच्या वित्तीय घाट्यावर परिणाम होणार नाही.
 • ONGC आणी HPCL या कंपन्यांच्या मर्जरमध्ये अडचणी येत आहेत.हे मर्जर मार्च २०१८ पर्यंत पुरे होईल असा अंदाज आहे.
 • सरकार GAILचे दोन विभागात विभाजन करण्याच्या विचारात आहे. एक भाग मार्केटिंग बघेल तर दुसरा GAS च्या उत्पादन आणी संबंधीत बाबींकडे लक्ष देईल.
 • संरक्षण मंत्रालयाने Rs २४०० कोटींच्या योजनांना मंजुरी दिली या योजनांचा परिणाम .ASTRA मायक्रोवेव्ह, वालचंदनगर इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यासाठी नवीन बिल लोकसभेत सादर केले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ८ कोअर सेक्टरमध्ये प्रगतीचे आकडे खूप चांगले आले. सरकारचा भर इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. सिमेंट स्टील पॉवर या कोअर सेक्टरमधील आकडे चांगले आले.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • इरिगेशनसाठी जी साधने लागतात त्यावरील GST १२% वरून ५% करणार आहेत. याचा परिणाम जैन इरिगेशन , EPC आणी PI इंडस्ट्रीज या कंपन्यांवर होइल
 • RBI कडे सरकारने Rs १३००० कोटी अतिरिक्त लाभांश मागितला होता. RBI ने हा लाभांश देण्याची तयारी दाखवली आहे.
 • RBI ने अलाहाबाद बँकेला PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) च्या तरतुदी लागू केल्या.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • लार्सेन एंड टुब्रो ला हायड्रोकार्बन बिझिनेस साठी Rs २१०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • सबमिलरचे ASSET ब्रिगेड एन्टरप्रायझेसने खरेदी केले.
 • मुकेश अंबानींच्या ‘इंडस्ट्रीयल सिटी प्रोजेक्टला’ CIDCO ने मंजुरी दिली.
 • NTPCने कुडगी प्रोजेक्ट II सुरु केला
 • डिसेंबर महिन्यात मारुतीची कार विक्री वाढली. पण निर्यात कमी झाली.
 • बजाज ऑटोच्या तीनचाकी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. निर्यातही वाढली.
 • टी व्ही एस मोटर्स आणी एस्कॉर्टस यांची निर्यात वाढली.
 • युनियन बँक Rs १२८७ कोटींचे १७ NPA विकण्यासाठी बोली मागवल्या.
 • कॅनरा बँकेने Rs १००० कोटींचे २० NPA विकण्यासाठी बोली मागवली
 • JSW एनर्जीने JP पॉवरचा बिना प्रोजेक्ट विकत घेण्यासाठी २०१६ साली केलेला करार रद्द केला.
 • शेअर मार्केट मध्ये तेजी आहे IPO ना गुंतवणूकदार भरभरून प्रतिसाद देत आहेत या सर्वामुळे ब्रोकर आणी इन्व्हेस्टमेंट बँकर आणी रजिस्ट्रार टू इशू अशा विविध फिल्डमध्ये काम करणाऱ्या EDELWEISS, मोतीलाल ओसवाल, जे एम फायनांसियल्स, A B मनी या कंपन्यांवर परिणाम होईल.
 • कॉक्स एंड किंग्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपले शेअर्स विकले.
 • PNB त्यांच्या म्युच्युअल फंडातील स्टेक विकणार आहे.
 • टाटा केमिकल्सचा टाटा ग्लोबल आणी RALLIS मध्ये स्टेक आहे तो विकून त्यांना Rs ५००० कोटी मिळतील.
 • प्रभात डेअरीने २३ लाख शेअर्स तारण म्हणून ठेवले.
 • D B रिअल्टीजने त्यांचे १ कोटी शेअर्स गहाण ठेवले.
 • हिमाद्री केमिकल्स ही लिथीयम BATTERY साठी लागणारा ADVANCE कार्बन बनवणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. सरकारचे धोरण इलेक्ट्रीक वाहनांना उत्तेजन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे या वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या BATTERY साठीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हिमाद्री केमिकल्सवर होईल.
 • रिलायंस इंडस्ट्रीजने जामनगरमध्ये GAS CRACKER चे उत्पादन सुरु केले.
 • मारुतीने आपल्या कार्सच्या वेगवेगळ्या मॉडेलवर Rs २०००० ते Rs ३०००० पर्यंत डीस्कौंट जाहीर केल्यामुळे शेअरच्या किमतीवर परिणाम झाला
 • देना बँक त्यांचा NSDL मधील १.५६% स्टेक विकणार आहे
 • GM ब्रुअरीज चा निकाल खूप चांगला आला
 • वरूण बिव्हरेजीसने पेप्सी कंपनीबरोबर मार्केटिंग आणी डीस्ट्रीब्यूशनसाठी करार केला
 • संघी इंडस्ट्रीज उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी Rs १२५० कोटी खर्च करणार आहेत.
 • GRAVITA इंडस्ट्रीजने आपल्या जयपूर येथील प्लांटमध्ये लेड टेट्रा ऑक्साईडचे उत्पादन सुरु केले.
 • इलेक्ट्रो स्टील्स ही कंपनी खरेदी करण्यात टाटा स्टील, EDELWEISS, आणी वेदांता या कंपन्यांनी रुची दाखवली.
 • पराग मिल्क या कंपनीने दिल्ली मध्ये ‘गोवर्धन’ BRAND दही launch केले

नजीकच्या काळात येणारे IPO

 • सरकार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स या कंपनीचा Rs ४००० कोटींचा IPO आणत आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • SJVN, युनिकेम LAB, आरती ड्रग्स या कंपन्यांनी शेअर्स ‘BUY BACK’ विचार करण्यासाठी ८ जानेवारी २०१८ रोजी आपापल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • लव्हेबल लोंन्जरीचा Rs २५० प्रती शेअर या भावाने २० लाख शेअर्ससाठी ‘BUY BACK’ ८ जानेवारीपासून सुरु होईल.
 • साउथ इंडियन बँकेने ९ जानेवारी २०१८ रोजी २० कोटी भांडवल उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • ऑरबीट एक्स्पोर्ट Rs १८० प्रती शेअर या भावाने ४.४४ लाख शेअर्स ‘BUY BACK’ करेल.
 • BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) ने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी १५ जानेवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

मार्केटने काय शिकवले

शेअरमार्केटचे पीच बदलले आहे. षटकार,चौकार मारले तर झेल जाण्याचा धोका २०१८ मध्ये आहे. करेक्शन आले तरी थोडेसे येईल पण पुन्हा मार्केट वर जाईल असे जे ट्रेडर धरून चालले होते तसे घडेल असे दिसत नाही. प्रत्येक वर्षी ३०% वाढ होत नाही, पण गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये करेक्शन असताना २०१८ हे वर्ष गुंतवणूक करण्याची संधी देईल असे वाटते.

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण एखाद्या खास घटनेसाठी खास वस्तूंची खरेदी करतो. पण घटना घडून गेल्यावर त्या वस्तू विकत नाही तर त्या समारंभाची आठवण म्हणून जपून ठेवतो. पण शेअरमार्केटमध्ये तसे नाही. कारण दैनंदिन आयुष्यात आपण वस्तू वापरण्यासाठी खरेदी करतो म्हणजेच उपभोगासाठी खरेदी करतो. ती विकून फायदा मिळवण्यासाठी नाही पण शेअरमार्केटमध्ये मात्र आपण खरेदी करतो ती विकून फायदा मिळवण्यासाठीचं!! आता पहा नाताळ आल्याबरोबर मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या  शेअर्सच्या किमतीत वाढ होते. नाताळ संपल्याबरोबर ते शेअर पडू लागले. मद्यार्काची मागणी वाढेल या अपेक्षेने नाताळच्या आधी शेअर्सची खरेदी केली आता मद्यार्काची मागणी कमी होईल म्हणून ह्या शेअर्सची विक्री वाढत आहे म्हणजेच ट्रेडर्स शेअर्स ‘शॉर्ट’ करत आहे. म्हणजेच मार्केटमध्ये दोन्हीही प्रकारचा ट्रेड करून फायदा मिळवता येतो.

सोमवारी १ जानेवारी रोजी PUT /CALL रेशियो १.६२ आणी फिअर ग्रीड मीटर ७३ होते. या परिस्थितीत मार्केट टिकत नाही. VOLUME खूप कमी होते. त्यामुळे अचानक मार्केट पडू लागले. 2018चे दर्शन मार्केटने दिले. २०१८चे संपूर्ण वर्ष मार्केट सरसकट तेजीत राहील असे दिसत नाही गाढव आणी घोडे यात गुंतवणूकदार फरक करतील, किंबहुना तो करावा लागेल जर कळत नसेल तर शिकून घ्यावे लागेल. हे ट्रेडर्स मार्केट आहे इन्व्हेस्टरचे नव्हे. सातत्याने सेक्टरमध्ये शेअर्समध्ये रोटेशन करावे लागेल. PASSIVE इन्व्हेस्टर राहून चालणार नाही. आपल्या पोर्टफोलिओचे सतत परीक्षण आणी निरीक्षण करून त्याची मार्केटच्या चालीबरोबर सांगड घालता आली पाहिजे.

सध्या निफ्टीमध्ये फारशी हालचाल नाही. निफ्टी एका छोट्याशा रेंजमध्ये फिरत आहे. मार्केट लहरी सुलतानाप्रमाणे वागत आहे. सकाळची मार्केटची भूमिका वेगळी असते तर दुपारची भूमिका वेगळी असते. मिड्कॅप आणी स्मालकॅपमध्ये हालचाल आहे. चांगले मिडकॅप शोधा. पण सावधगिरी बाळगा. कारण मिडकॅप शेअर्सना एकदा लोअर सर्किट लागायला लागली की विकायला कठीण होऊन बसते. पार्टी चालू आहे पण आपल्याला किती पचते आणी किती रुचते याचा विचार करायला हवा नाहीतर डॉक्टरकडे जावे लागते. ज्याप्रमाणे आपण आपले आरोग्य सांभाळतो त्याप्रमाणेच गुंतवणुकीचे आरोग्यही सांभाळावे लागते. क्रुडचा दर वाढत आहे पण त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वाढत आहे., त्यामुळे क्रूडच्या दरवाढीचा परिणाम थोड्या प्रमाणात कमी होत आहे. ज्यावेळी रुपयाचे अवमूल्यन होईल तेव्हा क्रुडचे  चटके बसू लागतील.

पुढील आठवड्यात कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात होईल. त्याप्रमाणे जे बदल होतील त्याकडे लक्ष द्या

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१५३ वर NSE निर्देशांक निफ्टी १०५५८ वर आणी बँक निफ्टी २५६०१ वर बंद झाले.

 

भाग ६२ – बीटकॉईन- एक मृगजळ

सध्या एक बातमी माझ्या वाचनात आली. ती म्हणजे CBOE ने (शिकागो बोर्ड ऑप्शन एक्स्चेंज, हे जगातील १९७३ साली सुरु झालेले सर्वात मोठे ऑप्शन एक्स्चेंज आहे) १० डिसेंबर २०१७ रोजी बीट कॉईन फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग सुरु केले.हे एक्स्चेंज GEMINI या डिजिटल ASSET कंपनीच्या ऑकंशन किमतीवर आधारीत व्यवहार करते. . १८ डिसेंबर २०१७ला CME नेही बीट कॉईनमध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु केले. या दिवशी दोन वेळा ट्रेडिंग थांबवावे लागले. ट्राफिक जाम झाला. त्यादिवशी १ बीटकॉईन= US $ १५५०० या भावाने ओपन झाले आणी १ बीट कॉईन =US $ १८८०० या दरावर बंद झाले. बीट कॉईनचा उच्चतम दर १ बीट कॉईन –US $ १९८४३ इतका होता. बीट कॉईन चा किमान रेट १ बीट कॉईन =US $१३९१४ असा होता. आता तो १ बीट कॉईन = US$१५०००च्या आसपास स्थिरावला आहे. लक्षात घ्या बीट कॉईनच्या किमतीतील हा एक आठवड्यातील चढउतार आहे. ही बीट कॉईन ची किमत १ जानेवारी २०१७ च्या किमतीपेक्षा १२ पट जास्त आहे. २००९ मध्ये US $ २५ चा एक पिझा घेण्यासाठी १०,००० बीट कॉईन देण्यात आले होते.

बीट कॉईन हे एक असे चलन आहे जे आपण बघू शकत नाही. स्पर्श करू शकत नाही. पण चलनाचे जे कार्य आहे ते बीटकॉईनच्या माध्यमातून करता येणे आजकाल शक्य झाले आहे. बीट कॉईन ही एक क्रीपटोकरन्सी आहे. हे चलन वापरताना HACKINGचा धोका असतो म्हणून बीट कॉईनमधील व्यवहारासाठी क्रिपटोग्राफीचा उपयोग करतात. ही एक वर्ल्डवाईड पेमेंट सिस्टीम, डिसेंट्रलाईझड डिजिटल करन्सी असून सेंट्रल बँक (उदा RBI) किंवा इतर प्रशासकाचे नियंत्रण नाही.

आता आपण हवेचे उदाहरण घेऊ. आपण हवेला कुठे हात लावू शकतो किंवा हवेला कुठे पाहू शकतो. पण हवेची जाणीव होते. फक्त विश्वासावर चालणारे चलन म्हणजे बीटकॉईन असे म्हणतात. काही माणसे परमेश्वर आहे असे म्हणणारी आहेत तर काही माणसे परमेश्वर नाही असे म्हणणारी आहेत. पण ज्याअर्थी आपल्या दृश्य असणारी सृष्टी आहे त्या अर्थी तिचा करताकरविता कोणीतरी असलाच पाहिजे.त्याच प्रमाणे बीटकॉईन ही संज्ञा अस्तित्वात आहे म्हणजे तिचा करता करविता कोणीतरी आहे हे निश्चित.

बीटकॉईन हे एक व्हर्च्युअल चलन किंवा डिजिटल चलन आहे. हा एक क्रीपटोकरन्सीचा प्रकार आहे. ह्या चलनाची साठवण करण्यासाठी तिजोरीची किंवा हंड्यांची आवश्यकता नसते .हे चलन आपल्याला ऑन-लाईन WALLET मध्ये ठेवता येते. ह्या प्रकारच्या चलनावर कोणाचेही नियंत्रण नाही. रुपया, GBP, किंवा US $ किंवा अन्य कोणत्याही देशाच्या चलनावर त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण असते तसे बीट-कॉईनच्या बाबतीत नाही म्हणून या चलनाला DECENTRALISED चलन असे म्हणतात. जसे हवा, पाणी, सूर्य चंद्र इन्टरनेट, ध्वनीलहरी, यांची मालकी अमुक एका माणसाकडे किंवा संस्थेकडे नाही पण या सर्व गोष्टीचा वापर करण्याचे अधिकार सर्वांना आहेत. बीटकॉईनचा शोध ३ जानेवारी २००९ मध्ये सातोशी नाकामाटो यांनी लावला.

रुपयाची किंवा अन्य कोणत्याही देशाच्या चलनाची किंमत त्या देशाजवळ असलेले सोने किंवा परकीय चलनाचा साठा, त्या देशावर असलेले कर्ज, देशाची आर्थिक परिस्थिती, प्रगतीचा वेग यावर ठरते तसे बीट कॉईनच्या बाबतीत नाही. बीट कॉईनची किंमत ही मागणी आणी पुरवठा या तत्वावर ठरते.
बीट कॉईनसाठी एका खात्याची गरज असते. याला ‘बीट कॉईन WALLET’ असे म्हणतात. या ‘WALLET’ चे पुष्कळ प्रकार आहेत. ‘डेस्कटॉप WALLET’, ‘मोबाईल WALLET’, ‘ऑन लाईन /वेबसाईट WALLET, ‘हार्डवेअर WALLET’ अशा कोणत्याही प्रकारच्या WALLETचा उपयोग करून एक खाते उघडा. हे WALLET तुम्हाला एक UID (UNIQUE ID) देते. या ID चा उपयोग करून बीट कॉईन माईन करून साठवता येतात.या UID चा उपयोग करून तुम्हाला WALLET मधील बीट कॉईन विकता येतात. या विक्रीचे पैसे तुम्ही या WALLET द्वारे तुमच्या बँक अकौंटमध्ये ट्रान्स्फर करू शकता. बीट कॉईनमध्ये कोठलाही व्यवहार करण्यासाठी बीट कॉईन WALLET असणे जरुरीचे आहे.

जसे प्रत्येक चलन छोट्या छोट्या भागात विभागलेले असते .उदा रुपया –पैसे, GBP –पेनी, तसा १ बीट कॉईन हा ‘सातोषी’ मध्ये विभागलेला असतो. एका बीट कॉईनची किंमत १० कोटी ‘सातोषी’ असते. बीट कॉईनचा दर US $ मध्ये ठरवला जातो. जसे १ बीट कॉईन म्हणजे US $१०००. बीट कॉईनची रुपयातील किंमत US $ आणी रुपया यांच्यातला विनिमय दर लक्षात घेवून ठरवली जाते.

तुम्ही ऑन लाईन काही सामान विकत असाल आणी खरेदी करणारा बीट कॉईन मध्ये पेमेंट करायला तयार असेल तर तुम्ही बीट कॉईन स्वीकारून सामान विका, नंतर जेव्हा बीट कॉईनचा दर वाढेल तेव्हा बीट कॉईन विकून पैसे मिळवा. सध्या तरी बीट कॉईन चा दर वाढतो आहे तो वाढतच राहील याची शाश्वती नाही. हेच उदाहरण शेअरमार्केटच्या बाबतीत द्यायचे झाले तर तुम्ही काही माल विकला त्या व्यक्तीकडे काही शेअर्स असतील ती व्यक्ती तेवढ्या किमतीचे (मार्केटमध्ये त्या दिवशी असलेल्या भावाप्रमाणे). शेअर्स तुमच्या ‘DEMAT’ खात्याला ट्रान्स्फर करायला तयार असेल तर तुम्ही ते शेअर स्वीकारून शेअर्सचा भाव वाढल्यावर ते शेअर्स विकून फायदा मिळवू शकता. पण याची शाश्वती नाही.

तुम्ही बीट कॉईन मायनिंग करू शकता. याच्या साठी संगणक हवा, आणी तोसुद्धा हायस्पीड प्रोसेसर (उच्च प्रतीची कॉम्प्युटिंग क्षमतेचा) असलेला म्हणजेच त्याचे हार्डवेअर उत्कृष्ट दर्जाचे हवे. याबरोबरच याला उर्जेचा वापर करावा लागतो बीट कॉईन संगणक कोड्सचा उपयोग गुंतागुंतीचे गणिती प्राब्लेम सोडवून माईन करतात. १ बीट कॉईन माईन करायला २१५ KW-HOURS उर्जा लागते. १ बीट कॉईन व्यवहाराच्या प्रक्रियेसाठी US $ ७.३० आकारले जातात. आपण जे व्यवहार बीट कॉईनच्या माध्यमातून करतो तो ‘व्हेरीफाय’ व्हायला हवा. हे व्यवहार व्हेरीफाय करण्यासाठी बीट कॉईन चा व्यवहार व्हेरीफाय करणाऱ्याला ‘मायनर’ असे म्हणतात. आपण बीट कॉईन मध्ये केलेला व्यवहार योग्य की अयोग्य, खोटा किंवा चुकीचा नाही याची पडताळणी हे ‘मायनर’ करतात. या कामाचा मोबदला त्यांना बीट कॉईन च्या माध्यमातूनच मिळतो. या ‘मायनर्स’ जवळ हाय परफॉरमन्स संगणक आणी GPU (ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट) असतात.असे संगणक आणी GPU खूप महाग असतात. अशा पद्धतीने नवीन बीट कॉईनचा प्रवेश होतो.

पण देशाच्या सेन्ट्रल बँकेने किती चलनी नोटा छापायच्या यावर सरकारचे बंधन असते. तसेच बीट कॉईनच्या बाबतीत आहे. बीट कॉईन मायनिंग करण्याची मर्यादा २१ मिलियन बीट कोईन इतकी आहे. सध्या १६.७ मिलियन बिट कॉईन सिस्टीममध्ये आहेत..

पूर्वीच्या काळात बार्टर व्यवहाराची पद्धत प्रचलीत होती. नंतर जेव्हा चलनात व्यवहार सुरु झाला तेव्हाही लोक घाबरले असणारच तसेच बीट कॉईन ही डिजिटल व्यवहाराची पुढील पायरी असल्यामुळे लोक या माध्यमातून व्यवहार करायला घाबरण्याची शक्यता आहे.

जसा आपण बँकेच्या पेमेंट प्रक्रियेचा अभ्यास करून त्या प्रक्रियेचा उपयोग करून व्यवहार करतो. या व्यवहाराची नोंद बँकेच्या खात्यात होते. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला असे कळते. तसाच व्यवहार बीट कॉईनच्या बाबतीत ‘ब्लॉकचेन’ च्या माध्यमातून करायचा. बीट कॉईन मध्ये झालेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद एका ‘पब्लिक लेजर’ मध्ये होते. यात प्रत्येक व्यवहाराची खुलासेवार माहिती असते यापूर्वी पब्लिक लेजर’ हा एकच डेटा बेस होता. तो ऑऊट ऑफ डेट, HACK, किंवा बदलला जाऊ शकत होता. याचा प्रतिबंध करण्यासाठी आता हाच डेटा निरनिराळ्या ठिकाणच्या संगणकांवर ठेवला जातो प्रत्येक बीट कॉईन व्यवहार या सर्व ठिकाणच्या संगणकांवर रेकॉर्ड केला जातो. यालाच ‘बीट कॉईन ब्लॉकचेन’असे म्हणतात. बीट कॉईन व्यवहाराची ‘बीट कॉईन ब्लॉक चेन’ मध्ये झालेली नोंद हे त्या व्यवहाराचे प्रमाण किंवा पुरावा असतो.

बीट कॉईन च्या व्यवहारात बँक, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड इत्यादींची गरज नसते. बीट कॉईनचा व्यवहार ‘नेटवर्क बेस्ड ‘असतो. हल्ली ‘ऑन लाईन डेव्हलपर्स’ एन्टरप्रान्युअर, NGO म्हणजेच नॉन प्रॉफीट ऑर्गनायझेशन, बीट कॉईन चा उपयोग करतात. जागतिक पातळीवर पेमेंटसाठी याचा उपयोग होतो.

बीट कॉईनमधील व्यवहार करण्याचे फायदे

(१)डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्डाने व्यवहार केल्यास जे चार्जेस लागतात त्यापेक्षा खूप कमी चार्जेस लागतात

(२) कोणताही त्रास न होता जगाच्या कोठल्याही कानाकोपऱ्यात व्यवहार करता येतो.

(२) बँकेने दिलेले डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड बँक ब्लॉक करू शकते. तसा बीट कॉईनचा अकौंट ब्लॉक करता येत नाही.

(४) आपल्या बीट कॉईन व्यवहारावर सरकारी, निम सरकारी किंवा अन्य कोणत्याही ऑथोरिटी लक्ष ठेवू शकत नाही.

(५) दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी बीट कॉईन फायदेशीर आहे असे दिसते. सध्यातरी बीट कॉईन ची किंमत वाढतेच आहे. याचा सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे.

(७) भिजणे, चोरीमारी फाटणे असा धोका नाही.

बीट कॉईन मधल्या व्यवहाराचे तोटे

(१)बिट कॉईनच्या किमतीत फार वारंवार आणी फार मोठे चढ उतार होतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी असलेल्या इतर माध्यमांपेक्षा धोका जास्त आहे.

(२) जर तुमचा संगणक ‘HACK’ झाला तर HACKER सर्व बीट कॉईन घेवून जाईल. अशा वेळेला कुणी मदत करू शकत नाही. आतापर्यंत ९,८०,००० बीट कॉईनची चोरी एक्सचेज मधून झाली. त्याच्यापैकी फारच कमी प्रमाणात तपास लागून बीट कॉईन परत मिळवता आले.

‘UNOCOIN’, Z’EBPAY’ या साईटवर तुम्हाला बीट कॉईनचा भाव समजू शकतो. आपण सोने चांदी जशी खरेदी करतो तसेच रुपये देवून बीट कॉईन खरेदी करू शकतो.

‘UNO COIN’ च्या बाबतीत जर रेफरल कोड मागितला तर U 124697 द्यावा. तुम्हाला Rs 200ची बीट कॉईन मिळू शकतील

UNO COIN वर व्यवहार करण्याचे फायदे

(१) OTC ट्रेडिंग

(२) AUTO सेल बीट कॉईन

(३) दोन किंवा अधिक ऑथेनटीकेशन होत असल्यामुळे जास्त सुरक्षित.

(४) तुम्ही तुमचा बीट कॉईन ADDRESS तयार करू शकता

(५) तुम्ही ‘बिझिनेस युनोकॉईन’ बरोबर सहज जोडले जाता.

(६) बीट कॉईनच्या किमतीत खूप चढउतार होत असेल तर ताबडतोब विकू शकता किंवा ठेवू शकता.

(७) नो CHARGE BACK

(८) पेमेंट करण्यासाठी बीट कॉईन स्वीकारताना कोणताही चार्ज नाही. .

‘ZEBPAY’ च्या ANDROID अप्लिकेशन वर जाऊन बीट कॉईन खरेदी करता येते. यासाठी रेफरल कोड मागितल्यास REF 77839482 द्यावा. या साईटवर तुम्हाला Rs १०० ची बीट कॉईन मिळतील.

‘ZEBPAY’ ची वैशिष्टे

(१) कमीत कमी किमतीत सेवा पुरवतात

(२) APP वापरून मोबाईलवरूनही खरेदी करता येते.

(३) बीट कॉईनचा व्यवहार जलद गतीने होतो.

(४) अधिक सुरक्षित

(५) AMEZON, फ्लिपकार्ट, मेक माय ट्रीप याची व्हाउचर खरेदी करून १०% बचत करू शकता.

(६) बीट कॉईन वापरून मोबाईल आणी DTH मध्ये ‘टॉप अप’ करू शकता.

१ ‘सातोषी’ = ONE HUNDRED MILLIONTH ऑफ १ बीट कॉईन म्हणजेच ०.०००००००१ बीट कॉईन

पूर्वी सोने घरदार शेतीवाडी यामध्ये पैसे गुंतवण्याकडे कल होता आता काही लोक बीट कॉईनकडे वळले आहेत. साधारण १०० ते २०० वर्षापूर्वी लोक बँकेत पैसे ठेवायला घाबरायचे सध्या ऑन लाईन व्यवहार करायला कचरतात. आणखी १०० वर्षांनी बीट कोईन आणी CRYPTO करन्सीजमध्ये नियमितपणे व्यवहार होऊ लागतील. .RBI ने असे सर्क्युलर काढले आहे की त्यांनी कोणत्याही एजन्सीला बीट कॉईनमध्ये व्यवहार करण्यासाठी किंवा बिट कॉईन माईन करण्यासाठी लायसेन्स दिलेले नाही. तसेच या करन्सीला सरकारचे कोणतीही संरक्षण नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या मान्यतेखाली आणी नियंत्रणाखाली CRYPTO करंसी जारी करण्याचा विचार करत आहेत. तर बाकीच्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी या करन्सीविरुद्ध हायरिस्क करन्सी म्हणून धोक्याचा इशारा दिला आहे.

एकंदरीत काय ‘धरलं तर चावत सोडलं तर पळत’!! कालाय तस्मय नमः

आठवड्याचे-समालोचन – निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा – २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निरोप समारंभ २०१७ चा आणी स्वागत समारंभ २०१८ चा –  २५ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७

मार्केटमध्ये परिणाम होणारे दोन प्रकारचे factor असतात. (१) MACRO (२) MICRO. फिस्कल डेफिसिट वाढते  आहे. GST कलेक्शन कमी, झाले, ADVANCE TAX कलेक्शन कमी झाले आणी सरकारला आपला खर्च कमी करायचा नाही त्यामुळे सरकारला ही कमी पडणारी रक्कम कर्ज काढून उभारावी लागेल. फक्त त्यातल्या त्यात चांगली गोष्ट एकच! विकास योजना सुरु ठेवाव्यात त्यात कुठलीही कपात न करता पैसा कर्जाच्या रुपात उभा करावा असा सरकारचा विचार दिसतो आहे. BOND यील्ड वाढते आहे यामुळे बँकांचे उत्पन्न कमी होईल. त्यामुळे रेटिंग एजन्सी वर्षभर तरी देशाच्या रेटिंगमध्ये सुधारणा करणार नाहीत. क्रूडचे दर वाढू लागल्यामुळे पेट्रोल, डीझेलचे दर वाढतील महागाई वाढेल. फक्त लिक्विडीटी आहे, पैसा येतो आहे म्हणून मार्केट तेजीत आहे. साध्या टाचणीनेही हा तेजीचा फुगा फुटेल. RBI सुद्धा पुढील ५ ते ६ महिन्यात रेटकट करणार नाही. उलट RBI रेट वाढवण्याची शक्यता आहे बँकानी मुदत ठेवीवरील व्याज दर वाढवायला सुरुवात केली आहे

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI आणी अर्थमंत्रालयाने असे जाहीर केले की ते कोणतीही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक बंद करण्याच्या विचारात नाहीत ज्या बँका PCA खाली ठेवल्या आहेत त्यांच्या वर RBI चे अधिक लक्ष राहील.
 • सेबीने AXIS बँकेला त्यांची अंतर्गत प्रोसेस आणी सिस्टिम्स सुधारण्याचा सल्ला दिला. AXIS बँकेचे तिमाही निकाल बँकेने हे निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्याआधी WHATSAPP वर जाहीर झाले होते सेबीने याच संबंधात काही शेअर ब्रोकर्स आणी शेअरमार्केटच्या तज्ञांच्या ऑफिसवर छापे टाकले
 • सरकारने असे जाहीर केले की सरकार युनायटेड बँक,ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, IOB, कॉर्पोरेशन बँक या सर्वाजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये इंद्रधनुष योजनेखाली Rs १०,००० कोटी भांडवल पुरवेल.
 • प्रायव्हेट इक्विटी फर्म KKR ला RBI ने पहिली विदेशी मालकीची ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) सुरु करायला मंजुरी दिली.
 • सेबीने सर्व कमोडीटी एक्स्चेंज आणी BSE, NSE ही इक्विटी एक्स्चेंज १८ ऑक्टोबर २०१८ पासून इंटिग्रेटेड एक्स्चेंज म्हणून काम करतील असे सांगितले. म्हणजेच कमोडिटी मार्केट इक्विटी मध्ये आणी NSE,(कारण NSE चे लिस्टिंग २०१८ मध्ये होईल.) BSE ही इक्विटी एक्स्चेंज कमोडीटी मध्ये ट्रेड करू लागतील. याचा फायदा NSE ला होईल(कारण NSE चे लिस्टिंग २०१८ मध्ये होईल).
 • AION कॅपिटल आणी JSW स्टील यांच्या कन्सोर्शियमने मॉनेट इस्पात आणी एनर्जी या कंपनीसाठी रेझोल्युशन प्लान सादर केला. यात Rs २५०० कोटी कर्जफेड आणी Rs १००० कोटी इक्विटी असेल. कर्जदार ७५% हेअरकट घेतील.
 • SBI ने कॅस्टेकस या कंपनी विरुद्ध NCLT मध्ये INSOLVENCY प्रोसीडीग दाखल केले.
 • DGCA (डायरेकटोरेट जनरल ऑफ सिविल एव्हिएशन) ने एअर डेक्कन ला ३४ मार्गांवर उडान योजनेखाली फ्लायिंग परमीट दिले.

सरकारी अनौंसमेंट

 • उत्तरप्रदेशात राज्य सरकार स्टेट एक्साईज पोलीसी आणणार आहे. मद्यार्कावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. याचा परिणाम ग्लोबस स्पिरीट, पायोनिअर डीस्टिलरी, युनायटेड ब्रुअरीज, J M ब्रुअरीज, युनायटेड स्पिरीट या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने त्यांच्या सर्व बचत योजनांवरचा व्याजाचा दर ०.२०% ने कमी केला.
 • सरकारने Rs ५०००० कोटी जास्त कर्ज उभारण्याचे ठरवले आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • स्टार सिमेंट या कंपनीला सरकारकडून Rs १५.९ कोटी मिळाले.
 • कॉपरच्या किमती ३ वर्षाच्या उच्चतम स्तरावर होत्या. याचा परिणाम हिंदुस्थान कॉपरवर होईल.
 • लोकांची दिशाभूल करून इन्शुरन्स पॉलिसी विकल्या असा ठपका ICICI बँक आणी ICICI प्रू यांच्यावर ठेवला.
 • हेइंकेन ही कंपनी युनायटेड ब्रुअरीजमध्ये स्टेक खरेदी करण्याची शक्यता आहे.
 • EDEL WEISSला IRDA कडून जनरल इन्शुरन्सच्या बिझिनेससाठी परवानगी मिळाली.
 • डॉल्फिन ऑफशोअर ला ONGC कडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • EID PARRY त्यांचा बायोपेस्टीसाईड बिझिनेस कॉरोमोन्डेल फरटीलायझर या कंपनीला विकणार आहे.
 • TCS ला निएलसन कंपनीकडून Rs १४५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • GAIL या कंपनीला घेण्यासाठी IOC आणी BPCL उत्सुक आहेत.
 • ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट नाताळला रिलीज झाला. हा चित्रपट तुफान गर्दीत चालू आहे याचा फायदा PVR, आयनॉक्स,लीजर आणी इतर कंपन्यांना होईल.
 • IT क्षेत्रातील कंपन्यांचे दिवस फारसे चांगले सुरु नाहीत. टी सी एस मधील एका कर्मचाऱ्यांने मला भेदभावाची वागणूक मिळते आहे अशी तक्रार २०१५मध्ये केली. ही केस काढून घ्यावी म्हणून टी सी एसने अर्ज केला. पण ही केस काढून घेणे तर दूरच पण जे इतर अमेरीकन या कंपनीत काम करत होते त्यांचा समावेश या दाव्यात केला गेला. म्हणजेच क्लास एक्शन सूट दाखल करण्यात आली. या प्रकारची क्लास एक्शन सूट इन्फोसिस विरुद्ध दाखल केली गेली आहे.
 • ऑरोबिंदो फार्माला USFDA कडून झोपेच्या औषधासाठी मान्यता मिळाली
 • उसाच्या किमती वाढल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम होईल.
 • हवाई इंधन GST खाली आणण्यासाठी आणी इनपुट TAX बेनिफिट देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली. याचा फायदा जेटएअर वेज, स्पाईस जेट आणी इंटरग्लोब याना होईल.
 • RCOM या ADAG ग्रूप कंपनीने असे जाहीर केले की त्यांचे टेलिकॉम ASSETS (स्पेक्ट्रम, टॉवर्स, फायबर) विकून Rs २५००० कोटी उभारेल. सर्व कर्जदारांचे कर्ज मुदतीआधी फेडले जाईल. कंपनी मार्च २०१८ मध्ये SDR बाहेर येईल. कंपनीने चीन डेव्हलपमेंट बँकेबरोबर ऑऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली. या बँकेने त्यांचे Rs ११४६० कोटींचे कर्ज वसूल करण्यासाठी IBC खाली RCOM वर INSOLVENCY साठी अर्ज केला होता. RCOM त्यांचा वायरलेस बिझिनेस बंद करतील. फक्त ते त्यांचा एन्टरप्राईज बिझिनेस चालू ठेवतील. RCOMने हा प्लान जाहीर केल्यावर पुन्हा एकदा ADAG ग्रूपच्या शेअरमध्ये संजीवनी आली. पण पूर्वी एकदा अशीच योजना सादर केली होती पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही हे गुंतवणूकदार विसरलेले नाहीत.
 • JP इन्फ्रास्ट्रक्चरच्या २२०० VAT च्या ASSET खरेदीसाठी ब्रूकफिल्डने Rs ३५०० ची बोली पाठवली आहे.
 • कमर्शियल GAS सिलिंडरचे भाव वाढणार आहेत.
 • अमूल्य लीजिंगची (AP अपोलो TUBES) ९% हिस्सेदारी प्रमोटर्सनी प्रती शेअर Rs ५६० या भावाने विकली. हे शेअर्स चांगल्या म्युचुअल फण्डानी खरेदी केले.
 • अस्टॉन पेपरचे शुक्रवारी Rs ११४ /- लिस्टिंग झाले. एशियन GRANITO कडे याचा मोठा स्टेक आहे.शेअरची किंमत Rs १२०.७५ पर्यंत वाढली. हा शेअर IPO मध्ये Rs ५० ला दिला होता.

कॉर्पोरेट एक्शन

पिडीलाईट या कंपनीने Rs १००० प्रती शेअर या भावाने  ‘BUY BACK’ जाहीर केला पण या ‘BUY BACK’ चा ACCEPTANCE  रेशियोही फारच कमी आहे. त्यामुळे ही ‘BUY BACK’ ऑफर शेअरहोल्डर्सना किंवा गुंतवणूकदारांना पसंद पडली नाही. कंपनी ‘BUY BACK’ वर Rs ५०० कोटी खर्च करणार आहे.(BUY BACK आणी शेअर्सच्या लिस्टिंग बद्दल माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.)

मार्केटने काय शिकवले

मंगळवारी तारीख २६ डिसेंबर २०१७ रोजी किर्लोस्कर ऑईल आणी किर्लोस्कर ग्रूपच्या इतर कंपन्याच्या शेअर्सची किमत वाढत होती. याचे कारण शोधता असे आढळले की CUMMINS ही कंपनी किर्लोस्कर घेते आहे अशी बातमी आहे. दुपारी CUMMINSने या बातमीचे खंडन केले. अशावेळी ज्यांनी कोणी या बातमीच्या आधारावर ट्रेड केला असेल त्यांनी तो ताबडतोब क्लोज करणे जरुरीचे असते.

इंडोटेक या कंपनीच्या CEO पदी आल्फ्रेड या  M /A(मर्जर आणी अक्विझिशन) आणी टर्न अराउंड तज्ञाची नेमणूक झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरवर परिणाम झाला. कधी कधी लीडर बदलल्यामुळे एखादी कंपनी आपल्या प्रगतीचा वेग वाढवू शकते.

शुक्रवारी संयमाची परीक्षा होती. STRESSED कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी होत होती. चांगले शेअर्स बाजूला सरकले होते किंबहुना चांगले शेअर्स पडत होते. अशावेळी जर STRESSED  कंपनीचे शेअर्स पदरात आले तर हा भाव पुन्हा दिसतो की नाही हे त्या विधात्याला माहिती त्यामुळे सतर्क राहणे योग्य! मार्जिन फंडिंगमुले ३०% ते ३५% ची हालचाल या शेअर्समध्ये दिसत होती.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच क्रूड वाढत होते. भारताची अर्थव्यवस्था क्रूडवर अवलंबून हे सर्वांना माहित आहे. क्रूड वाढले की अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो  आयात बिल वाढते. GST कलेक्शन कमी झाले आहे. पण लिक्विडीटी आहे पैसा येतो आहे त्यामुळे मार्केटमध्ये तेजी आहे. पण स्टॉपलॉसवर ध्यान ठेवून ट्रेडिंग करावे.ह्या आठवड्यात धोक्याची घंटी वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २०१८ चे पहिले सहा महिने यथातथा तर पुढील सहा महिने चांगले जातील असा अंदाज आहे. ८ राज्यातल्या निवडणुका आणी जानेवारीत लागणारे तिसर्या तिमाहीचे निकाल, ADVANCE  TAX चे आकडे आणी १ फेब्रुवारी सादर होणारे  अंदाजपत्रक  याकडे लक्ष ठेवावे. या ब्लॉगच्या सर्व वाचकांना नवीन वर्ष समृद्धीचे,यशाचे,समाधानाचे आणी आरोग्यपूर्ण जावो ही हार्दिक शुभेच्छा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०५७ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०५३१ वर आणी बँक निफ्टी २५५३९ वर बंद झाले.

 

आठवड्याचे समालोचन – भावनेचा खेळ पण बसत नाही मेळ – १८ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भावनेचा खेळ पण बसत नाही मेळ – १८ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७

गुजराथ आणी हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. BJPने गुजराथ राखले तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता काबीज केली. जरी BJPला गुजराथमध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असले तरी आज BJPचे गुजराथमध्ये २२ वर्षे राज्य आहे याचा विचार करता ANTI- INCUMBANCY वर BRAND मोदीचा विजय झाला असे तज्ञांचे मत आहे. गुजराथमध्ये ग्रामीण भागात BJP ला कमी जागा मिळाल्या आणी आता राजस्थान आणी मध्यप्रदेशमध्ये येणार्या वर्षात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अंदाज पत्रकात शेती आणी ग्रामीण उद्योग यावर भर असण्याची शक्यता आहे. BJP च्या या विजयामुळे सरकार करीत असलेल्या सर्व सुधारणांमध्ये स्थैर्य आणी सातत्य तसेच आणखी लोकाभिमुखता येईल असे वाटते.त्यामुळे लोकाना आवडेल असे अंदाजपत्रक बनेल का अशी भीती कमी झाली आणी मार्केट कमाल स्तरावर पोहोचले. पण तेथे टिकाव धरू शकले नाही. USA मध्ये TAX रीफॉर्म बिल पास झाले. त्यामुळे ज्या अमेरिकन कंपन्या भारतात कारभार करतात त्यांना भारतात व्यवसाय करणे फायदेशीर ठरणार नाही. किंवा भारतातही TAX कमी करावे लागतील. सतत वाढणारे क्रूडचे भाव हा मात्र चिंतेचा विषय ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA मध्ये H1B व्हिसा होल्डर्स च्या जोडीदाराला आता USA मध्ये नोकरी करता येणार नाही. USA मध्ये TAX रीफॉर्मवरील मतदानाच्या प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे या TAX रीफॉर्मवर पुन्हा मतदान घेतले गेले.तेव्हा हे TAX रीफॉर्म मंजूर झाले. कॉर्पोरेट TAX ३५% वरून २१ % वर आणला.

सरकारी अनौंसमेंट

 • सरकारने इलेक्ट्रिक आणी इलेक्ट्रोनिक उत्पादनांवर लागणाऱ्या इम्पोर्ट ड्युटी मध्ये ५% ते १०% वाढ केली. ही वाढ मेक-इन-इंडिया या कार्यक्रमाला उतेजन देण्यासाठी केली. यात मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, VCR/DVD प्लेयर्स, टीव्ही/VIDEO /डिजिटल कॅमेरा, LED दिवे, इलेक्ट्रिसिटी मीटर्स, सेट टॉप बॉक्स, पेट्रोलियम कोक, आणी LED/ LCD/ OLED टी व्ही PANEL आणी दिवे आणी लाईट फिटिंग यांचा समावेश आहे.
 • सरकार बँकांना Rs २००० पर्यंतच्या डेबिट कार्डच्या मदतीने केलेल्या व्यवहारावरील MDR (मर्चंट डीस्कौंट रेट) बँकांना REIMBURSE  करेल. यात भीम, UPI आणी AePS चा समावेश आहे.

 

 • सरकार फेब्रुवारी २०१८ मध्ये बँकांच्या रीकॅपिटलायझेशनचा पहिला हप्ता म्हणून Rs ७०००० कोटी रीकॅपिटलायझेशन BONDS इशू करेल. सरकारने बँकांना ते करणार असलेल्या सुधारणांचा आराखडा सादर करायला सांगितला आहे. काही बँकांना कॅपिटल मार्केट मधून पैसा उभा करायला सांगितला आहे.
 • सिगारेटच्या पाकिटावरील ८५% भाग हा ध्रुमपानाविरुद्ध इशाऱ्यासाठी असावा असा नियम होता तो भाग आता ४०% केला याचा परिणाम GODFREY फिलीप आणी ITC यांच्यावर होईल.
 • पेट कोकवरील इम्पोर्ट ड्युटी २.५% वरून १०% केली.
 • सरकारी उद्योगातील शिलकी पैसा आता त्यांच्या SBI मधील खात्यात जमा असतो. पण महापात्रा या IAS ऑफिसरच्या सुचनेवरून ही शिलकी रक्कम आता एक नवीन कंपनी उघडून तिच्याकडे किंवा PFC किंवा REC कडे जमा ठेवण्याचा सरकार विचार करीत आहे. या रकमेचा विनिमय सरकार उर्जा निर्माण करण्यासाठी करेल.
 • साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे सरकारने साखरेवर ३१ डिसेंबरपर्यंत बसवलेली स्टॉक लिमिट मुदतीपूर्वी रद्द केली. याचा चांगला परिणाम साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.
 • ७००० रेल्वे स्टेशनवर LED लाईट्स लावले जातील. याचा परिणाम HAVELLS एव्हरेडी, सूर्या रोशनी यांच्यावर होईल.
 • कोल इंडिया आता Rs ५० प्रती टन वाहतूक चार्ज लावेल यामुळे त्यांच्या उत्पन्नात Rs २५०० कोटींची वाढ होईल.
 • सोमानी सिरामिक्समध्ये  NRI च्या गुंतवणुकीवरील बंदी उठवली.
 • टाटा स्टील त्यांच्या कलिंगनगर प्लांटच्या विस्तारासाठी Rs २३५०० कोटी खर्च करील टाटा स्टील राईट्स इशू आणेल.
 • सरकारने आतापर्यंत इंद्रधनुष योजनेखाली सरकारी बँकांना Rs ५१८५८ कोटी भांडवल पुरवले. २०१७ मध्ये सरकारने ७५% भांडवल पुरवले आहे. या पुढे सरकार सरकारी बँकांची आर्थिक स्थिती आणी त्यांचा PERFORMANCE बघूनच भांडवल पुरवेल.
 • सरकारने टेक्स्टाईल सेक्टरसाठी Rs १३०० कोटींचे PACKAGE मंजूर केले. याचा परिणाम सेंच्युरी, अरविंद, सुमीत, डोनिअर, बन्सवारा, गार्डन, दिग्जाम, AB FASHION, VIP क्लोदिंग यांच्यावर होईल.
 • सरकार Rs १२०० कोटी खर्च करून बायो टॉयलेट बनवणार आहे. याचा परिणाम स्टोन इंडियावर होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • गंगेच्या किनार्यावर प्लास्टिक पिशव्या टाकल्यास Rs ५००० दंड लागेल; असे NGT ने (NATIONAL GREEN TRIBUNAL) जाहीर केले.
 • CCI (COMPETITION COMMISSION ऑफ INDIA)ने इंडस इंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्ल्युजन यांच्या मर्जरला मंजुरी दिली.
 • रुची सोया या कंपनीची IBC खाली INSOLVENCY प्रक्रिया सुरु झाली.
 • 2G घोटाळ्याच्या बाबतीत कोर्टाने सर्व आरोपींना पुरेशा पुराव्याच्या अभावी निर्दोष म्हणून सोडून दिले. तसेच ज्या कंपन्यांच्या मालमत्ता या केससाठी जप्त केल्या होत्या त्याही मालकांना परत करायला सांगितल्या. याचा परिणाम युनिटेक, RCOM, सन टीव्ही नेट वर्क, आयडीया, DB रिअल्टी या कंपन्यांवर होईल.
 • RBI ने बँक ऑफ इंडिया आणी युनायटेड बँक या दोन सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाना PCA च्या तरतुदी लागू केल्या PCA खाली आतापर्यंत १० सरकारी बँकांना आणण्यात आले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

नोव्हबर २०१७ मध्ये भारताची निर्यात ३०.६ % ने वाढून US $ २६.२ बिलियन झाली तर आयात १९.६ % ने वाढून US $ ४० बिलियन झाली. त्यामुळे ट्रेड GAP US $ १३.८ बिलियन झाली. इंजिनीरिंग गुड्स आणी जेम्स आणी ज्युवेलरी यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • जेपी ग्रूपने आपली ५ हॉटेल्स Rs २५०० कोटींना विकायला काढली आहेत सुप्रीम कोर्टाने जेपी इन्फ्राटेक या कंपनीला Rs १२५ कोटी कोर्टात जमा करण्यासाठी २५ जानेवारी २०१८पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
 • GMR इन्फ्रास्ट्रक्चरच्या JV ला फिलिपिनमधील क्लार्क विमानतळ बनविण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे
 • भारती एअरटेल पेमेंट बँकेमध्ये ४.७ मिलियन खातेधारकांच्या खात्यात Rs १६७ कोटी कुकिंग GAS वरील सबसिडी जमा झाली. खातेधारकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा अकौंट ‘ACTIVATE’ केला गेला आणी ही सबसिडी त्यात जमा केली गेली. आता कोणतेही खाते खातेधारकाच्या पूर्वपरवानगीशिवाय ‘ACTIVATE’ करता येणार नाही असा नियम सरकार करणार आहे. कंपनीने ग्राहकांच्या ते सांगतील त्या खात्यावर सबसिडी जमा करण्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रकारात भारती एअरटेलवर Rs २ कोटीपर्यंत दंड लावला जाण्याची शक्यता आहे.
 • पुढील सुचना मिळेपर्यंत एअरटेल पेमेंट बँकेला E- KYC सेवा स्थगीत ठेवायला सांगितल्या आहेत तसेच पेमेंट बँकेसाठी असलेले लायसन्स रद्द केले.
 • JSW होल्डिंगची FPI मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • निवडून आलो तर प्रत्येक घरात कुकिंग GAS उपलब्ध करून देऊ अशी BJP ने त्यांच्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती. याचा परिणाम गुजरात GAS, अडानी GAS यांच्यावर होईल.
 • टॉरंट फार्माच्या दाहेज युनिटला जर्मन रेग्युलेटरने मान्यता दिली आणी या युनिटमधून निर्यात करण्यास परवानगी दिली.
 • स्ट्राईडस शसून ‘ट्रिनीटी फार्मा’ या साउथ आफ्रिकास्थित कंपनीमधील मोठा स्टेक Rs २८ कोटींना खरेदी करणार आहे
 • LUMAX AUTO या कंपनीच्या ६ शहरातील १२ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे घातले.

कॉर्पोरेट एक्शन

 • शालीमार पेंट्स Rs १४० प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार आहे.
 • क्लारीस लाईफला डीलिस्टिंगसाठी मंजुरी मिळाली.
 • E-क्लर्क सर्विसेस ह्या कंपनीने प्रती शेअर Rs २००० या भावाने ‘BUY BACK’ करणार असे  २२ डिसेंबरला झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठकीत ठरले.
 • गांधी स्पेशल ट्युब्स या कंपनीने Rs ५०० प्रती शेअर या भावाने BUY BACK’ करायचे ठरवले आहे.
 • LT फूड्स चा QIP Rs ७९ प्रती शेअर या भावाने उघडला.
 • रेलीगेरेचा सिक्युरिटीज बिझिनेस EDELWEISS खरेदी करणार आहे.
 • JP पॉवरच्या सबसिडीमधील स्टेक विकण्यासाठी SBI ने बोली मागवल्या. SBI ने JP इन्फ्रास्ट्रक्चरने गहाण ठेवलेले १० कोटी शेअर्स जप्त केले.
 • पीडीलाईटने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • आरती इंडस्ट्रीज Rs १२०० प्रती शेअर या भावाने शेअर ‘BUY BACK’ करणार आहे.
 • VIP क्लोदिंग Rs २६ प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार आहे. (राईट्स इशूबद्दलची सर्व माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे)
 • सणासुदीच्या काळात करमणुकीशी सलग्न असलेल्या शेअर्स वर परिणाम होतो. ENIL, PVR, सिनेलाईन, मुक्ता आर्ट्स, वांडरेला हॉलिडेज, इत्यादी.
 • अडानी ट्रान्स्मिशन यांनी रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चरचा मुंबईमधील पॉवर जनरेशन आणी डीस्ट्रीब्युशन बिझिनेस Rs १३२५१ कोटींना खरेदी कार्यसाठी करार केला. या पैशाचा उपयोग रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर कर्ज फेडण्यासाठी करील
 • डालमिया भारत ही कंपनी मुरली इंडस्ट्रीज ही बँकरपट कंपनी Rs ४०० कोटींना विकत घेईल.
 • सरकारने नवीन कन्झ्युमर प्रोटेक्शन बिल २०१७ हे बिल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले.

 या आठवड्यातील लिस्टिंग

फ्युचर चेन सप्लाय या कंपनीचे NSE वर Rs ६६४ वर तर BSE वर Rs ६७४ वर लिस्टिंग झाले.

मार्केटने काय शिकवले

सिनेमा, नाटक, व्याख्यानाचा कार्यक्रम संपल्याबरोबर, दरवाजा उघडल्याबरोबर बाहेर पडण्याची घाई करू नये त्यामुळे चेंगराचेंगरी होते. थोडा वेळ थांबून बाहेर पडावे. हीच गोष्ट, हीच घाई ट्रेडर्सनी सोमवारी केली. जसजसे गुजराथमधील मतदानाचे कल कॉंग्रेसच्या बाजूने येऊ लागले असे पाहिल्याबरोबर सेन्सेक्स ८०० पाईंट पडले तर निफ्टी १००७५ पर्यंत पडला. जणू काही सर्व संपुष्टात आले असे समजून मंदी केली. परंतु जसजसे पुढील कल BJP च्या बाजूनेही येऊ लागले तसे मार्केट सुधारले, सुधारतच गेले. म्हणजे अपघात झालां या बातमीची पूर्ण माहिती न घेताच केवळ कल्पनेने एखाद्यास हृदयविकाराचा झटका येतो आणी अपघातात सापडलेल्या व्यक्तीस मात्र थोडे खरचटण्याशिवाय काही झालेले नसते. त्यामुळे रोजच्या आयुष्यात काय किंवा मार्केटमध्ये काय आपले डोके संकटाच्या काळात शांत ठेवणे नितांत गरजेचे आहे. भावनेच्या खेळामुळे अतोनात नुकसान होते आणी हे नुकसान का झाले याचे उत्तर मिळत नाही.यावेळी म्हणजेच सोमवारी तारीख १८ डिसेंबर रोजी  ‘HIGH WAVE CANDLE PATTERN’ डेली चार्टवर तयार झाला. हाय वेव्ह याचा अर्थ गोंधळ, अनिश्चितता, असामजस्य,  संशय असा होतो.  निफ्टीमध्ये १००७५ वर ट्रिपल बॉटम तयार झाला.

ओपनिंग प्राईस हीच दिवसाची हाय प्राईस आणी दिवसाच्या लो किंमतीला मार्केट बंद होते. मंदी करणार्यांचा वरचष्मा राहतो यालाच ‘बेअरीश बेल्टहोल्ड PATTERN’ असे म्हणतात. शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी हा धोक्याचा इशारा असतो.

गुजराथमधील निकालात उद्योग आणी व्यापार क्षेत्रातील नाराजी डोकावते. त्याची दखल सरकार उद्योग आणी  व्यापार क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी दूर करून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल. हे शेअरमार्केटच्या दृष्टीने चांगले आहे.

मंगळवार तारीख १९ डिसेंबर २०१७ सर्व ऑटो शेअर्स खूप वाढत होते. मार्केट नेहेमी सुतावरून स्वर्ग गाठते. गुजराथ विधानसभा निवडणुकीत BJPला ग्रामीण भागात कमी मते मिळाली. शेतकरी वर्ग नाराज आहे असे जाणवले. त्याचे उत्पन्न वाढवण्याकडे सरकार अंदाजपत्रकात लक्ष देईल. त्याचे उत्पन्न वाढले तर ते कशावर खर्च होईल? तर दुचाकी चारचाकी ऑटो खरेदी करण्यात. यामुळे ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली. आता पुढच्या तर्काप्रमाणे ऑटो कंपन्या वाढल्या की त्याना पार्टस पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये खरेदी होईल.

लॉंग वीक एंड आहे. नाताळमुळे फंड MANAGER सुट्टीवर असतात त्यामुळे पुढील आठवड्यात VOLUME कमी असतील. शुक्रवारी VIX १२.०८ आहे. हा १२ च्या खाली गेल्यास प्रॉफीट बुकिंग करा पुट कॉल रेशियो १.४९ होता.

मार्केट तेजीचे आहे नवनवीन उच्चांक गाठत आहे. घोडे आणी गाढव एकत्र धावत असतात तेव्हा घोडे कोणते आणी गाढव कोणते हे ओळखता आले पाहिजे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३९४० तर NSE निर्देशांक निफ्टी १०४९३ आणी बँक निफ्टी २५६४८ वर बंद झाले.

‘मार्केट आणी मी’ च्या सर्व हितचिंतकांना हा ख्रिसमस सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जावो हे शुभेच्छा आणी Santa पोतडीतून आपल्यावर असंख्य सुखांचा वर्षाव करो.

 

आठवड्याचे समालोचन – मार्केटमध्ये तेजी – दांडीयावाली कां सांताक्लाजवाली – ११ डिसेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केटमध्ये तेजी – दांडीयावाली कां सांताक्लाजवाली – ११ डिसेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७

शुक्रवारी मार्केटचा मूड एकदम बदलला. मार्केटमध्ये तेजी आली. करन्सी मार्केटची सुरुवात दमदार झाली. रुपयाचा US$ बरोबरचा विनिमय दर ०.१९ नी सुधारला. गुरुवारी आलेल्या एक्झिट पोलचा हा परिणाम असावा असे दिसते. या पोलप्रमाणे गुजरात BJP स्वतःकडे राखील तर हिमाचल प्रदेशमध्ये BJP ला बहुमत मिळेल. कोणतीही नवी गोष्ट करायला घेतली की काही चुका होतातच, काही नुकसान होते, काही लोकांना विनाकारण त्रास होतो पण उद्देश चांगला असेल तर जनता हा त्रास सहन करायला तयार असते. GST आणी डीमॉनेटायझेशन याचा त्रास गुजरातमधील लोकांना खूप झाला. परंतु GST मध्ये ज्या अडचणी आल्या त्या सोडविण्याची तयारी सरकारने दाखवली एवढेच नव्हे तर त्यापैकी काही अडचणी दूरही केल्या. याचा सकारात्मक परिणाम मतदानावर झाला असे एक्झिट पोलने दाखवले आणी मार्केटने तेजीची सलामी दिली. मतदार राजाही सुज्ञ झाला आहे आणी मार्केटही सुज्ञ झाले आहे हे जाणवते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • मंगळवार १२ डिसेंबर २०१७ पासून अचानक क्रूडचे दर वाढू लागले. त्यामुळे एक्सप्लोरेशन कंपन्यांवर परिणाम होईल. ONGC ऑईल इंडिया, रिलायंस. सरकारने ज्यांच्याजवळ ऑईल ब्लॉक्स आहेत त्यांनी शेल GAS शोधावा असे सुचवले आहे. क्रूड आणी डीझेलची मागणी वाढत आहे.
 • एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताच्या या फिस्कल वर्षीचा ग्रोथरेट ६.७% एवढा केला तर २०१९ या फिस्कल वर्षासाठी ७.३ % केला.
 • US फेडरल रिझर्वने १३ डिसेम्बर २०१७ पासून आपले रेट ०.२५% ने वाढवले. तसेच आपण २०१८ आणी २०१९ मध्ये प्रत्येकी तीन वेळा रेट वाढवू असे जाहीर केले.
 • बँक ऑफ इंग्लंड ने आपल्या प्रमुख व्याज दरात (०.५० %) कोणताही बदल केला नाही

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने पुन्हा १८०० शेल कंपन्यांची यादी तपासणी करण्यासाठी एजन्सीजकडे सोपवली.
 • सरकारने सर्व बँक खाती आणी इतर गुंतवणूक आधार बरोबर लिंक करण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली. मात्र आपला मोबाईल नंबर आधार बरोबर लिंक करण्याची तारीख कायम ठेवली. यावर गुरुवारी तारीख १४ डिसेंबर २०१७ला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले.
 • सरकारने सिमेंट कंपन्याना पेट कोक वापरण्यासाठी बंदी घातली होती. ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली. पेट कोकचा वापर करण्याऐवजी कोळशाचा उपयोग केला तर पॉवरखर्चात २५% वाढ झाली असती. यामुळे सिमेंट सेक्टर तेजीत होता. उदा प्रिझम, JK लक्ष्मी, अल्ट्राटेक, ग्रासीम, ककातीया, आंध्र, अंबुजा,श्री सिमेंट ACC, हैडलबर्ग.
 • LNG ला कमर्शियल फ्युएल चा दर्जा मिळेल असे वाटते. दुचाकी वाहने LNG वर चालवावीत असा विचार चालू आहे.
 • सरकारने चर्मउद्योगाला Rs २६०० कोटींचे PACKAGE मंजूर केले. याचा परिणाम त्या सेक्टर च्या शेअर्स वर होईल – खादीम’S, बाटा, लिबर्टी, मिर्झा
 • १५% मेथेनॉल ब्लेंडीगला परवानगी देण्यासाठी या अंदाजपत्रकांत नोटिफिकेशन आणण्याची शक्यता आहे. RCFचा मेथेनॉल बनवण्याचा कारखाना बंद पडला आहे. दीपक फरटीलायझर मेथेनोल बनवते.
 • मोबाईल फोनवर कस्टम ड्युटी ५% ने वाढवली. BPL आणी डिक्सन टेक्नोलॉजीला तसेच रेडिंगटनवर परिणाम होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने ज्या सरकारी कंपन्यात ५% पब्लिक शेअरहोल्डिंग आहे त्या कंपन्यात सरकारला डायव्हेस्टमेंट सूरु करायला सांगितले.
 • कॉर्पोरेट गव्हरनन्ससाठी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींवर विचार चालू आहे.
 • ‘WHATAPP’ वर काही कंपन्यांचे तिमाही निकाल उपलब्ध कसे झाले याबाबत कंपनी बरोबर चौकशी चालू आहे.
 • IPO साठी दिलेली समय सीमा कमी करण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
 • युनिटेकचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तहकूब करून त्याजागी सरकारने नेमलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमण्यासाठी दिलेल्या NCLT च्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
 • CCI(COMPETITION COMMISSION ऑफ INDIA) या सरकारी संस्थेने ABBOTT LAB, नोवार्तीस, EMCURE फार्मा आणी USV या फार्मा कंपन्यांना मधुमेहाच्या औषधांच्या प्राईसफिक्सिंगसाठी नोटीस दिली.
 • RBI ने कॉर्पोरेशन बँकेला PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) च्या तरतुदी लागू केल्या. कॉर्पोरेशन बँक ही PCA खाली येणारी ८ वी बँक आहे.
 • सुप्रीम कोर्टाने कर्नाटक राज्यात आयर्न ओअर काढण्याची सीमा 3० मेट्रिक टन वरून ३५ मेट्रीक टन केली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • नोव्हेंबर २०१७ मध्ये CPI ४.८८% (ऑक्टोबरमध्ये ३.५८%) वाढले. ही १५ महिन्यातील कमाल वाढ आहे.
 • IIP ऑक्टोबर मध्ये २.२% ने (सप्टेंबरमध्ये ४.१%) वाढली. यात कॅपिटल गुड्स, FMCG उत्पादनात आणी INFRASTRUCTURE क्षेत्रात वाढ झाली.
 • WPI (घाऊक महागाई निर्देशांक) नोव्हेंबर २०१७ मध्ये ३.९३% होता. हा गेल्या ८ महिन्यातील कमाल स्तरावर आहे. अन्नधान्य भाजीपाला यांच्या किंमती वाढल्या.
 • सोमवार १८ डिसेंबर पासून सिप्ला आणी ल्युपिन हे सेन्सेक्स मधून बाहेर पडतील तर इंडस इंड बँक येस बँक सेन्सेक्स मध्ये सामील होतील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • DR रेड्डी’जच्या आंध्र प्रदेशामधील बाचुपल्ली युनिटची तपासणी एप्रिलमध्ये झाली होती USFDA कडून या युनिटला EIR मिळाला.
 • एशियन पेंट्सने मोड्युलर किचन बनवणाऱ्या ‘SLICK’ या कंपनीमध्ये स्टेक घेतला. या कंपनीचे हे डायव्हरसिफिकेशन आहे.
 • स्टेट बँक ऑफ इडियाने आपले Rs १३२६ कोटींचे ११ NPA विकण्यासाठी बोली मागवली.
 • २०१८ या वर्षात सुट्या अशा तर्हेने आल्या आहेत की ‘लॉंग वीक एंड’ भरपूर आले आहेत हे हॉटेल इंडस्ट्री पर्यटन उद्योग यांच्यावर चांगला परिणाम करतील. रुपया जर असाच वधारत राहला तर परदेश वारीची सुसंधी.
 • टाटा केमिकल्स फॉस्फेटिक फरटीलायझर बिझिनेस विकण्यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी घेईल.
 • भारती एअरटेलने लडाखमध्ये 4G सर्विस सुरु केली.
 • IDBI ने NEGIL मधील ३०% स्टेक म्हणजे १.२ कोटी शेअर्स विकेल.
 • भेल इंडोनेशियात ५४ MV चा पॉवर प्लांट लावणार.
 • पुंज लॉइड या कंपनीला GAIL आणी NHAI कडून Rs १४५० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
 • GODFREY फिलिप्स या कंपनीने आपल्या मार्लबरो, रेड & व्हाईट, कॅवेंडर या सिगारेट BRAND ची किंमत ७% ट८% ने वाढवली.
 • ल्युपिनच्या (बर्थ कंट्रोलच्या औषधाला) ‘SALYRAL’ला USFDA ने मंजुरी दिली.
 • आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात माल पुरवण्यासाठी पराग मिल्कप्रोडक्टने ताजग्रूप बरोबर करार केला
 • थायरोकेअर, युकल फ्युएल, अटलांटा याचे तिमाही निकाल चांगले आले.
 • इन्फोसिसने सेबीकडे पनाया आणी CFO ला दिलेल्या SEVARANCE PACKAGE बाबत प्रकरण मिटवण्यासाठी अर्ज केला होता. पण NSE आणी इफोसीस यात फरक करू नये. तसेच मागील दरवाजाने कोणतेही सेटलमेंट करणे योग्य नाही असे कळवले आहे.
 • भेलला तामिळनाडू राज्य सरकारकडून १३२० MW प्रोजेक्टकरता Rs ७३०० कोटींची ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • टाटा कम्युनिकेशन या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने ७७३ एकर अतिरिक्त जमीन हेमिस्फींअर प्रॉपर्टीज इंडिया या कंपनीला ट्रान्स्फर करण्यास मंजुरी दिली. ही कंपनी टाटा कम्युनिकेशनच्या शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणात आपले शेअर्स देईल. या जमीनीची किंमत Rs १०००० ते Rs १५००० कोटी दरम्यान असेल. ही जमीन विकल्यावर जो पैसा येईल त्या पैशातून टाटा कम्युनिकेशन आपल्याला स्पेशल लाभांश देईल अशी शेअरहोल्डर्सची अपेक्षा आहे. या सर्व व्यवहारासाठी सेबी, NCLT ची मंजुरी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास ५ ते ६ महिने लागतील.
 • शालीमार पेंट्स राईट्स इशू आणणार आहे.

या आठवड्यातील IPO OFS QIP

 • इंटरग्लोब एव्हिएशन Rs ११३० प्रती शेअर्स या भावाने OFS आणत आहे.
 • युनियन बँक प्रती शेअर Rs १५४.६५, नात्को फार्मा प्रती शेअर Rs ९३७.६३, PNB प्रती शेअर Rs १७६.३५, NCL इंडस्ट्रीज Rs २३७.५० प्रती शेअर या भावाने QIP आणत आहेत.
 • सिंडीकेट बँकेने प्रती शेअर Rs ८४.१५ प्रती शेअर या भावाने QIP द्वारा Rs ११५१ कोटी उभारले.
 • या आठवड्यात ASTRON पेपर या कंपनीचा IPO १५ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान ओपन राहील. प्राईस BAND Rs ४५ ते Rs ५० आहे मिनिमम लॉट २८० शेअर्सचा आहे. कंपनी या IPO द्वारा Rs ७० कोटी भांडवल उभारेल. ही कंपनी PACKING इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणारा क्राफ्ट पेपर बनवते. कंपनीने गेल्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे. IPO प्रोसीड्सचा उपयोग अंशतः उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणी कर्जफेडीसाठी केला जाईल
 • IRDAने NATIONAL इन्शुरन्स कंपनीच्या IPO ला मंजुरी दिली.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • SHALBY हॉस्पिटलचे लिस्टिंग Rs २३९ आणी Rs २३७ ला अनुक्रमे NSE आणी BSE वर झाले.
 • फ्युचर चेन सप्लाय या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग सोमवार १८ डिसेंबर २०१७ रोजी होईल.

मार्केटने काय शिकवले

मार्केट जेव्हा अशा स्तरावर पोहोचते की ट्रेडर्सना आपल्याला होणार्या नुकसानीच्या भीतीपेक्षा होणाऱ्या फायद्याची शक्यता जास्त वाटते तेथे ट्रेडर्स खरेदी करायला सुरुवात करतात. येथे मार्केट्चा किमानस्तर म्हणजे बॉटम तयार होतो.

कोणता शेअर वाढणार किंवा कोणता शेअर पडणार हे समजले नाही तरी चालेल पण या तेजीत आपण आपले जे शेअर्स फायद्यात असतील ते विकून फायदा घरी आणावा. कोणता शेअर वाढणार किंवा कोणता शेअर पडणार हे समजत नसेल पण वातावरण तेजीचे आहे किंवा मंदीचे आहे हे जाणवत असेल तर त्यानुसार निफ्टीमध्ये खरेदी विक्री करावी.

सोमवारी संध्याकाळपर्यंत गुजराथ विधानसभेचे निकाल येऊन गुजरात विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल. BJP ला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मार्केट निराश होईल आणी जर १२० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मार्केट खूष होईल आणी तेजीची घोडदौड सुरु राहील. पण आयकराची मर्यादा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बँकांचे रीकॅपिटलायझेशन, या गोष्टी प्रमुख असतील. बघु या १८ तारीख काय दृश्य दाखवते!

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३४६३ NSE निर्देशांक निफ्टी १०३३३ तर बँक निफ्टी २५४४० वर बंद झाले