Tag Archives: marathi share marekt answers

आठवड्याचे-समालोचन – नाताळच्या आधी नाताळची भेट – १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नाताळच्या आधी नाताळची भेट – १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७

मुडी’ज ही आंतरराष्ट्रीय एजन्सी भारत आणी भारतातील शेअरमार्केटसाठी ‘सांताक्लाज’ सिद्ध झाली. या एजन्सीने १३ वर्षानंतर भारताचे रेटिंग वाढवले. नाताळच्या एक महिना आधी नाताळची भेट दिली. यावर्षी दिवाळी आधी तुम्हीआम्ही शेअरमार्केटमध्ये दिवाळी साजरी केली. आता नाताळ आधी नाताळ साजरा करु या. मुडीजने भारतीय सरकारच्या कर्जरोख्यांचे रेटिंग Baa3 वरून वाढवून Baa2 केले. अविकसित देशात भारत सर्वात वरच्या स्तरावर असेल आणी भारताचा प्रगतीचा रेट FY १८ साठी ६.७% FY 19 साठी ७.५% आणी FY २० नंतर प्रगतीचा वेग वाढेल असे अनुमान केले. यामुळे रुपया मजबूत होईल. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताविषयी विश्वास वाढेल. या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यामुळे भारतीय कंपन्यांना परदेशात स्वस्त दराने कर्ज मिळेल. म्युच्युअल फंडांची भागीदारी वाढेल. हे ग्रेडिंगमध्ये Upgradation  म्हणजे आर्थिक प्रगतीचे आणी सुबत्तेचे द्योतक आहे.

परदेशी गुंतवणूकदार गेले काही दिवस सतत विक्री करत होते. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे क्रेडीट वाढल्यामुळे भारताकडे पाठ फिरवलेले परदेशी गुंतवणूकदार परत आपली गुंतवणूक भारतात आणतील. भारतीय सरकार निरनिराळ्या क्षेत्रात सुधारणा करत आहे. त्या सुधारणांना मिळालेली ही पावती मानावी लागेल. ‘इज ऑफ डूइंग बिझिनेस’ निर्देशांकात सुधारणेनंतर सरकारच्या सुधारणांना मिळालेली ही दुसरी पावती.

मार्केटने त्वरीत या सुधारीत रेटिंगची दखल घेतली आणी मार्केट शुक्रवार तारीख १७ नोव्हेंबर २०१७ रोजी नव्या स्तरावर पोहोचले याचा फायदा HDFC STANDARD लाइफच्या लिस्टिंगलाही झाला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनने असे जाहीर केले की बँका आणी ASSET MANAGEMENT कंपन्यातील परदेशी मालकीवरील मर्यादा काढली जाईल. तसेच परदेशी कंपन्यांना स्थानीय सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्या आणी विमा कंपन्या याच्यात मेजॉरीटी स्टेक घेण्यास परवानगी दिली जाईल. या प्रकारे चीन हळू हळू आपली अर्थव्यवस्था परदेशी भांडवलास खुली करत आहे. चीनमध्ये धातुंसाठी असलेली मागणी कमी झाल्यामुळे झिंक. निकेल, स्टील यांचे भाव गडगडले. त्याबरोबरच या धातूंमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्यांचे शेअर गडगडले.
 • UK ने असे जाहीर केले की ते मार्च २९ २०१९ रोजी युरोपिअन युनियन मधून बाहेर पडतील. या प्रकारे त्या दिवशी ब्रेकझीटची प्रक्रिया पुरी होईल.
 • व्हेनिझुएला या देशाच्या चलनाची किंमत फारच कमी झाल्यामुळे तो देश दिवाळखोर देश म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. व्हेनिझुएलाची सरकारी कंपनी PDUSA ने ONGC ला देणे असलेली रक्कम दिली नाही.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने Strategic विक्री करण्यासाठी १८ कंपन्यांची यादी बनवली आहे. या कंपन्यांकडे असलेली अनावश्यक जमीनही सरकार विकणार आहे. यात ड्रेजिंग कॉर्पोरेशन, सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक, स्कूटर्स इंडिया, हिंदुस्थान prefab आणी पवन हंस या कंपन्यांचा समावेश आहे.
 • भारत नेट फेज II सोमवारपासून सुरु झाली. यासाठी सरकारने Rs ३४००० कोटींचे टेंडर मागवले आहे.
 • EPFवर दिले जाणारे व्याज ८.६५% वरून ८.५०% करण्याचा सरकार विचार करत आहे.
 • सरकारने भारत ETF २२ हा एक्स्चेंज ट्रेडेड फंड मार्केटमध्ये आणला. या फंडात ६ सेक्टर मधील २२ कंपन्याचे शेअर्स असतील यापैकी १९ कंपन्या सरकारी तर ३ खाजगी क्षेत्रातील आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २०% कोटा आरक्षित ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना ३% डीस्कॉउंट देण्यात आला. हा NFO (न्यू फंड ऑफर) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ओपन राहीला. या फडाद्वारे सरकार Rs ८००० कोटी उभारेल.
 • दिल्ली NCR एरिआमध्ये वातावरणातील प्रदुशणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे प्रदूषण डीझेल वापरणाऱ्या गाड्यांमुळे होते असा अंदाज आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या गाड्यांच्या किमतीच्या एक निश्चित % पर्यावरण सेस लावण्याची शक्यता आहे. सरकारने BSVI इंधन वापरण्याचा कालावधी दिल्लीसाठी २०२० साला ऐवजी एप्रिल २०१८ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणजे हे पेट्रोल आताच्या पेट्रोलपेक्षा महाग असेल. तसेच हे पेट्रोल वापरल्यावर गाडीचे ‘माईलेज’ कमी होईल. तसेच कार्सच्या किमतीही वाढतील.
 • सरकार सरकारी बँकांच्या रीकॅपीटलायझेशनबद्दल डिसेंबर २०१७ पर्यंत निर्णय घेईल.
 • सरकार आयात कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रोनिक वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात होतात. त्यासंबंधीचे धोरण सरकार लवकरच जाहीर करेल. याचा परिणाम मर्क आणी BPL यांच्यावर होईल.
 • सरकारने दिल्ली NCR मधील बांधकामावर असलेली बंदी उठवली
 • सरकारने सर्व प्रकारच्या डाळी आणी पल्सेस यांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले.
 • सरकारने ‘FPI’ च्या निवेशाची मर्यादा ४९% केली. याचा फायदा पेट्रोनेट LNG( ४०% वरून ४९%) आणी ICICI लोम्बार्डला (२४% वरून ४९%) होईल.
 • सरकारने आपण जर डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड PAYtm यांच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर GST मध्ये २% सूट दिली जाईल असे जाहीर केले. याचा फायदा TVS इलेक्ट्रॉनिकला होईल.
 • सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कार्पेट एरिआ १२० वर्गमीटर एवढा केला आता या घरानांही सवलत मिळेल. याचा फायदा रिअल एस्टेट सेक्टर, हौसिंग फायनान्स आणी सिमेंट या सेक्टर्सना होईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सेबीने जानेवारी २०१८ पासून IPO ची प्रक्रिया T+३ करण्याचे ठरवले आहे, या प्रक्रियेप्रमाणे IPO बंद होण्याच्या दिवसापासून ३ दिवसांच्या आत शेअर्सचे लिस्टिंग होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ‘IIP’ आकडे आले. सप्टेंबर २०१७ साठी IIP निर्देशांकात ३.८% (ऑगस्ट मध्ये ४.५%) वाढ झाली. एकूण वाढ कमी  झाली असली तरी कॅपिटल गुड्स चे उत्पादन ७.४% ,इलेक्ट्रिसिटी, उत्पादन यांच्या निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली. तसेच रोज वापरातील वस्तूंचे उत्पादन १०% ने वाढले ही वाढ ग्रामीण मागणी वाढली असल्याचे दाखवते.
 • ऑक्टोबर महिन्यात WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) ३.५९% ने वाढला. (सप्टेंबर महिन्यात २.६०% वाढला होता.) ही वाढ मुख्यतः अन्न धान्य आणी भाजीपाला, इंधन आणी उर्जा यांच्या किंमतीत झाली.
 • CPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ऑक्टोबर २०१७ या महिन्यात ३.५८% ने वाढले. ही गेल्या सात महिन्यातली कमाल वाढ आहे. अन्नधान्य आणी भाजीपाला, इंधन उर्जा यांच्या बाबतीत जास्त वाढ दिसून आली.
 • MSCI निर्देशांकात काही बदल करण्यात आले. या निर्देशांकात ३० शेअर्सचा समावेश करण्यात आला तर १० शेअर्स वगळण्यात आले.
 • ऑक्टोबर २०१७ मध्ये भारताची निर्यात US $२३.१ बिलियन तर आयात US $ ३७.१ बिलियन झाली. ऑक्टोबर महिन्यासाठी ट्रेड डेफिसिट US $ १४ बिलियन एवढी झाली. GSTच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे निर्यात कमी झाली.
 • ट्यूब इन्व्हेस्टमेंट हा शेअर ‘T’ ग्रूप मधून ‘B’ ग्रूप मध्ये आला आणी सर्किट वाढवून २०% केले.

खाजगी कंपनांच्या घडमोडी

 • AXIS बँकेत BAIN, CAPITAL INTERNATIONAL, (दोन्ही मिळून US $ १.६ बिलियन) आणी LIC US $२ मिलियनची गुंतवणूक शेअर्स आणी शेअर वारंटच्या स्वरूपात करेल. यामुळे बँकेची कॅपिटल ADEQUACY १८.६६% इतकी होईल. या व्यवहारातून बँक Rs ११६२६ कोटी भांडवल उभारेल.
 • JP ग्रूपची कंपनी जे पी इन्फ्राटेक पूर्ण किंवा अंशतः खरेदी करण्यात JSW ग्रूप. वेदान्ता,लोढाग्रूप आणी डच बँक यांनी रस दाखवला.
 • RCOM चा मुंबईतील पॉवर व्यवसाय अडाणी ट्रान्समिशन खरेदी करेल. हा सौदा Rs १६००० ते Rs १७००० कोटीमध्ये होईल.
 • लारसन आणी टुब्रो या कंपनीचा तिमाही निकाल चांगला आला. पण त्यांनी भविष्यातील ऑर्डर फ्लो चा गायडंस कमी केला.
 • आयडीया आपला टॉवर बिझिनेस ATC टेलिकॉम ला Rs ३८५० कोटींना विकेल. हा सौदा २०१८ च्या पहिल्या तिमाहीत पुरा होईल. तसेच वोडाफोनही आपला टॉवर बिझिनेस ATC टेलिकॉमला Rs ४००० कोटींना विकणार आहे.
 • अलाहाबाद बँक डिसेंबर २०१७ पर्यंत Rs १२६१ कोटीचे ६१ NPA अकौंट विकेल.
 • महिंद्र आणी महिंद्र आणी फोर्ड याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेदान कारसाठी JOINT वेंचर होईल. ही कंपनी मेक्सिकोच्या मार्केटमध्ये EV आणण्याची तयारी करत आहे.
 • इंडिया बुल्स हौसिंगने ओक नॉर्थ बँकेतील १०% हिस्सा Rs ७७० कोटीना विकला
 • USFDAने ल्युपिनच्या गोवा प्लांटसाठी वार्निंग लेटर इशु केले.
 • RECने ‘पतरातु’ प्रोजेक्टसाठी Rs १४००० कोटीचे कर्ज मंजूर केले.
 • ABBOT LAB, क्विक हिल, नेकटर लाईफसायन्सेस, गोदरेज फिलिप्स, न्यू इंडिया अशुअरंस, GIC, टेस्टी बाईट्स, मार्कसंस फार्मा यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • अडानी पॉवर, BASF, TSL, TD पॉवर या कंपन्या टर्नअराउंड झाल्या. कोल इडिया, आणी NCC चे निकाल असमाधानकारक आले.
 • पडबिद्री ब्लेड प्लांट सुझलोंनने संपामुळे बंद केला
 • जस्टीस लीग आणी तुम्हारी सुलू हे चित्रपट रिलीज होणार आहेत. याचा फायदा INOX आणी PVR यांना होईल.

कॉर्पोरेट एक्शन

 • वक्रांगी सॉफटवेअरने १:१ असा बोनस जाहीर केला
 • या आठवड्यातील लिस्टिंग न्यू इंडिया अशुअरन्स या कंपनीचे शेअर्स Rs७५० वर झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ७७० ला किरकोळ अर्जदारांना दिला होता.
 • एअरटेल या कंपनीने त्यांचा भारती इन्फ्राटेलमधील ४.४९% स्टेक Rs ३३२५ कोटींना विकला
 • EDELWEISS ही कंपनी Rs २८५ प्रती शेअर या भावाने QIP आणणार आहे.
 • नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात लोक देशी परदेशी प्रवासास जातात. आता पुन्हा क्रूडचे भाव कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना फायदा होईल.
 • RBL बँकेने स्वाधार फिनसर्वमध्ये २% हिस्सेदारी वाढवली. आता RBL ची हिस्सेदारी ६०% झाली.
 • क्रिसिलने PRAGMATIKS मध्ये १००% हिस्सेदारी खरेदी केली.

या आठवड्यातील लिस्टिंग

न्यू इंडिया अशुअरंसचे Rs ७५० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ८०० ला दिला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना Rs ७७० ला दिला होता.

खादीम इंडिया या काम्पानीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs ७३० (IPO किंमत Rs ७५०) वर झाले.

इंडिया इनफोलाईनमधून डीमर्ज झालेली कंपनी ५ पैसा.कॉम या कंपनीचे NSE वर Rs ४०० वर लिस्टिंग झाले.

(डीमर्जर या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती ‘मार्केट आणी मी’ या माझ्या पुस्तकात दिली आहे)

मार्केटने काय शिकवले

९ दिवसांपासून मार्केटमध्ये ‘लोअर हाय लोअर लो’ होत आहे. बहुतेक वेळा ८ दिवसानंतर मार्केटचा ट्रेंड बदलतो. एखाद्या शेअरमध्ये रेकॉर्ड VOLUME असले तर तो शेअर काही दिवसांकरता कनसॉलिडेट होतो. घरातल्या एखाद्या व्यक्तीने काही चांगले काम केले तर घरातून त्याचे कौतुक होते. पण बाहेरच्या कुणी शाबासकी दिली बक्षीस दिले किंवा त्या कामाची दाखल घेतली, वर्तमान पत्रातून छापुन आले की त्याला अधिक महत्व प्राप्त होते. अशीच स्थिती मुडीजने रेटिंग वाढवल्यामुळे झाली.

भारतात मात्र सरकारला त्यांनी केलेल्या सुधारणासाठी टीकेला तोंड द्यावे लागत आहे. सामान्य जनतेला फक्त महागाई कमी झाली तरच सुधारणा झाली असे वाटते. पण सरकारच्या सुधारणांची आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने दखल घेतली हे कौतुकास्पदच आहे. मार्केटनेही सलामी दिली. या सलामीचा फायदा मार्केट पडू लागल्यानंतर मार्केट पासून दूर गेलेल्या लोकांना झाला नाही.

मला मार्केट्ची तुलना बॉक्सिंगच्या खेळाशी करावीशी वाटते. बॉक्सिंगमध्ये खेळाडू पडतो पण पुन्हा उठतो पण मैदान सोडून पळत नाही. खेळात सुधारणा करतो त्याचवेळी यशस्वी होतो. हेच तत्व मार्केट मध्ये आचरणात आणल्यास तेजीचा आनंद लुटता येईल.

या आठवड्याचा शेवट आनंदात झाला. मार्केटने नवा उच्चांक प्रस्थापित केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३४२, NSE निर्देशांक निफ्टी १०२८३ वर तर बँक निफ्टी २५७२८ वर बंद झाला.

आठवड्याचे समालोचन – चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चाहूल लागली बदलाची – ६ नोव्हेंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७

शेअरमार्केट ज्या प्रमुख गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात चलन, क्रूड, व्याजाचा दर आणी सोने यांचा समावेश असतो. गेल्या तीन वर्षात क्रूडचा दर कमी होत होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील ताण कमी झाला आणी चलनाचा विनिमय सुधारला. पण २०१७ मध्ये हळूहळू क्रूड वाढत जात आहे. क्रूडचा भाव US$ ६० पर्यंत पोहोचला. त्यामुळे रुपयाचा इतर चलनाबरोबरचा विनिमय दर कमी कमी होत गेला. रुपयाचा विन्मय दर US $1 =Rs ६३ वरून  US$1=Rs ६५ इतका हा दर कमी झाला. त्यामुळे रथाची चाके पुन्हा उलटी फिरणार काय अशी शंका येऊ लागली. काही प्रमाणात मार्केटमध्ये प्रॉफीट बुकिंग सुरु झाले आणी फार्मा, IT तसेच सरकारी बँकांच्या शेअर्सची खरेदी सुरु झाली. एकंदरीतच मार्केटची चाल बदलली.

गेल्या तीनचार वर्षांचा काळ क्रूडचा भाव पडण्याचा होता. पण आता मुलभूत बदल होत आहे. क्रूडचा भाव US $ ६४ पर्यंत झाला आहे. हा भाव US$ ७० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • सौदी अरेबियातील राजकीय घडामोडींमुळे आणी त्यांच्या इराणबरोबरील संबंधातील ताणतणावामुळे क्रूडची किंमत २ वर्षातील कमाल स्तरावर वाढली.
 • जपानच्या अध्यक्षांनी सांगितले की आम्ही loose मॉनेटरी पॉलिसी चालू ठेवू.

सरकारी अनौंसमेंट

 • कोल इंडियाची सबसिडीअरी महानदी कोल फिल्ड्स या कंपनीला ओडिशा सरकारने Rs २१ कोटी दंड ठोठावला.
 • MMTC आणी STC या दोन्ही कंपन्यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये सरकारची हिस्सेदारी ९०% आहे. त्याशिवाय LIC कडे ५% हिस्सेदारीआहे. ५% शेअर्स पब्लिककडे आहेत. VRS साठी सरकारला कमी पैसा (STC च्या कर्मचाऱ्यांच्या VRS साठी Rs २५० कोटी) खर्च करावा लागेल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

9 ते १० नोव्हेंबरला GST कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेतले गेले.

 • GST कौन्सिलने १७८ वस्तूंवरचा GST २८% वरून १८ % केला. १३ वस्तूंवरील GST १८% वरून १२% केला. २ वस्तूंवरचा GST २८% वरून १२% केला. रेस्टॉरंट आणी हॉटेल्सवरचा GST ५% केला. ६ वस्तुंवरील GST ५% वरून ०% केला. ८ वस्तूंवरचा GST १२% वरून ५% केला. रेस्टॉरंट आणी हॉटेल यांना इनपुट क्रेडीट मिळणार नाही. GST कौन्सिलच्या या बैठकीत रिअल इस्टेटवर चर्चा होऊ शकली नाही.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • RIL आलोक इंडस्ट्रीज चे पॉलिएस्टर युनिट खरेदी करण्याचा विचार करत आहे.
 • REC (रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन) रेल्वेला इलेक्ट्रिफिकेशनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी ४ ते ५ वर्षात Rs ३०००० कोटींचे कर्ज वार्षिक ९% व्याजाने देणार आहे.
 • SCHNEIDAR ही फ्रेंच कंपनी आणी TAMASEK हे लार्सेन & टूब्रो चा इलेक्ट्रिक आणी ऑटोमेशन बिझिनेस Rs १५००० कोटी ते Rs १७००० कोटीना विकत घेणार आहेत.
 • USFDA ने ल्युपिन या कंपनीला त्यांच्या गोवा आणी पिठमपूर प्लांटसाठी वार्निंग लेटर इशू केले आहे. त्याचप्रमाणे ३ फॉर्म नंबर 483 इशू केले आहेत. यामुळे कंपनीचे नवीन प्रोडक्ट USA मध्ये लॉनच करण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून ल्युपिनचा शेअर १६% पडला.
 • आय फोन १० मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळाला याचा फायदा HCL इन्फोसिस्टीमला होईल.
 • RCOMया कंपनीचा टॉवर बिझिनेस घेण्यासाठी जी ब्रूकफिल्ड बरोबर बोलणी चालू होती ती फिसकटली.
 • OMRU हॉस्पिटलमध्ये नाटको फर्माने स्टेक घेतला.
 • NHAI ने HCC, लार्सन आणी टूब्रोला नोटीस पाठवली
 • युनिकेम LABची मार्केट कॅप Rs २६०० कोटी आहे पण त्यांना १२० BRAND विकून Rs ३६०० कोटी मिळाले. म्हणजे Rs १००० कोटींचा फायदा झाला. त्यामुळे शेअरहोल्डर्सना स्पेशल लाभांश मिळेल अशी अपेक्षा आहे.
 • पनामा पेपरप्रमाणेच ‘PARADISE’पेपरचा धमाका झाला आहे. ७१४ लोकांच्या नावांचा, यात काही आंतरराष्ट्रीय तसेच राजकीय नेत्यांचा, उद्योग जगतातील लोकांचा, सिनेजगतातील लोकांचा, तसेच काही कंपन्यांचा समावेश आहे.
 • सदभाव इंजिनिअरिंग या कंपनीला महाराष्ट्र राज्यात Rs ६७५ कोटींचे काम मिळाले.
 • HDFC लाईफचा इशू येतो आहे. त्यांची इंद्रप्रस्थ मेडिकलमध्ये हिस्सेदारी आहे त्यामुळे या IPO ला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर इंद्रप्रस्थ मेडिकलच्या शेअरची किंमतीवर परिणाम होईल.
 • महिंद्र लाईफ स्पेस २ औद्योगिक प्रोजेक्टमध्ये Rs ६०० कोटींची गुंतवणूक करेल.
 • ज्योती LAB चा हेन्केल या कंपनीबरोबरचा करार रिन्यू होऊ शकला नाही.
 • मंचरमध्ये मेगा प्रोजेक्टसाठी पराग मिल्क प्रोडक्ट या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून Rs २८० कोटी उत्तेजनार्थ मिळाले.
 • अडानी पॉवरने 1496MW क्षमतेचा पॉवर परचेस करार बांगलादेशबरोबर केला.
 • आसाम आणी केनयामध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे चहाचे दर ५% ते 11% ने वाढले. त्यामुळे चहा कॉफी उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.
 • ड्रेजिंग कॉर्पोरेशन ही कंपनी तोट्यातून नफ्यात आली. (टर्नअराउंड झाली). Rs १४ कोटी नफ्याएवजी Rs १९ कोटी फायदा झाला.
 • स्टेट बँक ऑफ इंडियाचा निकाल चांगला झाला. NII (नेट इंटरेस्ट इन्कम) वाढले, NPA कमी झाले. PCR (प्रोविजन कव्हरेज रेशियो सुधारला. कासा रेशियो (करंट अंड सेविंग डीपॉझीट/ एकूण डीपॉझीट) सुधारला.
 • MRF, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, चेन्नाई पेट्रो, युनायटेड ब्रुअरीज, महानगर GAS, टायटन, सौराष्ट्र सिमेंट, GIPCL, KEC, सिप्ला, महानगर GAS ALLSEC टेक्नॉलॉजी, IRB इन्फ्रा, वाबको, पेट्रोनेट LNG, बॉम्बे डायींग, व्होल्टास, ऑरोबिंदो फार्मा यांचे तिमाही निकाल चांगले आले
 • ‘JUST DIAL’ , कॅस्ट्रोल या कंपन्यांचे निकाल ठीक आले.
 • टाटा पॉवर, REC, OBC, SRFचा निकाल असमाधानकारक आले.
 • नागार्जुन फरटीलायझर, फ्युचर कन्झ्युमर, V MART, डेन नेटवर्क, हाथवे, ट्रेनट या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

कॉर्पोरेट एक्शन

 • अरविंद लिमिटेड या कंपनीने आपले ब्रांडेड APPAREL आणी इंजिनीअरिंग बिझिनेस डीमर्ज केले. कंपनी तिच्या Rs १० दर्शनी किमत असलेल्या ५ शेअर्समागे अरविद FASHION चे Rs ४ दर्शनी किमतीचा १ शेअर आणी जर तुमच्याकडे २७ शेअर्स असतील तर अनुप (इंजिनीअरिंग बिझिनेस) चा Rs १० दर्शनी किमतीचा एक शेअर तुमच्याकडे अरविंद चे २७ शेअर्स असतील तर देण्यात येईल. ही डीमर्जरची प्रक्रिया ८ ते ९ महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर हे शेअर्स लिस्ट होतील.
 • प्रायव्हेट इक्विटी फर्म एव्हरस्टोन व्हीडीओकॉनचा ’केनस्टार’ हा किचन आणी होम अप्लायन्सेस ब्रांड विकत घेणार आहे.
 • ICICI बँकेने ICICI सिक्युरिटीज या त्यांच्या सबसिडीआरीचा IPO आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही
 • सबसिडीअरी इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणे ब्रोकिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
 • MAX लाईफ ही कंपनी लक्ष्मी विलास बँकेत १०% स्टेक घेण्याची शक्यता आहे.
 • टाटा केमिकल्सचा हल्दिया येथील फॉस्फेट फर्टिलायझर प्लांट इंडोरामा ग्रूप Rs ३७५ कोटींना विकत घेणार आहे.
 • कॅस्ट्रोल या कंपनीने १:१ बोनस दिला.
 • महिंद्र आणी महिंद्र या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. महिंद्र आणी महिंद्र या कंपनीचा तिमाही निकाल चांगला लागला. मर्जीन १३% वरून १६% झाले.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • रिलायंस नीपपॉन लाईफ या कंपनीच्या शेअर्सचे Rs २९४ ला लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये २५२ ला दिला होता
 • महिंद्र लॉजीस्टिक्सचा शेअर Rs ४२९ वर लिस्ट झाला.

या आठवड्यातील IPO

HDFC लाईफचा IPO एकूण ४.९ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. QIP १६.६ वेळा, HNI कोटा २.२८ वेळा तर रिटेल कोटा ०.९ वेळेला सबस्क्राईब झाला.

मार्केटने काय शिकवले

NHAI ने काही कंपन्यांवर प्रतिबंध घातले आणी या कंपन्यांना ऑर्डर्स दिल्या जाणार नाहीत असे जाहीर केले. यात HCC तसेच लार्सन एंड टुब्रो यांचा समावेश होता. पण वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी NHAI ला काळजीपूर्वक पूर्ण चौकशी करा असा सल्ला दिला.

गुगल ही कंपनी ‘JUST DIAL’  ही कंपनी विकत घेणार आहे अशी बातमी होती. त्यामुळे ‘JUST DIAL’ चा शेअर बर्यापैकी वाढला. शुक्रवारी कंपनीने स्पष्टीकरण दिले की अशी कोणतीही बोलणी चालू नाहीत. पूर्वी ‘JUST DIAL’ ह्या कंपनीला अमाझोन ही कंपनी विकत घेणार आहे अशी बातमी होती

USFDA ने DIVI’ज LAB ला दिलेले WARNING लेटर परत घेतले.

इंडिगोच्या बाबतीत त्यांनी एका प्रवाश्या बरोबर अशोभनीय वर्तन केले अशी बातमी आली पण याचा कंपनीच्या बिझिनेसवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नसल्यामुळे मार्केटने या बातमीकडे दुर्लक्ष केले.

राधाकृष्ण दमाणी एक मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी  ADLAB च्या मालकीचे एक हॉटेल विकत घेतले. यामुळे ADLAB चा शेअरची किंमत वाढली.

या अशा परस्पर विरोधी बातम्या सतत मार्केटमध्ये येत असतात जर तुम्ही बातमींवर आधारीत ट्रेड करत असाल तर फार सावध आणी चपळ राहिले पाहिजे. बातमीचा आणी त्याच्याविरुद्ध आलेली बातमी दोन्हींचा फायदा करून घेतला पाहिजे. त्या वेळेवर त्या शेअरबाबत त्वरीत निर्णय घेता आला पाहिजे. नाहीतर म्हणलेच आहे ‘थांबला तो संपला’

शेअरमार्केट म्हणजे क्रिकेट सामन्याप्रमाणेच असते. क्रिकेटमध्ये  २०-२०, वन डे, कसोटी सामना, खेळले जातात. त्याचप्रमाणे मार्केटमध्येसुद्धा लोक विविध प्रकारच्या म्हणजे इंट्राडे, अल्प मुदतीसाठी, मध्यम मुदतीसाठी, आणी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक/ट्रेड करत असतात. कधी कधी असे होती की सामन्याचा रंग दर तासागणिक बदलत असतो. दोन्ही बाजूच्या लोकांची उत्सुकता ताणली जाते. पण  शेवटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपतो. तसेच काहीसे या आठवड्यात झाले कधी मार्केट बेअर्सच्या बाजूने तर कधी बुल्सच्या बाजूने झुकले. पण शेवटी काहीच  निर्णय लागला नाही. बुल्स किंवा बेअर्स कोणीही चांगला व्यवहार करू शकले नाहीत. आठवडा गोंधळाचा गेला.

GST कौन्सिलने ज्या वस्तूंवर GST कमी केला आहे त्या वस्तूंशी संबंधीत कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढतील. तरी अशा कंपन्यांच्या शेअर्सवर पुढील आठवड्यात लक्ष ठेवा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३१४ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०३२१ वर तर बँक निफ्टी २५४९८ वर बंद झाले

 

आठवड्याचे-समालोचन – शेअरमार्केट्ची गाडी सहाव्या गिअरमध्ये – 30 ऑक्टोबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट या आठवड्यात ३१ ऑक्टोबर २०१७ या दिवशी घडली. “EASE OF DOING BUSINESS” या निर्देशांकात भारताची स्थिती ३० अंकांनी सुधारली. तुम्ही म्हणाल आम्हाला यात चांगलं काय? वाईट काय? काही कळले नाही. कोणताही उद्योग करायचा म्हणजे अनेक परवानग्या, अनेक सरकारी खात्यांकडून विविध कारणांसाठी मंजुरी, वीज,पाणी, जमीन,यंत्रसामुग्री, कच्चा माल.पर्यावरण आणी वाहतूक या सर्वांची जमवाजमव करावी लागते. या सर्व प्रक्रियेत वेळ, पैसा, आणी त्रास खूप होतो. परदेशातील लोक उद्योग सुरु करण्यासाठी आपल्या देशात येतात, त्यामुळे आपल्या देशात परदेशातून पैशाचा ओघ सुरु राहतो. पण परदेशातील लोकांना उद्योग सुरु करताना अडचणी आल्या, प्रत्येक ठिकाणी अडवणूक झाली तर ते भारतात येण्यास फारसे उत्सुक नसतात. यासाठी WORLD बँकेने काही निकष ठरवले आहेत. त्यानुसार या निकषांवर आधारीत माहिती संकलीत करून ही बँक रेटिंग देते. आपला या यादीत १३० वा नंबर होता तो आता १०० वा झाला भारतात ज्या सुधारणा केल्या गेल्या त्यामुळे भारतात बिझिनेस सुरु करणे आणी तो सुरळीतपणे चालू ठेवणे अधिक सोपे, सुलभ आणी फायदेशीर झाले. भारतात केल्या गेलेल्या या सुधारणांचे जागतिक पातळीवर कौतुक झाले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव उद्योगांवर बरीच नियंत्रणे घातली आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्यांकडे केमिकल्सची मागणी वाढली. केमिकल कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले. उदा बालाजी अमाईनस, इंडिया ग्लायकॉल, नवीन फ्लूओरिन, नोसील, मेघमणी ओर्गानिक्स,हिकल केमिकल्स, सुदर्शन केमिकल्स, विनती ओर्गनिक्स
 • बँक ऑफ इंग्लंड ने आपले रेट वाढवले.
 • FEDने आपल्या रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.
 • USA मध्ये औषधांच्या किंमती १३% ने कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • इथेनॉलची किंमत Rs ३९ वरून Rs ४०.८५ केली. ही किंमत २०१७-२०१८ साठी ठरवली. नेहेमी मार्केटमध्ये एकाचा फायदा तर दुसर्याचे नुकसान असते. ऑईल मार्केटिंग कंपन्या इथेनॉल खरेदी करतात इथेनॉलची किंमत वाढवली की साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढतात तर HPCL, BPCL IOC यांचे शेअर पडतात. ओईल मार्केटिंग कंपन्यावर वाईट परिणाम होतो.
 • फरटीलायझर कंपन्यांसाठी Rs १०००० कोटींच्या सबसिडीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
 • नाल्कोची ऑफर फोर सेल Rs ६९ प्रती शेअर या भावाने येणार आहे. सध्या नाल्कोचा भाव Rs ९५ च्या आसपास आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • इन्डोकाउंट इंडस्ट्रीजच्या दोन डायरेक्टर्सना शेल कंपन्यांशी संबंधीत असल्यामुळे कॉर्पोरेट मंत्रालयाने अपात्र घोषित केले.
 • फर्जी इमेल संबंधात सेबीने सुप्रीम टेक्सपोर्ट LTD च्या प्रमोटर्सवर आणी त्यांच्याशी संबंधीत १० कंपन्यांवर कारवाई केली. त्यांना स्टॉक एक्स्चेंजशी संबंधीत कोणतेही कामकाज करण्यावर बंदी घालण्यात आली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी 

 • IDFC बँक आणी श्रीराम कॅपिटल यांच्यात मर्जरचे प्लान सुरु होते. VALUATION विषयी एकमत झाले नाही त्यामुळे हे मर्जर रद्द झाले.
 • अल्केम LABच्या LT LOUIS या युनिटला USFDA क्लीन चीट मिळाली
 • रेल्वेने रूळ मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी टेंडर मागवले. याचा फायदा ‘SAIL’ होईल.
 • TCS या कंपनीने मलेशियन एअरलाईन्ससाठी ‘कलाउड सर्विस, चालू केली.
 • ऑरीकोन एनटरप्रायझेस या कंपनीने RESTRUCTURING चा मोठा प्लान सोमवार ३०/१०/ २०१७ रोजी सादर केला
 • सोलार इंडस्ट्रीजला Rs ११४३ कोटींची ऑर्डर कोल इंडिया या कंपनीकडून मिळाली.
 • टाटा ग्लोबल बिव्हरेजीस या कंपनीने बंगलोरमध्ये आपला पहिला टी कॅफे सुरु केला.
 • टाटा टेलीमधील डोकोमो चा हिस्सा टाटा सन्सला ट्रान्स्फर केला.
 • खादिम या कंपनीचा IPO येत आहे. त्यामुळे बाटा, लिबर्टी, मिर्झा या शेअर्सकडे लक्ष ठेवावे
 • सेन्ट्रम कॅपिटल या कंपनीला मायक्रोफायनान्समध्ये व्यवहार करण्यासाठी मंजुरी मिळाली.
 • कोलगेट या कंपनीत LICने आपला स्टेक वाढवला.
 • NTPC च्या रायबरेली प्लांटमध्ये दुर्घटना झाल्यामुळे उंचाहारमधील युनिट नंबर ६ बंद केले.
 • नेलकास्ट सारख्या कंपन्या TRACTORSचे स्पेअर पार्टस् पुरवतात.
 • DIVI’S LAB या कंपनीच्या विशाखापट्टणम युनिट II वर USFDA ने लावलेला IMPORT ALERT उठवला

कॉर्पोरेट एक्शन

 • इन्फोसिसने आपल्या शेअर BUYBACK Rs ११५० प्रती शेअर या भावाने Rs १३००० कोटींचा BUYBACK जाहीर केला. आपल्याला इन्फोसिस एक फॉर्म पाठवील. त्या फॉर्मवर तुमचा DEMAT अकौंट नंबर तुमच्या नावावर असलेल्या शेअर्सची संख्या आणी BUYBACK मध्ये इन्फोसिस किती शेअर्स BUYBACK करेल ते लिहिलेले असेल. ठराविक मुदतीत जेवढे शेअर्स तुम्हाला BUYBACK साठी द्यायचे असतील (तुम्ही तुमच्याजवळ असलेले सर्व शेअर्स BUYBACK साठी ऑफर करू शकता कंपनी मात्र त्यांच्या नियमानुसारच शेअर्स BUY BACK करेल.) त्या शेअर्स साठी DIS भरून जेथे तुमचा DEMAT अकौंट असेल तेथे द्यावी. तुम्हाला जेवढे शेअर्स BUYBACK साठी द्यावयाचे असतील ते कंपनीने दिलेल्या DEMAT अकौंटमध्ये जमा होतील. आपण BUYBACK साठी दिलेलं शेअर्स या अकौंटमध्ये जमा झाले की नाही त्याची चौकशी करावी. जेवढे शेअर्स तुम्ही ऑफर केले असतील त्यातून कंपनीने BUYBACK केलेले शेअर वजा जाता बाकीचे शेअर्स तुमच्या DEMAT अकौंटला पुन्हा जमा होतील. तसेच जेवढे शेअर्स कंपनीने BUY BACK केले असतील तेवढ्या शेअर्सचे Rs ११५० प्रती शेअर या भावाने पैसे आपल्या बचत खात्यात जमा होतील.
 • अलेम्बिक फार्मा या कंपनीने ‘ORILL’ या कंपनीचे अधिग्रहण पुरे केले.
 • ड्रेजिंग कॉर्पोरेशन मधली सरकारची हिस्सीदारी पूर्णपणे विकण्यासाठी केंद्र सरकारला मंजुरी मिळाली.
 • रिलायंस इन्फ्राने RSSS ट्रान्स्मिशनमधील स्टेक अडाणी पॉवरला विकला.
 • मर्केटर लाईन्स त्यांची इंडोनेशियामधील कोळशाची खाण विकणार आहे.
 • IDFC आणी पर्यायाने IDFC बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे या बातमीचे IDFC ने खंडन केले.
 • MAX लाईफ ही कंपनी लक्ष्मी विलास बँकेमध्ये १०% स्टेक घेणार आहे. सरकारी बँकेमध्ये सरकार भांडवल घालते पण खाजगी बँकांमध्ये कोण भांडवल घालणार हा प्रश्न असतो. खाजगी बँकांना खाजगी रित्याच भांडवल गोळा करावे लागते.
 • टॉरेंट फार्मा ह्या कंपनीने  युनिकेम LAB चा BRANDED  फॉर्म्युलेशंस चा भारत आणी नेपाल मधील बिझिनेस Rs ३६०० कोटींला विकत घेतला.
 • भारत फोर्ज ही कंपनी AMTEK ऑटो ही कंपनी खरेदी करणार आहे. USA मध्ये क्लास 8 ट्रकची विक्री वाढली याचा फायदा भारत फोर्जला होईल.
 • UFO मुवीजनी क्युबा सिनेमाबरोबर मर्जर केले. त्यामुळे एकंदर ७३०० स्क्रीनचा फायदा घेता येईल.
 • UCO बँक स्टील ASSET मधील ५१% हिस्सा विकणार आहे.
 • डी-लिंक ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
 • DEVONSHIRE कॅपिटल रुची सोया या कंपनीमध्ये ५१% स्टेक Rs ४००० कोटीला खरेदी करणार आहे.
 • हेक्झावेअर, इंटर ग्लोब एविएशन, DR रेड्डीज, HDFC सिम्फनी, DHFL, अजंता फार्मा, ल्युपिन, मेरोको सिंडीकेट बँक, सुप्रीम इंडस्ट्रीज, KPIT, UPL BEL कॅपिटल फर्स्ट, कॉनकॉर टाटा पॉवर, GE T&D, टायटन चे निकाल चांगले आले
 • CDSL सेन्चुरी प्लायवूड, कजारीया, हिरो मोटो यांचे निकाल समाधानकारक आले.
 • महिंद्र लाईफ, WOCKHARDT, सेन्ट्रल बँक, IDBI, स्ट्राईड शासून, आंध्र बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक आले.
 • टी सिरीज, सोनी म्युझिक, आणी सारेगम यांच्यावर ED ने मनी लॉनडरिंगसाठी केस दाखल केली.
 • ऑक्टोबर महिन्यात ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले. मारुती, आयचर मोटर्स, बजाज ऑटो, टी व्ही एस मोटर्स, या कंपन्यांची विक्री वाढली.
 • RCOM या कंपनीने आपल्या जवळील स्पेक्ट्रम आणी टॉवर बिझिनेस विकण्याची तयारी दाखविली आहे. त्याचे त्यांना Rs १७००० कोटी मिळतील असा अंदाज आहे. त्यांनी LENDAR फोरममधील बँकांना ५१% कॅपिटलमध्ये हिस्सा देऊ केला आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • पुढील आठवड्यात नोव्हेंबर ६ २०१७ रोजी रिलायंस नीपॉन ASSET MANAGEMENT कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.

मार्केटने काय शिकवले

आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपल्याला किती रुपये किती दिवसांत मिळतील याचा अंदाज येण्यासाठी जर तो शेअर वायदेबाजारात असेल तर अंदाज घेता इतो. पुट रायटर कोणत्या भावाला खडे आहेत ते पाहावे आणी कॉल रायटर कितीवर आहे हे पहा त्यातून अंदाज येतो किती रुपयांच्या खाली शेअरची किंमत जाणार नाही आणी कोणत्या किंमतीला रेझिस्टन्स येईल हे समजते.

गेल्या गुरुवारी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी  एक्सपायरी झाली सोमवार नोव्हेंबर सिरीजचा पहिला दिवस. अशा दिवशी वायदा बाजाराचे निरीक्षण केल्यास असे दिसले की  १०३०० चा पुट आहे. ११००० चा CALL घेतलेला दिसत आहे. म्हणजे लोकांना अजूनही तेजी अपेक्षित आहे असे जाणवते. पुट CALL रेशियो सुद्धा १.४५ वरून १.३८ झाला आहे.हे सर्व  पाहता मार्केट वाढेल पण वाढण्याचा वेग कमी होईल असे जाणवते.

एखादे डील होणार या अपेक्षेने शेअरमध्ये ट्रेडिंग करणार असाल तर बातम्यांकडे लक्ष द्या. जर ते डील रद्द होणार अशी कुणकुण लागली तर शेअर्स विकून टाका. ज्याप्रमाणे IDFC आणी श्रीराम ग्रूप यांच्यातील डील रद्द झाले

यावेळी शेअर मार्केटने EASE OF DOING बिझिनेसमध्ये मिळालेल्या चांगल्या रेटिंगची दखल घेतली. लागणार्या तिमाही निकालांकडेही मार्केटचे लक्ष होते. तिमाही निकालांनी फारशी निराशा केली नाही. बँकांच्या तिमाही निकालात जी कसर असते ती सरकार बँकांचे रीकॅपिटलायझेशन करणार आहे या बातमीने भरून काढली. त्यामुळे मार्केट (निफ्टी आणी सेन्सेक्स) ऑल टाईम हायला बंद झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३६८५, NSE निर्देशांक निफ्टी १०४५२ वर तर बँक निफ्टी २५६५० वर बंद झाले.

आठवड्याचे समालोचन – आनंदी आनंद गडे – २३ ऑक्टोबर २०१७ ते २७ ऑक्टोबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आनंदी आनंद गडे – २३ ऑक्टोबर २०१७ ते २७ ऑक्टोबर २०१७

या आठवड्यात खूपच मजा आली. सरकार सांगत होते बँकांची स्थिती फारशी चांगली नाही. म्हणून बँकांमध्ये काही प्रमाणात भांडवल घालण्याची गरज आहे. प्रत्यक्षात काहीच घडत नव्हते. पण मंगळवारी अर्थमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केले की आम्ही सरकारी बँकांमध्ये Rs २.११ लाख कोटी २ वर्षाच्या कालावधीत घालू. त्यांनी या योजनेचा आराखडा सादर केला. त्यामुळे बुधवार तारीख २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे शेअर्स वधारले. काही बँकांचे शेअर्स तर ३०% ते ४०% ने वाढले. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे विशेषतः सामान्य लोकांचे पैसे या बँकांच्या शेअर्समध्ये अडकले होते त्यांना ते फायद्यात विकायला मिळाले. त्यामुळे खुशीची, आनंदाची लहर पसरली. BSE आणी NSE या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकानी नवीन उच्चांक प्रस्थापित केला. शेअर मार्केटमध्ये नवीन इतिहास रचला गेला.

सरकारी अनौन्समेंट

 • सरकारने असे जाहीर केले की येत्या दोन वर्षात सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना Rs २.११ लाख कोटी एवढे भांडवल पूरवेल. इंद्रधनुष योजनेखाली Rs १८००० कोटी देणार. तसेच Rs १३५ कोटी बॉंडसच्या माध्यमातून तर Rs ०.५८ लाख कोटी इक्विटी कॅपिटलच्या माध्यमातून भांडवल म्हणून पुरवले जाईल. हे भांडवल पुरवले गेल्यामुळे सरकारी बॅंका अधिक कर्ज देऊ शकतील. यात MSME (मेडियम आणी स्माल एन्टरप्रायझेस) सेक्टरला कर्ज देण्यावर भर असेल. सरकारने सांगितले की ते बँकांच्या कार्यक्षमतेवर बारकाईने लक्ष ठेवतील आणी कार्यक्षमतेप्रमाणे बँकांना भांडवल पुरवले जाईल.
 • तसेच हे सरकार येत्या पांच वर्षात रस्ते बांधणीसाठी Rs ६.९२ लाख कोटी खर्च करून ८३६७७ किलोमीटर्स रस्ते बांधेल. यात भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३४८०० किलोमीटर्सचा समावेश असेल. या दुहेरी उपायांमुळे रोजगार आणी बँक क्रेडीट यात लक्षणीय वाढ होईल
 • सरकारने रब्बी पिकाच्या MSP (मिनिमम सपोर्ट प्राईस) जाहीर केल्या.
 • सरकारने साखरेसाठी ठरवलेल्या स्टॉक लिमिटची मर्यादा ६ महिन्यांनी वाढवली ही कालमर्यादा २८ ऑक्टोबरला संपत होती
 • सरकारने ‘भारत नेट फेज एक’ डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होईल असे सांगितले.
 • सरकारने BEMLमधील स्टेक विकण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाने विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढे ढकलला. तसेच NBCC मधील डायव्हेस्टमेंटचा विचार पुढे ढकलला.
 • सरकारच्या एअरइंडियामधील विनिवेशासाठी सात बोली मिळाल्या.
 • सरकारने NLC मधील ३% ते ५% स्टेक ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून डायव्हेस्ट केला ऑफरसाठी किमत प्रती शेअर Rs ९४ ठरवली. रिटेल इन्व्हेस्टरला ३.५% डीस्काउंट दिला ही ऑफर फॉर सेल तारीख २५ ऑक्टोबर (नॉन रिटेल कोटा) आणी २6 ऑक्टोबरला (रिटेल कोटा) झाली दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
 • महाराष्ट्र सरकारने GVKMIAL ला Rs १६००० कोटींचे नवी मुबई विमानतळाचे काम दिले.
 • सरकारने असे जाहीर केले की १ जानेवारी २०१८ पासून सर्व देशात डायरेक्ट फरटीलायझर सबसिडी योजना लागू केली जाईल.
 • गुजरात सरकारने ड्रीप इरिगेशन पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना GST माफ केले आहे. या ड्रीप यंत्रणेवरचा GST राज्य सरकार भरेल.
 • गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी ९ डिसेंबर आणी १४ डिसेंबरला मिळून एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे गुजरातशी संबंधीत कंपन्या GNFC, GSFC, GHCL, GICPL, गुजरात अल्कली, गुजरात GAS या कंपन्यांनी शेअरमार्केटचे लक्ष वेधले आहे.
 • खाण मंत्रालयाने नाल्कोमध्ये ९.३% स्टेकची डायव्हेस्टमेंट करायची ठरवली आहे.
 • आता GST खाली सेवा क्षेत्रातील कंपन्या कॉम्पोझिशन योजनेचा फायदा घेऊ शकतील. त्याना आता ५% GST भरावा लागेल. कॉम्पोझिशन योजनेत सामील होण्याची मर्यादा Rs १ कोटी करण्याचा सरकार विचार करत आहे.
 • मोठ्या बिझिनेसनी छोट्या बिझिनेस कडून केलेल्या खरेदीवर इनपुट TAX क्रेडीट मिळेल.
 • नोव्हेंबर महिन्यात सरकार भारत ETF चा दुसरा हप्ता आणण्याची शक्यता आहे. सरकार Rs १०००० कोटी उभारेल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • भारत सरकारने बँकांच्या रीकॅपिटलायझेशनसाठी केलेल्या उपाययोजनांचे RBI ने स्वागत केले. AXIS बँकेने जिंदाल स्टील आणी पॉवर या कंपनीला दिलेले कर्ज NPA म्हणून जाहीर करावे असे RBI ने सांगितले. तसेच HDFC बँकेला एक प्रोजेक्टसाठी दिलेले कर्ज NPA करायला सांगितले.
 • सुप्रीम कोर्टाने जे पी ग्रुपला कोर्टात Rs २००० कोटी भरण्यासाठी ५ नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ दिली. जे पी ग्रुपने आपण यमुना एक्सप्रेस हायवे विकून हे पैसे भरू असे सांगितले.
 • सुप्रीम कोर्टाने घर खरेदीदारांना रिफंड देण्यासाठी युनिटेकचे प्रमोटर संजय चंद्रा यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना Rs १००० कोटी कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • SBI ने TRACTOR फायनान्ससाठी एस्कॉर्टस लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला.
 • RAMCO सिस्टिम्स या कंपनीला पे रोल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मोठी ऑर्डर मिळाली.
 • ITNL ला NHAI नी ‘बांसकोपा टोल प्लाझा’ वर टोल वसूल करण्याची परवानगी दिली.
 • डेल्टा कॉर्पने नेपाळमध्ये कॅसिनो चालू करण्यासाठी एवरेस्ट HOSPITALITY बरोबर करार केला.
 • KEC INTERNATIONALला Rs १९३१ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • L & T इन्फोटेक ने APTIUS बरोबर डिजिटल सोल्युशन्ससाठी करार केला.
 • एका दिवसात सर्वात जास्त गाड्या विकण्याचे रेकॉर्ड हिरो मोटोचे झाले. त्यांनी एका दिवसात ३ लाख गाड्या विकल्या.
 • श्री लंकेमध्ये थ्री व्हीलरवर बंदी येण्याची शक्यता आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सेफ्टी STANDARDS राखली जात नाहीत असे श्री लंकेचे म्हणणे आहे. कारण तिथे रिक्षांचा स्कूटर्ससारखा वापर केला जातो. म्हणून ३५ वर्षावरील नागरिकांनाच परवाना द्यावा असा विंचार श्री लंकेचे सरकार करीत आहे. याचा परिणाम बजाज ऑटो आणी टी व्ही एस मोटर्स या कंपन्यांवर होईल.
 • आर्सेलर मित्तल ही जगातली सर्वात मोठी स्टील कंपनी भारतातील आजारी स्टील कंपन्या घेण्यामध्ये रुची दाखवत आहे. या मध्ये भूषण स्टील, मॉनेट इस्पात, विसा स्टील यांचा समावेश आहे. पूर्वी अशा कंपन्या विकत घेताना किंवा ट्रान्स्फर होताना विकल्या जाणार्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या मंजुरीची जरुरी होती आता अशी मंजुरी लागणार नाही.
 • USAचे संरक्षणमंत्री टीलर्सन हे भारताच्या दौर्यावर येत आहेत. त्यावेळी संरक्षण आणी तत्संबंधित काही करार होण्याची शक्यता आहे. याचा फायदा संरक्षण सामुग्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. उदा BEL, BEML, वालचंदनगर इंडस्ट्रीज, ASTRA MICROWAVE.
 • गायत्री प्रोजेक्ट्स आपल्या ७ रोड टोल प्रोजेक्ट वेगळ्या करून नवीन कंपनी बनवण्याच्या विचारात आहे.
 • भेलला तेलंगाना सरकारकडून 4000MW थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी Rs २०००० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • आर कॉम ही कंपनी आपला 2G आणी 3G बिझिनेस ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत बंद करणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यावयास सांगितले आहे. सर्व 2G आणी 3G ग्राहकांचे 4G मध्ये रुपांतर करण्यात येईल. २१ नोव्हेंबर २०१७ पासून ते त्यांचा DTH बिझिनेस बंद करणार आहेत.
 • WOCKHARDT, ल्युपिन, अल्केम LAB, GRANULES इंडिया, ऑरोबिंदो फार्मा या कंपन्यांच्या वेगवेगळ्या औषधांना USFDA ने मंजुरी दिली.
 • ONGCने IOC आणी GAIL यांच्यातील स्टेक विकण्याचा आपला निर्णय पुढे ढकलला. तसेच HPCL चे अधिग्रहण डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याच्या ऐवजी मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले.
 • मारुती सुझुकीचा तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला. विक्री, PAT EBITDA वाढली.
 • इन्फोसिसचा निकाल चांगला आला. इन्फोसिसने Rs १३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. इन्फोसिसने जाहीर केले की पनाया आणी इतर डीलमध्ये काहीही चुकीचे झाले नाही.
 • ITC ची सिगारेट्सची विक्री ४०% ने कमी झाली. त्यांचे इन्कम, नफा यांच्यात वाढ झाली.
 • GIC हौसिंग, PNB हौसिंग, CROMPTON, इंडिया बुल्स व्हेन्चर, ज्युबिलंट फूड्स, सारेगम, विजया बँक, क्वेस कॉर्पोरेशन, मास्टेक, v गार्ड इंडस्ट्रीज, इमामी, RBL BANK, अंबुजा सिमेंट, RALLIS इंडिया, कॉरोमोन्डेल INT, रेडिको खेतान, HUL, नोसील, HAVELLS, झुआरी अग्रो, हिंदुस्थान झिंक, टीन प्लेट, इंडिया बुल्स हौसिंग, ग्राफाईट इंडिया, HDFC बँक, युनायटेड स्पिरीट, श्री कलाहस्ती पाईप्स यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • येस बँक, कॅनरा बँक, बायोकॉन, इक्विटास, टाटा कम्युनिकेशन, GHCL, यांचे निकाल असमाधानकारक होते.

कॉर्पोरेट एक्शन

 • कॅस्ट्रोल इंडियाने बोनसवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ७ नोव्हेंबरला बोलावली आहे.
 • पॉवर सेक्टरसाठी एक मोठी युनिव्हर्सल कंपनी स्थापन केली जाईल. या अंतर्गत NTPC ही NHPC आणी SJVN मध्ये मोठा स्टेक घेईल.
 • पोलारीस कन्सल्टिंग या कंपनीने ३१ ऑक्टोबरला डीलिस्टिंग वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • महिंद्र लॉजिस्टीक या महिंद्र ग्रूपमधील कंपनीचा IPO २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ओपन राहील. प्राईस BAND Rs ४२५ ते Rs ४२९ आहे. मिनिमम लॉट ३४ शेअर्सचा आहे.
 • श्रेय इक्वीपमेंट फायनान्स या कंपनीच्या Rs २००० कोटींच्या IPO ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.
 • HDFC लाईफ चा IPO ७ नोव्हेंबरला ओपन होऊन ९ नोव्हेंबरला बंद होईल प्राईस BAND Rs २७५ ते Rs २९० आहे.
 • द न्यू इंडिया अशुअरंस कंपनी लिमिटेडचा IPO १ नोव्हेंबर २०१७ ला ओपन होऊन ३ नोव्हेंबर २०१७ ला बंद होईल. प्राईस BAND Rs ७७० ते Rs ८०० आहे. मिनिमम लॉट १८ शेअर्सचा आहे.
 • खादीम ही रिटेल फुटवेअर क्षेत्रातील कंपनी Rs ५४३ कोटींचा IPO २ नोव्हेंबर २०१७ ते ६ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान आणत आहे. प्राईस BAND Rs ७४५ ते Rs ७५० आहे. मिनिमम लोट २० शेअर्सचा आहे

या आठवड्यातील लिस्टिंग

 • इंडिया एनर्जी एक्स्चेंजचे लिस्टिंग Rs १५०० ला झाले या कंपनीने IPO मध्ये Rs १६२५ला शेअर्स दिले होते
 • जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे लिस्टिंग Rs ८५० वर झाले. IPOमध्ये Rs ८६७ ना शेअर्स दिले होते.

मार्केटने काय शिकवले

खरे पाहता बँकांना प्रत्यक्षात पैसा मिळाला कां ? तर नाही हेच उत्तर द्यावे लागेल. कोणत्या वेळेला, कोणत्या बँकेला, किती आणी कोणत्या प्रमाणात पैसा, कोणत्या अटींवर मिळेल हे ही स्पष्ट झाले नाही. जे भांडवल देणार ते दोन वर्षांच्या कालावधीत देणार. दिलेला पैसा पुरेश्या प्रमाणात देणार कां? आणी एवढा पैसा दिल्यावर बँकांच्या परिस्थितीत समाधानकारक सुधारणा होईल कां?  या सर्व प्रश्नाचे उत्तर लोकांचे लोकांनीच स्वतःचे स्वतःला दिले. आणी या एका बातमीच्या आधारावर सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांचे शेअर्स दिवसभर चढ्या भावात खरेदी केले. आणी नंतर निराश होऊन तिसरे दिवशी विकले सुद्धा! सरकारच्या हातून कोणतेही पैसे लवकर सुटत नाही हेच खरे

सर्व सरकारी बँका तोट्यात आहेत. NPA वाढत आहेत स्लीपेजीस आणी त्यांच्याकरता लागणारी प्रोविजन वाढत आहे. त्यामुळे मार्केट वाढत असले तरी बँकिंग सेक्टर मंदीत आहे. त्याला थोडा अपवाद खाजगी बँकांचा आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये ट्रेडर्सनी भरभरून SHORTING  केले होते. ते SHORTS  कव्हर करावे लागले असे दिसते. त्याचबरोबर खाजगी बँका आणी नॉन-बँकिंग फायनांशियल कंपन्या मंदीत होत्या. हाव आणी भीतीचे विचित्र समीकरण तयार झाले. त्यात भीती जणू काही हद्दपार झाली होती.

या आठवड्यात लागलेले बरेचसे निकाल काही समाधानकारक तर काही चांगले लागले. सरकारी घोषणा, डायव्हेस्टमेंट चालू आहे. मार्केटला आवश्यक असलेले ट्रिगर किंवा खुराक सरकार पुरवत आहे. सरकारी धोरणांमुळे कंपन्यांच्या बिझिनेसवर विपरीत परिणाम होईल, किंवा होतो आहे ही भीती आलेल्या चांगल्या निकालांमुळे कमी होत आहे. सरकारच्या उद्योगाशी सतत चालू असलेल्या संवादामुळे उद्योग जगतात सरकारविषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण होत आहे. सरकार आपला खर्च, गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रात विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर, कृषी, उर्जा या क्षेत्रात वाढवीत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. आणी त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होताना दिसत आहे.

ज्यांनी कधी काळी शेअर्समध्ये गुंतवणूक केली पण त्यात घाटा झाला, वेळ मिळेना, मार्केटमध्ये यशस्वी आणी फायदेशीर व्यवहार करणे जमेना, अशा अनेक कारणांनी मार्केटला राम राम ठोकला होता त्यांनी मार्केटकडे थोडेसे लक्ष देऊन त्यांचे खरेदी केलेले जुने शेअर्स फायद्यात असतील तर आलेल्या संधीचा फायदा घ्यावा. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. खूप काळ प्रतीक्षा केल्याचे चांगले फळ त्याना मिळू शकते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३१५७, NSE निर्देशांक निफ्टी १०३२३ तर बँक निफ्टी २४८४० वर बंद झाले.

आठवड्याचे समालोचन – आतिषबाजी शेअरमार्केटमध्ये -१६ ऑक्टोबर २०१७ ते १९ ऑक्टोबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा लेख आपल्याला वाचायला मिळेल तेव्हा नुकतीच भाऊबीज झालेली असेल! फार गोड दिवस ! लहानपणीच्या बर्याच आठवणी ताज्या करणारा दिवस! अर्थात ओवाळणी आलीच ही ओवाळणी आपण चांगल्या शेअर्सच्या स्वरूपात घालू शकता. जर या शेअर्सची किंमत वाढत राहिली तर वर्षानुवर्षे बहिणीच्या मनात ही भावाने दिलेली एक गोड आठवण राहील. बहिणीला चिडवता येईल यावर्षी ओवाळणी नाही असे सांगत तिच्या नावावर शेअर्स घेवून तिच्या खात्यात टाकून तिला सरप्राईज देता येईल. अडचणीच्या वेळी ही ओवाळणी हा एक भक्कम आधार सिद्ध होऊ शकते. म्युच्युअल फंडांकडे येणार्या पैशात लक्षणीय वाढ झाली आहे फक्त पैसेच नाही तर म्युच्युअल फंडांचे ग्राहकही वाढत आहेत. त्यामुळे शेअरमार्केटमध्ये येणारा लीक्विडीटीचा ओघ काही काल नियमितपणे येत राहील.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने चीन आणी EU मधून आयात होणाऱ्या कोटेड flat स्टीलवर ANTI DUMPING ड्युटी लावली.
 • मॉनसनटोवर आंध्र प्रदेश राज्य सरकार क्रिमिनल केस दाखल करण्याची शक्यता आहे.
 • सरकारने NTPC चा दिल्लीचा कोल प्लांट पर्यावरणाच्या कारणासाठी बंद केला.
 • NCLT ने निक्को कॉर्पोरेशन या कंपनीचे लिक्विडेशन करण्याची ऑर्डर दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • सप्टेंबर महिन्यासाठी WPI निर्देशांक ३.२४% वरून कमी होऊन २.६०% झाला फूड WPI ४.४१ वरून १.९९ % इतका कमी झाला.
 • सप्टेंबर महिन्यात भारताची निर्यात २५.६७% ने वाढून US $ २८.६ बिलियन झाली. भारताची आयात १८.१% ने वाढून US$ ३७.८ बिलियन झाली. ट्रेड डेफिसीट US $ ८.९८ बिलियनएवढी झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ‘NEXIUM’ हे औषध ऑरोबिंदो फार्माच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या औषधाला USFDA कडून परवागी मिळाली. युनिट ७ मध्ये हे औषध बनवले जाते. पोटदुखीसाठी हे औषध वापरले जाते.
 • क्लारीस लाईफ सायन्सेसची FPI लिमिट २४% वरून ४९% केली. NRI ची सीमा १०% वरून २४% केली.
 • ASTRAZENCA ला त्यांचे मधुमेहावरचे औषध भारतात विकायला परवानगी मिळाली.
 • AXIS बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.बँकेने भविष्यात दोन तिमाहीमध्ये पॉवर क्षेत्रातील NPA वाढतील असे सांगितले.
 • पेनिन्सुला LAND या कंपनीला गोदरेजकडून जमिनीचे Rs २०० कोटी मिळाले.
 • डी बी रिअल्टी आणी एल आय सी हौसिंग फायनान्स मधील वाद मिटला.
 • १७ ऑक्टोबर २०१७ पासून MCX वर सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु झाले. किमान लॉट  १ किलोचा असेल. हे ट्रेडिंग सकाळी १० वाजल्यापासून रात्री ११-३० पर्यंत चालेल. MCX चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. टर्नओव्हर १७% आणी मार्जीन २१% वरून ३०% झाले.
 • एल आय सी ने आपला अडाणी पोर्टमधील स्टेक २.४३% वरून ७ % पर्यंत वाढवला.
 • JSPL त्यांचा एक प्लांट विकणार आहेत. आलेल्या पैशातून ते OBC चे कर्ज फेडू शकतील.
 • इंटलेक्ट डिझाईन एरेना ही कंपनी बँकॉकच्या एका बँकेसाठी सॉफटवेअर बनवणार आहे.
 • प्रताप SNACKS ची FPI लिमिट २४% अरुण १००% केली.
 • भूषण स्टील आणी मॉनेट इस्पात खरेदी करण्यामध्ये JSW स्टील आणी एडलवेस यांनी रस दाखवला.
 • नेपालमध्ये पूल बनवण्यासाठी टीटाघर WAGANला US$ ६० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • जैन इरिगेशन या कंपनीने २६३ कोटींचे FCCB फेडले.
 • बजाज फायनान्स, कन्साई नेरोलाक, कोलगेट, गृह फायनान्स, स्टरलाईट टेक्नोलॉजी, फेडरल बँक,ACC,बजाज ऑटो या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • विप्रोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
 • रिलायंस जीओ ने आपले काही प्लान महाग केले. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्यांना दिलासा मिळेल.
 • रिलायंस इंडस्ट्रीजने KG D-६ या बंगालच्या खाडीतील फिल्ड्समधून ७ मिलियन क्युबिक मीटर्स प्रती दिवस उत्पादन करण्याची आपली US$ १.४ बिलीयन्सची योजना सादर कली.
 • अल्ट्रा टेक सिमेंट या कंपनीच्या ऑपरेटिंग कार्यक्षमतेमध्ये चांगली वाढ झाली. इन्कम(Rs ६९३६ कोटी) ७% ने तर EBITDA ( Rs १५५० कोटी) १३% ने वाढले. पण J P ग्रूपकडून अक्वायर केलेल्या प्लांटचा अक्विझिशन करताना  केलेला खर्च आणी ते प्लांट कंपनीच्या गुणवत्तेपर्यंत आणण्याच्या खर्चामुळे PAT (Rs ४२३ कोटी) ३१% ने कमी झाले.
 • ‘हिरो’ ग्रूप भिलवारा ग्रुपचा ८३.५ MW विंड पॉवर प्रोजेक्ट खरेदी करणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • इंडसइंड बँक आणी भारत फायनांसियल यांच्या मर्जरला परवानगी मिळाली. तुमच्या जवळ भारत फायनांशियलचे १००० शेअर्स असतील तर तुम्हाला इंडसइंड बँकेचे ६३९ शेअर्स मिळतील. हे मर्जर पूर्ण व्हायला १५ महिने लागतील. RBI, CCI आणी सेबी यांच्याकडून परवानगी मिळवावी लागेल.
 • गॉड फ्रे फिलिप्स या कंपनीने आपला चहाचा कारभार गुडरिक ला Rs २० कोटींना विकला. नेहेमी ज्या कंपनीकडे पैसे येणार असतात त्या कंपनीचा शेअर वाढतो पण यावेळी गुडरिकचा शेअर वाढला कारण त्याना चहाचा कारभार स्वस्त्यात मिळाला.
 • जे पी ग्रूप हे त्यांची जे पी पॉवर ही कंपनी Rs १०००० कोटीना विकणार आहेत.
 • IRB इफ्राच्या सबसिडीअरीला ‘CG टोल ‘ ला परवानगी मिळाली. SBI या कंपनीला Rs १४०० कोटी कर्ज देणार  आहे.
 • SAIL या सरकारी कंपनीला बोनस किंवा लाभांश देण्यासाठी स्टील मंत्रालयाने परवानगी नाकारली. INS क्लींसटन या कंपनीला काही स्पेशल प्रोडक्ट्स विकणार आहे.
 • टाटा टेलिसर्विसेस (महाराष्ट्र) ही आपल्या प्रमोटर्सना प्रेफरन्स शेअर्स किंवा डीबेन्चर्स इशू करून Rs २०००० कोटी भांडवल उभे करेल. हे पैसे कंपनीवर असलेले कर्ज फेडन्याकार्ता वापरले जातील.
 • भारती एअरटेल आणी टाटा ग्रूपमध्ये DTH बिझिनेससाठी बोलणी चालू आहेत.
 • M & M फायनांसियल त्यांच्या ब्रोकिंग आणी इन्शुरन्स बिझिनेसमधील ५% स्टेक XL ग्रुपला विकणार आहेत.
 • TCPL या BSE वर लिस्टिंग असलेल्या कंपनीचे NSE वरही लिस्टिंग झाले.
 • फ्लिपकार्ट फ्युचर लाईफस्टाईलमधला ८% ते १०% स्टेक घेणार आहे.
 • नीला इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी आपला रिअल इस्टेट बिझिनेस वेगळा काढून इन्फ्रास्ट्रक्चर बिझिनेसवर लक्ष केंद्रित करार आहे.नव्या कंपनीचे शेअर्स १:१ या प्रमाणात मिळतील

या आठवड्यात येणारे IPO

पुढील आठवड्यात रिलायंस नीपपॉन लाईफ इन्शुरन्सचा IPO येणार आहे. हा IPO २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान ओपन राहील आणी याचा प्राईस BAND Rs २४७ ते Rs २५२ आहे. मिनिमम लॉट ५९ शेअर्सचा आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • १६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोदरेज अग्रोव्हेटचे Rs ६२१ वर लिस्टिंग झाले. हे शेअर्स IPO मध्ये Rs ४६० प्रती शेअर्स या भावाने दिले होते.
 • १८ ऑक्टोबर २०१७ रोजी MAAS चे Rs ६६० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs ४५९ प्रती शेअर या भावाने शेअर्स दिले होते.

मार्केट काय शिकवले

यावेळी आपण कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाल्यावर काय अनुभव घेतलात? निकाल चांगला आल्यास शेअर Rs २ वाढतो आणी नंतर पडतो. पण ज्या क्षेत्राकडून फारशी अपेक्षा नव्हती अशा क्षेत्रातील कर्नाटक बँक फेडरल बँक यांचे निकाल सुंदर आल्याबरोबर मार्केटने खूपच चांगले स्वागत केले. याचाच अर्थ असा की निकाल जरी चांगले आले तरी मार्केट प्राईस आणी EPS यांची तुलना करता असे आढळते की शेअर खूप महाग झाला आहे. त्यामुळे निकालाचे कौतुक करून ट्रेडर्स किवा गुंतवणूकदार शेअर्स विकायला सुरुवात करतात. यालाच सेल ऑन न्यूज असे म्हणतात.

कोणताही सणवार साजरा करत असताना आपण प्रथम सुरुवात साफसफाईने करतो. भांडणे विसरण्याचा प्रयत्न करतो. सर्व कटू आठवणी बाजूला सारून नव्या वर्षाला सामोरे जायला तयार होतो. काही वेळा आपले निर्णय चुकतात, काही वेळा कंपन्यांचे निर्णय चुकतात. त्यामुळे आपल्या पोर्टफोलीओत WEAK शेअर्स जमा होतात. अशा WEAK शेअर्समधली गुतंवणूक फायद्याची ठरत नाही. जुन्या गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमधील weak शेअर्स आताच्या तेजीत विकून आपल्या पोर्टफोलीओची साफसफाई करावी. तर नव्याने  व्यवहार करणाऱ्यानी  आपल्या पोर्टफोलिओत weak शेअर्स जमाच होणार नाहीत याची काळजी घ्यावी. बदललेल्या परिस्थितीत विचारांच्या दिव्याच्या प्रकाशात पोर्टफोलिओमध्ये आवश्यक ते बदल करून नव्या वर्षाचे स्वागत करा. मार्केट नवीन नवीन शिखरे सर करत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा योग्य गुतंवणूक करून फायद्याची नवीन शिखरे सर करा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२३९० वर तर NSE निर्देशांक १०१४६ तर बँक निफ्टी २४००९ वर बंद झाले.

 

आठवड्याचे-समालोचन – लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा – ९ ऑक्टोबर २०१७ ते १३ ऑक्टोबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा – ९ ऑक्टोबर २०१७ ते १३ ऑक्टोबर २०१७

दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी करायला सुरुवात झाली. सर्व गुंतवणूकदारांना आणी ट्रेडर्सना शेअरमार्केटने दिवाळी बोनस दिला असेच म्हणावे लागेल. लक्ष्मीशिवाय काहीच साध्य होत नाही हेच खरे ! आम्हा गृहिणींना तर सगळ्यांच्या सर्व मागण्या पुऱ्या कराव्या लागतात. लक्ष्मी असेल तर मुलांचे हट्ट पुरवता येतात. त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तीच माझ्या दृष्टीने दिवाळी ! पैशाचे सोंग आणता येत नाही. पण मला मार्केटचे आभार मानले पाहिजेत. कोणताही पक्षपात न करता मार्केटने सर्वांना खुश केलं, मार्केट जणु म्हणालं ‘ज्याला जेवढे दोन हातांनी कमवता येईल तेवढे कमवा. मी माझ्या अनंतहस्तांनी तुमच्यासाठी पैशांची आणी आनंदाची बरसात करत आहे.’

तुमचा शेअरमार्केटचा अभ्यास वाढवा, एक उद्योग असे स्वरूप न ठेवता त्याला व्यासंगाचे स्वरूप द्या. जनी मनी, स्वप्नी  तसेच विचारात लक्ष्मीचे स्वरूप ठेवून सातत्याने शेअरमार्केटचा व्यवसाय करा. म्हणजे जेथून परत येण्याचा मार्ग संपतो असे घर लक्ष्मीला मिळेल आणी ती तिथे निरंतर वास करेल. आणी ते घर तुमचेच असेल हा विश्वास बाळगा. नाहीतरी कृष्णाने सांगितले आहे माझा हो, माझी पूजा (श्रमांनी विश्वासाने) कर म्हणजे माझे घर म्हणजेच लक्ष्मीचे घर म्हणजे तुमचेच घर होईल.

या दिवाळीच्या निमित्ताने शेअर मार्केट मधील छोट्यामोठ्या, तज्ञ आणी नवख्या गुंतवणूकदाराना आणी ट्रेडर्सना आणी माझ्या शेअरमार्केट प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना विशेषतः नवीन सुरुवात केलेल्या माझ्या ब्लॉगच्या, पुस्तकांच्या वाचकांना लक्ष्मीने भरपूर अभ्यास, श्रम करण्याची ताकत देवो आणी त्यांच्या घरी निरंतर आणी वाढत्या प्रमाणात वास करो हीच माझी शुभेच्छा.

आंतरराष्ट्रीय घडामोडी        

 • क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण सौदीमध्ये US$ १०० बिलीयनचा एक इशू येत आहे. त्यासाठी त्याना क्रूडचा भाव तेजीत ठेवावा लागेल.
 • सौदी EMIRATES भारतात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑईल एक्स्प्लोरेशन उद्योगात असणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. उदा. ABAN OFFSHORE, डॉल्फिन
 • सोमवारी पंतप्रधानांनी ऑईल आणी GAS सेक्टरमधील कंपन्यांच्या CEO ची मीटिंग बोलावली. या बैठकीत पंतप्रधानांनी उर्जाक्षेत्रासाठी व्यापक धोरण ठरवण्यासाठी ठराव मागवले. ऑईल, GAS आणी इलेक्ट्रिसिटी ह्या गोष्टी GST अंतर्गत आणण्याची मागणी झाली. पंतप्रधानानी GAS च्या किंमती कमी करण्याचा आणी GAS HUB स्थापन करण्याचे आवाहन केले.
 • सरकारने सांगितले की सोने आणी जडजवाहीर खरेदी करण्यासाठी KYC आवश्यक असण्याची मर्यादा आता Rs २ लाख ठेवली आहे. तसेच ज्युवेलर्सना आता Rs ५०००० पेक्षा जास्त खरेदी करणार्यांची माहिती PMLA ला देण्याची जरुरी नाही. यामुळे सणासुदीच्या दिवसात KYC नियम Rs ५०००० साठी आवश्यक केल्यामुळे कमी झालेली विक्री आता वाढेल. यामुळे जवाहिरे आणी सोन्याचे दागिने बनवणार्यांची एक मागणी सरकारने पुरी केली आहे.
 • सरकारने आता PPF आणी NSC, आणी KVC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार सक्तीचे केले आहे.
 • ज्या कंपन्यांनी डीमॉनेटायझेशन नंतर मोठी रोकड जमा करून नंतर काढून घेतली त्यांच्यावर आता सरकार आपला रोख वळवणार आहे. अशा खात्यांची संख्या IDBI बँक, कॅनरा बँक आणी बँक ऑफ बरोडामध्ये सगळ्यात जास्त आहे.
 • सरकारने चीनमधून आयात होणार्या अलॉय आणी नॉन अलॉय स्टील वायर आणी रॉडसवर US $ ५३६ ते US $ ५४६ इतकी ANTI DUMPING ड्युटी लावली
 • महाराष्ट्र आणी गुजरात सरकारने पेट्रोल आणी डीझेल वरील VAT कमी केल्यामुळे पेट्रोल आणी डीझेल च्या किंमती कमी होतील.
 • GAILने GAS खरेदीसाठी बऱ्याच दीर्घ काळाकरता करार केले होते त्यामुळे GAS ची खरेदीची किंमत US $ १३ पडत होती. त्यामुळे GAS खरेदी महाग पडत होती. म्हणून GAS SWAPING करायला ‘GAIL’ला परवानगी दिली. जपानमधून स्वस्त  ‘GAS’ आयात करण्यासाठी परवानगी मिळाली. वाहतूक खर्चात बचत हा GAS SWAPING चा उद्देश आहे. प्रथम ‘GAIL’USA मधून GAS खरेदी करत होते. आता USA कडून GAS जपान घेईल. आणी भारत जपानकडून ‘GAS’ घेइल. हे समजावून घ्यायचे असेल तर जे लोक नोकरीला घेतले जातात त्याना त्यांच्या राहत्या घराच्या ५ किलोमिटरच्या परिघात पोस्टिंग देण्याचा प्रयत्न केला गेल्यास ज्या पद्धतीने असे पोस्टिंग दिल्यामुळे वाहतुकीत जाणारा वेळ खर्च आणी शक्ती यांचा अपव्यय टळतो तीच पद्धत GAS च्या बाबतीत वापरली आहे. जो देश ज्या देशाच्या जवळ असेल त्याने तेथून GAS घ्यावा असे ठरले. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचेल.
 • सरकार NATIONAL PROJECT CONSTRUCTION विकणार आहे. यासाठी ८ नोव्हेंबर पर्यंत बोली मागवल्या आहेत.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ऑगस्ट महिन्यासाठी IIPचे आकडे चांगले आले IIP ४.३% झाले.
 • सप्टेंबर महिन्यासाठी CPI ३.२८% झाला.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • GST कौन्सिलची मीटिंग ६ ऑक्टोबर २०१७ ला झाली. या मीटिंग मध्ये छोट्या व्यापाऱ्यांनी आणी SME नी व्यक्त केलेल्या अडचणी तसेच निर्यात करण्यात GST मुळे येणार्या अडचणी आणी त्यावरच्या उपायांबद्दल चर्चा आणी कारवाई झाली. ती खालीलप्रमाणे
  • GST कौन्सिलने २७ वस्तूंवरील GSTचे दर कमी केले. पंपासाठी जे स्पेअरपार्ट लागतात त्यांच्यावरील GST कमी केला त्याचा फायदा रोटो पंप, शक्ती पंप, तसेच KSB पंप्स आणी किर्लोस्कर BROS या कंपन्यांना फायदा होईल.
  • कॉम्पोझिशन स्कीम लागू होण्याची मर्यादा Rs ७५ लाखापासून Rs १ कोटी केली. आणी या योजनेखाली येणार्या छोट्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना रिटर्न भरण्यासाठी जास्त वेळ दिला.या योजनेत व्यापारी उद्योग आणी रेस्टॉरंट हे त्यांच्या टर्नओव्हरवर अनुक्रमे १% २% आणी ५% GST भरू शकतात.
  • ज्या उद्योगांचा टर्नओव्हर Rs १ कोटीपर्यंत आहे त्याना आता तिमाही रिटर्न भरावा लागेल.
  • E कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या पुरवठादारांना पेमेंट करताना TCS (TAX COLLECTED AT SOURCE) आणी TDS (TAX DEDUCTED AT SOURCE) वजा करण्याची तरतूद १ एप्रिल २०१८ पर्यंत तहकूब ठेवली,
  • सेवा पुरविणाऱ्या कंपन्याना आता त्यांचा टर्नओव्हर जर Rs २० लाखांपेक्षा कमी असेल तर जरी त्या इंटरस्टेट स्तरावर सेवा पुरवत असल्या तरी GST खाली रजिस्ट्रेशन करण्याची जरुरी नाही.
  • मर्चंट एक्स्पोर्टर्सला निर्यातीसाठी खरेदी केलेया देशांतर्गत मालावर ०.१% GST भरावा लागेल.
  • एक्स्पोर्टर्ससाठी E WALLET ची सोय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध केली जाईल. सरकारने उपलब्ध केलेल्या वेगवेगळ्या योजनाखाली जे निर्यातदार निर्यात करीत आहेत त्यांना GST भरावा लागणार नाही.
  • GST रोल ऑऊट होण्याच्या पूर्वी वाहन लीजवर घेतले असेल तर ६५% लीज VALUE वर आताच्या GST दराप्रमाणे कर आकारला जाईल. ही सुट लीजवर घेतलेले वाहन विकले असले तरी उपलब्ध असेल.
  • अर्थमंत्र्यांनी सांगितले की आम्ही उद्योगाच्या मागणीचा विचार करत आहोत आणी त्यावर विचार करण्यासाठी एक GOM (GROUP OF MINISTERS)ची नेमणूक केली जाईल. हा GOM  दोन आठवड्यात त्यांचा रिपोर्ट देईल.
 • सेबीने म्युच्युअल फंडांचे खालील पाच प्रकारात वर्गीकरण केले. (१) इक्विटी (२) DEBT (३) हायब्रीड (४) सोल्युशनओरिएनटेड (५) अन्य योजना. सेबीने याचे पुढे इक्विटीचे १० प्रकारात, DEBTचे १६ प्रकारात आणी हायब्रीडचे ६ प्रकारात वर्गीकरण केले आहे.यासाठी सेबीने BSE वरील ग्रेडिंगप्रमाणे पहिल्या १०० शेअर्सचे लार्जकॅप, नंतरचे १०१ ते २५० पर्यंत मिडकॅप तर बाकीचे सर्व शेअर्स स्माल कॅप म्हणून ठरवले आहेत. म्युच्युअल फंडांच्या या प्रत्येक प्रकाराप्रमाणे एक योजना आणावी असे सांगितले आहे. म्युच्युअल फंडाना यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली आहे. यामुळे ग्राहकांना म्युच्युअल फंडांची त्यांना हवी तशी योजना निवडणे सोपे जाईल.
 • सेबीने बऱ्याच कंपन्यांचे सर्किट फिल्टर १०% वरून २०% केले.
 • RBI ने OBC वर PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) अंतर्गत कारवाई केली.या कारवाईमुळे बँकेच्या स्वायत्ततेवर बरेच निर्बंध येतात.
 • MCX वर दिवाळीपर्यंत सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु होईल.
 • कोची शिपयार्डला इंडियन नेव्हीकडून Rs ५४०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • सदभाव इंजिनिअरिंगला गुजरात सरकारकडून कांडला बंदराच्या संदर्भात Rs १७० कोटीचे काम मिळाले.
 • PSP प्रोजेक्टला Rs १५७० कोटींची मोठी ऑर्डर मिळाली.
 • सरकार इथनॉलचे दर Rs २ नी वाढवणार आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होईल. ८ लाख साखरेचे उत्पादन व्हायला पाहिजे होते ते यावेळी फक्त ३.५ लाख तन झाले. सणासुदीच्या दिवसात साखरेसाठी मागणी असल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत. या उत्पादनात उत्तर प्रदेशात रेकॉर्ड उत्पादन होईल.
 • सिम्बायोमिक्स थेरांप्यूटिक्स एल एल सी या कंपनीचे अधिग्रहण ल्युपिन ने US $ १५ कोटींमध्ये केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा समुहाने सरकारला कळविले आहे की त्यांची गेली २१ वर्षे सुरु असलेली टाटा टेलीसर्विसेस ही कंपनी बंद करण्याचा मानस आहे. कंपनीजवळ असलेले स्पेक्ट्रम विकण्यासाठी किंवा सरकारला सरेंडर करण्यासाठी प्रक्रिया कळवण्याची विनंती सरकारला केली आहे. भारती एअरटेल टाटा टेलीसर्विसेसचा मोबाईल कारभार खरेदी करणार आहे. त्याचबरोबर टाटा टेलीसर्विसेसचे स्पेक्ट्रम तसेच ४० मिलियन ग्राहक भारती एअरटेलकडे ट्रान्स्फर होतील. हे एक नॉनकॅश आणी नॉन DEBT अग्रीमेंट आहे. टाटा टेलीचा फिक्स्ड लाईन आणी BROADBAND बिझिनेस टाटा स्काय कडे तर एन्टरप्राईझ टाटा कम्युनिकेशन कडे सोपवला जाईल.
 • रिलायंस इंडस्ट्रीज आपला USA मधील शेल GAS मालमत्तेचा काही भाग US$ १२६ मिलियनला विकणार आहे.
 • IOC ने असे जाहीर केले की GAIL आणी ऑईल इंडिया या कंपन्यातील सरकारी हिस्सा विकत घेण्यास ते तयार आहेत. ही कंपनी म्यानमार आणी बांगलादेशमध्ये ऑफिस उघडणार आहे एन्नोरे येथे LNG टर्मिनस बांधून ते डिसेंबर २०१८ पर्यंत कार्यान्वित करणार.
 • सरकारने आर्बिट्रेशन अवार्डमध्ये मंजूर झालेली रकम कंपन्यांना द्यावी असे सांगितल्यामुळे JMC प्रोजेक्ट्स, पटेल इंजिनिअरिंग, मान इन्फ्रा, अशा कंपन्यांना आर्बिट्रेशन अवार्ड प्रमाणे पैसा मिळेल.
 • जिंदाल स्टील एंड पॉवर ही कंपनी आपले रायगढ आणी अंशुल येथील ऑक्सिजन प्लांट श्रेय इन्फ्रास्ट्रक्चरला Rs ११२० कोटींना विकणार आहे.
 • मार्कसंस फार्मा या कंपनीच्या गोवा युनिटच्या ३ एप्रिल ते ७ एप्रिल २०१७ दरम्यान USFDA ने केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये क्लीन चीट दिली
 • टाटा पॉवर आपला इंडियन एनर्जी एक्स्चेंज मधील स्टेक विकणार आहे.
 • साउथ इंडियन बँकेचे तसेच लक्ष्मी विलास बँकेचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. जास्त प्रोविजन करायला लागल्यामुळे नफा ८०% ते ९०% ने कमी झाला.NPA ची स्थिती काहीशी स्थिर आहे
 • पेपर PACKAGING कंपन्यांना GST मुळे फायदा होतो आहे उदा हुतात्माकी PPL
 • MCX वर दिवाळीच्या आसपास सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु होत आहे. याचा फायदा EDELWEISS, मोतिलाल ओसवाल, जे एम फायनांसियल, जीओजित, रेलीगेरे यांना होईल. MCX चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता.
 • T I फायनान्स या शेअरला टी टू टी ग्रूप A ग्रूप मध्ये आणून या कंपनीचे सर्किट २०% चे केले.
 • केमिकल बनवणाऱ्या किंवा या उद्योगाशी संबंधीत असणार्या कंपन्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले लागतील असे वाटते. उदा. हिमाद्री केमिकल्स, बोडल केमिकल्स, कनोरिया, GNFC, एस एच केळकर.
 • मर्केटर या कंपनीने आपले एक जहाज विकले.
 • लार्सन आणी टुब्रो या कंपनीला मीटर्ससाठी मोठी ऑर्डर मिळाली. लार्सेन एन्ड टुब्रो आपले नॉन कोअर ASSET विकण्याच्या विचारात आहे.
 • सुवेन लाईफ सायन्सेस या कंपनीला नसांच्या आजारावरील औषधासाठी न्यूझीलंडकडून सन २०३४ पर्यंत पेटंट मिळाले.
 • MOODY’ज नी GMR इंफ्राच्या हैदराबाद विमानतळाला Ba1 ग्रेड दिली याचा अर्थ काही गोष्टी चिंताजनक आहेत.
 • दिल्लीत वर्ल्ड ट्रेड सेंटर बनवण्यासाठी NBCC ला Rs २००० कोटींचे काम मिळाले.
 • USFDA कडून दादरा युनिटला क्लीन चीट मिळाल्यामुळे आता हलोल प्लान्टलाही क्लीन चीट मिळेल असे वाटते
 • मॉनसंटो आणी कावेरी सीड्स यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.
 • STC, MMTC आणी PFC याना लाभांश देण्यातून सूट मिळाली.
 • बजाज कॉर्प, CYIENT, इंडसइंद बँक, GM ब्रुअरीज, गोवा कार्बन, कर्नाटक बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे दुसर्या तीमाहीचे निकाल चांगले आले टी सी एस चे निकाल चांगले आले. प्रॉफीट ८.५% ने वाढले. प्रॉफीट Rs ६४५० कोटी तर इन्कम Rs ३०५४१ आणी EBITDA Rs ७६६० कोटी झाला. टी सी एस ने प्रती शेअर Rs ७ अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअरच्या मार्केट कॅपने Rs ५५० लाख कोटींचे लक्ष्य ओलांडून एक विक्रम केला.
 • मान इंडस्ट्रीजला ‘GAIL’ कडून Rs ९३० कोटींची ऑर्डर मिळाली. या कंपनीची मार्केट कॅप Rs ६०० कोटींची आहे. त्यामुळे ही ऑर्डर मोठीच म्हणावी लागेल.
 • इंडिया बुल्स रिअल इस्टेट ही कंपनी सिंगापूरमधील सबसिडीअरी डीलिस्ट करणार आहे. तसेच आपला रेसिडेनशियल आणी कमर्शियल बिझिनेस वेगळे करणार आहेत.
 • कोची शिपयार्डला इंडियन नेव्हीकडून Rs ५४०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • डिक्सन या कंपनीला फ्लिपकार्टकडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • DCW तामिळनाडूमध्ये नवीन प्लांट चालू करणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राईझेस या कंपनीने 9X MEDIA आणी INX MUSIC ह्या अनुक्रमे हिंदी आणी पंजाबी दूरदर्शनवाहिन्या Rs १६० कोटींना खरेदी केल्या.
 • IPO गोदरेज अग्रोचेट चा IPO एकूण ९५.३ वेळा तर रिटेल कोटा ७.५ वेळेला आणी HNI कोटा २३६ वेळेला ओव्हर सबस्क्राईब झाला. या कंपनीच्या शेअर्सचे १६ ऑक्टोबर २०१७ रोजी लिस्टिंग आहे.
 • HCL इन्फो ही कंपनी Rs ५०० कोटींचा राईट्स इशू आणत आहे. या कंपनीचा पोस्ट खात्याबरोबर वाद चालला होता तो पुढील आठवड्यात मिटेल.
 • इन्फोसिसच्या ‘BUY BACK’ योजनेची रेकोर्ड डेट १ नोव्हेंबर २०१७ ही ठरवली.
 • रिलायंस इंफ्राचा मुंबईमधील ट्रान्समिशन बिझिनेस ‘अडाणी ट्रान्समिशन’ Rs १००० कोटीना खरेदी करणार आहे. हा पैसा कर्ज कमी करण्यासाठी वापरण्यात येईल.
 • रिलायंस निपॉन या AMC(ASSET MANAGEMENT COMPANY) चा IPO २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ओपन राहील. प्राईस BAND Rs २४७ ते Rs २५२ आहे. या शेअर्सचे लिस्टिंग ६ नोव्हेंबर रोजी होईल.
 • चेन्नई पेट्रो या कंपनीत इराणची भागीदारी असल्यामुळे IOC ने चेन्नई पेट्रो बरोबरचे मर्जर रद्द केले.
 • BASF इंडिया BAYERS इंडियाचा बिझिनेस खरेदी करणार आहे.
 • एस्कॉर्टस ही कंपनी रेलटेक ही कंपनी खरेदी करणार आहे.
 • NBCC ही सरकारी कंपनी इंजिनीअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड, HSCC आणी NPCC या तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अक्वायर करण्याची शक्यता आहे.

मार्केटने काय शिकवले

CLSA ने मारुतीचे रेटिंग कमी करून महिंद्र आणी महिंद्रचे रेटिंग वाढवले. याचा अर्थ काहीतरी बातमी येऊ घातली आहे. आपण आपला प्रॉफीट बुक करावा आणी महिंद्र आणी महिंद्र मध्ये काय घडते यावर लक्ष ठेवून या कंपनीतील गुंतवणूक वाढवावी कां याचा विचार करावा.

T I फायनान्स या शेअरला टी टू टी ग्रूप मधून काढून A ग्रूप मध्ये घालून त्याचे सर्किट २०% चे केले. म्हणजेच पेशंटमध्ये सुधारणा दिसते आहे म्हणून डॉक्टरनी डायेट बदलले पथ्य कमी केले अशापैकीच आहे.

मार्केटमध्ये येणाऱ्या बातम्या, आकडेवारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, आणी मानसिकता यांचा परिणाम मार्केटवर होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बुधवार तारीख ११ ऑक्टोबर २०१७ रोजी घडलेली घटना तेच दर्शविते. USA ची ‘वॉरशिप’ चीनच्या समुद्रात आली अशी बातमी आल्याबरोबर ट्रेडर्सनी विक्री सुरु केली. जवळ जवळ ३०० पॉइंट मार्केट पडले. म्हणजे बातमी तेवढी भीतीदायक नव्हती. पण प्रतिक्रिया मात्र फार तीव्र झाली. अशा वेळी एक गोष्ट पक्की की शेअर्स स्वस्तही मिळतात आणी चढ्या भावाला विकले जातात. पण सबुरी आणी निरीक्षण हवे. तेजीच्या मार्केटचा फायदा उठवण्यासाठी ज्ञान हवे त्याचवेळी समृद्धीची ज्योत उजळेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२४३२, NSE निर्देशांक निफ्टी १०१६७ वर तर बॅंक निफ्टी २४६८९ वर बंद झाले.

आठवड्याचे-समालोचन – दिवाळीच्या आधी दिवाळी – ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

हा आठवडा एकंदरीतच शांततेत गेला सोन्रे ढासळले, डॉलर सुधारला, क्रूडही खाली आले. सोन्याच्या बाबतीत मागणी कमी झाली. GST लागू झाल्यामुळे आणी Rs ५०००० च्या खरेदीसाठी KYC सक्तीचे केल्यामुळे, आधार आणी PAN कार्ड असणे जरुरीचे केल्यामुळेही सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला. बहुतेक बँकांनी बचत आणी मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली. मंदीचे ढग थोडेसे धूसर झाले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये पुन्हा H1B विसाची प्रक्रिया सुरु झाली.
 • USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढल्यामुळे क्रूडचे भाव खाली आले.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने पेट्रोल आणी डीझेल वरची एक्साईज ड्युटी Rs २ ने कमी केली.
 • NHPC आणी SJVN यांना रामपूर प्रोजेक्टसाठी Rs २१०० कोटी जास्त मिळण्याची शक्यता आहे.
 • GST चा फायदा घेवून ज्या कंपन्या किमती वाढवतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारने ANTI PROFITEERING ऑथोरिटी ची स्थापना केली. यात १ चेअरमन आणी ४ सदस्य असतील.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBIने FII आणी FPI ची मर्यादा २४% वरून ४०% केली.
 • RBI ने आपल्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. SLR मात्र ०.५ % ने कमी करून १९.५% केला. RBI ने वाढती महागाई आणी वाढत्या फिस्कल तुटीविषयी चिंता व्यक्त केली. RBI ने काही अटींवर P2P कंपन्यांना NBFC चा दर्जा दिला. RBI ने आपल्या भारताच्या प्रगतीचा अंदाज ७.३% वरून ६.७ % केला. RBI ने सांगितले की होम लोन आणी पर्सनल लोन यांच्यावरील व्याजदर आता T-बिल (ट्रेजरी बिल्स) किंवा सरटीफिकेट ऑफ डीपॉझीट, किंवा RBI च्या रेपो रेट प्रमाणे ठरवले जातील.
 • सेबीने उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे की प्रमोटर्स आणी २५% पेक्षा जास्त शेअरहोल्डिंग असलेल्या शेअरहोल्डर्सबरोबर कंपनी ‘unpublished price sensitive information’ देण्यासाठी एक करार करू शकते. पण या कराराद्वारे पुरवली गेलेली माहिती या शेअरहोल्डर्सनी आणी प्रमोटर्सनी गुप्त ठेवली पाहिजे.
 • महिला डायरेक्टर नेमायची असेल तर ती प्रमोटर्सची नातेवाईक असता कामा नये.
 • या समितीने शिफारस केली आहे की एप्रिल २०२० पासून ज्या कंपनीत पब्लिक शेअरहोल्डिंग ४०% च्या वर आहे त्या कंपनीने चेअरमन आणी व्यवस्थापकीय संचालक अशी दोन पदे वेगळी करून प्रत्येक पदाचे अधिकार आणी जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
 • तसेच या समितीने इंडिपेंडंट डायरेक्टर्स, वर्षातील किमान बोर्ड मीटिंग, एक व्यक्ती किती कंपनीत डायरेक्टर राहू शकते, कंपनीत किती किमान डायरेक्टर्स असावेत, कंपनीचे ऑडीटर्स, तसेच कंपनीने प्रकाशित करायची माहिती आणी त्याचे वेळापत्रक याबाबतीत सुचना केल्या आहेत. समितीच्या मते हे बदल घडले तर कॉर्पोरेट गव्हेनन्सवर चांगला परिणाम होईल. सेबीने या रिपोर्ट वर लोकांचे म्हणणे आणी सुचना मागवल्या आहेत. लोकांच्या सूचनांचा विचार करून मग या शिफारसी अमलात आणल्या जातील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा मोटर्सला १०००० इलेक्ट्रिक व्हेहिकलची ऑर्डर मिळाली.
 • ऑटो विक्रीचे आकडे आले. त्यात मारुती, महिंद्र आणी महिंद्र, अशोक LEYLAND, TVS मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटो यांच्या विक्रीचे आकडे वाढले.
 • टी सी एस ला एपिक केस मध्ये USA कोर्टाने केलेल्या दंडाची रकम US$ ९४ मिलियन वरून US$४२ मिलियन पर्यंत कमी केली.
 • गोदरेज प्रॉपर्टीज पुण्यामध्ये नवीन प्रोजेक्ट सुरु करत आहे.
 • MOILने मंगेनीज ओअरचे भाव ७.२५% ने वाढवले
 • BASF इंडस्ट्रीजच्या होल्डिंग कंपनीने आपला लेदर केमिकलचा बिझिनेस Rs १९७ कोटींना विकला.
 • महिंद्र आणी महिंद्र या कंपनीला १५० इलेक्ट्रिक व्हेइकलची ऑर्डर मिळाली.
 • अजूनही पाऊस चालू आहे. अशावेळी शेतात पाणी असते. त्यामुळे उस तोडणीचे काम दिवाळीनंतरच सुरु होईल. त्यानंतर उसाचे गाळप सुरु होईल. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे. ज्या साखर उत्पादक कंपन्यांकडे साखरेचा साठी आहे त्या कंपन्यांना फायदा होईल.
 • अशोका बिल्डकॉन या कंपनीला Rs १२४ कोटींचे आर्बिट्रेशन अवार्ड मिळाले.

कॉर्पोरेट एक्शन

 • इंद्रप्रस्थ GAS LTD. च्या शेअर स्प्लिटला मंजुरी मिळाली.
 • इंडिया बुल्स व्हेन्चर ही कंपनी Rs २००० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे.
 • RCOM आणी एअरसेल या कंपन्यांचे मर्जर रेग्युलेटरी आणी कायदेशीर अडचणींमुळे रद्द झाले. याचा परिणाम ज्या बँकांनी RCOM ला कर्ज दिले आहे त्यांच्यावर होईल.
 • लिप्सा जेम्स या कंपनीला Rs१७.५ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • विप्रोने यूजर एक्सपिरीयंस कन्सल्टंशी कंपनी ‘कुपर’ खरेदी केली.
 • स्टरलाईट टेक्नोलॉजीला ऑपटीकल फायबर केबल बनवण्यासाठी ३ वर्षासाठी ऑर्डर मिळाली.
 • CROMPTON GREAVES ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीचा किचन आणी होम अप्लायन्सेस ब्रांड केनस्टार Rs १४०० कोटींना विकत घेण्याच्या विचारात आहे.
 • फ्युचर रिटेल या कंपनीने हायपरसिटी मॉल्स Rs ६५५ कोटींना विकत घेतला. या कंपनीची १९ हायपर मॉल्स मुंबई हैदराबाद आणी बंगलोर येथे आहेत. या अक्विझिशनमुले फ्युचर रिटेलच्या स्टोअर्सची संख्या ९०० वर जाईल.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • या आठवड्यात SBI लाईफच्या शेअर्स चे Rs ७३६ वर लिस्टिंग झाले. शेअर IPO मध्ये Rs ७०० ला दिला होता. SBI लाईफ नोव्हेंबर २०१७ मध्ये बहारीनमध्ये त्यांची शाखा उघडेल
 • प्रताप SNACKS या कंपनीचे लिस्टिंग Rs १२७० वर झाले. या कंपनीने IPO मध्ये Rs ९३८ ला शेअर दिला होता. ज्यांना शेअर मिळाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

नजीकच्या काळातील IPO

 • HAL (हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड) चा IPO आणून सरकार आपला १०% स्टेक विकणार आहे
 • MAS फायनानसियल या अह्मदाबाद स्थित कंपनीचा IPO ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ओपन राहील. या IPOचा प्राईस band Rs ४५६ ते Rs ४५९ असून मिनिमम लॉट ३२ शेअरचा आहे. कंपनी मायक्रो आणी लहान युनीट्सना लोन देते. कंपनीचे TRACK रेकोर्ड चांगले आहे. या कंपनीच्या १२१ शाखा आहेत.
 • GIC Re ही कंपनी IPO द्वारा Rs ११३७० कोटी उभारेल. कंपनीचा IPO ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ओपन राहील प्राईस band Rs ८५५ ते Rs ९१२ राहील कंपनी रिटेल गुंतवणूकदाराना Rs ४५ डीसकौंट देणार आहे. मिनिमम लॉट १६ शेअर्सचा असेल. या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग २५ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल. ही सरकारी कंपनी असून रिइन्शुअरंसच्या क्षेत्रात काम करते.
 • INTERNATIONAL एनर्जी एक्स्चेंज या कंपनीचा IPO ९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या दरम्यान ओपन असेल. या IPOचा प्राईस BAND Rs १६४५ ते १६५० असून मिनिमम लॉट ९ शेअर्सचा आहे.

 

मार्केटने काय शिकवले

शेअरमार्केट आणी आपण एकमेकांपासून दूर नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आरसा मार्केट असते. नवरात्रात बहुतेकजण उपवास करतात उपवासाचे पदार्थ विकणाऱ्या कंपनीचा शेअर असता तर तोसुद्धा वाढला असता. दसरा आल्याबरोबर PC ज्युवेलर्स सारखा शेअर पडत्या मार्केटमध्ये वाढला. पण नवरात्रात दारू आणी मांसाहार याचे सेवन करीत नाहीत पण नवरात्र संपले दसराही संपला त्याच बरोबर वेंकि’ज आणी मद्यार्कासम्बंधी कंपन्यांचे शेअर्स वाढले. यावरून वाचकांनी काय समजायचे ते समजावे.  शेअर मार्केटचे निरीक्षण करता करता मजा वाटली इतकेच.

पुढील आठवड्यासाठी तर चांगले संकेत आहेत. शुक्रवारी GST कौन्सिलची बैठक आहे. यामध्ये GST संबंधीत  जनतेच्या अडचणी दूर केल्या जातील अशी अपेक्षा आहे वातानुकुलित उपहारगृह, हॉटेल्स उदा कामत हॉटेल्स, स्पेशालिटी रेस्टॉरंट टेक्स्टाईल उदा अरविंद रेमंड्स प्लायवूड उदा. ग्रीन प्लायवूड, आर्चीड प्लायवूड या उद्योगांवर आकारला  जाणारा GSTचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

निर्यातदारांना IGST मध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे. ३१ मार्च पर्यंत रिव्हर्स चार्ज हटेल.GST मध्ये होणाऱ्या सुधारणांचा सुगावा मार्केटला लागला आहे असे जाणवले शेवटच्या १५ मिनीटामध्ये मार्केटने चांगलीच उसळी घेतली. दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी करू असा मार्केटचा इरादा जाणवला. १२ ऑक्टोबरला टी सी एस, आणी इंडस इंद चे दुसऱ्या तीमाहीचे निकाल येतील., तसेच IIP आणी CPI चे आकडे येतील.

BSE निर्देशांक सेंसेक्स ३१८१४ NSE निर्देशांक निफ्टी ९९८० तर बँक निफ्टी २४१९० वर बंद झाले