आजचं मार्केट – ४ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ जून २०१८

आज मार्केट दिवसभर मंदीत होते. याचे भागीदार म्हणजे सेबी आणि HDFC बँक.

सेबीने ASM कॅटेगरीमध्ये काही शेअर्सना ADDITIONAL SURVEILLANCE CATEGORY करून त्यांच्यासाठी ADDITIONAL SURVEILLANCE मेजर्स जाहीर केली. ही कॅटेगरी PRICE VARIATION आणि VOLATILITY यावर आधारित आहे. या प्रकारात सध्या BSE ने २० तर NSE ने १६ शेअर्सची नावे टाकली आहेत. गोवा कार्बन ग्राफाइट इंडिया, HEG, वेंकी’ज या कंपनीच्या शेअर्सची लोकांनी विक्री केली .

HDFC बँकेच्या FPI कॅटेगरी मध्ये मंजूर असलेले पर्सेंटेज वाढल्यामुळे सेबी च्या नियमानुसार हे पर्सेंटेज मंजूर पर्सेंटेजच्या आत आणण्यासाठी FPI ला ५ दिवसाच्या आत खरेदी केलेले शेअर्स विकण्याची परवानगी होती. FPI ने FPI मर्यादेपेक्षा जास्त खरेदी केलेले शेअर्स विकल्यामुळे HDFC चा शेअर पडला

DR रेड्डीजच्या श्रीकाकुलम प्लाण्टला USFDA ने क्लीन चिट दिली. त्यामुळे शेअर वाढला.  बँक ऑफ बरोडामध्ये तोट्यात चालणार्या लहान आणि मध्यम आकाराच्या चार सरकारी बँकांचे मर्जर होणार असल्याच्या बातमीमुळे बँक ऑफ बरोडाचा शेअर कोसळला. टाटा मोटर्सची ‘JLR’ ची विक्री ७% ने वाढली. त्यामुळे शेअर वाढला.  ‘एलिका’ मध्ये WHIRLPOOL ४९% स्टेक खरेदी करणार आहे.

UP मधील साखर उत्पादकांनी आपल्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधून सरकारला इशारा दिला की पुढील क्रशिंग हंगाम पुष्कळच अडचणींचा असेल. उसाच्या किमतीबद्दल काहीच निश्चितता नाही. सिमेंट आणि कार्बाइड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकारने पेट कोक आयात करण्यासंबंधीच्या निर्णयात बदल केल्यामुळे दिलासा मिळाला. आता या कंपन्या तसेच त्यांच्याशी संबंधित एजन्सीज प्रदूषण नियंत्रण बोर्डात स्वतःचे रजिस्ट्रेशन करून पेट कोक आयात करू शकतील.

अल्ट्राटेक सिमेंट आणि दालमिया भारत या कंपन्यात बिनानी सिमेंटच्या साठी चालू असलेल्या चढाओढीत एक फेरी दालमिया भारतने जिंकली. दालमिया भारतची याचिका सुप्रीम कोर्टाने मंजूर केली. आणि कर्जदार बँकांना अंतिम बोलीसाठी स्टे दिला.

HDIL या कंपनीने IDBI बँकेबरोबर OTS केली त्याच्यामुळे कंपनीची वसईची जमीन विकण्याचा निर्णय पुढे गेला.
वाढणारी महागाई लक्षात घेता RBI आपल्या दरात ०.२५% वाढ करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक चालू आहे. ६ जून २०१८ रोजी RBI आपले तिमाही वित्तीय धोरण जाहीर करेल
RBI च्या १२ फेब्रुवारी २०१८ च्या डिफॉल्ट अकौंट साठीच्या नियमांविरुद्ध बँक अधिकाऱयांच्या असोसिएशनने केलेल्या याचिके संदर्भात दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकार आणी RBI ला नोटीस पाठवली. HDFC बँकेच्या शेअरमध्ये Rs ७६८ कोटींची ब्लॉक डील झाले.  विमानाने प्रवास करणाऱ्या अंतर्देशीय प्रवाशांची वाहतूक २५% ने वाढली.

अशा प्रकारे काही अपवाद वगळता आजचा दिवस बेअर्सनी गाजवला.

BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३५०११ NSE चा निर्देशांक निफ्टी १०६२८ आणि बँक निफ्टी २६२५७ वर बंद झाले.

 

Advertisements

आजचे मार्केट – १ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचे मार्केट – १ जून २०१८

३१ मे रोजी ४०० पाईंटची लांबलचक उडी मारल्यामुळे मार्केट थकले, थोडेसे सुस्तावले सुद्धा! मागचा पुढचा अंदाज घेत पाऊले टाकू लागले. युरोप कॅनडा ,मेक्सिको येथून USA मध्ये आयात होणाऱ्या अल्युमिनियमवर १०% आणि स्टील वर २५% इम्पोर्ट ड्युटी लावली म्हणजे USA ने सुरु केलेले ट्रेड वॉर पुरते ओसरले नाही.

व्हेनिझुएलाकडे बाकी असलेली ONGC विदेशचे पेमेंट या देशाने केले नाही. ONGC चा ONGC विदेशमध्ये ४०% स्टेक आहे. त्यामुळे ONGC चा शेअर पडला. सरकार त्यांचा SUTTI योजनेतील मारुती लिमिटेड, ITC, लार्सन अँड टुब्रो तसेच ऍक्सिस बँकेमधील स्टेक विकायचा विचार करत आहे. जानेवारी ते मार्च २०१८ या वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारताची GDP ग्रोथ ७.७% झाली.

१ जून रोजी मे महिन्याच्या ऑटो विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटोची विक्री ३०% ने वाढली तसेच निर्यातही वाढली. अशोक लेलँडची विक्री ५१% ने वाढली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री वाढली. मारुतीची विक्री ३०% ने वाढली. आयशर मोटर्सची विक्री थोड्या कमी प्रमाणात वाढली. जून १२ २०१८ पर्यंत अधिक महिना असल्यामुळे या महिन्यात कार्स आणि इतर वाहनांची खरेदी शुभ मानत नसल्यामुळे ऑटो विक्रीचे आकडे थोडे कमी प्रमाणावर आले. टाटा मोटर्स ची कमर्शियल आणि घरगुती वाहनविक्रीचे आकडे चांगले आले. TVS मोटर्सची विक्री १०% वाढली.

IGL ने पेट्रोनेट LNG बरोबर LNG व्हेईकल साठी करार केला. फॉस्फेटिक व्यवसाय विकून टाटा केमिकल्सला Rs ८७३ कोटी मिळाले.  पंजाब नॅशनल बँक त्यांचे भिकाजी कामा रोड वरील हेड ऑफिस Rs १३०० कोटींना विकणार आहे. तसेच ही बँक त्यांचा PNB हौसिंग मधील स्टेक विकणार आहे. पॉवर जनरेटिंग आणि डिस्ट्रिब्युशन कंपन्यांचे सरकारकडून येणे असलेले पैसे लक्षात घेऊन RBI च्या नव्या नियमाप्रमाणे त्यांना NPA घोषित करू नये असा निर्णय हायकोर्टाने दिला. यांचा या कंपन्यांना कर्ज दिलेल्या बँकांवर नकारात्मक तर या कंपन्यांवर सकारात्मक परिणाम होईल. दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या ऑडिटर्सने राजीनामा दिला ही शेवटी अफवाच निघाली. टी व्ही वाहिनीवर कंपनीने सांगितले की आमच्या ऑडिटरने राजीनामा दिलेला नाही आणि कंपनीचे रस्ते बांधणीचे काम व्यवस्थित चालू आहे.

विशेष लक्षवेधी

 • पुढील आठवड्यात RBI आपले तिमाही वित्तीय धोरण जाहीर करेल.
 • USA ची सेंट्रल बँक फेडची मीटिंग १२ आणि १३ जूनला होईल. या मीटिंग मध्ये व्याजाच्या दरवाढीविषयी फेड निर्णय घेईल. फेड यावेळी व्याजाचा दर वाढवेल ही जवळ जवळ निश्चिती आहे.
 • १४ जून च्या आसपास किरकोळ महागाई, थोक महागाई आणि IIP चे आकडे येतील.

आज कंपन्यांच्या वार्षिक निकालांविषयी असणारे तर्क वितर्क आशा निराशा निकाल जाहीर झाल्यामुळे संपले आणि वास्तव समोर आले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२२७ NSE निर्देशांक निफ्टी १०६९६ आणि बँक निफ्टी २६६९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचे मार्केट – ३१ मे 2018

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचे मार्केट – ३१ मे

आज मार्केटचा मूड चांगला होता आंतरराष्ट्रीय मार्केट तेजीत होती. निवडणुकांचा कौल विरोधी पक्षांच्या बाजूने लागला तरी मार्केटनी डोळे मिटून घेतले होते. एक्स्पायरी असल्यामुळे प्रत्येकजण पोझिशन रोल ओव्हर करावी का क्लोज करावी याच विचारात होता. या गदारोळात मार्केट ४०० पाईंट वाढले. मी आपल्याला सांगितले होते की निफ्टीची एक्स्पायरी १०७०० च्या आसपास होईल ते खरे झाले.

भारत डायनामिकस , मिश्र धातू ​निगम, BGR एनर्जी , KNR CONSRTUCTION , इन्फिबीम, TORRENT फार्मा , पुंज लॉइड यांचे निकाल चांगले आले. अहलुवालिया काँट्रॅक्टस, MTNL, यांचे निकाल असमाधानकारक आले. ऑडिटर्सच्या राजीनाम्याचे सत्र निवळताना दिसत नाही. अटलांटाचे ऑडिटर्स PWC यांनी राजीनामा दिला. यावेळी दिलेल्या राजीनाम्यांमुळे शेअर्सचा भाव २०% पडून त्याला लोअर सर्किट लागते. त्यामुळे शेअर होल्डर्सचे नुकसान होते. खरे पाहता काय काय घडले ते शेअरहोल्डर्सना खुलासेवार समजले पाहिजे . पण काही का असेना गुंतवणूक करताना कॉर्पोरेट गव्हरनन्सचे नियम पाळले जात आहेत की नाही याकडे लक्ष द्यावे. म्हणजे गुंतवणुकीचे आरोग्य चांगले राहते.

सेबीने HDFC बँकेसाठी FII साठी असलेली विंडो १ जूनपासून बंद केली. त्यामुळे आता प्रीमियम देऊनही FII मार्केट मधून HDFC बँकेचे शेअर्स खरेदी करू शकणार नाहीत. ओरिएंट सिमेंटने १ वर्षांची मुदत संपल्यामुळे JP असोसिएटचे दोन प्लांट विकत घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले.हे शेअरहोल्डरना आवडले त्यामुळे शेअर वाढला. पॉवर ग्रीडने रेल्वेची सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी MOU केले. महिंद्रा आणि महिन्द्राने चाकण येथील प्लांटमध्ये EV बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर MOU केले. महाराष्ट्राच्या राज्य सरकारने कंपनीला बरीच कन्सेशन दिली असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. मॅकलाईड रसेल या कंपनीने Rs २१० प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK जाहीर केले

उद्यापासून MSCI निर्देशांकात बदल होणार. वायदे बाजारातील व्यवहारांसाठी ठेवावे लागणारे मार्जिन वाढणार. इनिशियल मार्जिन, एक्स्पोजर मार्जीन किंवा एक्स्ट्रीम लॉस मार्जिन , कॅलेंडर स्प्रेड मार्जिन, मार्क टू मार्केट सेटलमेंट हे सर्व सक्तीने ट्रेडर्स कडून वसूल करून एक्स्चेंजला किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कळवले पाहिजे.

सिमेंट सेक्टरमधील मंदी संपत आली आहे असे दिसते. पुढील महिन्यासाठी निफ्टी ११००० चा कॉल १०६०० चा पुट त्याचप्रमाणे बँक निफ्टीमध्ये २७००० चा कॉल आणि २५५०० चा पुट यामध्ये खरेदी दिसली . यावरून पुढील महिन्यात निफ्टी १०६०० ते ११००० या दरम्यान आणि बँक निफ्टी २५५०० ते २७००० या दरम्यान राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३२२ NSE निर्देशांक निफ्टी १०७३६ बँक निफ्टी २६९५६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ३० मे २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० मे २०१८

शेअरमार्केट राजकारण, समाजकारण, अर्थकारण ​आणि आंतरराष्ट्रीय वातावरण यांनी ढवळून निघाले. इटलीची खराब आर्थीक परिस्थिती, स्पेनमधील राजकीय अस्थिरता, कैराना, पालघर, गोंदिया येथील पोटनिवडणुका, आणि बातम्यांचा गोंधळ यांनी मार्केट ढवळून निघाले. इटलीचा धोका ग्रीसच्या पेक्षा मोठा आहे. १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड जर्मनीत २.५% तर इटलीत ३.३८% झाले.

बोरोसिल, मुरुडेश्वर सिरॅमिक्स, BPCL, पॉवर ग्रीड यांचे निकाल चांगले आले. ग्लेनमार्क, BEL, हॉटेल लीला,अबन ऑफशोअर, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, यांचे निकाल असमाधानकारक आले. सॅटिन क्रेडिट केअर तोट्यातून फायद्यात आली तर हॉटेल लीला फायद्यातून तोट्यात गेली. फोर्टिस हेल्थकेअरचे आज येणारे निकाल रद्द झाले. आता ११ जून २०१८ रोजी निकाल जाहीर होतील. मर्क यांचा BPL बीझिनेस (बायोफार्मा, परफॉर्मॅन्स मटेरियल, लाईफ सायन्सेस) प्रॉक्टर आणि गॅम्बलला विकणार आहेत. P & G ने २६% स्टेकसाठी Rs १५००.३६ ने ओपन ऑफर दिली आहे. ही ऑफर १३ जून ते २६ जून २०१८ दरम्यान ओपन राहील. त्यामुळे मर्क चा शेअर २०% वाढला. ग्रीन प्लाय मधून ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीज डीमर्ज करायला परवानगी मिळाली, ग्रीन प्लायच्या एका शेअरला ग्रीन पॅनेलचा एक शेअर मिळेल. आणि ग्रीन पॅनेलचे NSE आणि BSE वर लिस्टिंग होईल.

विमानाचे इंधन GSTच्या कक्षेत आणावे असे घाटते आहे सध्या या इंधनावर १२ % कर लागतो.विमान कंपन्यांनी १००० किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी Rs २०० आणि त्यापेक्षा जास्त अंतरासाठी Rs ४०० असा सरचार्ज लावला. सरकार ८०,००० ते ९०,००० अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर DEMAT करणार आहे. या बातमीमुळे CDSL ला फायदा होईल अशा अपेक्षेने हा शेअर वाढला. घरोघरी वीज पुरवल्यानंतर घरोघरी मीटर बसवण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा HPL इलेक्ट्रिक या कंपनीला होईल. टाटा स्टीलने भूषण स्टीलच्या कर्जदारांना Rs ३५२०० कोटी पेमेंट केले. NCLT ने आणि CIC ने वेदांताचा इलेक्ट्रो स्टीलस स्टीलसाठी चा रेझोल्यूशन प्लान मंजूर केला आणि वेदांताला या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकांना पेमेंट करायला सांगितले.

बातम्यांचा गोंधळ

 • सकाळी IOC च्या साईटवर पेट्रोल आणि डिझेल चे दर Rs ०.६० ने कमी केले असे दाखवले. आणि थोड्या वेळातच साईट अपडेट केली नाही असे सांगण्यात आले आणि हे दर फक्त Rs ०.०१ ने कमी करण्यात आले असे जाहीर केले. याचा परिणाम शेअर मार्केटवर आणि पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांवर झाला.
 • दिलीप बिल्डकॉनच्या ऑडिटरनी राजीनामा दिला अशी बातमी आली आणि कंपनीनी याचा इन्कार केला. अशा बातम्या जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत का हे मात्र कळेनासे झाले आहे.

उद्या एक्स्पायरी असल्यामुळे गोंधळात भर पडेल. त्यातूनच तिमाही किंवा वार्षिक निकाल जाहीर करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बर्याच कंपन्यांचे निकाल येतील. ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये रोल ओव्हर जास्त होईल, ओपन इंटरेस्ट वाढेल ते शेअर पुढील महिन्यासाठी योग्य ठरतील.

BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३४९०६, NSE चा निर्देशांक निफ्टी १०६१४ तर बँक निफ्टी २६३२७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २९ मे २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ मे २०१८

जगातील सगळ्या देशांच्या चलनाबरोबर तुलना केल्यास US $ मजबूत होतो आहे असे जाणवते. त्यामुळे अर्थातच रुपया कमजोर होत आहे. आज RBI ने ओपन मार्केट ऑपरेशन द्वारे US $ विकले असे सांगत होते. या सगळ्यामुळे मार्केटमधील रचना सातत्यानें बदलते आहे. तिमाही निकालांचा परिणाम आहेच. अनिश्चिततेचे प्रमाण वाढले आहे.

इटलीमध्ये सरकार फॉर्म होऊ शकत नाही. इटलीच्या अर्थमंत्रीपदी युरोला विरोध करणारा माणूस येतो आहे. त्यामुळे युरोपियन कॉमन युनियनमध्ये खळबळ माजून युरोपियन मार्केट्स पडली. USA ची मार्केट ही पडली. आणि त्याचा परिणाम भारतीय मार्केट्सवरही झाला.

भेल, महिंद्रा आणि महिंद्रा, ईपका लॅब,कोल इंडिया, ऑइल इंडिया, याचे तिमाही निकाल चांगले आले. ऑरोबिंदो फार्मा, बँक ऑफ इंडिया यांचे निकाल असमाधानकारक होते. निटको टाईल्स तोट्यातून फायद्यात आली तर DCM श्रीराम फायद्यातून तोट्यात गेली. साखरेच्या संबंधातील निर्णय चांगलाच गाजतो आहे आणि सगळ्यांची दाणादाण उडवतो आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखरेसंबंधी निर्णय घेतला जाणार होता पण पंतप्रधान २ जून पर्यंत विदेश दौऱ्यावर असल्यामुळे उपरोल्लेखित बैठक रद्द झाली.त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स पडले. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्ली राज्य सरकारने औषधांच्या किमती निश्चित केल्या. याचा प्रतिकूल परिणाम अपोलो हॉस्पिटल आणि फोर्टिस हेल्थकेअर या शेअर्सवर झाला. CNG आणि PNG यांचे दर वाढल्यामुळे IGL आणि MGL यांचे शेअर्स वाढले.

विशेष लक्षवेधी

 • वेदांताचा तुतिकोरिन येथील प्लांट बंद होतो आहे याचा फायदा कोणाला होईल याचा विचार केला पाहिजे. कॉपरची उत्पादनक्षमता ४६% ने कमी होईल त्यामुळे हिंदुस्थान कॉपरच्या उत्पादनासाठी ची मागणी वाढली त्यामुळे हा शेअर वाढला.
 • ऑडिटरने राजीनामा दिला ही बातमी वाचली की खळबळ उडते आणि शेअर २०% पर्यंत पडतो. पण ही बातमी खरी की खोटी याची शहानिशा केली पाहिजे. आज स्ट्राइड्स शसूनच्या बाबतीत असेच घडले. कंपनीने ताबडतोब खुलासा केला की ऑडिटर्सनी राजीनामा दिलेला नाही. त्यासरशी पडत असलेला शेअर वाढला.

आज मी आपल्याला MGL चा चार्ट दाखवत आहे यामध्ये ‘थ्री स्टार्स इन साऊथ’ या रचने विषयी माहिती देत आहे.

Source – chartlink.com

आपण २१ मे २०१८ पासून २९ मे २०१८ पर्यंतच्या कँडल्स बघितल्या तर २२ मे २०१८ रोजी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आढळते. त्यानंतर तीन दिवस म्हणजे २३ २४ २५ मे २०१८ रोजी शेअरने बॉटम बनवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तीन चांदण्या मंदीनंतर जाणवतात. त्यानंतर २८ तारखेची कँडल तेजीची आहे. हा शेअर Rs १३०० पासून Rs ८०० पर्यंत खाली आला आहे. थोड्याच दिवसात बॉटम फॉर्म होईल असे दिसते.

उद्या अबन ऑफशोअर, बर्जर पेंट्स, फोर्टिस हेल्थकेअर,ONGC , अपोलो हॉस्पिटल्स आणि ITDC या कंपन्यांचे तिमाही निकाल होतील. एक्स्पायरीला दोन दिवस बाकी असल्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता राहील. निफ्टी १०७०० च्या आसपास एक्स्पायरी होईल असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९४९ NSE निर्देशांक निफ्टी १०६३३ तर बँक निफ्टी २६२५४ वर बंद झाला.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २८ मे २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ मे २०१८

मान्सूनचे केरळ आणि कर्नाटकामध्ये आगमन झाले म्हणून आज मार्केट आनंदात होते. सलग तिसर्या दिवशी म्हणजेच गुरुवार शुक्रवार आणि सोमवार मार्केट तेजीत होते. क्रूडच्या किमतीने घेतलेली माघार आणि रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ यामुळे DII आणि FII यांनी भारतीय मार्केटमध्ये खरेदी सुरु केली.त्याचेच प्रतिबिंब मार्केटमधल्या तेजीत जाणवले. त्याच बरोबर USA च्या ऑफिसर टीम ने USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तरकोरियाचे किम यांच्यातील परिषदेची तयारी सुरु केली. मंदीच्या पोझिशन लोकांना बंद कराव्या लागल्या. हेच बरोबर चित्र चार्टमध्येही दिसते आहे. THREE WHITE SOLDIERS ही रचना दिसायला लागली.ही रचना मंदीच्या शेवटी तयार होते. मंदी संपत आली हे दर्शवते. मार्केट मधील सेंटीमेंट बदलते आहे आशादायी वातावरण तयार होते आहे.

गुरुवारपासून मार्केट आधीच्या दिवशीपेक्षा वरच्या स्तरावर उघडले आणि वरच्या स्तरावर बंद झाले. चार्टमध्ये या तीन कँडल आपल्याला हिरव्या रंगाच्या दिसतील. २४ मे, २५ मे आणि २८ मे या तीन दिवसांच्या या तीन कँडल्स आहेत.

NTPC, लार्सन अँड टुब्रो( Rs १६ प्रती शेअर लाभांश), सन फार्मा यांचा निकाल चांगला आला. पेट्रोल आणि डिझेल मध्ये फ्युचर्स चालू करण्यासाठी ऑइल मंत्रालयाने परवानगी दिली. त्यामुळे MCX चा शेअर वधारला. मनपसंद बिव्हरेजीस या कंपनीच्या DELOITTE या ऑडिटर्सनी राजीनामा दिला. त्यामुळे घाबरून जाऊन लोकांनी शेअर्स विकल्यामुळे २०% शेअर पडला. डिव्हिज लॅब यांनी Rs १० प्रती शेर लाभांश जाहीर केला.

विशेष लक्षवेधी
GIC चा निकाल चांगला आला आणि त्यांनी १:१ बोनस जाहीर केला.

हा एक्स्पायरी वीक आहे. त्यामुळे मार्केट अस्थिर असण्याची शक्यता आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१६५ NSE निर्देशांक निफ्टी १०६८८ आणि बँक निफ्टी २६६१४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २५ मे २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ मे २०१८

आज सकाळपासूनच मार्केटमध्ये तेजीचा मूड होता. त्याला कारणही तसेच होते. क्रूडचा भाव कमी होऊ लागला. रुपया वधारला. बॉण्ड यिल्ड कमी झाले. VIX कमी झाले. USA च्या मार्केटमध्ये V शेप रिकव्हरी झाली.USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी १२ जूनला उत्तर कोरिया बरोबर ठरलेली मीटिंग रद्द केली ही एकच नकारात्मक बाब होती. निफ्टी १०५०० चा स्तरावर टिकतोय असे वाटल्यावर शॉर्टकव्हरिंग बरोबर नवीन खरेदी दिसली. त्यामुळे मार्केटचा मूड बदलला आणि निफ्टी इंट्राडे १०० अंक वधारला.

गुजरात अल्कलीज, सुदर्शन केमिकल्स, कोची शिपयार्ड, MOIL, मंगलोर केमिकल्स, युनायटेड स्पिरिट, युनायटेड ब्रुवरीज,करूर वैश्य बँक, टेक महिंद्र यांचे तिमाही निकाल चांगले आले. कमिन्स आणि गुजरात सिद्धी सिमेंट या तोट्यातून फायद्यात आल्या. काकतीया सिमेंट, झुआरी ऍग्रो या फायद्यातील कंपन्यांना तोटा झाला. IDBI बँकेचा निकाल असमाधानकारक होता.

NSE आणि MCX यांचे मर्जर होणार अशी खसखस मार्केटमध्ये पिकते आहे. MCX ने आमचा असा काही विचार नाही असे स्पष्ट केले तरीसुद्धा MCX चा शेअर Rs १०० ने वाढला. १ऑक्टोबर २०१८ पासून इक्विटी, कमोडिटी आणि वायदा बाजारात युनिफाईड लायसेन्स पॉलिसी अमलात येणार आहे. त्यामुळे कमोडिटी, इक्विटी आणि वायदा बाजार यासाठी वेगवेगळी लायसेन्स लागणार नाहीत. म्हणून NSE आणि MCX यांचे मर्जर घाटत आहे अशी अटकळ आहे.
COX AND KINGS ला RBI कडून NBFC बिझिनेससाठी लायसेन्स मिळाले.

कावेरी सीड्स ने Rs ६७५ प्रती शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला. कंपनी फक्त २९ लाख शेअर्स BUY BACK करणार आहे. कंपनीकडे कॅश आहे, समोर अशी कोणतीही योजना नाही ज्यामुळे कंपनीची प्रगती होईल अशावेळी BUY BACK केला तर शेअर्सचा भाव वाढतो त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होतो. रेशियो सुधारतात. पण कावेरी सीडच्या बाबतीत असे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे कंपनीच्या शेअरचा भाव वाढण्याऐवजी पडला.

विशेष लक्षवेधी

 • पुढील आठवड्यात लार्सन & टुब्रो, NTPC, भेल, BPCL महिंद्रा आणि महिंद्रा, ऑइल इंडिया, ONGC यांचे निकाल आहेत.
 • टेक महिंद्र या कंपनीने Rs १४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • १ जून २०१८ पासून MSCI निर्देशांकात बदल होणार आहे.
 • २९ मे २०१८ रोजी हवामानाविषयी अंदाज वर्तवला जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९२४ NSE चा निर्देशांक निफ्टी १०६०५ बँक निफ्टी २६२७३ वर बंद झाले. सोमवारी मार्केट पहिला अर्धा दिवस तरी तेजीत राहील आणि नंतर प्रॉफिट बुकिंग होईल असे वाटते.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!