Tag Archives: marathi share market

आठवड्याचे-समालोचन – नर्व्हस 90s – नर्व्हस निफ्टी ९९०० – 17 जुलै २०१७ ते २१ जुलै २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

क्रिकेटमध्ये आणी शेअरमार्केटमध्ये बरेच साम्य आहे. २०-२०, वन डे, किंवा कसोटी क्रिकेटप्रमाणेच मार्केट मध्येसुद्धा इंट्राडे, शॉर्ट टर्म, मेडियम टर्म आणी लॉन्ग टर्म गुंतवणूक असे प्रकार असतात. पण दोन्ही ठिकाणचा आशावाद नेहेमीच खुणावतो. एखादा फलंदाज जेव्हा शतकाच्या जवळ येतो तेव्हा तो स्वतः आणी सामना बघणारे प्रेक्षक दोघांनाही हुरहूर लागते. कारण शतक हा एक, (मग तो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये असो) मानबिंदू आहे. खेळ स्लो होतो. फलंदाज नर्व्हस ९० मध्ये सापडला आहे असे प्रेक्षकांना वाटते. शतक पुरे झाले म्हणजे फलंदाजही निश्वास सोडतो आणी प्रेक्षकही आनंदित होतात. तसेच मार्केटमध्ये घडत आहे. निफ्टी १०००० च्या आसपास पोहोचताना थोडे अडखळत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA ने सर्व देशांना बजावले आहे की USA मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांविषयी मागितलेली माहिती त्या त्या देशाने पुरविणे जरुरीचे आहे. जर अशी माहिती पुरवली नाही तर त्या देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली जाईल.
  • USFDAच्या अड्वायझरी कमिटीने ब्रेस्ट कॅन्सरसाठी बायोसिमिलर ‘TRASTUZUMAB’ ला मंजुरी दिली. या औषधाला ३ सप्टेंबर २०१७ पर्यंत ‘USFDA’ ची अंतिम मंजुरी मिळेल असे बायोकॉन या कंपनीने सांगितले. या औषधासाठी जगामध्ये US$ ६.९ बिलियन तर USA मध्ये US$ २.६ बिलियन चे मार्केट उपलब्ध आहे. या बातमीनंतर शेअर ऑल टाईम हायला गेला.
  • UK ने प्रथमच कबुल केले की ब्रेकझीट साठी त्यांना युरोपिअन युनियनला GBP १०० बिलियन एवढे पेमेंट करावे लागेल.
  • चीनच्या अर्थव्यवस्थेत (GDP) मध्ये दुसर्या तिमाहीत ६.९% वाढ आली. ही वाढ काही अंशी उत्पादनातील वाढ आणी निर्यातवाढीमुळे आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

  • सरकारने ऑईल आणी GAS क्षेत्रातील दुसऱ्या मर्जरची घोषणा केली. ‘IOC’ ही कंपनी ‘ऑईल इंडिया’या कंपनीतील सरकारचा ६६% स्टेक विकत घेईल. या मर्जरची वेळ आणी बाकीच्या प्रोसिजरल डीटेल्स नंतर ठरवले जातील पण हे मर्जर आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पुरे केले जाईल.
  • E-VECHICLE ला प्रोत्साहन देण्यासाठी आणी BATTERY SWAPPING स्टेशन बनवण्यासाठी नियम बनवले जातील. NTPC आणी पॉवर ग्रीड या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या BATTERY SWAPPING स्टेशन बनवतील यासाठी खास परमिटची जरुरी असणार नाही.
  • सरकारने चार्जर आणी ADAPTAR याच्यावर ANTIDUMPING ड्युटी बसवली. कस्टम ड्युटी १०% लावली. याचा फायदा डीलिंक आणी स्मार्टलिंक या कंपन्यांना होईल.
  • पन्ना मुक्ता ताप्ती ऑईल फिल्ड विषयीच्या केसमध्ये सरकारने RIL, SHELL आणी ONGC या तीन कंपन्यांना संयुक्तरीत्या US$ ३ बिलियन दंड भरायला सांगितला आहे.
  • सरकारने ONGC आणी HPCL यांच्यातील कॉर्पोरेट एक्शनला मंजुरी दिली. या प्रमाणे ONGC HPCL मधील ५१% सरकारचा स्टेक Rs ३० ते Rs ४० प्रीमियम देऊन कॅश मध्ये खरेदी करेल ONGC ला ओपन ऑफर आणण्यापासून सरकारने सुट दिली आहे. ONGC कडे असलेल्या कॅश रिझर्व्ह वर परिणाम होईल. पैशाची सोय करण्यासाठी ONGC ही कंपनी IOC मधील आपला हिस्सा विकेल.HPCL ही ONGC ची सबसिडीअरी कंपनी म्हणून कार्यरत राहील. त्यामुळे HPCL ची BRAND VALUE सुरक्षित राहील.MRPL ही कंपनी HPCL ची सबसिडीअरी असल्यामुळे तीही ONGC ची सबसिडीअरी बनेल.
  • उत्तर प्रदेश आणी महाराष्ट्र या राज्यातील साखर कारखान्यांनी साखरेचे भाव वाढवले. पूर्वी उसाला SAP (STATE ADMINISTRATIVE PRICE) प्रमाणे किमत दिली जात होती. आता FAP ( FAIR AND REMUNERATIVE PRICE) प्रमाणे उसाला भाव दिला जाईल असे UP राज्य सरकारने सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना तोटा होईल तर उत्तर प्रदेशातील कारखान्यांना फायदा होईल.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र उसाची शेती करायची असेल तर ड्रिप इरिगेशनचाच वापर केला गेला पाहिजे असे सांगितले याचा फायदा जैन इरिगेशनला होईल.
  • सरकार जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लेदर सेक्टरला काही सवलती देणार आहे. यासाठी Rs २६०० कोटी खर्च केले जातील. या योजनेला ‘इंडियन फुटवेअर, लेदर, एन्ड अक्सेसरीज डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ असे नाव दिले आहे. जादा रोजगार दिला तर आयकरात सवलत मिळणार आहे. निर्यातीला उत्तेजन देणे हा एक उद्देश आहे. Rs १५००० च्या जवळपास पगार असेल तर EPF मध्ये भाग घेतला नाही तरी चालेल. जर १५० ते २५० तास रोजगार पुरवला तरी वरील प्रमाणे सवलती उपलब्ध असतील.
  • सरकारने ३४ मेगा मल्टी मोडल लॉजीस्टिक पार्क बांधण्यासाठी मंजुरी दिली यावर सरकार Rs २००००० कोटी खर्च करेल. हे प्रोजेक्ट राज्य सरकारच्या जमिनीवर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनर्शीपच्या माध्यमातून केले जाईल.
  • सरकार BEML मधील २६% स्टेक विकणार आहे. सरंक्षण मंत्रालयाकडून यासाठी मंजुरी मिळाली.
  • CAG ने ६ टेलिकॉम कंपन्यांचे आणी IFCI चे ऑडीट केले. या कंपन्यांनी २०११ ते २०१५ या काळात आपले उत्पन्न कमी दाखवले आहे असे आढळले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • INOX विंड या कंपनीच्या INSOLVANCY प्रोसिडिंग सुरु करायला NCLT च्या चदिगढ बेंचने मंजुरी दिली.
  • RBI ने बँकांना प्रथम ‘वन टाईम सेटलमेंट’ चा विकल्प तपासून पहायला सांगितले आहे. ही प्रोसेस सहा महिन्याच्या आत पूर्ण झाली नाही तर बँकांनी लिक्विडेशन प्रोसेस सुरु करावी असे सांगितले आहे.
  • GST कौन्सिलने सिगारेट्सवरील कर (GST) २८% + ५% ad valorem cess असा वाढवला. तसेच सिगारेटच्या लांबीवर अवलंबून १००० सिगारेट्सवर खालीलप्रमाणे कर लावला. ६५-७० mm Rs ४८५, ७० -७५ mm Rs ६२१ आणी ७५ mm च्यावर Rs ७९५ असा न्युमरिकल सेस लावला. या करवाढीमुळे सरकारला Rs ५००० कोटींचे उत्पन्न मिळेल. या GST कौन्सिलच्या निर्णयाचा परिणाम ITC, आणी सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला.
  • NGT (NATIONAL GREEN TRIBUNAL)ने त्रिवेणी इंजिनिअरींगला त्यांच्या मुझफ्फरनगर येथील काम थांबवायला सांगितले.
  • गुजरात हायकोर्टाने एस्सार स्टील या कंपनीने केलेल्या अर्जाच्या विरोधात असा निकाल दिला की RBI आणी कर्ज देणार्या बँकांना IBC खाली BANKRUPTCYसाठी कारवाई सुरु करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या कंपनीला दिलेलं कर्ज सर्व बँकांनी मार्च २०१६ ला NPA केले आहे.
  • NCLT ने मोंनेट इस्पात या कंपनीच्या इन्साल्वन्सीसाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

भारतातून होणारी निर्यात जून २०१७ मध्ये ४.३९% ने वाढून US$ २३.५ बिलियन झाली. ही गेल्या चार महिन्यातील किमान निर्यात आहे. भारतात होणारी आयात मात्र १९%ने वाढून US $ ३६.५ बिलियन झाली. यामुळे जून २०१७ साठी ट्रेड GAP US$ १२.९ बिलियन(मे २०१७ मध्ये US $ १३.८४ बिलियन) झाली. सोने आणी प्रेशस स्टोन यांची आयात दुप्पट झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • मुक्ता आर्ट्स दसऱ्यापर्यंत अहमदाबादमध्ये २ आणी आंध्र प्रदेशात ४ मल्टीप्लेक्स चालू करणार आहे.
  • अल्केम LAB च्या तळोजा प्लांटची ची USFDA ने तपासणी केली. यात कोणतीही त्रुटी दाखवण्यात आली नाही.
  • इंद्रप्रस्थ GAS LTD या कंपनीला गुरूग्राममध्ये सिटी GAS डीस्ट्रीब्युशन नेटवर्क्ससाठी मंजुरी मिळाली.
  • JSPL चा छत्तीसगढमधील पॉवर प्लांट JSW एनर्जी घेणार आहे.
  • पिनकॉन स्पिरीटला संरक्षणखात्याकडून ऑर्डर मिळाली.
  • रूपा कंपनी त्यांचे दोन BRAND ‘MICROMAN’ आणी ‘MICRO WOMAN’ USA मध्ये इंट्रोड्युस करणार आहेत.
  • HCL इन्फोसिस्टिम्स ही कंपनी APPLE या कंपनीबरोबर डीस्ट्रीब्युशन नेटवर्क साठी करार करणार आहे.
  • गोल्डन टोबॅंको या कंपनीची इंडियाबुल्स फायनान्स या कंपनी कडे कर्जासाठी गहाण ठेवलेली मरोळ अंधेरी येथे असलेली जमीन विकण्यासाठी इंडिया बुल्सने नोटीस दिली आहे.
  • टाटा मोटर्स या कंपनीने बायो मिथेन इंजिन तयार केले.
  • ज्युबिलीयंट फूड्स, ACC, इंडियन मेटल (लॉस मधून प्रॉफीटमध्ये) हिंदुस्थान झिंक, रिलायंस इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, RBL बँक, बर्जर पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, DCB,,विप्रो, मास्टेक, इंडियन बँक, टीनप्लेट, यांचे तिमाही निकाल चांगले आले. तर कॅनरा बँक, फोर्स मोटरचे, कर्नाटक बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होता. बजाज ऑटोचा निकाल ठीक होता.
  • रिलायंस ज्ञीओने शुक्रवारी AGM मध्ये 4G स्मार्ट फोन जीओ फोन लौंच केला. या फोंनवर CABLE टी व्ही दिसेल असे जाहीर केल्यामुळे DTH आणी केबल टी व्ही कंपन्यांचे शेअर्स पडले. तसेच जीओ फोन बरोबर दिलेल्या सवलतींमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स पडले.
  • फेडरल बँकेची FII मर्यादा ४९% वरून ७४% केली.
  • एल आय सी ने टाटा ग्लोबल बिव्हरेजीसमधील शेअर्स विकून आपली हिस्सेदारी कमी केली.
  • अशोक LEYLAND ने इलेक्ट्रिक व्हेईकल बनवण्यासाठी सन मोबिलिटीबरोबर करार केला.
  • भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला पतरातू सुपर थर्मल पॉवर प्लांटसाठी Rs १०२६६ कोटींची ऑर्डर मिळाली.
  • टाटा एलेक्सी या कंपनीचे टी सी एस मध्ये मर्जर होण्याची शक्यता आहे.
  • नाटको फार्माच्या कोथूर युनिटला USFDA ने केलेल्या १६ ते २४ जानेवारी दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चीट दिली.
  • सन फार्मा, ल्युपिन, कॅडीला हेल्थकेअर, ऑरोबिन्दो फार्मा या कंपन्यांना त्यांच्या औषधांसाठी USFDA ची मंजुरी मिळाली.
  • NTPC ही पॉवर उत्पादन क्षेत्रातील कंपनी आता पॉवर डीस्ट्रीब्यूशन क्षेत्रात उतरण्याचा विचार करत आहे.
  • बालाजी टेलीमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजनी २४% पेक्षा जास्त स्टेक Rs १६४-Rs १६५ या भावाने खरेदी केला.बालाजी टेली ही कंपनी प्राईम फोकस आणी मुक्ता आर्ट्स या कंपन्यांप्रमाणेच कंटेंट प्रोव्हायडरचे काम करतात. रिलायंस इंडस्ट्रीजला गल्फ आफ्रिका पेट्रोमधील हिस्सेदारी विकली त्यातून Rs १०८७ कोटी मिळाले.
  • बॉम्बे डाईंग या कंपनीने आपली पुण्याची जमीन Rs २०० कोटींना विकली.

कॉर्पोरेट एक्शन

  • विप्रो ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी Rs ३२० प्रती शेअर या भावाने Rs११००० कोटी किमतीचे शेअर्स टेंडर ऑफर या पद्धतीने ‘BUY BACK’ करेल.
  • ‘JUST DIAL’ ह्या कंपनीने २४ जुलै रोजी शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
  • ATLAS सायकल या कंपनीने ४ ऑगस्ट रोजी शेअर स्प्लिट वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
  • रिलायंस जीओ राईट्स इशू द्वारे Rs २०००० कोटी उभारेल.
  • रिलायंस इंडस्ट्रीजने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरमागे १ शेअर बोनस दिला जाईल असे जाहीर केले. म्हणजे १: १ बोनस जाहीर केला.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • ICICI लोम्बार्ड या विमा क्षेत्रातील कंपनीने IPO साठी सेबी कडे अर्ज केला.
  • HDFC लाईफ या कंपनीचा Rs १०००० कोटींचा IPO ऑक्टोबर /नोव्हेंबर २०१७ मध्ये येत आहे. या द्वारे २०% इशुड शेअर कॅपिटल IPO द्वारे विकणार आहेत. MAX लाईफ बरोबरचे मर्जर रद्द झाले नसले तरी त्याचा IPO नंतरच विचार केला जाईल असे सांगितले.HDFC लाईफ ने या IPO साठी IRDA कडे परवानगी मागितली.
  • SBI लाईफ ने IPO साठी अर्ज केला. IPO च्या माध्यमातून १२ कोटी शेअर्स जारी करणार.
  • सलासर टेक्नोलॉजी हा IPO २७३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला; तर रिटेल कोटा ५६ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • गोदरेज अग्रोव्हेट ही कंपनी १.२३ कोटी शेअर्सच्या IPO द्वारा Rs ३००० कोटी भांडवल उभारणार आहे. याचा फायदा गोदरेज इंडस्ट्रीज आणी ASTEC लाईफ सायन्सेस या कंपन्यांना होईल.

मार्केटने काय शिकवले

लिमयेंनी १७ जुलै २०१७ रोजी NSE चा चार्ज स्वीकारल्यावर जर प्रथम कोणते काम केले असेल तर सेबीच्या कोलोकेशनविषयीच्या तक्रारीकडे लक्ष दिले. दंड स्वीकार केला. पण चूक मान्य केली नाही. कोलोकेशनविषयीचा गुंता सोडवायला सुरुवात केली. गुंता सुटला तर NSE च्या IPO चा रस्ता मोकळा होईल. ज्या ज्या कंपन्यांचा NSE मध्ये स्टेक आहे अशा कंपन्यांकडे लक्ष द्यावे. राधाकृष्ण दमाणी आणी राकेश झुनझुनवाला यांनी कोठे गुंतवणूक केली याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यांनी जे पी असोसिएट आणी ज्युबिलीयट लाईफ मध्ये हिस्सा खरेदी केला.

स्वदेशी (DOMESTIK) फंड आणी विदेशी निवेशक यांचे खरेदीविक्रीचे आकडे पाहिल्यास असे आढळते की मार्केट वाढण्याचा वेग कमी होत आहे. या लेव्हलवर कोणीही कॉम्फरटेबल नाही. कारण तिमाही निकालांचा विचार केल्यास निकाल खूप चांगले येत आहेत असे दिसत नाही. काहीही म्हणा मार्केट नर्व्हस ९९०० मध्ये अडकले असे म्हणावे लागेल. वाट पाहुया आणी जसे निफ्टी १०००० वर पोहोचेल तसे सेलब्रेट करू या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२०२८ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९९१५ तर बँक निफ्टी २४२८४ वर बंद झाला.

Advertisements

आठवड्याचे-समालोचन – कदम कदम बढाये जा खुशीके गीत गाये जा – १० जुलै ते १४ जुलै २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवारी निफ्टी आणी सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वात उच्चस्तराला उघडले. खरे पाहता पार्टीसिपेटरी नोटची खबर होती पण मार्केटने सर्वांना धक्का दिला. सोमवारी तारीख १० जुलै २०१७ रोजी निफ्टी ९७०० च्या वर उघडले आणी ९७०० च्या वर बंद झाले. ९७८२ पर्यंत मार्केट इंट्रा डे गेले होते. आता निफ्टीची ट्रेडिंग रेंज बदलली आहे. निफ्टी ९६५० ते ९८५० झाली. मंगळवारी तारीख ११ जुलै २०१७ रोजी निफ्टी ने ९८०० ला स्पर्श केला. हे मार्केट लिक्विडीटीमुळे तेजीत सुरु आहे. बुधवारी PUT CALL रेशियो १.४० झाला.बुधवारी निफ्टी ९८१६ ला पोहोचले. गुरुवारी तर ९९०० गाठण्यासाठी ३ पाइंट उरले होते. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२००० झाला. शुक्रवारी निफ्टी ९९०० वर उघडले आणी सेन्सेक्स ३२१०० वर तर बँक निफ्टी २३९५० वर पोहोचला. शुक्रवारी PUY CALL रेशियो १.४६ होता. ही ओव्हर बॉट पातळी आहे. आपली पोझिशन हलकी करा.

या सर्व घटनांमुळे असे आढळले की मार्केट नवीन नवीन शिखरे सर करत आहे. लोकांचा आनंद ओसंडून वाहत आहे. मार्केटमध्ये खुशी होती. लिक्विडीटी भरपूर होती. ज्या लोकांचे शेअर्स अडकले असतील त्यांना विकण्याची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढत आहे. OPEC देशांची निर्यात वाढत आहे. त्यामुळे ONGC वर वाईट परिणाम होत आहे. USA FED ने सांगितले की BALANCESHEET सुधारणे बॉंड विक्री करणे, रेट वाढवणे, हे सर्व हळू हळू आणी वेळोवेळी येणारा डेटा बघून केले जाईल. USA मध्ये जॉब डेटा समाधानकारक आल्यामुळे आणी प्रोड्युसर्स प्राईस वाढल्यामुळे रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे.
  • UKने युरोपीयन युनियन शी असलेले राजकीय आर्थिक आणी कायदेशीर संबंध तोडण्यासाठी कायदा प्रसिद्ध केला.
  • लेबाननमध्ये ऑईल आणी GAS साठी ONGC विदेश बोली लावणार आहे.

सरकारी अनौन्समेंट 

  • ज्या कंपन्या परदेशातून एअरक्राफ्ट भाड्याने घेतात त्याना GST लागणार नाही.
  • सरकारने साखर कंपन्यांची विनंती ऐकली आणी साखरेवरची आयात ड्युटी ४०% वरून ५०% केली. गडकरी (मंत्री केंद्र सरकार) यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की की उत्तरप्रदेशात बस, taxi सारखी वाहने इथेनॉलवर चालवा. उत्तर प्रदेशात इथेनॉलचे उत्पादन चांगले होते. याचा फायदा UP मधील साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.
  • महाराष्ट्र सरकारने रिअल्टी सेक्टरसाठी सुचना केली. कोणीही बिल्डर्सनी सरकारकडे अर्ज केल्यास त्यावरचा निर्णय ८ दिवसात घेतला पाहिजे.
  • Rs १ लाखाचे दागिने विकल्यास Rs ३००० GST लागेल. जुन्या दागिन्यांची दुरुस्ती करायची असेल तर ५% GST लागेल. कारण हे जॉब वर्क समजले जाईल.
  • एअरलाईन्समध्ये १००% FDI ला परवानगी देऊ नये. २/३ डायरेक्टर्स आणी चेअरमन भारतीय असले पाहिजेत. इंटेलिजन्स ब्युरोने अशी सुचना केली आहे. कारण USA आणी कॅनडा मध्येसुद्धा फक्त २५% विदेशी गुंतवणुकीस परवानगी आहे.
  • लहान बँकांमध्ये सरकार मर्जरच्या आधी भांडवल गुंतवेल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • IIP चे आकडे आले. मे २०१७ या महिन्यातील औद्योगिक उत्पादन १.७% (एप्रिल २०१७ मध्ये २.८९ % होते) ने वाढले.
  • CPI जून २०१७ साठी १.५४% (मे २०१७ मध्ये २.१८ होता) होता. WPI जुनसाठी ०.९% (मे मध्ये २.२% होता) होता
  • अशा प्रकारे किरकोळ आणी घाऊक महागाईचे निर्देशांक कमी झाल्यामुळे RBI ने आता रेट कमी करावा अशी मार्केट्ची आणी गुंतवणूकदारांची अपेक्षा असल्यामुळे मार्केट वधारले.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • जे हायवे शहरातून जातात त्यांना राज्य सरकार डीनोटीफाय करीत असल्यास सुप्रीम कोर्टाची काही तक्रार नाही. डिनोटीफाय केल्यानंतर त्या हॉटेल्समधून दारू विकता येईल.
  • सेबीने सांगितले की पोर्टफोलीओमध्ये शेअर नसेल तर पी नोटच्या माध्यमातून ट्रेड करता येणार नाही.
  • पशुवध कायद्यामध्ये बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितले

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी 

  • HDFC इन्व्हेस्टमेंटने ट्यूब इन्व्हेस्टमेंटमध्ये २% स्टेक घेतला
  • गीअर उत्पादन करणाऱ्या कंपन्या मंगळवार तारीख ११ जुलै २०१७ रोजी तेजीत होत्या. भारत गीअर, शांती गिअर्स, हाय टेक गीअर
  • टाटा पॉवर आणी अडानी पॉवरच्या बाबतीत समस्या सारखीच आहे. या दोन्ही कंपन्यांना कोळसा आयात करावा लागतो. तो महाग पडतो. पण पॉवरचे रेट वाढवता येत नाहीत. त्यामुळे उच्च पातळीवरची बैठक बोलावली आहे.
  • टाटा मोटर्सने कार्गो सेगमेंटमध्ये ३ नवीन गाड्या बाजारात आणल्या आहेत.
  • NCL तामिळनाडू, उत्तरप्रदेशात, ९९२ MW पॉवरचे सोलार प्लांट लावणार आहे.
  • गुजराथमध्ये पेट्रोकेम कॉम्प्लेक्सच्या विस्ताराला रिलायंसला मंजुरी मिळाली. Rs २१०० कोटी विस्तारावर खर्च करणार.
  • कॅम्लिन फाईन केमिकल्स या कंपनीने चीनच्या कंपनीमध्ये ५१% हिस्सा खरेदी केला.
  • अक्ष ऑपटी फायबरला जयपूर स्मार्ट सिटी साठी ऑर्डर मिळाली.
  • कॅडिला हेल्थकेअरच्या मोरैया प्लांट मधून जनरिक औषधाच्या उत्पादनास USFDA ची मंजुरी मिळाली.
  • बायोकॉनने कॅन्सरच्या नव्या औषधाच्या मंजुरीसाठी अर्ज दिला. या बाबतीत विचार करण्यासाठी USA च्या ADVISORY कमिटीची बैठक झाली. त्यांना मंजुरी मिळाली. MORGAN STANLEYने बायोकॉनचे टार्गेट Rs ४५० दिले तर CLSA ने Rs १८६ दिले. प्रत्येकाजवळ त्यांच्या दिलेल्या टार्गेट्सच्या समर्थनार्थ आपापली कारणे आहेत. आपण आपले टार्गेट ठरवून निर्णय घ्यावा हे उत्तम.
  • टी सी एस लखनौ सेंटर बंद करणार आहे. येथे १००० कर्मचारी काम करतात. त्यांना नोइडा वाराणसी येथे ट्रान्स्फर करणार म्हणजेच कॉस्ट कमी करण्याचा विचार आहे.
  • कतार एअरवेज भारतात अंतर्गत प्रवासी विमान सेवा सुरु करणार आहे. सध्या लीगल टीमबरोबर चर्चा चालू आहे.
  • FM रेडियोसाठी Rs ५३.४ कोटीची बोली सन टी व्ही ने जिंकली.
  • ‘FITCH’ ही कंपनी ‘CARE’ या कंपनीचा व्यवसाय खरेदी करण्ताची शक्यता आहे. ‘ICRA’ आणी ‘CRISIL’ या दोन्ही कंपन्याही शर्यतीत आहेत.
  • ‘गती’ ही कंपनी ‘SNAPDEAL’ चा लॉजिस्टीक कारभार खरेदी करण्याची शक्यता आहे
  • KEC INTERNATIONALला Rs १८४५ कोटींची ऑर्डर मिळाली.
  • धन धना धन योजनेखाली रिलायंस जियो नवीन PACKAGE देणार आहे. यात २०% डेटा जास्त मिळेल.
  • A U. फायनान्स Rs ५२५ वर लिस्ट झाला.
  • डिविज LAB या कंपनीच्या विशाखापट्टणम युनिटला जो इम्पोर्ट ALERT दिला होता तो काढून टाकला. SYMPHONY आणी ब्ल्यू स्टार यांच्यात तुलना केली असता SYMPHONYचा EPS २५ तर ब्लू स्टार चा १२ आहे. त्यामुळे SYMPHONY ५३ पट तर ब्लू स्टार५१ पट चालू आहे.
  • स्टरलाईट लाईटिंगला बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने लोन दिले होते. हे लोन शेअर्समध्ये कन्व्हर्ट केले त्यामुळे ही कंपनी बजाज इलेक्ट्रिकलला मिळाली. त्यामुळे बजाज इलेक्ट्रिकलचा स्टेक १८% वरून ४७% झाला.
  • इंडस इंड बँकेचा तिमाही निकाल लागला. फायदा कमी झाला. पण इतर उत्पन्न वाढले NPA मध्ये थोडी वाढ झाली
  • टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा १ल्या तिमाहीचा निकाल समाधानकारक नव्हता. कंपनीचा रेव्हेन्यू US$ ४.५९ बिलियन तर नेट प्रॉफीट US $ ९२३ मिलियन झाले. कंपनीने USA मधील कंपन्यांनी IT वर कमी केलेला किंवा पुढे ढकललेला खर्च, मजबूत रुपया, आणी पगारवाढ तसेच USA मधील व्हिसाचे प्रोब्लेम ही कारणे सांगितली. ऑपरेटिंग मार्जीन २३.४% (गेल्या तिमाहीत २५.१%) होते. ATTRITION रेट ११.६ होता.
  • आज इन्फोसिसचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. इन्कम Rs १७०२८ कोटी तर नेट प्रॉफीट Rs३४८० कोटी होते. निकाल अपेक्षेपेक्षा थोडे चांगले आहेत. आम्ही सायबर सिक्युरिटी वर जास्त लक्ष केंद्रित करू असे कंपनीने सांगितले.
  • HDFC लाईफ त्यांचे MAX लाईफ बरोबर होणारे मर्जर रद्द करून IPO आणण्याचा विचार करत आहे जून २०१६ मध्ये ठरलेले मर्जर IRDA ने रद्द केले.
  • TORRENT फार्माच्या दहेज युनिटची तपासणी २६ ते ३० जून या कालावधीत केली होती. या तपासणीत ५ त्रुटी आढळल्या. SAMPLE आणी टेस्टिंगमध्ये त्रुटी आढळल्या. क्वालिटी संबंधात तक्रारी आहेत
  • टाटा स्टील युरोपने त्यांचे दोन स्टील पाईप बनवणारे प्लांट लिबर्टी हाउस या कंपनीला विकले.
  • इन्फोसिस, हडसन अग्रो, CYIENT, गोवा कार्बन या कंपन्यांचा तिमाही निकाल चांगला आला.

तांत्रिक विश्लेषण

शूटिंग स्टार मंगळवारी मार्केट उघडले तेव्हा निफ्टीने ९८०० चा आकडा ओलांडला. नंतर निफ्टी ९८३० पर्यंत गेला. नंतर ९७७८ चा लो मारला आणी ९७८६ वर बंद झाला. या ठिकाणी शूटिंग स्टार PATTERNची स्थिती आढळली. हा कॅण्डलस्टिक PATTERN होय. हा रिव्हर्सल PATTERN आहे. इन्व्हरटेड HAMMER प्रमाणे हा PATTERN असतो. शेअरची किंमत मार्केटच्या वेळेत ओपनिंग प्राईसच्या बरीच वर जाते. पण ओपनिंग प्राईसच्या खाली क्लोज होते. शूटिंग स्टारसाठी अपवर्ड ट्रेंड हवा. हायेस्ट प्राईस आणी ओपनिंग प्राईसमधील फरक हा शूटिंग स्टारच्या बॉडीच्या दुप्पट हवा. किमान किंमत आणी क्लोजिंग प्राईस यातला फरक फारंच कमी असतो. आधीचे बायर प्रॉफीटबुकिंग करू लागतात. शॉर्ट सेलर घुसतात त्यामुळे न्यू हायला स्पर्श केल्याबरोबर मार्केट वेगाने खाली येते.

कॉर्पोरेट एक्शन

  • झंडू रिअलीटी आणी इमामी इन्फ्रा यांचे मर्जर केले जाणार आहे.

नजीकच्या भविष्यात येणारे IPO

  • SBI लाईफ ८ कोटी शेअर्सचा IPO आणणार आहे.
  • रेल्वे आपल्या IRCTC, IRCON, RVNL, RIITES, या चार कंपन्यातील १०% स्टेक विकणार आहे. हे IPO ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात येतील.
  • सलासर टेक्नो इंजिनिअरिंग हा IPO १२ जुलै ते १७ जुलै या दरम्यान ओपन असेल IPO प्राईस Rs १०८ आहे.
  • BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२०२० वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९८८६ वर बंद झाले. बँक निफ्टी २३९४१ वर बंद झाले.

मार्केटने काय शिकवले

PUT CALL रेशियो १.३४ झाला. हा १.३८ झाला म्हणजेच ओव्हरबॉट स्थिती झाली. अशावेळी प्रॉफीट बुकिंग करा. अशा वेळी कॅश मार्केटच्या शेअरमध्ये ट्रेडिंग करा. STOCK स्पेसिफिक रहा. मी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला विनंती करते की आपल्या मित्रांपैकी, नातेवाईकापैकी कोणाचे शेअरमध्ये पैसे अडकले असतील आणी त्या लोकांचे मार्केटकडे लक्ष नसेल तर त्यांना मार्केटच्या बुल रनची खबर द्या. ते आपले शेअर्स शक्य असतील तर प्रॉफीटमध्ये विकू शकतील.

अनुभव हाची गुरु – गोंधळात गोंधळ – १० जुलै २०१७

गोंधळात गोंधळ

सोमवारी तारीख १० जुलै २०१७ रोजी सकाळी सकाळी P नोटच्या संदर्भात खबर आली. त्यामुळे गोंधळ उडाला. पण ही खबर पॉझीटीव्ह आहे असे समजताच SGX निफ्टी सावरला. मार्केट व्यवस्थित सुरु झाले. ऑल टाईम हायला उघडले. पण NSE वरील शेअर्सचे भाव बदलत नव्हते, अपडेट होत नव्हते. त्यामुळे ट्रेडिंग करताना गोंधळ उडत होता.१० वाजता वायदे बाजारातील सौदे NSE ने बंद केले.तिथपर्यंत काही लोकांचे सौदे झाले होते.आणी त्यांनी पुढील ऑर्डर्स टाकल्या होत्या. BTST (BUY TODAY SELL TOMORROW) किंवा STBT (SELL TODAY BUY TOMORROW) वाल्यांचा गोंधळच उडाला.

NSE ने १०-३० ते १०-४५ या दरम्यान प्रीओपन सेशन होईल असे सांगितले. आणी १०-४५ वाजता NSE सुरु होईल असे जाहीर केले. पण तसे घडले नाही. या वेळेपर्यन्तही तांत्रिक बिघाडात सुधारणा झाली नव्हती. नंतर पुन्हा ११ ते ११ वाजून ७ मिनिटांनी प्रीओपन आणी ११-१५ वाजता NSE सुरु होईल असे जाहीर केले. पण पुनश्च हरी ओम ! कथा पुढे सरकलीच नाही. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास NSE च्या सॉफटवेअरमध्ये काही बिघाड आहे हे सेबीला समजले.
हा सर्व वेळ BSE वरील कामकाज रोजच्याप्रमाणे व्यवस्थित चालू होते.

दोन वेळा प्रयत्न झाल्यानंतर सांगण्यात आले आता संपूर्ण दिवसासाठी NSEवरील ट्रेडिंग बंद राहील. नंतर लगेचच १० मिनिटांनी असे सांगण्यात आले की असे दिवसभर ट्रेडिंग बंद ठेवता येणार नाही. १२-१५ ते १२-२२ या वेळात प्रीओपन करून १२-३० वाजता मार्केट सुरु करू. सकाळी ९-५५ वाजेपर्यंत ज्यांनी सौदे टाकले ते पूर्ण करण्यासाठी मेंबर्सना १२-१५ ते १२-२९ पर्यंतचा वेळ दिला गेला. पण ९-५५ पर्यंतचे सौदे रद्द होणार नाहीत असे सांगितले. असे घडले तर काय उपाययोजना केली पाहिजे यासाठी कोणतेही लीगल फ्रेमवर्क उपलब्ध नाही. या वेळात काही FREAK ट्रेड झाले म्हणजे भाव नोंदवले गेले पण ट्रेड दिसले नाहीत.

१२-३० वाजता NSE सुरु झाले. वायदेबाजार नीट सुरु झाला. पण कॅश सेगमेंटमधील गोंधळ संपला नव्हता. विक्रीसाठीचे भाव कमी आणी खरेदीसाठीचे भाव जास्त दिसत होते. AU फायनान्सचा भाव NSE वर Rs ३५८ तर BSE वर Rs ५३३ दिसत होता. दोन्ही एक्स्चेंजवरील किंमतीमध्ये एवढा फरक कधीच नसतो.
NSE वर सौदे MATCH करताना वेळ लागत होता. अर्थमंत्रालय दिवसभर लक्ष ठेवून होते पण काही करू शकत नव्हते. फक्त SEBIच्या संपर्कात होते. STOCK एक्स्चेंजविषयी सर्व निर्णय सेबी घेते. सेबीने सांगितले की आज गुंतवणूकदारांचे, ट्रेडर्सचे किंवा ब्रोकर्सचे जे नुकसान झाले असेल ते नियमाप्रमाणे विचार करून सेबी त्याची भरपाई करेल.

पण BACK UP SYSTEM का चालू केली नाही नेहेमी दर ३ महिन्यांनी MOCK ट्रेडिंग घेण्यात येते. आकस्मिक संकटाच्या वेळेस उपयोग व्हावा म्हणून जी योजना आयोजित केली गेली ती जर अशा वेळेस फेल गेली तर काय उपयोग ? परीक्षेच्या ऐन वेळी केलेला सर्व अभ्यास विसरून जाण्यासारखे झाले हे !

अशा वेळी काही गोष्टी लक्षात येतात.

(१) BSE वरील VOLUNE वाढले.

(२) NSE वर वायदेबाजारात सौदे होत नसतानासुद्धा BSE वरील वायदेबाजार थंड होता.

(३) अशा वेळी मार्केट ऑर्डर टाकू नये, लिमिट ऑर्डरच टाकावी. मार्केट ऑर्डर टाकल्यास खरेदी चढ्या भावाला होण्याची तर विक्री कमी भावाला होण्याची शक्यता असते.

१ वाजून १० मिनिटांनी NSEवर ट्रेडिंग व्यवस्थित सुरु आहे असे सांगितले. ९ एप्रिल २०१४, ३ जुलै २०१४, ११ जुलै २०१४, ला BSE वर अशा घटना घडल्या होत्या. पण यात एकच बरे झाले हे सर्व NSE उघडण्याच्या वेळीच झाले. २ वाजून गेल्यावर घडले असते तर फार नुकसान आणी गोंधळ उडाला असता. जसे लग्न होण्याच्या अगोदर काही वाईट गोष्टी समजल्या त्यामुळे लग्न मोडले तर लोक म्हणतात लग्न झाल्यानंतर घटस्फोट होण्यापेक्षा आधी समजले हे बरे झाले. शेवटी काय दगडापेक्षा वीट मऊ. पण मार्केटला या सगळ्याचा गंध नव्हता. मार्केट स्वतःतच मग्न होते. निफ्टी ९७०० च्या वर उघडला आणी ९७६२ वर बंद झाला. ९७८२ पर्यंत निफ्टी ने इंट्राडे उच्चांक गाठला.

ही NSE च्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. हा दिवस मार्केटच्या उच्चांकासाठी आणी मार्केटमधल्या तांत्रिक बिघाडाच्या नावावर नोंदला गेला.

आठवड्याचे-समालोचन – सलाम सलाम GST ला सलाम – जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

सलाम सलाम GST ला सलाम (जुलै ३ २०१७ ते जुलै ७ २०१७)

GST ही करविषयक सुधारणा मार्केटच्या पसंतीला उतरली असे समजावे का ? पण सोमवार तारीख ३ जुलै २०१७ रोजी मार्केटमध्ये जी तेजी दिसली त्यावरून हाच निष्कर्ष निघतो. मार्केट उघडल्यापासून तेजीतच होते. ITC चा पुढाकार होता. बऱ्याच ब्रोकरेज हाउसनी ‘ITC’ चे टार्गेट वाढवले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • इन्फोसिस उत्तर कॅरोलिनामध्ये (USA मध्ये) आपला दुसरा टेक्नोलॉजी आणी इनोव्हेशन हब उघडणार आहे. या मध्ये बहुसंख्य USA मधील स्थानिक रहिवाश्यांची भरती केली जाईल.
  • दार्जिलिंगमध्ये चाललेला संप आणी अस्थिर परिस्थितीमुळे उच्च प्रतीच्या चहाच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चहाच्या किंमती वाढल्या आहेत. रशिया आणी इराण येथून चहाला मागणी खूप आहे ही मागणी वाढत आहे. त्यामुळे चहाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे चहा उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले – गुडरिक, आसाम टी, जयश्री टी, टाटा टी

सरकारी अन्नौंसमेंट

  • पंतप्रधानांचा मंगळवार तारीख ४ जुलै २०१७ रोजी इझ्रायलचा दौरा सुरु झाला. जे देश तंत्रज्ञान देण्यास तयार आहेत अशा देशांबरोबर करार होणार आहेत. इझरायल तंत्रज्ञान देण्यास तयार आहे. या प्रवासात संरक्षण तंत्रज्ञानाविषयी अनेक करार होतील, MOU होतील. ही ऐतिहासिक घटना आहे. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी इझरायलची यात्रा केली नव्हती. याचा फायदा सरंक्षण आणी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना होईल. वालचंदनगर इंडस्ट्रीज, रिलायंस डिफेन्स, ASTRA MICROWAVE पुंज लॉईड या कंपनीने प्रथम इझरायल बरोबर काम करण्यास सुरुवात केली.
  • उत्तर प्रदेशातील गंगा सफाईसाठी इझरेलबरोबर करार झाला. अंतरीक्ष क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच संरक्षणविषयात करार झाले एक डिफेन्स टेक्नोलॉजीकल फंड स्थापन करणार आहेत. ७ महत्वाचे करार झाले. इझरायली कंपनी लेसिको बरोबर TEXMAKO रेल आणी TEXMACO इन्फ्रानी करार केला.
  • TEX REL आणी गरवारे WALL रोप्स यांना इझ्रायल कडून ऑर्डर मिळाली.
  • कर चोरी करण्यासाठी मदत केली असेल तर अशा १२ चार्टर्ड अकौंटंटवर कारवाई केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ही कारवाई करेल. आय कर विभागाने तक्रार केली होती की ज्यावेळी आय कर विभाग कंपनीकडे काही गोष्टींबाबत खुलासा मागत असे त्या त्या वेळी कंपन्या सांगत असत की आम्हाला माहीत नाही, आमच्या CA (चार्टर्ड अकौंटंट) ला विचारा कर कायदेशीर मार्गाने वाचवा पण कर चोरी करू नका असे थोडक्यात पंतप्रधानांनी सुचवले.
  • ‘ITC’ ला ADDITIONAL EXISE DUTY भरावी लागणार नाही.
  • खताच्या कंपन्यांना जुना STOCK GST लावून सप्टेंबर २०१७ पर्यंत विकण्यास परवानगी दिली.जुन्या STOCK वर नवीन MRP छापण्यास परवानगी दिली.
  • स्पाईस जेटला Rs २२९ कोटींची बँक GURANTEE देण्यास दिल्ली हायकोर्टाने सांगितले.
  • जेट एअरवेज २४% हिस्सा डेल्टा एअरवेजना विकणार आहे. आणी Rs २००० कोटी उभारणार आहे. यासाठी एत्तीहादची मंजुरी गरजेची आहे.
  • हायड्रो पॉवर पॉलिसी तयार करण्याचे काम सुरु आहे. ह्या महिन्याअखेर ह्या पॉलिसीला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. याचा फायदा NHPC, SJVN अशा कंपन्यांना होईल.
  • SODAA ASH चे भारतात DUMPING होत असे. यावरील ANTI DUNPING ड्युटी २ जुलै २०१८ पर्यंत लागू केली. याचा फायदा GHCL, DCW, टाटा केमिकल्स यांना होईल.
  • TRACTOR वरील GST १८% वरून १२% केला. खतावरील GST १२% वरून ५% केला.
  • साखरेवरील आयात ड्युटी ४०% वरून ६०% केली. त्यामुळे साखर कंपन्यांना फायदा होईल. ज्या कंपन्यांकडे साखरेचा साठा भरपूर आहे अशा कंपन्यांना फायदा होईल. राजश्री शुगर, धारणी शुगर, उगार शुगार, धामपूर शुगर, KCP शुगर.
  • मुंबईमध्ये २४ तास दुकाने सुरु राहतील. त्यामुळे फ्युचर रिटेल, V २ रिटेल, D MART, TRENT या कंपन्यांच्या शेअर्सला फायदा होईल.
  • एअर इंडियाचे Rs २०००० कोटींचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय आणी देशांतर्गत अशी विभागणी होण्याची शक्यता आहे.
  • सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये Rs ४०००० कोटी घालण्याची शक्यता आहे.
  • पुढील आठवड्यात पॉवरसेक्टरसाठी काही ‘BAIL OUT PACKAGE’ सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे. याचा फायदा PFC, REC, EMCO, PTC या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे.
  • भारत नेट फेज २ चे काम सुरु होईल. १ लाख ग्राम पंचायती जोडल्या जातील.फायबर नेटवर्कचे जाळे पसरले जाईल. याचे ऑक्शन होईल. टेलिकॉम कंपन्याही या ऑक्शनमध्ये भाग घेऊ शकतील. याचा फायदा तेजस नेटवर्क, अक्ष ओप्टीफायबर, फिनोलेक्स, ITI, स्टरलाइट, युनिव्हरसल केबल, स्मार्ट लिंक, डी लिंक या कंपन्यांना होईल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • NBCC ला रेल LAND डेव्हलपमेंट ऑथारीटीकडून १० रेल्वे स्थानक विकसित करण्यासाठी परवानगी मिळाली. भारती एअरटेलला एअरसेल मधला स्पेक्ट्रम घेण्यासाठी CCI (COMPETITION COMISSION ऑफ INDIA) ने परवानगी दिली.
  • ज्योती STRUCTUREच्या बाबतीत NCLT ने इंसोल्वन्सी प्रोसिडिंग चालू करायला परवानगी दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • BOB (बँक ऑफ बरोडा) चे १२ अकौंट IBC मध्ये आले. यात Rs ७२०० कोटींचे एक्स्पोझर आहे . या पैकी ५०% प्रोविजन बँकेने केली. १०० %प्रोविजन करण्याची गरज नाही असे बँकेला सांगितले. त्यामुळे शेअर वाढला.
  • गळ्यात हार घातला असेल तर चांगला वाटतो खरा. पण हाराचे वजन एवढे असू नये की माणूस त्याखाली दबला जाईल. हीच कथा NTPC ची झाली. LANKO इफ्रा ही कंपनी NTPC च्या गळ्यात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे NTPC चा शेअर पडला.
  • JMC प्रोजेक्ट्स ला ४-५ ऑर्डर्स मिळाल्या.
  • अंबुजा सिमेंटला ऑक्शनमध्ये ४२ मिलियन टनचा लाईमस्टोनचा १ ब्लॉक मिळाला.
  • स्पायडरमॅन होम हा सिनेमा रिलीज होणार आहे याचा फायदा मुक्ता आर्ट्स, INOX लीजर, एरोस, PVR या कंपन्यांना होईल.
  • भारती एअरटेल आणी अनलिस्टेड टाटा टेलीसर्विसेस आणी टाटा स्काय आणी लिस्टेड टाटा कम्युनिकेशन यांचे मर्जर करण्याची शक्यता अजमावून पाहिली जात आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • IDBI ने क्लिअरिंग कॉर्पोरेशनमधील हिस्सेदारी विकली.
  • PETRONET LNG ची एक्स डेट सोमवार ३ जुलै रोजी होती. त्यामुळे शेअरचा भाव Rs २१५ झाला.
  • सोमवारी SANWAARIYA अग्रो एक्सबोनस झाला.
  • SBI जनरल इन्शुरन्स नजीकच्या भविष्यकाळात IPO आणण्याचा विचार करत नाही.SBI लाईफ अशुअरन्सच्या IPO साठी IRDA ने सैद्धांतिक मंजुरी दिली. पण UTI AMC मधला स्टेक विकण्याचा विचार आहे.
  • NSE पुन्हा DRHP दाखल करण्याची शक्यता आहे.
  • इन्फोसिस ‘CLOUDYN SOFT’ मधील आपली हिस्सेदारी US $ ४९ लाखांना मायक्रोसॉफ्टला विकणार आहे.
  • २६ जुलैला येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये तिमाही निकाल आणी शेअरस्प्लिटवर विचार केला जाईल.
  • ११ जुलै रोजी NTPC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. या बैठकीत बोनस शेअर इशू करण्यावर विचार केला जाईल.
  • NMCE (NATIONAL MULTI COMMODITY EXCHANGE) आणी ICEX ( INDIAN COMMODITY EXCHANGE) यांचे मर्जर होणार आहे. यात ICEX चा ६२.८% हिस्सा असेल तर NMCE चा राहिलेला हिस्सा असेल
  • श्रीराम ट्रान्सपोर्ट आणी श्रेराम सिटी युनियन या कंपन्यांचे IDFC बँकेत मर्जर होण्याची शक्यता आहे. पिरामल एन्टरप्रायझेसचा श्रीराम ग्रूपमध्ये स्टेक आहे.
  • पंजाब आणी सिंध बँकेचे PNB मध्ये मर्जर होईल.
  • ABC बेअरिंग ही कंपनी टीमकीन या कंपनीमध्ये मर्ज होईल.
  • ICICI प्रू सहारा लाईफ इन्शुरन्समध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.
  • STC आणी PEC चे MMTC मध्ये मर्जर होण्याची शक्यता आहे.
  • A B NUVO च्या १० शेअर्स मागे ग्रासिमचे १५ शेअर्स मिळतील.

या आठवड्यातील IPO

  • A U फायनांस स्माल बँकेचा इश्यू ५४ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. परंतु रिटेल कोटा ३ वेळा भरला त्यामुळे शेअर्स ALLOT होण्याची शक्यता आहे.
  • GTPL चे आज लिस्टिंग झाले. IPO मध्ये Rs १७० ला शेअर्स दिले होते. लिस्टिंगही Rs १७० वर झाले.

मार्केटने काय शिकवले

सोमवारी मार्केटने १७ सेशन्सच्या कनसॉलिडेशननंतर ५ EMA (EXPONENTIAL MOVING AVERAGE), १३ EMA, २० EMA च्या वर ९६१५ वर निफ्टी बंद झाला. निफ्टी ने मल्टीपल शॉर्ट टर्म AVERAGE ओलांडला. आता निफ्टीचा ब्रेकऑउट झाला आणी BULLISH PATTERN प्रस्थापित झाला.

एक महिन्यापूर्वी बरोबर ६ जून २०१७ रोजी निफ्टी ९७०९ पर्यंत गेला होता. गुरुवारी ६ जुलै २०१७ रोजी निफ्टी ९७०० पर्यंत पोहोचेल. गुरुवारी बँक निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरी असते. तांत्रिक बाबी पाहिल्या तर असे सांगता येते की ब्रेकऑउट किंवा ब्रेकडाऊन झाल्यास फॉलोअप खरेदी किंवा फॉलोअप विक्री हवी आणी volume जास्त हवेत तरच ती ‘MOVE’ टिकाऊ असते. निफ्टी ९७०० पर्यंत जाऊन मार्केट पडण्यास सुरुवात झाली. पण ट्रेडर्सची प्रॉफीट बुकिंग झाली आणी USA मधील आणी युरोपमधील मार्केट्स मंदीत होती. तेथून मार्केटने क्लू घेतला असे जाणवले.

शाळेत जशी काही मुले मस्तीखोर,नटखट, दंगेखोर असतात. तसेच मार्केटमध्ये काही शेअर्स असतात. अशा शेअर्सना मी पेंनी STOCKS म्हणते. हे शेअर कधी रुसतात, तर कधी हसतात. अशा शेअरमध्ये ट्रेड करून काही जणांना फायदाही होतो. असे बरेच शेअर या आठवड्यात चालले. पण अशा शेअर्सना किंवा अशा मुलांना कधीही डोक्यावर बसवून घेऊ नये. नाहीतर असे शेअर कधी आपल्या टाळूवरचे लोणी खाऊन जातात समजत नाही आपण पहात बसण्यापेक्षा काही करू शकत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१३६४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९६६३ वर बंद झाले

आठवड्याचे समालोचन -आशा सुटेना देव भेटेना – २७ जून ते ३० जून २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सलग सहा सिरीजची सांगता तेजीत झाल्यावर जूनच्या सिरीजची सांगता मंदीत झाली. १४०७९५८ कोटी एवढी रेकोर्ड उलाढाल गुरुवार तारीख २९ जुलै २०१७ रोजी झाली. जुलै सिरीजची सुरुवात मंदीने होणार हे उघडच. ज्या पोझिशन कॅर्री फॉरवर्ड झाल्या त्या मन्दीच्याच दिशेच्याच. म्हणजेच अनिश्चिततेचा व मार्केटचा ३६ चा आकडा आहे असेच म्हणावे लागेल. पूर्वी जेव्हा राजकीय अनिश्चितता होती तेव्हाही मार्केट असेच मंदीत  होते. पण सध्याची मंदी ही तात्पुरती आहे GSTचे बस्तान बसले की ही मंदी जाईल असा अंदाज आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA मध्ये ओबामाकेअरच्या जागी दुसरी पॉलिसी येत असल्यामुळे DR रेड्डीज या कंपनीचे नुकसान होईल असे कंपनीने जाहीर केले.
  • पंतप्रधानांच्या USA दौऱ्यात एक प्रकारचे सौहार्दाचे वातावरण होते एनर्जी आदान प्रदान करण्यावर जोर दिला गेला. त्यांनी व्हिसा धारकांसाठीही बोलणी केली.
  • USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USA च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अनुसरून ‘FAMILY’ ची व्याख्या बदलून जर बदललेल्या व्याखेप्रमाणे एखादा नातेवाईक USA मध्ये सध्या राहत असेल तरच लिबिया, इराण, सोमालिया, सुदान, सिरीया, येमेन या देशातील नागरिकांना नवीन व्हिसा देण्यात येईल आपणाला जर व्यवसायासाठी USA मध्ये यायचे असेल तर हे संबंध formal आणी WELL DOCUMENTED असले पाहिजेत.

सरकारी अन्नौंसमेंट

  • कॅनरा बँकेमध्ये देना बँक आणी विजया बँक यांचे मर्जर होणार आहे.
  • OFSच्या माध्यमातून RCF मधील आपली हिस्सेदारी सरकार ५% कमी करणार आहे. गुरुवार आणी शुक्रवारी OFS झाला ७.२% डीसकौंट वर हिस्सेदारी विकली. Rs ७४.२५ भाव ठरला. त्यावेळी मार्केट प्राईस Rs ८० होती.
  • एअर इंडियाच्या डायव्हेस्टमेंटला परवानगी मिळाली, एअर इंडियाला असलेले कर्ज मालमत्ता हॉटेल्स याविषयीचे निर्णय एक समिती घेईल.
  • हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशनसाठी शनिवारपासून बोली मागविली जाणार आहे लिलाव सुरु होणार आहे, याचा फायदा एक्सप्लोरेशन कंपन्या, ड्रीलिंग कंपन्या, पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांना होईल – ABAN डॉल्फिन जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस, ISMT जिंदाल ड्रिलिंग, GOL ऑफशोअर
  • ITDC ने त्यांची भोपाल आणी आसाम येथील हॉटेल्स राज्य सरकारांकडे सुपूर्द केली.
  • आता NELP बरोबरच HELP ही नवी पॉलिसी ऑईल आणी GAS क्षेत्रात येणार आहे.
  • नैसर्गिक वायुला GST च्या कक्षेत आणणार आहेत याचा फायदा टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. हेअर ऑईल वर पूर्वी २३%ते २४% कर आकारला जायचा. आता GST खाली १८% लागेल. याचा फायदा मेरिको ला होईल.
  • सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजाचे दर ०.१०% ने कमी केले. आता PPF वरील व्याजाचा दर ७.८% तर किसान विकास पत्रावर ७.५ % राहील.
  • सरकारने ७ व्या पे कमिशन ची सुधारीत भत्त्यांसाठी शिफारस मंजूर केली. यासाठी सरकार Rs ३०७८४ कोटी खर्च करेल.
  • १ जुलै २०१७ पासून सर्व वर्तमान ‘PAN’ धारकांना आपला PAN नंबर आधार कार्डा बरोबर लिंक करावा लागेल. हे आपण आयकर रिटर्न भरताना बँक अकौंट ओपन करताना आणी Rs ५०००० पेक्षा जास्त रकमेचे फायनांशियल TRANSACTION साठी आवश्यक आहे.
  • CDSL मधील २६% हिस्सेदारी BSEने IPO द्वारा विकली.याचा फायदा BSE ला होईल.
  • युनिकेम LAB च्या गोवा उत्पादन युनिटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली
  • एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक घेण्यात इंडिगोने रुची दाखवली तेव्हापासून या कंपनीचा शेअर सतत पडत आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सेबीने OFS च्या नियमात सुधारणा केली. कर्मचारी आणी ऑफिस स्टाफ आता OFS मध्ये भाग घेऊ शकतील.
  • RBI ने IBC कडे सुपूर्द केलेल्या NPA खात्यांवर कर्ज दिलेल्या बँकांनी प्रथम ५०% आणी जर कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली तर १००% प्रोविजन करावी असे बँकांना आदेश दिले.
  • RBI लवकरच Rs २०० ची नोट चलनात आणील.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • ३० जून पासून ‘रेप्को होम फायनान्स’, SREI इन्फ्रा, मन्नापुरम फायनान्स, चेन्नाई पेट्रो, आणी ICICI प्रुडेशियल, या कंपन्यांचा वायदा बाजारात समावेश होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • इंडिया बुल्स रिअल मध्ये पिरामल नी आपला स्टेक वाढवला.
  • टाटा मेटालिक्स, टाटा स्पॉंज या टाटा ग्रूपच्या दोन्ही कंपन्या टाटा स्टीलमध्ये मर्ज होणार अशी खबर आहे.
  • आंध्र प्रदेशातील काकिनाडाला स्मार्ट किती बनवणार आहेत. त्यासाठी स्टरलाइट टेक्नोलॉजी या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली.
  • लाओपाला ग्लासमध्ये FII लिमिट २४% वरून ३५% केली.
  • नवीन फ्लूओरीनमध्ये मफतलाल इंडस्ट्रीज आणी नोसिलचा स्टेक आहे हा स्टेक या कंपन्या विकणार आहेत
  • सोना कोयो आणी भारत फोर्ज या दोन कंपन्यांनी AMTEK ऑटो मध्ये स्टेक घेण्यात इंटरेस्ट दाखवला.
  • JSW स्टील ग्रूपची JSW सिमेंट या कंपनीने शिवा सिमेंटमध्ये शेअर्स खरेदी केले. जेव्हा एखादा मोठा ग्रूप एखाद्या कंपनीत लक्ष देत असेल तर आपणही लक्ष ठेवावे.
  • कावासाकी हेवी बरोबर BHEL ने हाय स्पीड ट्रेन साठी करार केला.

कॉर्पोरेट एक्शन

  • नेस्ले ही कंपनी आपले शेअर्स BUY BACK करेल.
  • बजाज ऑटो ची लाभांशासाठी डेट ८ जुलै २०१७ आहे
  • PETRONET LNG च्या बोनस साठी रेकोर्ड देत ४ जुलै २०१७ आहे.
  • माइंड ट्रीने Rs 625 ला BUY BACK जाहीर केला.
  • गोदरेज अग्रोव्हेट मधील हिस्सेदारी IPO द्वारा विकली जाणार आहे. याद्वारे Rs ४०० कोटी गोळा होतील.
  • क्रिसिलने ‘केअर’मधील ८.९% हिस्सेदारी Rs १६५९.९१ प्रती शेअर या भावाने खरेदी केली.कॅनरा बंकेनी हि हिस्सेदारी विकली. कॅनरा बँक ही हिस्सेदारी विकणार ही खबर मार्केटला बरेच दिवसापासून होती. ही टांगती तलवार दूर झाल्यामुळे ‘केअर’ चा शेअर वाढला. कॅनरा बँकेने २६ लाख शेअर्स विकून Rs ४३२ कोटी जमा केले.
  • कुओनी ग्लोबल डेस्टिनेशन MANAGEMENT नेटवर्क ही कंपनी THOMAS कूक या कंपनीने विकत घेतली. त्यामुळे २१ देशात कारभार पसरेल. यामुळे Rs ८७०० कोटींचा टर्नओव्हर होईल.
  • MACDONALDची ४३ लायसेन्स दिल्लीमध्ये रद्द केली. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट ही व्यस्था बघते. या कंपनीच्या शेअरवर परीणाम झाला.

 

या आठवड्यातील लिस्टिंग

  • तेजस नेटवर्कचे लिस्टिंग झाले. शेअर ज्या भावाला IPO मध्ये दिला त्याच भावाला म्हणजे Rs २५७ला लिस्टिंग झाले. IPO ला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
  • इरीस लाईफसायन्सेस या कंपनीचे Rs ६१६ वर लिस्टिंग झाले. IPO च्या निवेशकांना फारसा फायदा झाला नाही
  • IPO मध्ये हा शेअर Rs ६०३ ला दिला होता
  • CDSL चे लिस्टिंग दमदार Rs २५० ला झाले IPO प्राईस Rs१४९ वर Rs १०० लिस्टिंग गेन झाला.

भविष्यात येणारे IPO

  • जेनसेट उत्पादक ‘POWERICA’ नजीकच्या काळात IPO द्वारे Rs ८०० कोटी उभारेल..

मार्केटने काय शिकवले

लिक्विडीटी आणी VALUATION दोन्ही गोष्टीत झकाझकी चालू आहे. मार्केटमध्ये येणार्या पैशामुळे मार्केट फारसे पडत नाही. बरेच शेअर्स हाय VALUATIONवर ट्रेड करत असल्याने मार्केट फारसे वाढत नाही. माणूस आशेवर जगत असतो त्यामुळे काहीतरी घडेल आणी मार्केट पुन्हा वाढू लागेल असे वाटते

LIC ने सन फार्माचे ७ लाख शेअर्स खरेदी केले. तर हिरो मोटोमधील २% स्टेक कमी केला. आता हा स्टेक ५.१३% राहिला. DSP BLACK ROCK या म्युच्युअल फंडाने ARROW ग्रीनटेक मध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी केले. या म्युच्युअल फंडाचा स्माल कॅपमध्ये गाढा अनुभव मानला जातो. LIC आणी आणी म्युच्युअल फंड्स जेव्हा मार्केटमध्ये विकतात किंवा खरेदी करतात तेव्हा मार्केटला त्या प्रकारची गती मिळते. गुंतवणूकदारांना अंदाज घेता येतो. पुट /कॉल रेशियो १.१ वरून ०.९८ झाला. ज्यावेळी हा रेशियो 1 पेक्षा खाली येतो तेव्हा अग्रेसिव शॉर्ट करणे टाळावे. पण एक्सपायरी असेल तर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड चा विचार करू नये,

३० जूनला रात्री १२ वाजता GST लागू होईल. सुरुवातीला काही अडचणी येतील. सध्या कोणाला किती आणी कसा फायदा होईल आणी नुकसान कोणाला होईल याचा अंदाज घेत मार्केट पुढे सरकत आहे. पण नेहेमी अंदाज आणी प्रत्यक्ष परिस्थिती यात फरक असतो. हा फरक येणारा काळच ठरवेल. म्हणून आपण नेहेमी म्हणतो ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’  परिणामाला सामोरे जावे तर लागेलच प्रश्न आहे पॉझीटीव किंवा निगेटिव! बघुया काय होते ते

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०९२० वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ९५२३ वर बंद झाले

 

Stock market information in marathi

आठवड्याचे-समालोचन – १९ जून २०१७ ते २३ जून २०१७ – योगाशी करा सहयोग तर साधेल योगायोग

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

२१ जून हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होतो. योगाचे असणारे महत्व सर्व जगाला पटले. योगामुळे आरोग्य चांगले राहते. आरोग्यामध्ये शारीरिक आणी मानसिक आरोग्याचा समावेश होतो. जर असे आरोग्य चांगले राहिले तर शेअरमार्केटमधील गुंतवणुकीचे आणी ट्रेडिंगचे निर्णय घेणे सहज शक्य होते. स्थैर्य येते उत्साह येतो त्यातूनच प्रयत्नाला योग्य दिशा मिळते. प्रयत्नातून यश आणी त्यातून संपत्ती असा सुंदर योगायोग साधता येतो. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करताना संयमाची गरज असते. हा संयम योगामुळे येतो. कमीतकमी किंमतीत खरेदी, जास्तीतजास्त किंमतीत विक्री, अफवांपासून स्वतःचा बचाव यासाठी संयम लागतो. म्हणूनच उत्तम योगायोग जुळून येण्यासाठी योगाची कास धरा असे सांगितले जाते

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • क्रूड उत्पादन करणाऱ्या देशांनी क्रूड उत्पादनात वाढ केल्याने क्रूडची किमत कमी होत आहे.
  • MSCI निर्देशांकात चीनमधील २२२ ‘A’ शेअर्स चा MSCI इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकात समावेश केला जाईल.हे शेअर्स या इंडेक्सचा ०.७% हिस्सा असतील. यामुळे आता जागतिक गुंतवणूकदार चीन मध्ये जास्त गुंतवणूक करतील. हे शेअर्स मे २०१८ आणी ऑगस्ट २०१८ अशा दोन टप्प्यात MSCI इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकात सामील केले जातील.
  • USA सिनेट मध्ये ओबमाकेअर ही हेल्थकेअर स्कीम रद्द करण्याचा आणी नवीन हेल्थकेअर बिल मजूर होण्याचा चान्स आहे या बिलाप्रमाणे श्रीमंत USA च्या नागरिकांवर लावलेला ३.८% नेट इन्व्हेस्टमेंट TAX रद्द करण्याकरता तरतूद असेल. या कायद्याप्रमाणे २३ मिलियन USA नागरिक हेल्थकेअर प्लानला पारखे होतील.

सरकारी अन्नौंसमेंट

  • सरकारने अखेर GST साठी ३० जून २०१७ रोजी रात्री १२ वाजता मुहूर्त ठरवला.आजी माजी पंतप्रधान आणी सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.तुम्ही आम्ही हा सोहळा दूरदर्शनवर पाहता पाहता अक्षता टाकू शकतो.
  • सरकार GST साठी NAA (NATIONAL ANTI-PROFITEERING AUTHORITY) ची स्थापना करेल. ही ऑथारीटी कंपन्या GST मुळे झालेला करातील फायदा ग्राहकांना पास करतात की नाही यावर लक्ष ठेवेल आणी ज्या कंपन्या GST मुळे होणारा करातील फायदा ग्राहकांना पास ऑन करणार नाहीत त्याना दंड तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यापर्यंत कारवाई करील.
  • सरकारने चीन मधून आयात होणाऱ्या दूध आणी दुग्धोत्पन्न पदार्थांवर १ वर्षाकरता बंदी घातली आहे. याचा फायदा नेस्ले, प्रभात डेअरी, पराग मिल्क प्रोडक्टस्, क्वालिटी डेअरी यांना होईल.
  • ड्रेजिंग कॉर्पोरेशन मध्ये सरकारचा ७३.४६ % हिस्सा आहे. हा हिस्सा सरकार लिलाव करून विकणार आहे.
  • राज्य सरकारच्या लॉटरीवर १२% तर इतर खाजगी लॉटरीसाठी २८% GST चा दर असेल.
  • जर घराचे भाडे Rs २५०० ते Rs ७५०० असेल तर १८% GST आणी घराचे भाडे Rs ७५०० च्यावर असेल तर २८% GST लागेल.
  • एअरइंडिया मधील आपला स्टेक विकावा असे सरकारचे म्हणणे आहे पण विमानन मंत्रालयाचा त्याला विरोध आहे.
  • दिल्लीला धीतोरनी येथे २४६ एकर जागेत स्मार्ट सिटी तयार करण्याचे काम NBCC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मिळाले.
  • कर्नाटक राज्य सरकारने Rs ५०००० पर्यंतचे कर्ज माफ केले.
  • AIF (आल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट फंड) यांना कमोडीटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. याचा फायदा MCX ला होईल.
  • शिपिंग कंपन्यांना ५% GST लावला याचा फायदा OIL कंपन्यांना होईल.
  • ज्या बँकेकडे, पोस्ट ऑफिसकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे अजून रद्द केलेल्या Rs५०० आणी Rs १००० च्या जुन्या नोटा असतील त्यांना जुलै २०पर्यंत (३० दिवसांच्य मुदतीत) RBI च्या कोणत्याही ऑफिसात जमा करण्याची परवानगी दिली आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • RBI ने PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) खाली बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेवर कारवाई केली.
  • सेबीने RESTRUCTURING SCHEME अंतर्गत अडचणीत असलेल्या कंपनीत २५% पेक्षा जास्त स्टेक घेणार्या इन्व्हेस्टरला अल्पसंख्य शेअरहोल्डर्ससाठी ओपन ऑफर आणण्याच्या नियमातून सुट दिली आहे. परंतु यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी लागेल. या स्कीमअंतर्गत आलेल्या नवीन इन्व्हेस्टर्सनी घेतलेल्या शेअर्सना ३ वर्षाचा लॉक इन पिरीयड असेल.
  • तसेच सेबीने PE नोटसाठी नियम अजून कडक केले तर FPI साठी असलेल्या काही नियमात सवलती देण्याचा आपण विचार करत आहोत असे जाहीर केले.
  • सरकारने असा निर्णय घेतला आहे की ‘ऑर्गनिक फूड’ म्हणून विकल्या जाणाऱ्या PACKAGED फूड साठी FSSAI (FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY OF INDIA) चे CERTIFICATION लागेल

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी  

  • DR रेडीजच्या श्रीकाकुलम प्लांटची USFDAने तपासणी केली. त्यात १ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ दिला.
  • इप्का LABला USFDA दाखवलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी जो वेळ लागत आहे तो चिंताजनक आहे.
  • टाटा स्टीलमध्ये जो टाटा मोटर्सचा स्टेक आहे तो टाटा SONS खरेदी करणार आहे. म्हणजेच टाटा स्टीलला पैसे मिळतील त्यांचे कर्ज कमी होईल आणी टाटा मोटर्समधील टाटा संस चा स्टेक वाढेल.
  • ABB आणी L&T यांच्यात L&T ची इलेक्ट्रिकल आणी ऑटोमेशन डिविजन खरेदी करण्यासाठी बोलणी चालू आहेत. या डिविजनचे VALUATION Rs १४००० कोटी ते Rs१८००० कोटी होईल. ABB या डिविजन मध्ये ५१% ते १००% च्या दरम्यान स्टेक खरेदी करेल.
  • स्पाईस जेट या प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात असलेल्या कंपनीने US$१.७ बिलियन किमतीची ५० BOMBARDIER Q४०० विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे त्यामुळे ही कंपनी भारतातील सर्वात मोठी TURBOPROP एअरक्राफ्ट ऑपरेटर बनेल.
  • महिंद्र एअरोस्पेस ही कंपनी लवकरच आपले AIRVAN नावाची १० सीटर विमान सेवा प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी लौंच करेल.
  • कॅनरा बँकेने त्यांचा ‘CARE’ मधील ९% स्टेक Rs ३९३ कोटींना विकला.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया इस्सार स्टील, भूषण स्टील, आणी इलेक्ट्रोस्टील स्टील्स या कंपन्यांविषयी INSOLVENCY अंड BANKRUPTCY कोर्टात अर्ज करेल. या कंपन्यांकडे बँकांचे एकूण Rs १००००० कोटी कर्ज बाकी आहे.
  • कर्ज देणाऱ्या बँका आणी मॉनेट इस्पात यांच्यात कंपनीचे IBC (INSOLVENCY एंड BANKRUPTCY CODE) खाली रीऑर्गनायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे, या कंपनीत कर्जदार बँकांचा ५१% स्टेक असल्यामुळे या रीऑर्गनायझेशनला जास्त अडचण येणार नाही असे वाटते.
  • टाटा मोटर्स लंडन आणी अमेरिकन STOCK एक्स्चेंज वर JLR चे लिस्टिंग करणार आहे.
  • वेदान्ता ही कंपनी झारखंडमध्ये नवीन प्लांट सुरु करणार आहे
  • पेट्रोनेट LNG ही मुंद्रा LNG टर्मिनल विकत घेण्यासाठी बोलणी करीत आहे.
  • १२ जून २०१७ ते १६ जून २०१७ या दरम्यान ल्युपिन कंपनीच्या पिठमपूर युनिट ३ ची तपासणी केली. 483 फॉर्म इशु केला आणी ५ त्रुटी नोंदवल्या.
  • IDFC मध्ये FII ची लिमिट ४८% असते. ती पूर्ण झाल्यामुळे FIIना या शेअरमध्ये गुंतवणूक करायला परवानगी नव्हती. पण सध्या ही गुंतवणूक ४८% पेक्षा कमी असल्याने पुन्हा FII ना गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. .
  • GST लागू होण्यापूर्वी आपली इंव्हेनटरी कमी करण्याची शर्यत लागली आहे. पण हा सेल खूप मोठी सूट देऊन केला जात आहे. त्यामुळे विक्रीचे आकडे सुधारतील पण ऑपरेटींग मार्जीन कमी होईल. आणी पुढे मालाला २-३ महिने मागणी कमी येईल. त्यामुळे FMCG, ऑटो सेक्टरचे दुसऱ्या आणी तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येणार नाहीत.
  • ग्रासिम आणी AB NUVO यांच्या मर्जरची तारीख ६ जुलै २०१७ ही ठरली.
  • टाटा पॉवर, अडानी पॉवर, आणी एस्सार पॉवर या कंपन्यांनी त्यांचा आयात केलेल्या कोळशावर चालणाऱ्या पॉवर प्लांट मध्यील मेजॉरीटी स्टेक गुजरात राज्यसरकारला Rs १ किमतीला विकण्याची तयारी दर्शवली आहे. इंडोनेशिया मधील कायदा बदलल्यामुळे तेथून आयात होणार्या कोळशाच्या किमती वाढल्यामुळे कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यास सुप्रीम कोर्टाने या कंपन्यांना नकार दिला आहे. या कंपन्यांनी या बाबतीत केंद्र सरकारला मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
  • WOCKHARDTने लंडनमधील कोर्टात २.३० कोटी GBP भरून टेसला बरोबरचा आपला तंटा मिटवला.
  • २२ कर्जदारांनी एस्सार ओईलला ROJNEFTशी करार करण्यासाठी NOC दिले.
  • बोरोसील ग्लास आपल्या Rs १० दर्शनी किमत असलेल्या १ शेअर्सचे Rs १ दर्शनी किमतीच्या १० शेअरमध्ये विभाजन करणार आहे. म्हणजेच एका शेअरला १० शेअर मिळतील. शेअर्स स्प्लीट विषयी माहिती माझ्या पुस्तकात सविस्तर दिली आहे.
  • RCOM च्या REHABILITATION PACKAGEला कर्जदारांनी मंजुरी दिली. यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली. या मुदतीपर्यंत IBC खाली कारवाई करणार नाही असे जाहीर केले.
  • कॅनफिना होम्स या कंपनीने ५ शेअरला १ राईट्स शेअरला मंजुरी दिली. कंपनी राईट्स इशू द्वारे Rs १००० कोटी उभारेल. राईट्स इशू विषयी माझ्या पुस्तकात स्वतंत्र CHAPTER आहे.

या आठवड्यात आणी नजीकच्या काळात येणारे IPO

  • इंडियन एनर्जी एक्स्चेंज ने IPO साठी सेबीकडे अर्ज केला आहे. टाटा पॉवर त्यांचा हिस्सा विकणार आहेत.
  • IRCTC ने IPO साठी प्रक्रिया वेगात सुरु केली.
  • एरिस लाईफसायन्सेसचा IPO ३.३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. QIB कोटा ४.७ वेळा आणी रिटेल कोटा ३.३ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
  • CDSL या डीपॉझीटरी क्षेत्रात काम करणार्या कंपनीचा IPO एकूण विक्रमी १७० वेळा तर या मधील HNI कोटा ५६३ वेळा तर रिटेल कोटा २३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • २८जुन २०१७ पासून ते ३०जुन २०१७ पर्यंत AU SMALL FINANCE बँकेचा IPO ओपन राहील. याचा प्राईस BAND Rs ३५५ ते Rs ३५८ असेल मिनिमम लॉट ४१ शेअर्स आहे.या बँकेच्या ३०० शाखा असून गुजरात राजस्थान NCR छत्तीसगड या राज्यात मुख्यतः यांच्या शाखा आहेत. ही बँक मुख्यतः PRODUCT BASED कर्ज देते. या बँकेचे NPA २% च्या आसपास असतात. ही बँक लहान वाहने, लहान हौसिंग आणी बिझिनेस लोन देते.

तांत्रिक विश्लेषण

  • मन्नापुरम फायनान्स या शेअरचा गुरुवारचा चार्ट बघितल्यास रिव्हर्स हेड एंड शोल्डर चा PATTERN दिसला. या PATTERNचा प्राईस VOLUME ब्रेकऑऊट झाला.
  • रिलायंस डिफेन्सचा चार्ट बघितल्यास लहानसा TRIANGLE PATTERN दिसला. या PATTERNचा ब्रेकऑऊट झाल्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये शेअरची किंमत वाढली.

मार्केटने काय शिकवले

गेल्या वर्षी GST बिल पास होण्याच्या वेळेपासून लॉजिस्टिकचे शेअर्स वाढले. मध्यंतरी काही काळ पडले आणी आता पुन्हा आता १ जुलै २०१७ पासून GST लागू होणार म्हणल्यावर ह्या शेअरमध्ये  हालचाल दिसू लागली. म्हणजेच लोक पैसा अडकवून ठेवत नाहीत. काही महिने हे शेअर्स वाढण्याची शक्यता नसेल तर ते शेअर विकून तोच पैसा ज्या शेअरमध्ये हालचाल असेल त्या शेअर मध्ये गुंतवतात. पैसा जेवढा खेळता राहील तेवढा नफा जास्त पण योग्य वेळ साधता आली पाहिजे.

या आठवड्यात मार्केटने जाहीर केले – ‘आता मी थकलो काही काल विश्रांतीची गरज आहे.’ थोड्या थोड्या प्रमाणात मार्केटने माघार घेतली. पण ज्या गुंतवणूकदारांनी किंवा ट्रेडर्सनी गुंतवणुकीची किंवा ट्रेडिंगची शिस्त पाळली असेल, STOP LOSSचा उपयोग केला असेल, आणी वेळेवर प्रॉफीट बुकिंग केले असेल त्याना या वेळेचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी करता येईल. पुढील ३ दिवस मजेत घालवता येतील. आणी नवीन संधीचा विचार करता येईल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१११८ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९५७३ वर बंद झाले.

 

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia

नाव: AMIT PATHADE

तुमचा प्रश्न : Dimat अकाउन्ट उघडण्यासाठी कीती खर्च लागतो.आणि कमीत कमी कीती रक्कम गुतवणूक करावी लागती.

‘DEMAT’ अकौंट उघडण्यासाठी खर्च ठरलेला नाही. काही ब्रोकर फुकट DEMAT अकौंट उघडतात तर काही ठिकाणी लाईफटाईमसाठीचे पैसे अकौंट उघडतानाच घेतात. कमीतकमी कितीही रक्कम गुंतवा अगदी Rs १०० सुद्धा.

नाव: Narayan Suryakant palande

तुमचा प्रश्न : Mala share market baddle kahihi knowledge nahiye.. Pan mala te shiknyachi khup iccha aahe.. Tumi mala ya blog cha marfat shikvu shakta ka??

लोकांना शेअरमार्केट्ची माहिती व्हावी आणी पैसा मिळावा हाच उद्देश माझ्या ब्लॉगचा आहे. तुम्ही लक्षपूर्वक वाचा.

नाव: supriya

तुमचा प्रश्न : buyback mhanaje kay

मी ‘BUY BACK’ या विषयावर माझ्या ब्लॉगवर ब्लोग नंबर ५८ लिहिला आहे. तो वाचा माझ्या पुस्तकात सुद्धा ‘BUY BACK’ वर लेख आहे.

नाव: andy

तुमचा प्रश्न : i am very impress your knowledge about share market .here i am ask you can i invest 500/- rupees. in share market

तुम्ही Rs ५०० काय पण Rs १०० सुद्धा गुंतवू शकता.

नाव: सुहास गोरे

तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम Candlestick patterns वर एखादा लेख लिहावा हि विनंती. खूप confusion आहे. काहीच माहिती नाही म्हंटलं तरी चालेल please मॅडम लवकरात लवकर यावर लेख लिहावा.

मला वेळ मिळाला की आपल्या सूचनेचा विचार होईल. माझ्या पुस्तकातील ‘तांत्रिक विश्लेषण’ या विभागात ‘कॅण्डल स्टिक’ या PATTERN वर माहिती आहे. 

नाव: Ajit

तुमचा प्रश्न : नमस्कार मॕडम, माझ्याकडे Supreme Tex या कंपनीचे ५०० शेअर्स आहेत, Buy Value 10rs आहे. तर मला हा stock वाढेल की नाही याबद्दल व याचे भविष्य काय असेल.. current value : 4 rs

मार्केटमधून पैसा कसा मिळवता येतो हे एखाद्या शाळेत जसे शिकवतात तसे मी ‘ब्लॉग’च्या प्रशिक्षण वर्गाच्या किंवा पुस्तकाच्या माध्यमातून शिकवते पंण ठराविक शेअरवर माझे मत व्यक्त करत नाही. मोबाईलवर येणार्या SMS वरून ज्या काही शेअर्सविषयी टिपा येतात त्यात पूर्णपणे समजून उमजून गुंतवणूक करा. अन्यथा फसगत होण्याची शक्यता मोठी असते.

नाव: Ravindra Dhoble

तुमचा प्रश्न : आदरणीय म्याडम demat खाते broker मार्फत काढल्यास broker ला किती कमिशन मिळते ?

‘DEMAT’ खाते उघडण्यासाठी ब्रोकरला काही कमिशन द्यावे लागत नाही.

नाव: SWATI NALE

तुमचा प्रश्न : Dmat account kadhtana bank broker thevane yogya ki private broker thevane yogya

‘DEMAT’ अकौंट एखाद्या मोठ्या बँकेमध्ये आणी ट्रेडिंग अकौंट मात्र प्रायव्हेट ब्रोकरकडे ठेवावा. तुम्ही कुठेही अकौंट उघडा पण अकौंट मध्ये होणाऱ्या ऑपरेशन्सवर बारकाईने लक्ष ठेवा. म्हणजे फसवणूक होत नाही.

नाव: Sandeep mhaske

तुमचा प्रश्न : Res. Mam Day trading madhe risk che praman kiti aste

तुम्ही किती धोका पत्करायला तयार असाल त्याप्रमाणे STOP LOSS लावावा. त्यामुळे तुम्ही धोक्याचे प्रमाण नियंत्रित करू शकता. पण गुंतवणूक किंवा शॉर्ट किंवा मध्यम मुदतीच्या ट्रेडिंग पेक्षा डेट्रेड मध्ये धोका जास्त आहे.

नाव: अविन बाबासाहेब निर्मळ

तुमचा प्रश्न : सप्रेम नमस्कार मॅडम, जर मी dmat account उघडले आणि काही शेअर्सची खरेदी केली, आता मला ते शेअर्स विक्री करण्याकरिता समोर खरेदीदार असणे आवश्यक आहे किंवा नाही. तसेच मी कोणत्याही ब्रोकरशिवाय माझे खाते कोणालाही त्याचे अधिकार न देता अगदी सहज आणि मोकळेपणाने चालवू शकतो की,हि प्रक्रिया अवघड आणि किचकट असते हे सांगा हि विनंती. कारण मला माझे खाते स्वतः चालवण्याची ईच्छा आहे.

इंटरनेट वरून तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या शेअर्ससाठी किती खरेदीदार, कोणत्या प्राईसला, किती शेअर्ससाठी उपलब्ध आहेत हे कळू शकते. तुम्ही तुमचे खाते स्वतः चालवू शकता. याची प्रोसेस ब्लॉगवर आणी माझ्या पुस्तकात डिटेलमध्ये वर्णन केलेली आहे

नाव: Sandeep mhaske

तुमचा प्रश्न : Aadarniya mam, blue chip shayer mhanjhe Kay? Aani,tyamadhe riskche praman kami kase aasu shakte. Thank u

मार्केट कॅप, VOLUME, लिक्विडीटी, TRACK रेकॉर्ड, कंपनीला होणारा नफा, कंपनी देत असलेला लाभांश, शेअरहोल्डिंग PATTERN, आणी कंपनीला उपलब्ध असणाऱ्या प्रगती करण्याच्या संधी, या सर्व गोष्टी ब्लू चीप कंपनीत असतात. त्यामुळे कंपनीच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले तर धोका कमी असतो.

नाव: Asif

तुमचा प्रश्न : mala sharemarket shuruwat karyachi aahe

आपण माझा ब्लॉग ,पुस्तक, प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून शेअरमार्केटशी परिचय करून घ्या. नंतरच आपण शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक, ट्रेडिंग सुरु करा.

नाव: Ashvini Santoshrao bhende

तुमचा प्रश्न : Is it necessary to have a net banking to open dmat account

आपण बँकेत किंवा ब्रोकरच्या ऑफिसात व्यक्तीशः जाऊन DEMAT अकौंट उघडू शकता. जर तुम्ही DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट ऑन-लाईन करणार असाल तर नेट बँकिंगची सुविधा असणे जरुरीचे आहे अन्यथा नाही.

नाव: Eknath Mahajan

तुमचा प्रश्न : dmat sathi It return aavashyak aahe ka share trading var tax basto ka

तुमचे करपात्र उत्पन्न कमीत कमी करमुक्त उत्पनापेक्षा जास्त असेल तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये झालेल्या उत्पन्नाचा एकूण उत्पन्नात समावेश करावा लागतो. परंतु खरेदी केल्यानंतर एक वर्षाने STOCK एक्स्चेंजच्या माध्यमातून शेअर्स विकले तर कोणताही कर लागत नाही.

नाव: महेश नार्वेकर

तुमचा प्रश्न : मॅडम नुकत्याच आलेल्या बातमीनुसार बी.एस.ई ने सात स्टोक वर अप्पर सर्किट,वा हाई वाल्यूम मूळे ट्रेडिंग वर बंदी घातली,म्हणजे नक्की काय? हे शेअर दिवसाला 20%वर होते.प्र(2)-काही शेअरचा मागील दोन अडीच वर्षाचा आढावा घेतल्यास १०००ते१२००%टक्क्यांपर्यंत वाढ दाखवते ही किमया शेअर बाजारात असेल?की उगाच आकडे फुगून दाखवले असावेत का? मॅडम आपले ब्लाॅग वाचून शेअर बाजारात उतरण्यास हिंमत आली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

ज्या अर्थी सेबीने या शेअर्सच्या ट्रेडिंग वर बंदी घातली आहे त्याअर्थी या शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये काही गैरव्यवहार चालू आहेत असे समजायचे. अशा शेअर्समध्ये ट्रेडर्सनी ट्रेडिंग करू नये.

नाव: sagar

तुमचा प्रश्न : Can govt employee invest in share market??

आपण आपल्या ऑफिसमध्ये प्रचलीत असलेल्या नियमांची चौकशी करावी. पण सामान्यतः दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी परवानगी असते.

नाव: balu gadhe

तुमचा प्रश्न : शेअर कोठुन खरेदी करायचा

शेअर शेअर मार्केटमधून खरेदी करावा. त्यासाठी DEMAT अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट असणे जरुरीचे आहे.

नाव: Amar kogde

तुमचा प्रश्न : Face value म्हणजे काय plz tell mi

कंपनी IPO मध्ये शेअर ऑफर करताना त्याची फेस VALUE ठरवते. फेस VALUE आपल्याला शेअरच्या मार्केट किमतीच्यावर लिहिलेली बिझिनेस वाहिन्यांच्या टीकरवर दिसते.

नाव: amol pati

तुमचा प्रश्न : gst for effect in share market ?

GST  हा विचार देशातील अर्थव्यवस्थेच्या सर्व अंगांवर कुठे चांगला तर कुठे विपरीत परिणाम करेल. हा विचार सर्व उद्योगांशी निगडीत असल्याने मार्केटमधील बहुतेक सेक्टरवर आणी त्यातील कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम करेल.

नाव: sudha chavan

तुमचा प्रश्न : Respected Madam, Future Option madhey market cha trand oolkhun call or put madhey kashi entry gheyvi? Pls margadarshan kara

‘ट्रेंड इज फ्रेंड’ हे शेअरमार्केटचे सूत्र आहे. मंदी असेल तर ‘PUT’ BUY करा आणी जर तेजी असेल तर ‘CALL’ BUY करा.

नाव: RAJENDRA MANE

तुमचा प्रश्न : HUDCO IPO will open in this month. Will you please explain about it, shall we buy it or not ??

‘HUDCO’ च्या IPO विषयी सविस्तर माहिती त्या आठवड्याच्या समालोचनात दिली आहे.

नाव: amit gade

तुमचा प्रश्न : mam mla short sell kay asto v to ksa kraycha ya vishyi mahiti pahije

माझ्या ब्लॉग नंबर ३२, ३३, ३४, ३५, ३६ या ब्लोगवर डेट्रेडची माहिती दिली आहे त्यात शॉर्ट सेलची माहिती मिळेल किंवा माझ्या पुस्तकात मिळेल.

नाव: Mahesh Bhide

तुमचा प्रश्न : Can i buy Century enka at 449 & delta corp at 281

मी शेअर मार्केट शिकवते. कोणता शेअर घ्यावा हे सांगत नाही. कारण त्यामुळे माझे वाचक परावलंबी होण्याचा धोका संभवतो.

नाव: poonam ghadge

तुमचा प्रश्न : share market madhe invest karaych asel tar broker chi garaj aahe ka ?

ब्रोकर लागतोच. पण ब्रोकर म्हणजेच मध्यस्थ हा त्याचा अर्थ. ब्रोकर एखादी व्यक्ती, फर्म, कंपनी किंवा बँक असू शकते.

नाव: shivprasad

तुमचा प्रश्न : gst chi vibhagni kashi keli ahe centre and state

आपण रोजचे वर्तमानपत्र वाचले तरी आपण GST FRIENDLY बनाल. मी शेअर मार्केट शिकवते. GST नव्हे. आणी GST चा परीणाम कोणत्या शेअरवर कसा, कोणत्या कंपनीला फायदा होईल हे शिकवते. यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु आहे.

GST हा नवीन आणी सतत बदलणारा विषय आहे. त्याचे विविध परिणाम १ जुलैला लागू झाल्यापासून तिसऱ्या तिमाहीत दिसू लागतील.

नाव: mahendra patil

तुमचा प्रश्न : we have purches HINDUSTAN ZINK AT RS. 320 [23/03/2017] but now price have go down so please guidance me HOLD OR SELL

ठराविक शेअरवर मी मत व्यक्त करत नाही.

नाव: Vishal

तुमचा प्रश्न :

1.Colgate VR 3 e/s anounce zala aahe. On Jr mi to share , devident chi rukam a/c madhe yeniya aadhi vikla TR mala te rupee miltil ki te yeniya sathi portfolio madhe share aasava lagto?

रेकोर्ड डेटला तुमच्या DEMAT अकौंटवर शेअर्स जमा असतील तरच बोनस लाभांश, स्प्लिट अशा कॉर्पोरेट एक्शनचा फायदा मिळतो. माझ्या पुस्तकात मी रेकोर्ड डेट आणी EX डेट याविषयी सविस्तर चर्चा केली आहे ती वाचावी.

२. Jr ekada share la khare di karniya aadhi devident jahir zala aasel Ani devident vatpavelie Jr to maziya portfolio madhe aasel TR devident konala Mikel?

रेकोर्ड डेटला तुमच्या DEMAT अकौंटवर शेअर्स जमा असतील तरच बोनस लाभांश, स्प्लिट अशा कॉर्पोरेट एक्शनचा फायदा मिळतो

नाव: Dhananjay Kale

तुमचा प्रश्न : Madam, me tumche blog regular vachto,trading thoda far mahiti zala ahe pan share select karta yet nahi news paper vachto news pahto intra day karto ahe sadhya chhotya pramanat tumhi sangitlyapramane pan me ekhada share ghetla ki to lagech padayla suruvat hote asha padhatine maze gelya 1 mahinyat 200 rs.profit ani 400 rs.loss zala me kasa drishtikon thevava please sanga?

तुम्ही शेअरची वर्षभरातली किमान आणी कमाल किंमत पहावी. रिस्क-रिवार्ड रेशियो पहावा आणी नंतरच ट्रेडिंग करावे. आपण डेट्रेड करताना तो अल्पजीवी आणी पट्कन पण मर्यादित नफा मिळवून देणारा ट्रेड आहे. हे लक्षात ठेवावे. जर तुम्ही जास्त वाट बघत बसाल तर बातमीचा परिणाम निघून जातो आणी शेअर तुमच्याकडे राहून जातात.नाव डे ट्रेड असले तरी हा ट्रेड कधी कधी ५ ते १० मिनिटात संपतो आणी शेअर त्याच्या पूर्वीच्या किमतीला येऊन बसतो.

नाव: suraj khandagale

तुमचा प्रश्न : what is mean by sharemarket ? give me details

कंपनीच्या भागभांडवलाची खरेदी विक्री ज्या मार्केटमध्ये केली जाते त्याला शेअरमार्केट म्हणतात.

नाव: rushikesh suryawanshi

तुमचा प्रश्न : mam, atta demat account open kelya nantr instruction sleep chi garaj lagte Ka?

instruction sleep mhanje Kay?

ब्रोकर PO ( पॉवर ऑफ ATTORNEY) घेतो त्यामुळे तुम्हाला DIS (डिलिव्हरी INSTRUCTION  स्लीप) भरून द्यावी लागत नाही.

DIS म्हणजे तुम्ही शेअर्स विकले आणी ते तुमच्या ‘DEMAT’अकौंट वरून वजा करण्यासाठी तुम्ही दिलेले अधिकारपत्र असते.

नाव: Sandeep mhaske

तुमचा प्रश्न : Res mam, shayers delivery mhanaje aapan aaplya dmat Ac made shayers kitihi vel theua shakto ka? Pahijhe tevha sell karu shakto? Delivery made margin kiti aaste? Plz guide? Thank u.

शेअर खरेदी करून तूम्ही त्याची किंमत दिल्यावर तुम्ही कितीही वर्ष ठेवू शकता तुम्ही दिलेल्या शेअर्सची पूर्ण किंमत दिल्यावर मार्जीनची गरज नाही.

नाव: Vaibhav Dhotre

तुमचा प्रश्न : 1) News

  1. i) तुम्ही सर्व बातम्यांसाठी साठी कोणता माध्यम वापरता?
  2. ii) जर websiteअसेल तर कोणती ज्याद्वारे तात्काळ बातम्या मिळतील?

वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या उद्योगाशीसंबंधीत वाहिन्या तसेच इंटरनेटवर या बातम्या उपलब्ध असतात. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर बातम्या ऐकल्या तर तुम्हाला तात्काल बातम्या मिळू शकतात.

2)Buy Back

i)Nucleus software चे shares buy back होणार आहेत. तर ते shares कधीपासून कधीपर्यंत होल्ड कराव्या लागतील?

iii) व ती माहिती कुठल्या ठिकाणावरून मिळवायची?

iii) जो प्रॉफिट होईल तो कसा मिळतो म्हणजे बँक का ट्रेडिंग account?

BUY BACK च्या प्रक्रियेवर मी ब्लॉग नंबर ५८ लिहिला आहे. माझ्या पुस्तकातही ही माहिती आहे. विशिष्ट कंपनीच्या BUY BACK विषयी तुम्हाला BSE च्या वेबसाईटवर जाऊन त्या त्या कंपनीचे पेज उघडले तर माहिती मिळू शकते.

नाव: दिलीप नाईकरे

तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम आपल्या अनुभवातून आम्हास दिलेल्या प्रत्येक माहिती खूप छान आहे.

माझा असा प्रश्न आहे कि आपण या सर्व कंपन्यांच्या बातम्या कुठून मिळवता

वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या उद्योगाशीसंबंधीत वाहिन्या तसेच इंटरनेटवर या बातम्या उपलब्ध असतात. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर तुम्ही जर ऐकल्या तर तुम्हाला तात्काल बातम्या मिळू शकतात.

नाव: Swapnil Patil

तुमचा प्रश्न : Mam, tumhala itki sagli iformation milte kuthun ? te dekhil separate ashi. For example corporate action, international news, Govt, etc…please kahi sources sanga jenekarun mi tya news cha or event cha velich upyog karu shaken..

हल्ली मोबाईलवरील इंटरनेटवर दूरदर्शनच्या उद्योगाशी निगडीत सर्व वाहिन्या दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही टी व्ही समोर नसलात तरी तुम्हाला या बातम्या कळू शकतात.

नाव: Aditya

तुमचा प्रश्न : Which is trade platform offer less brokerage charge

तुमच्या ट्रेडिंगच्या उलाढालीच्या प्रमाणात ब्रोकरचे चार्ज बदलू शकतात. या विशिष्ट संकल्पनेची तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे चौकशी करावी.

नाव: Rahul Ghule

तुमचा प्रश्न : Madam, I want sources which I should follow to remain update regarding news of stock market. i.e. site, news paper or tv channel etc.

तुम्ही टीव्हीच्या बिझिनेस वाहिन्यांवर किंवा इंटरनेटवर बातम्या ऐकून, वाचून अपडेट राहू शकता.

नाव: rupali chavan

तुमचा प्रश्न : share market tejit kiva mandit ahe ksa olkaycha

हायर टॉप आणी हायर बॉटम जर होत असेल आणी वाढत्या VOLUMEने होत असतील तर मार्केट तेजीत आहे असे समजावे. लोअर टॉप आणी लोअर बॉटम होत असेल आणी तेही वाढत्या VOLUME ने होत असतील तर मार्केट मध्ये मंदी आहे असे समजावे.

नाव: Sandeep mhaske

तुमचा प्रश्न : Res mam, majhaa prashna aasa aahe ki ekach bank account varun 2 te 3 dmat account aani trading account operate houa shakata ka? Thank u.

ज्या लोकांच्या नावे DEMAT अकौंट असेल त्या लोकांचे नाव बँकेच्या बचत खात्यात असले पाहिजे. आणी ब्रोकरकडील ट्रेडिंग अकौंटमध्ये या बचत खात्याची नोंद केली पाहिजे.

नाव: karad Ravindra

तुमचा प्रश्न : mi icici bankeche 10 shares 21.04.2017 roji ani wipro che 4 share 13.04.2017 roji vikat ghetale ahet tar ata sambndhit kampanyanchya nikalabarobar jahir bonus nusar mi bonus share sathi patra asel kay ani to bonus share mazya dmat accountla kadhi pahayala miltil. ani hi mahiti kothun kalate tehi sanga mhanaje next time tithunach pahata yeil

माझा बोनसवरचा ब्लॉग नंबर ५६ वाचा ह्या बद्दलची माहिती माझ्या पुस्तकातही आहे.  ICICI बँकेने १:१० असा बोनस जाहीर केल्याने तुम्हास १ बोनस शेअर मिळण्यासाठी १० शेअर्सची खरेदी करावी लागेल.

नाव: Sandeep mhaske

तुमचा प्रश्न : Res. Mam, mala short selling ya conceptvishayi vistarane mahiti havi hoti. Karan tumachi sangnyachi bhasha simple aaste. Thank u

माझे डेट्रेड विषयी ब्लॉग नंबर ३२ ते ३५ वाचा. त्यात ही माहिती आहे.

नाव: nikhil pawar

तुमचा प्रश्न : madam 10 march te 15 march yaa veli BHARAT ELECTICALS LIMITED che shear down ka zale aahet. kahi sangaal ka?

शेअर्सची किंमत पडणे किंवा वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही भेलच्या शेअरचा १० मार्च ते १५ मार्च या दरम्यानचा चार्ट बघा. रेझिस्टन्सची पातळी असते किंवा काही मुलभूत कारण असते. याविषयीची अधिक माहिती माझ्या पुस्तकात मिळेल.

नाव: arun anna zadgea

तुमचा प्रश्न : sir new share market madhe me ata enter kart aahe ani me thoda abhyas pan me yacha kela aahe tar me yatu aajun kas share market expert banu shakto ani sir me m.com zale aahe ata sir me ya madhe expert banu ichito sir mala plz coprate kara ani changlya tips dya

सतत मार्केटचा मागोवा घ्या. प्रत्येक घटनेचा आणी त्याच्या शेअर्सच्या किमतीवरील परिणामांचा अभ्यास करा.

नाव: Dnyaneshwar Girase

तुमचा प्रश्न : Namaste madam, Madam mi TV var bagat asto ki expert sangtat ki company cha shear mahag jhala. Kiva swast jhala he kashyavarun kadale. Sangal ka madam please

शेअर स्वस्त झाला किंवा महाग झाला हे पहाण्यासाठी कंपनीची गुणवत्ता, आणी TRACK रेकोर्ड, ROE, EPS, प्राईस टू बुक, ऑपरेटिंग मार्जिन, इत्यादी रेशियो पहावे लागतात. माझ्या पुस्तकात या विषयी विवेचन आहे. …

नाव: Gopal N MIrge

तुमचा प्रश्न : IPO ओव्हरसबस्क्राईब झाला. Mhnje kay zale

IPO मध्ये ऑफर केलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा जेव्हा जास्त शेअर्ससाठी अर्ज (मागणी) येतात तेव्हा तो IPO ओव्हरसबस्क्राईब झाला असे म्हणतात. IPO मध्ये १००० शेअर्स ऑफर केले असतील आणी त्यासाठी १०००० शेअर्स साठी मागणी अर्ज  आले तर तो IPO १० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला असे म्हणतात.

नाव: Shweta adake

तुमचा प्रश्न : Jk tyers Mi 175 chya price la vikt ghetle ahet ..but ata tyachi price far kmi zali ahe …wat to do

मी ठराविक शेअर्सबद्दल सांगत नाही. पण रबराचे भाव कमी होत आहेत आणी क्रूडचा भावही कमी आहे. त्यामुळे टायर कंपन्यांच्या शेअर्सला चांगले दिवस आले आहेत. अल्प मुदतीसाठी ट्रेड करायचा असल्यास त्या त्या कंपनीचा चार्ट बघावा.

नाव: RAHUL BELURE

तुमचा प्रश्न : DP charge Kay aasto v kashawar aadharit aasto DP charge sarvana sarkha ch aasto ka

DP चार्ज शेअर विकल्यावर लागतो पण प्रत्येक शेअरमागे नाही. तर प्रत्येक कंपनीच्या शेअर्सवर असतो. म्हणजे एकाच कंपनीचा  १ शेअर  विकला किंवा १००० शेअर विकले तरी तेवढाच चार्ज पडतो. पण ५ कंपन्यांचे प्रत्येकी ५ शेअर्स विकले तर प्रत्येक कंपनीच्या शेअर्ससाठी वेगळा DP  चार्ज पडेल.

नाव: Amit Sutar

तुमचा प्रश्न : What is the circuit?

सर्किट म्हणजे खरेदीची किंमत आणी विक्रीची किंमत किती वाढू शकते आणी किती कमी होऊ शकते या साठी ठरवलेली मर्यादा. २% पासून ते २०% पर्यंत सर्किट लागते. या विषयी खुलासेवार माहिती माझ्या पुस्तकात दिली आहे.

नाव: nitin sawant

तुमचा प्रश्न : GST sathi tax bharnya sathis register karave lagte ? GST monthly bharava lagto ?

मी शेअरमार्केट संबंधीच माहिती देते.

नाव: Ravalnath Appa Patil

तुमचा प्रश्न : Respected Madam, !!!!!!!! Greeting of the day!!!!!!!!!!. I want to start trading in share market. How can i start and how much funds required to start trading in share market. Can you help me.

Thanks & Regards

Ravalnath Patil

आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्या ब्लॉग वर दिलेली आहेत. लक्षपूर्वक वाचा.

नाव: prashant mathye

तुमचा प्रश्न : me tumchi share market sambandhi sarv mahiti vachali..malahi share market market madhye entry karaychi aahe…dmat account aani trading account he fakt broker kadunach open hou shakte ka ???…aani maza dusra prashna… shares chi buying selling aapan swata karu shakto ka?..ki tyasathi pan broker chi help ghyavi lagel.

तुम्ही बँकेत किंवा ब्रोकरकडे DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडून ऑन-लाईन ट्रेडिंग करू शकता.

नाव: prashant mathye

तुमचा प्रश्न : share sell kartana aapan jo bhav lavto tya bhavala na vikla gelyas te shares return aaplyala miltat ki market madhye jo current bhav chalu asto tyach bhavane vikun takayche.

तुमच्या टाकलेल्या भावाला शेअर विकला गेला नाही तर दिवसाअखेरी तुमची ऑर्डर रद्द होते. मार्केटच्या वेळात तुम्ही ऑर्डर बदलू शकता. माझा ब्लॉग २५ आणी २६ वाचा.

 नाव: VIKRANT

तुमचा प्रश्न : g s t upade mahiti kase karavi

आपण वर्तमानपत्रातून किंवा इंटरनेटवरून किंवा टीव्हीच्या बिझिनेस वाहिन्यांवरून ही माहिती गोळा करू शकता.

नाव: Pravin Desai

तुमचा प्रश्न : नमस्कार मी श्री प्रविण् गोविंद देसाई व्यवसाय नोकरी माझी इच्छा आहे की शेअर माकेट विषयी जाणून घेण्याची

आपण माझा ब्लोग, माझे पुस्तक तसेच बिझिनेस संबंधी वर्तमानपत्रे आणी दूरदर्शनवरील बिझिनेस वाहिन्या यावरून शेअर मार्केट आणी त्यात चालणाऱ्या व्यवहारांच्या प्रक्रियेची माहिती मिळवा.

नाव: Pravin Desai

तुमचा प्रश्न : सुरवात कशी करायची व काेठून

आपली प्राथमिक तयारी झाली की आपण DEMAT अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडून सुरुवात करावी.