Tag Archives: share bajarachi mahiti marathi-stock-market

आठवड्याचे समालोचन – शेअरमार्केट मंगळावर – ५ जून २०१७ ते ९ जून २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जीवसृष्टीच्या शोधात माणूस मंगळावर पोहोचला तसे प्रॉफीटच्या शोधात शेअर मार्केटचे निर्देशांक ब्लू स्काय प्रदेशात पोहोचून मंगळ आणी त्याही पलीकडील ग्रह पादाक्रांत करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी ९६% मान्सूनची शक्यता, ग्रामीण भागात वाढणारी मागणी, आणी GSTचे १ जुलै २०१७ पासून लागू होणे आणी कमी होणारी महागाई, जागतिक शेअरमार्केटमध्ये येणारी तेजी, क्रूडची कमी होणारी किंमत आणी केंद्रीय सरकारची इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारी गुंतवणूक अशी एका मागून एक याने सोडली जात आहेत. निफ्टी ९६६० वर तर सेन्सेक्स ३१००० वर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी 

  • PARIS करारातून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांना बदलावा लागेल असे दिसते. पण USA या करारातून २०२० पर्यंत बाहेर पडू शकत नाही असे तज्ञाचे मत आहे. USA मधील सर्व उद्योग PARIS करारातील सर्व अटींचे पालन करून सुरु आहेत.
  • ECB ने आपल्या दरात कोणतेही बदल केले नाहीत.
  • UK मधील सार्वत्रिक निवडणुकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे ‘HUNG’ पार्लमेंट स्थापन होईल.

सरकारी अन्नौंसमेंट 

  • GST चा दर सोन्यावर आणी ज्युवेलरीवर ३% तर रफ डायमंड्स वर ०.२५% लागणार आहे. याचा फायदा PC ज्युवेलर्स, टायटन, गीतांजली जेम्स, TBZ अशा कंपन्यांना होईल.
  • टेक्स्टाईलवर ५%, रेडीमेड गारमेंट्स वर १२%, नैसर्गिक यार्नवर ५% आणी मानवनिर्मित यार्नवर १८% GST लागेल. याचा फायदा गोकुळदास एक्स्पोर्ट,मॉनटे कार्लो, सेंच्युरी, अरविंद, रेमंड, बॉम्बे डाईंग इत्यादी कंपन्यांना होईल.
  • सर्वप्रकारच्या बिस्किटांवर १८% GST तर ट्रेडमार्कवाल्या PACKAGED फूडवर ५% GST लागेल.
  • Rs ५०० पेक्षा कमी किंमत असलेल्या पादत्राणांवर ५% तर Rs ५०० पेक्षा जास्त किंमत असणाऱ्या पादत्राणांवर १८% GST लागेल.
  • बिडीसाठी वापरण्यात येणाऱ्या पानांवर १८% तर बिडीवर २८% GST लागेल. सोलार एनर्जीवर ५% GST आकारणार आहेत. याचा फायदा WEBSOL एनर्जी या कंपनीला होईल.
  • GST लागू झाल्यानंतर सिरामिक सेक्टर मधील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना संघटीत क्षेत्रात सामील व्हावे लागेल. त्यामुळे आता संघटीत क्षेत्राला असंघटीत क्षेत्रापासून होणारी स्पर्धा कमी होईल. याचा फायदा कजारिया सेरामिक्स, मुरुडेश्वर, सोमाणी, निटको या कंपन्यांना होईल.
  • GST मुळे QUICK RESTARAUNT चा फायदा होईल. त्यामुळे वेस्टलाईफ DEVELOPEMENT आणी जुबिलीयंट सारख्या कंपन्यांना फायदा होईल.
  • बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक आपल्या सबसिडीअरिज मधील स्टेक विकून भांडवल उभारणार आहे.
  • २४ कॅरेट सोन्याच्या निर्यातीवर सरकार बंदी आणण्याच्या विचारात आहे.
  • आतापर्यंत फक्त ५ शहरांमध्ये रोजच्या रोज पेट्रोल आणी डीझेलच्या किंमती ठरवण्याचा प्रयोग पायलट तत्वावर चालू होता. यालाच डायनामिक प्राइसिंग असे म्हणतात. हा प्रयोग यशस्वी होतो आहे असे आढळून आल्यामुळे आणखी काही शहरात १६ जून २०१७ पासून रोजच्या रोज पेट्रोल आणी डीझेलच्या किमती जाहीर केल्या जातील. त्यामुळे ऑईल मार्केटिंग कंपन्यांना होणारा तोटा कमी होईल.
  • सरकार पर्यटन आणी वेलनेस पोलिसी जून २०१७ मध्ये जाहीर करेल. या बाबत विविध भारतीय दूतावासाकडून माहिती मागवली आहे. ‘हेल्थ अंड वेल्थ साथ साथ’ या धोरणाखाली मेडिकल पर्यटन पोलिसी जाहीर होणार आहे.
  • उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी’ एक समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न ही समिती करेल.
  • सरकार हायड्रोपॉवर सेक्टरला Rs १६००० कोटींचे PACKAGE देण्याच्या विचारात आहे. याचा फायदा NHPC आणी SJVN यांना होईल.
  • शिक्षणासाठी रोख रकमेचा उपयोग करू नये अशा प्रकारच्या सुचना सरकारने दिल्या आहेत.
  • सरकार तंबाखू आणी तंबाखूशी संबंधीत कंपन्यातील आपला स्टेक विकण्याच्या विचारात आहे.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था 

RBI दर दोन महिन्यांनी आपले वित्तीय धोरण जाहीर करते. या मध्ये RBI अर्थव्यवस्थेच्या वर्तमान परिस्थितिचा आढावा घेते. आणी येणार्या नजीकच्या काळातील अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर भाष्य करते. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे काम RBI चे तर ग्रोथ बघण्याचे काम सरकारचे असते.  यावेळी RBI ने २०१७ -२०१८च्या पुर्वार्धासाठी २%-३.५% (आधीचा अंदाज ४.५%) तर उत्तरार्धासाठी ३.५% ते ४.५% (आधीचा अंदाज ५%) महागाईचा दर असेल असे भाष्य केले आहे. पण RBI ने सरकारी नोकरांच्या हातात येणारी पगारवाढीची थकबाकी आणी ग्रामीण भागात वाढणारे मजुरीचे दर यामुळे महागाईच्या बाबतीत सावध राहावे लागेल असे सुचवले. तसेच RBI ने भारताच्या प्रगतीचा वेग आर्थिक वर्ष २०१८ साठी ७.३% असेल असे सांगितले. RBI ने असे सांगितले की आम्ही GST लागू झाल्यानंतर होणार्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. तसेच वारंवार राज्य सरकारांनी कर्जमाफी केल्यास आतापर्यंत पाळलेली फिस्कल शिस्त धोक्यात येऊ शकते.

या पॉलिसीद्वारे RBI रेपो रेट (या दरावर RBI बँकांना कर्ज देते) आणी रिव्हर्स रेपो रेट (या दरावर बँका त्यांच्या कडील शिलकी पैसा RBI कडे ठेवू शकतात.) तसेच CRR (कॅश रिझर्व रेशियो, या रेशियोप्रमाणे प्रत्येक बँकेला RBI कडे आपल्या एकूण डीपॉझीटच्या एक निश्चित परसेंटेज कॅश रिझर्व ठेवावे लागतात.), SLR (STATUTORY लिक्विडीटी रेशियो) या रेशियो प्रमाणे प्रत्येक बँकेला दिवसाच्या शेवटी आपल्या एकूण डिमांड आणी टाईम लायबिलीटीजचे एक निश्चित पर्सेंटेज लिक्विड ASSETS (सोने, किंवा इतर मंजूर केलेल्या सिक्युरिटीज) च्या स्वरूपात रिझर्व म्हणून RBI कडे ठेवाव्या लागतात.तसेच RBI बँकांना तातडीची मदत म्हणून MSF (MARGINAL STANDING FACILITY) देते. या सर्व गोष्टींवर RBI आपला दृष्टीकोन सांगते आणी आवश्यक  असेल तसे बदल करते.

या वेळच्या पॉलिसीत RBI ने रेपो रेट (६.२५%), रिव्हर्स रेपो रेट (६%) CRR (४%) आणी MSF रेट(६.५%) या   मध्ये काही बदल केला नाही. SLR मात्र कमी करून २४ जून २०१७ पासून  २०% (२०.५% वरून) केला. अशा प्रकारे बँकांना जास्त फंड्स उपलब्ध करून दिले. यामुळे हौसिंग सेक्टरसाठी जास्त फंड्स उपलब्ध होतील. याचा BACKWARD आणी FORWARD परिणाम होतो. घरबांधणीसाठी लागणाऱ्या सामानाची (उदा सिमेंट स्टील, पाईप्स) मागणी वाढेल आणी कुशल आणी अकुशल कामगारांसाठी रोजगार उपलब्ध होईल..

बँका निरनिराळ्या प्रकारची कर्जे देत असतात. त्या कर्जाच्या परतफेडीच्या (कर्जाचा हफ्ता आणी कर्जावरील व्याज)  परिस्थितीप्रमाणे आणी त्या कर्जासाठी उपलब्ध असलेल्या सिक्युरिटीवर आधारीत RBI त्या कर्जांचे वर्गीकरण करते आणी प्रत्येक कर्जासाठी बँकांना त्यांच्या नफ्यातून एक निश्चित पर्सेंटेज प्रोविजन करायला सांगते. जशी जशी कर्जाच्या परतफेडीची अवस्था बिघडत जाते तसे तसे प्रोविजनचे पर्सेंटेज वाढत जाते. ज्यावेळी कर्ज (लॉस ASSETS) निश्चित बुडणार अशी परिस्थिती येते तेव्हा कर्ज आणी त्यावरील व्याज यासाठी १००% प्रोविजन करावी लागते.

ज्या कर्जांची मुद्दल आणी व्याज यांची परतफेड नियमित असते आणी पुरेशी सिक्युरिटी उपलब्ध असते अशा कर्जांना STANDARD ASSETS असे म्हणतात. बँकांनी दिलेल्या आणी STANDARD ASSET म्हणून वर्गीकृत केलेल्या हौसिंग लोनवरील प्रोविजनचा रेट ०.४०% वरून ०.२५% केला. तसेच RBI ने प्रत्येक कर्जासाठी ‘RISK WEIGHT’ ठरवलेले असते.बँका RISK ADJUSTED RETURN या धोरणानुसार हौसिंग कर्जावरील व्याज दरामध्ये बदल करू शकतील. याला आपण प्रत्येक कर्ज देताना परतफेडीबाबत असलेल्या धोक्याची पातळी म्हणू शकतो. LOAN-TO-VALUE रेशियो म्हणजे सिक्युरिटी म्हणून ठेवलेल्या घराच्या किंमतीच्या प्रमाणात बँक किती जास्तीतजास्त कर्ज देऊ शकते.हे सांगणारा रेशियो होय. जर हौसिंग कर्जाची रक्कम Rs ७५ लाखापेक्षा जास्त असेल आणी LTV ७५% पेक्षा जास्त असेल तर RBI ने RISK WEIGHT ५०% (आधी ७५% होते) आणी जर हौसिंग कर्जाची रक्कम Rs. ३० लाख ते Rs ७५ लाख असेल आणी LTV ८०% पेक्षा जास्त असेल तर RISK WEIGHT ३५% (आधी ५०% होते) एवढे कमी केले. या दोन्हीमुळे बँका हौसिंग लोन वरील व्याज दर कमी करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ल्युपिन ही फार्मा क्षेत्रातील सुस्थापीत कंपनी. या कंपनीच्या इंदोर प्लांटमधील USFDA ने दाखवलेल्या त्रुटी कंपनीने अद्याप दुरुस्त केल्या नाहीत. या त्रुटी उत्पादनाची आणी त्यावरील कंट्रोल्सची रेकॉर्ड्स पुरी करण्याच्या बाबतीत आहेत.
  • गुजरात पिपावाव पोर्ट ह्या भारतातील पहिल्या खासगी पोर्टमधील आपला ४३.१% स्टेक APM TERMINALS यांनी विकायला काढला आहे. या स्टेकची VALUE Rs २९८५ कोटीपर्यंत होईल असा अंदाज आहे.
  • व्हीव्हीमेड LABS या कंपनीच्या स्पेन मधील युनिटच्या निरीक्षणात USFDA ला काहीही त्रुटी आढळल्या नाहीत.
  • CADILA हेल्थकेअर या कंपनीच्या बद्दी युनिटला EIR मिळाला. याचा अर्थ USFDA ने ज्या त्रुटी नोंदवल्या होत्या त्याकडे लक्ष देऊन कंपनीने त्यात सुधारणा केल्या.
  • जेट एअरवेज ७५ विमाने खरेदी करणार आहे.
  • युनायटेड स्पिरीट या कंपनीने सांगितले की येत्या ४ वर्षात कंपनी आपल्यावरील कर्ज ५०% ने कमी करेल आणी वर्किंग कॅपिटलही कमी करेल.
  • स्ट्राईडस शसून या कंपनीला त्यांचे बँगलोर युनिट तपासल्यावर फॉर्म नंबर ४८३ इशू केला. यात ३ त्रुटी दाखवल्या.
  • युनिकेम LAB च्या गाझियाबाद युनिटला USFDA कडून EIR(ESTABLISHMENT INSPECTION REPORT) मिळाला.
  • BSNL संचार मंत्रालयाबरोबर २५००० WAI FAI बसवण्यासाठी MOU  करणार आहे. यातील बहुतेक साधनसामुग्री ITI तयार करीत असल्यामुळे ITI (इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज) चा शेअर वाढला.
  • टाटा कम्युनिकेशन लवकरच LAND डीमर्जर करणार आहे. याबाबतीत कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पुढील आठवड्यात निर्णय घेतील. कंपनी ही जमीन विकून आलेला पैसा स्पेशल लाभांशाच्या स्वरूपात शेअरहोल्डर्सना देईल.
  • इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक सदस्य आणी प्रमोटर्स आपला १२.७५% स्टेक (VALUE Rs २८००० कोटी) विकून टाकण्याच्या विचारात आहेत. कंपनीच्या वर्तमान व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बेबनावाचा हा परिणाम आहे.

 कॉर्पोरेट एक्शन 

  • PC ज्युवेलर्सच्या बोनसची रेकॉर्ड डेट ७ जुलै २०१७ तर बायोकॉनच्या बोनसची रेकॉर्ड डेट १७ जून आहे.
  • HCL टेक चा BUY BACK १२ जून ते २३ जून पर्यंत चालू राहील.
  • BAYER CROP CHEM ही कंपनी Rs ४९०० प्रती शेअर या भावाने २.८९% शेअर्स Rs ५०० कोटी खर्च करून BUY BACK  करणार आहे.
  • SBI चा QIP मंगळवारी तारीख ६ज्ञून  २०१७ रोजी आणणार आहे. यात ५०% हिस्सा LIC विकत घेणार आहे. शुक्रवारी हा QIP ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • कॅनफिना होम्सने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक STOCK SPLIT वर विचार करण्यासाठी २३ जून २०१७ रोजी  बोलावली आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

  • या आठवड्यात इंडिया पॉवर ग्रीडच्या InVIT चे लिस्टिंग झाले इशू प्राईस Rs १०० असलेल्या InVIT चे लिस्टिंग Rs ९९.०२ ला झाले.
  • नजीकच्या काळात येणारे IPO ICICI लोम्बार्डला IPO साठी परवानगी मिळाली आहे. ICICI त्यांचा स्टेक कमी करणार आहेत.
  • IREDA( INDIAN RENEWABLE ENERGY DEVELOPMENT AGENCY) चा IPO आणून २५% विनिवेश करायला परवानगी दिली. १३.९ कोटी शेअर्स इशू होतील.
  • तेजस नेटवर्क्स या कंपनीचा IPO पुढील आठवड्यात जून १४ ते जून १६ या दरम्यान येत आहे. IPO चा प्राईस BAND Rs २५० ते Rs २५७ आहे. कंपनी या IPO प्रोसीड्सचा उपयोग विस्तार योजनेसाठी करील.
  • रिलायंस म्युच्युअल फंड त्याचा फंडाचे डोमेस्टिक STOCK एक्स्चेंजवर लिस्टिंग करेल. NIPPON ASSET MANAGEMENT त्यांचा म्युच्युअल फंडातील १०% स्टेक विकेल.

मार्केटने काय शिकवले 

TCS चा BUY BACK ३१ मे ला पूर्ण झाला. शेअरहोल्डर्सनी आणी प्रमोटर्सनी BUY BACK मध्ये शेअर्स दिले. कंपनीने सुद्धा शेअर्स BUY BACK केले. सर्व BUY BACK केलेल्या शेअर्सची रकम शेअरहोल्डर्सच्या खात्यामध्ये ५ जून २०१७ ला जमा झाली  त्यामुळे गुंतवणूकदार खुश झाले. त्यामुळे शेअर्सची संख्या कमी झाली, BALANCESHEET ची गुणवत्ता वाढली, EPS वाढले, ROE वाढला. म्हणून शेअर Rs २०० नी वधारला. कॉर्पोरेट एक्शन आणी त्याचा फायदा याविषयी माझ्या पुस्तकात खुलासेवार वाचायला मिळेल. याविरुद्ध BAYER CROP CHEM ने कमी प्रीमियमवर BUY BACK घोषित केल्यामुळे शेअर पडला

काही शेअर्समध्ये सर्क्युलर ट्रेडिंग चालू असावे असे वाटते म्हणून ED ची नजर आहे. तर काही शेअर्स कारण नसताना वाढले तसेच कारण नसताना पडले. हे शेअर्स बहुधा सर्किट ते सर्किट वाढतात आणी त्याच पद्धतीने पडतात. असे शेअर्स सेबीच्या निरीक्षणाखाली असतात. स्वस्त मिळतात म्हणून असे शेअर्स विकत घेऊन फसू नका.

जेव्हा मोठे मोठे फंड काही कंपन्यांचे शेअर्स नोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्याकडे लक्ष ठेवावे. सध्या अशी खरेदी पर्सिस्टंट आणी CYIENT या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली.

गाडी मोशनमध्ये असेल, निश्चित सिग्नल नसेल तर जात आहे त्याच दिशेत पुढे जात राहते. त्यामुळे मार्केट हळू हळू का होईना वाढत आहे. पण वाढणारे शेअर्स आणी कमी होणारे शेअर्स यांचा रेशियो पाहिल्यास तो एकास तीन या प्रमाणात आहे. कधी कधी यापेक्षाही हे प्रमाण जास्त आढळते. सामान्य माणसाला मार्केट जोरात पडल्याशिवाय अल्पावधीसाठी मंदी येऊ घातली आहे हे समजत नाही. त्यामुळे प्रॉफीट बुकिंग हेच सूत्र अवलंबले पाहिजे. मार्केट जरी मंगळाचा शोध घेत वर वर चालले असले तरी श्वसनासाठी पुरेशी हवा नसेल तर माघारी यावे लागते व घुसमट होते. त्याचप्रमाणे वेळेवर विकता न आल्यामुळे पुन्हा तो भाव आला नाही तर घुसमट होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२७२ वर तर NSE  निर्देशांक निफ्टी ९६६७ वर बंद झाले.

Advertisements

आठवड्याचे समालोचन – नाच नाचूनी अती मी दमले – २९ मे ते २ जून

पावसाचे ढग जमू लागले, तर उत्तर कोरीआने मिसाईल्सचे परीक्षण केले. शेअरमार्केटच्या दृष्टीने या परस्परविरोधी  घटना म्हणाव्या लागतील.त्याचबरोबर जेम्स आणी ज्युवेलरीवरील GST चा दर ठरवताना अनेक अडचणी येत आहेत. मार्केटही आता धावून धावून थकले मार्केटलाही आता विश्रांतीची गरज आहे. अशी विश्रांती मार्केटने या आठवड्यात घेतली. मार्केट आता सार्वकालीक उच्च स्तरावर असल्याने कुणालाही खरेदीमध्ये रस नाही व बुल रन असल्यामुळे आणखी किती वाढेल सांगता येत नाही. पुन्हा स्वस्तात मिळणार नाही अशा मनस्थितीत गुंतवणूकदार आहेत. या आठवड्यात वायदेबाजारात निफ्टीमधील १०००० चे सौदे दिसू लागले. त्यामुळे निफ्टी लवकरच १०००० च्या स्तरावर पोहोचेल अशी आशा मूळ धरू लागली आहे. STOCK स्पेसिफिक मार्केट चालू होते असे जाणवले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की USA PARIS CLIMATE AGREEMENT मधून बाहेर पडले आहे. हा करार कार्बन एमिशन कंट्रोल करण्यासाठी होता.
  • USA मध्ये रोजगारीचे आकडे चांगले आले, US$ मजबूत झाला. त्यामुळे फेड रेट वाढवण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार युरोपिअन देशांचा दौरा चालू आहे. यामध्ये आर्थिक, परमाणु आणी विज्ञान या विषयांवर द्वीपक्षीय करार करण्याचा हेतू आहे तसेच EU बरोबर फ्रीट्रेड अग्रीमेंट करण्यावर जोर असेल.
  • सरकार लेदर उद्योगाला तो लेबर इंटेनसिव असल्यामुळे उत्तेजन देण्यासाठी Rs ४००० कोटींचे PACKAGE देणार आहे. कमी व्याजाने कर्ज, मशिनरी खरेदीमध्ये सवलत, कमी दराने ड्युटी आकारणे अशा स्वरूपात  PACKAGE असेल. याचा फायदा मिर्झा INTERNATIONAL, बाटा, लिबर्टी, सुपर हाउस, RELAXO सारख्या कंपन्यांना होईल.
  • टेलिकॉम कंपन्यांना जी कर्जे दिलेली आहेत त्यांच्या परतफेडीची मुदत ४० वर्षे करावी आणी त्यांच्याकडे असलेला स्पेक्ट्रम कर्जासाठी सिक्युरिटी म्हणून गहाण ठेवण्याची तरतूद असावी असा विचार चालू आहे.
  • इन्फ्रा सेक्टरमधील NPA झालेल्या प्रोजेक्टसाठी NIIF (NATIONAL INVESTMENT AND INFRASTRUCTURE FUND)कडून फंड्स दिले जातील. पण ही प्रोजेक्टस पूर्ण होतील असा विश्वास सरकारला वाटला पाहिजे.
  • डाटा सुरक्षेसाठी सरकारचे IT मंत्रालय नवीन कायदा बनवणार आहे. जर डाटा लीक झाला तर त्या गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची कायद्यात तरतूद असेल.
  • LNG ला डीझेलबरोबर MATCH करून त्याचा ऑटो इंधनासारखा उपयोग करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यासाठी पेट्रोनेट LNG ने गुजरात GAS बरोबर करार केला आहे.
  • सरकारने आता NPA चा प्रश्न सोडविण्यासाठी टॉप ५० NPA खात्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. या खात्यांवर RBI, केंद्र सरकार आणी सरकारच्या विविध VIGILANCE एजन्सीज लक्ष ठेवतील.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने असे जाहीर केले की ज्या नव्या बिल्डींग होतील त्यात LED बल्ब आणी इतर उपकरणांचा वापर केला पाहिजे याचा फायदा सूर्या रोशनी, HPL इलेक्ट्रिक याना होईल.
  • CPSE ETF च्या माध्यमातून सरकार त्यांचा हिस्सा विकणार आहेत. SBI, BOB, PNB, AXIS, L&T, ITC यातील हिस्सा विकणार आहे. SAIL, NALCO ,MOIL , कोल इंडिया, NMDC याही कंपन्या यात असतील. यात मुख्यतः मायनिंग कंपन्यांचा समावेश असेल.
  • सरकारने एअर इंडिया या विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील सरकारी कंपनीचे खाजगीकरण करायचे ठरवले आहे. सरकार ही कंपनी या क्षेत्रातील देशी किंवा विदेशी कंपनीला विकू शकते.

इकॉनोमीच्या गोष्टी

  • MSCI निर्देशांकातून डिविज LAB काढला आणी REC आणी IOC चा समावेश केला. ICICI बँक, ग्रासिम यांचे वेटेज वाढवले.
  • लॉरस Labs, नवनीत एज्युकेशन, आणी सिनजीन या कंपन्यांचा MSCI स्माल कॅप निर्देशांकात सामील केल्या.
  • भारताची GDP २०१६-१७ या वर्षात ७.१ % ने वाढले. हा वाढीचा वेग गेल्या दोन वर्षापेक्षा कमी आहे. तर हीच वाढ २०१६ -१७ च्या चौथ्या तिमाहीत ६.१ % होती. हा डीमॉनेटायझेशनचा परिणाम आहे असे तज्ञांचे मत आहे. पण रीमॉनेटायझेशन, चांगला पावसाळा, आणी RBI ने रेट कट केले तर आणी १ जुलै पासून लागू होणारी GST ची करप्रणाली यामुळे २०१८ मध्ये पुन्हा GDP मध्ये आवश्यक तेवढी वाढ होईल असे वाटते.

RBI, सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सेबी P नोट साठी प्रती गुंतवणूकदाराला US $ १००० लेव्ही बसवणार आहे. P नोट्ससाठी KYC चे नियम MANDATORY केले. सेबी P नोट्सच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. सेबीला २०२० पर्यंत P नोट्सचा वापर संपुष्टात आणायचा आहे. सध्याच्या मार्केटमध्ये  विदेशी निवेशक आणी घरेलू  निवेशक दोघेही गुंतवणूक करीत आहेत. नुसत्या विदेशी निवेशकांवर आपण अवलंबून नाही. त्यामुळे सेबीने ही योग्य वेळ गाठली आहे.
  • फार्मा सेक्टरने DPCO ला औषधांच्या किमती लवकर जाहीर करण्यासाठी विनंती केली आहे. कारण लेबलिंग, PACKAGING, DISTRIBUTION यासाठी ९० दिवस लागतात.
  • GST कौन्सिलने Rs १०० प्रती किलो आणी त्यापेक्षा जास्त दराने विकल्या जाणाऱ्या बिस्किटांवर (प्रीमियम बिस्किटांवर) १८% तर त्याच्या पेक्षा कमी किंमतीला विक्री होणाऱ्या बिस्किटांवर १२% GST लागेल असे जाहीर केले.
  • पावसाचे चांगले अनुमान, आणी कमी होणारी महागाई यामुळे RBI रेट कट करील का? या अपेक्षेने सगळ्यांचे  लक्ष आहे.
  • RBI आपली तिमाही क्रेडीट पॉलिसी ७ जून रोजी जाहीर करेल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • हेल्थ प्रोडक्ट रेग्युलेटरी ऑथारीटी आयर्लंड यांनी वोखार्तचे शेंद्र युनिट तपासले आणी क्लींअरंस दिला.
  • मनपसंद बिव्हरेजीसने पार्ले प्रोडक्ट्स बरोबर डीस्ट्रीब्युशनसाठी करार केला.
  • गुजराथमध्ये सिमेंटचे दर प्रती पोत्यामागे Rs १० वाढवले. याचा फायदा अल्ट्राटेक, अंबुजा, ACC यांना होईल.
  • RCOM आपण इशू केलेल्या NCD ( नॉन कॉनव्हरटीबल डिबेंचर्स) चे पेमेंट वेळेवर करू न शकल्यामुळे आपल्या कर्जाच्या परतफेडीत DEFAULT करेल असे वाटत आहे अशा बातमीमुळे RCOMचा शेअर सार्वकालिक (लाईफ टाईम) किमान पातळीवर आला. कंपनीने सांगितले आहे की आम्ही नॉन कोअर ASSET विकून लवकरच कर्जात कपात करू. R COM चे एकूण कर्ज Rs ४०००० कोटींपेक्षा जास्त आहे. २ जून २०१७ रोजी झालेल्या कर्ज देणाऱ्या बँकांच्या बैठकीत कंपनीच्या SDR ला सैद्धांतीक मंजुरी दिली गेली. आणी ३ आठवड्याच्या आत याला अंतिम मंजुरी दिली जाईल असा निर्णय घेतला गेला. कंपनीला सप्टेंबर २०१७ पूर्वी Rs २५००० कोटी एवढी कर्जाची परतफेड करायची आहे.
  • BILT (बल्लारपूर इंडस्ट्रीज LTD) आणी पंजाब अल्कली या दोन्ही कंपन्या कर्ज देणाऱ्या बँकांना ५१% शेअर्स देणार आहेत. या कंपन्या कर्ज देणाऱ्या बँका टेकओव्हर करतील.
  • ‘रावा’ फिल्डच्या विस्तार योजनेसाठी वेदान्ता या कंपनीला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
  • JSW स्टील ही कंपनी ‘उत्तम गाल्वा’ या कंपनीला खरेदी करेल अशी मार्केटमध्ये बातमी आहे.
  • SJVN (इतर इन्कम Rs ८४ कोटी), महिंद्र आणी महिंद्र,बर्जर पेंट्स, हिंदाल्को, कोलते पाटील, युनायटेड स्पिरीट MOIL, SAIL, टाटा ग्लोबल, एवरेस्ट कान्टो, IRB INFRASTRUCTURE यांचे निकाल चांगले आले.
  • ओरीएंट सिमेंट ही कंपनी JAYPEE ग्रुपचे भिलाई आणी निगरी येथील प्लांट Rs १९४६ कोटींना विकत घेणार आहे. हे डील मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल.
  • एव्हरेडी आणी MaCLEOD रसेल यांनी आपापसात करार केला आहे. त्यामुळे आता चहा आणी BATTERY सेल यांची विक्री एकत्र होताना दिसेल.
  • मारुती आणी अशोक LEYLAND याची निर्यात LATIN अमेरिका आणी नायजेरिया यातील अशांतीमुळे कमी झाली. बजाज ऑटोची विक्री १०% तर निर्यात ३% घटली.
  • SAIL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी आपले ३ प्लांट जुन २०१७ मध्ये विकणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • इगारशी मोटर्स ही कंपनी ‘AGILE ELECTRIK SUB ASSEMBLY PVT LTD’ ह्या कंपनीला आपल्यात मर्ज करणार आहे. या कंपनीच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या जवळ असलेल्या ‘AGILE’ च्या ३२३ शेअर्स साठी इगारशी मोटर्सचे ८८ शेअर्स मिळतील. या मर्जरनंतर पब्लिक शेअरहोल्डिंगचे नॉर्म्स पुरे करण्यासाठी जेव्हढे शेअर्स इशू करण्याची जरुरी असेल तेवढे शेअर्स कंपनी पब्लिक शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स म्हणून इशू करेल याचा रेशियो आणी रेकॉर्ड डेट नंतर जाहीर केली जाईल.
  • लॉइड इलेक्ट्रिकल एन्ड इंजिनीअरिंग या कंपनीने फायनल लाभांश Rs १.५० आणी विशेष लाभांश म्हणून प्रती शेअर Rs २० मिळून एकूण Rs २१.५० लाभांश जाहीर केला.
  • सिटी युनियन बँकेचा निकाल चांगला आला. बँकेने १:१० या प्रमाणात बोनस जाहीर केला. तुमच्या जवळ १० शेअर्स असतील तर तुम्हाला १ शेअर बोनस मिळेल.
  • लार्सेन आणी टूब्रोचा निकाल चांगला आला. नफा ७% तर विक्री १२% ने वाढली. कंपनीने Rs २१ प्रती शेअर लाभांश आणी १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
  • BPCL या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
  • नेस्को या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ११ प्रती शेअर लाभांश आणी एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले.
  • जिंदाल पॉली ही कंपनी Rs २००० कोटी खर्चून DTF या कंपनीचा युरोपिअन बिझिनेस ही कंपनी विकत घेणार आहे.
  • प्रिकॉल ही कंपनी PMP ऑटोचे अधिग्रहण करेल.
  • डिसेंबर २०१७ च्या आसपास ONGC, HPCL ही ऑईलमार्केटिंग कंपनी US$४५० कोटींना विकत घेईल.
  • BAYER क्रॉपकेम ह्या कंपनीने BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे..
  • भारती एअरटेल आणी टेलेनॉर यांच्या मर्जरला सेबी आणी STOCK एक्सचेजनी मंजुरी दिली. आता NCLTची मंजुरी मिळणे बाकी आहे.
  • द्वारीकेश शुगर या कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट केले.

स्प्लिट, बोनस, लाभांश BUY BACK या सर्व कॉर्पोरेट एक्शनची खुलासेवार माहिती माझ्या पुस्तकात मिळेल. त्यामुळे शेअरमध्ये ट्रेडिंग गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल

या आठवड्यातील लिस्टिंग

  • या आठवड्यात PSP प्रोजेक्ट्स चे लिस्टिंग झाले लिस्टिंग Rs १९९ वर झाले. कंपनीने ज्या किंमतीला IPO मध्ये शेअर्स दिले होते त्या किंमतीपेक्षा कमी किमतीला लिस्टिंग झाले.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • GTPL HATHWAY ही केबल टी व्ही आणी BROAD BAND सेवा क्षेत्रात काम करणारी कंपनी जून महिन्यात IPO द्वारे Rs ६०० कोटी उभारेल. ही कंपनी या सेवा देशातील १६९ शहरात पुरवते.

मार्केटने काय शिकवले

आकडेवारी डोळसपणे पहा. विदेशी लोक इंडेक्स फ्युचर्समध्ये खरेदी करीत आहेत, आणी STOCK फ्युचर्स विकत आहेत. याचा अर्थ असा की ज्या मोठ्या मोठ्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक असते त्यांचे निकाल समाधानकारक नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षेच्या पातळीवर उतरले नाहीत. बँक निफ्टीची पोझिशन कमजोर आहे. तेजीवाले निफ्टी ९६०० च्या वर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत तर मंदीवाले निफ्टी ९६०० च्या खाली खेचत आहेत.

JP ASSOCIATES किंवा इतर JP ग्रुपचे शेअर, किंवा RCOM, त्यांच्यावर असलेल्या कर्जाची या कंपन्या  वेळोवेळी परतफेड करू शकत नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या शेअर्सची किंमत किमान स्तरावर पोहोचली आहे. लोकांना आता हे शेअर्स खूपच स्वस्त झाले आहेत म्हणून घ्यावेसे वाटतात. ते या बाबतीत मला सल्ला विचारतात. ते म्हणतात लॉटरीचे तिकीट समजून घ्यावे अशा विचारात होतो. त्याना किंगफिशरची आठवण करून द्यावीशी वाटते. शेअर स्वस्त मिळतो आहे किंवा शेअर खूप पडला आहे हे खरेदीचे कारण असू शकत नाही. कंपनीच्या, उद्योगाच्या, अर्थव्यवस्थेच्या मुलभूत परिस्थितीत जर काही चांगले बदल होणार असतील तरच असे शेअर खरेदी करावेत. नाहीतर हळू हळू शेअरची किंमत कमी कमी होत किंमत येणे बंद होते. खूप कर्ज असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स पासून नेहेमी दूर रहावे

सध्या मार्केट्ची चाल लक्ष देण्यासारखी आहे. मार्केट एक पाउल मागे येते आणी २ पाउले पुढे जात आहे. मार्केट वाढण्याचा वेग कमी झाला आहे.

ऑटो विक्रीचे आकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजेत. GST लागू होणार असल्यामुळे कोणालाही इंव्हेंटरी ठेवण्यात इंटरेस्ट नाही. कंपन्या मोठ्या प्रमाणावर किंमतीत सूट देऊन असलेली इंव्हेंटरी विकून टाकतील. त्यामुळे विक्रीचे आकडे चांगले दिसतील.पण प्रॉफीट मार्जिन कमी होईल. ग्राहकसुद्धा मोठी सुट मिळत असल्यामुळे आपली खरेदी प्रीपोन करतील. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्ट २०१७ मध्ये ऑटो विक्रीचे आकडे चांगले असणार नाहीत असे वाटते.

१ जुलैपासून GST लागू होणार आहे. त्यामुळे B2C(बिझिनेसTO CUSTOMER) विभागात बरीच हालचाल दिसते. मिडकॅप फंड आणी BALANCED फंड यामध्ये लोकांचा पैसा जास्त येत आहे. म्हणून मिडकॅप महाग झाले आहेत. पण हा ट्रेंड बदलेल असे वाटते. म्युच्युअल फंडांना ज्या साठी पैसा येतो त्यातच तो गुंतवावा लागतो. IT, फार्मा, FMCG या क्षेत्रात १८% ते २०% CAGR ग्रोथ होती. परंतु आता देशी तसेच विदेशी सरकारचे कायदेकानू, वाढती स्पर्धा, यामुळे या सेक्टरच्या  प्रगतीवर आणी पर्यायाने या सेक्टरमधील गुंतवणुकीत बदल होतो आहे.

मार्केट थकल्यामुळे विसावा घेत आह्रे. तुम्ही सुद्धा थोडे थोडे प्रॉफीट बुकिंग करा आणी योग्य संधीची वाट पहा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२७३ तर NSE निर्देशांक ९६५३ या लाईफ टाईम हाय वर बंद झाले.

आठवड्याचे समालोचन – सरकारची साथ मार्केटचा विकास – 22 मे ते २६ मे २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

२६ मे रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची तीन वर्षे पुरी झाली. २६ मे २०१४ रोजी सेन्सेक्स २४७०० तर निफ्टी ७३०० होता. आज २६ मे २०१७ रोजी सेंसेक्स ३१००० आणी निफ्टी ९६०० आणी बँक निफ्टी २३३८० या स्तराला स्पर्श करून आले. टर्नओव्हर १३ लाख कोटींचा झाला. म्हणजेच सर्व गुंतवणूकदारांना तिसर्या वाढदिवसाची भेट मिळाली. गेली तीन वर्षे सरकार अतिशय कार्यक्षम, नवीन नवीन कल्पना, योजना, विविध क्षेत्रातील रोगांचे निदान आणी त्यावरील उपाय शोधण्यात तत्पर राहिले. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी हरेक प्रयत्न मोदी सरकारने केले. ‘कोणी वंदा कोणी निंदा आमुचा देशहिताचा धंदा’ हे व्रत घेतल्याप्रमाणे सरकारचे काम चालू आहे. शेअरमार्केट हे देशाच्या आर्थिक स्थैर्याचे आणी प्रगतीचे द्योतक असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही सरकारवर विश्वास ठेवून आपली शेअर मार्केटमधली गुंतवणूक वाढवली. आणी सरकारच्या कामाला पसंती दिली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया आणी इज़्राइल यांचा यशस्वी दौरा केला. आर्थिक करारांबरोबरच त्यांनी इज़्राइलला शांतता राखण्याचे आवाहन केले. USA च्या वेगवेगळ्या स्टेटस्नी इंडियन IT कंपन्या जर स्थानिक लोकांना रोजगार पुरवणार असतील तर अशा कंपन्यांना वेगवेगळ्या सोयी आणी सवलती पुरवण्याचे आश्वासन दिले आहे इन्फोसिसला इंडियाना स्टेटने करात सवलत आणी वन TIME GRANT या स्वरुपात देऊ केली आहे.

ओपेकच्या बैठकीत यावेळी भारतसुद्धा सामील झाला होता. ओपेकचे उत्पादन कमी करण्याचे धोरण पुढील ९ महिन्यासाठी चालू ठेवावे. या प्रस्तावावर विचार करून ओपेकने हे धोरण मार्च २०१८ पर्यंत चालू ठेवावे असा निर्णय घेतला या निर्णयात आता व्हेनीझूएला हा देशही सामील झाला. USA  आपले अलास्कामधील क्रूडचे उत्पादन वाढवणार आहे. यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांनी क्रुडऑइलच्या किमतीकडे लक्ष ठेवावे.

USA FED जून २०१७ मध्ये रेट वाढवू शकते तसेच मॉनेटरी इझिंगखालील बॉंडची खरेदी कमी करू शकते.

सरकारी अन्नौंसमेंट

  • इज़्राइल एअरोस्पेस बरोबर Rs ४००० कोटींचा करार झाला. पण ही कंपनी BEL बरोबर हे काम करणार आहे
  • संरक्षणासाठी लागणारी ६५% साधनसामुग्री आयात करावी लागते. पण मेक-इन–इंडियाच्या अंतर्गत संरक्षणाचे करार करावेत आणी भारतातच या साधनसामुग्रीचे उत्पादन करावे असे ठरले. परदेशी कंपन्या फक्त तंत्रज्ञान देतील का हा प्रश्न आहे ? BEL,BEML, पुंज लोंइड, वालचंदनगर, रोल्टा, लार्सेन & टुब्रो, ASTRA मायक्रोवेव्ह, टीटाघर wagan या कंपन्यांना याचा फायदा होईल.
  • शिक्षण आणी आरोग्यसेवा GST मधून वगळल्यामुळे फोर्टिस हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल, नारायणा हृदयालय आणी इतर हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांचा फायदा होईल.
  • केरोसीन सबसिडीचा भार ऑईल इंडिया आणी ONGC या कंपन्यांवर पडू नये अशी उपाययोजना करण्याच्या विचारात सरकार आहे.
  • राष्ट्रीय टेक्स्टाईल धोरण जून मध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे अरविंद, डोनिअर, ARROW, पेज, लक्स, मॉनटे कार्लो या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
  • सरकारचा सोने आणी रेल्वे यासाठी रेग्युलेटरी ऑथोरिटी नेमण्याचा विचार आहे.
  • सरकारने उसाची FRP (फेअर एंड रेम्युनरेटीव प्राईस) Rs २३० वरून वाढवून Rs २५५ केली.
  • सरकार इन्शुरन्स ब्रोकिंगमध्ये सध्या ४९% FDI ला परवानगी आहे ती १००% करण्याची शक्यता आहे. याचा फायदा MK ग्लोबल, एडलवाईज, मोतीलाल ओसवाल, जीओजीत, IIFL होल्डिंग या कंपन्यांना होईल.
  • कॉमर्स मंत्रालयाने सांगितले की GST लागू झाल्यानंतर सोन्यावरील आयात कर कमी केला जाऊ शकतो.
  • टेलिकाम सेक्टरला आधी १५% कर लागत होता तो आता १८%च्या SLAB मध्ये आला. यासाठी टेलीकाम सेक्टर GST कौन्सिलकडे आपले गाऱ्हाणे मांडणार आहे. ३ टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्याना लावलेल्या दंडाविषयी योग्य वेळी विचार केला जाईल असे टेलीकॉम मंत्रालयाने सांगितले.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सिमेंट कंपन्या सतत सिमेंटच्या किमती वाढवत आहेत. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्यामालाच्या किमती वाढलेल्या नसतानाही सिमेंटच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे ESMA अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
  • शिल्पी केबल या कंपनीविरुद्ध इंसोलव्हन्सी प्रोसिडिंग सुरु करण्यासाठी NATIONAL LAW TRIBUNAL ने मंजुरी दिली.
  • सेबीने असे जाहीर केले आहे की १ जुलै २०१७ पासून ब्रोकर्स जवळ पडलेला क्लायंटचा पैसा ब्रोकर आता इतर ट्रेडसाठी किंवा स्वतःच्या उपयोगासाठी वापरू शकणार नाहीत. सेबीने stock एक्स्चेंजना ब्रोकरकडील क्लायंटच्या पैशावर देखरेख ठेवण्यासाठी सिस्टीम तयार करायला सांगितली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ब्रोकरला त्याच्याकडे असलेल्या क्लायंटच्या पैशाविषयीची माहिती stock एक्स्चेंजला द्यावी लागेल.
  • CCI(COMPETITION COMMISION OF INDIA) ने टाटा सन्स आणी त्यांच्या इतर ग्रूप कंपन्यांना टाटा टेलीसर्विसेस मधील NTT DOCOMO चा २१.५ स्टेक विकत घ्यायला मंजुरी दिली.
  • GST कौन्सिल ने असे जाहीर केले की ज्या कंपन्या त्यांच्या सबसिडीअरिज, शाखा आणी जॉईनट व्हेंचर्सना गुड्स सप्लाय करतात अशा सप्लाय केलेल्या गुड्सच्या ९०% VALUE वर GST आकारला जाईल.
  • सोन्यावर आणी चांदीवर कोणताही विशेष कर आकारला जाणार नाही. पण GST ५% दराने आकारला जाईल.

इकॉनॉमीच्या गोष्टी

  • BSE निर्देशांक सेन्सेक्समधून १९ जून २०१७ पासून GAIL बाहेर पडेल आणी कोटक महिंद्र बँक आणी टाटा मोटर्स DVR सेन्सेक्समध्ये सामील होईल.
  • शुक्रवार २६ मे २०१७ पासून HCC कजारिया, नाल्को, RBL बँक, रामको सिमेंट हे शेअर्स वायदामध्ये सामील झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ओडीसामधील आयर्न ओअर ब्लॉकची बोली भूषण स्टीलने जिंकली.
  • नाटको फार्माच्या तेलंगणातील Rs ४०० कोटींच्या प्रोजेक्टला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
  • व्हिडीओकोनवर Rs ४५००० कोटींचे असलेले कर्ज NPA म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या बँकांनी या कंपनीला कर्ज दिले आहे त्यांचे शेअर्स पडले.
  • रेमंड या कंपनीची बीच कॅन्डीच्या जवळची जमीन कंपनीचे प्रमोटर Rs ९००० प्रती चौरस फूट या भावात विकत घेणार आहेत. या जमिनीची सध्याची मार्केट प्राईस Rs १००००० प्रती चौरस फूट आहे. त्यामुळे शेअरहोल्डर्सना आपली फसवणूक होते आहे असे वाटते आहे. हा कॉर्पोरेट गवर्ननसचा इशू होऊ शकतो.
  • आज ल्युपिन चा निकाल आला. ल्युपिनच्या इंदोर युनिटच्या वर्किंगवर ६ निरीक्षणे दिली. त्याबरोबरच फार्मा सेक्टर मध्ये ‘प्राईस प्रेशर’ आहे आणी अमेझोन कंपनी फार्मा सेक्टरमध्ये प्रवेश करत असल्यामुळे आपला प्रगतीचा दर सिंगल डीजीट राहील असे ल्युपिनने सांगितले.
  • MTNLया सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने आपल्या जवळ असलेल्या जमिनीचे मॉनेटायझेशन करण्यासाठी टेलीकॉम मंत्रालयाकडे परवानगी मागितली.
  • L&T आपला स्विचगिअर बिझिनेस विकणार आहे. हा बिझिनेस खरेदी करण्यात मित्सुबिशी, PANASONIC, हिताची, आणी हनीवेल यांनी रस दाखवला आहे.
  • जैन इरिगेशन, PC ज्युवेलर्स, BOSCH(मार्जीन वाढले) बजाज हिंदुस्थान अशोक LEYLAND, HPCL टाटा केमिकल्स, ITC यांचे निकाल चांगले आले.
  • डीश टी व्ही आणी सिप्ला या कंपन्यांचा निकाल निराशाजनक होता.
  • IDBI बँक आपले नॉनकोअर ASSET विकून भांडवल उभारणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • डेक्कन सिमेंट ही कंपनी आपल्या एका शेअरचे २ शेअर्समध्ये तर जमुना ऑटो आपल्या एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लीट करणार आहे
  • P C ज्युवेलर्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने १:१ असा बोनस जाहीर केला.
  • आज सिंटेक्स या कंपनीचे डीमर्जर झाले. टेक्स्टाईल बिझिनेस आज Rs १८ ला लिस्ट होऊन नंतर Rs ३२ पर्यंत वाढला. काही दिवसांनी प्लास्टिक बिझिनेसचेही लिस्टिंग होईल.
  • ITC च्या निकालात Rs ४०० कोटी इतर उत्पन्नाचा समावेश आहे.
  • HPCL ने १:२ या प्रमाणात बोनस दिला. म्हणजे तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला एक शेअर बोनस म्हणून मिळेल

मार्केटने काय शिकवले

या आठवड्यात सरकारने पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून जशी जबरदस्त चपराक दिली तशीच मार्केटनेसुद्धा सर्व ट्रेडर्सना चांगलेच वठणीवर आणले. मार्केट वाढते आहे बुल रन आहे कोणत्याही भावाला विकत घेतले तरी भाव वाढणार आणी फायदा होणार अशी समजूत ट्रेडर्सची असते. मार्केट या आठवड्यात ४ दिवस पडतच राहिले म्हणजेच गाफील राहू नये हा धडा मार्केटने दिला. गुरुवारी एकस्पायरीच्या दिवशी ४४८ पाईंट  मार्केट वर असल्यावर जशी आकडेवारी मिळायला हवी होती तशी दिसली नाही. त्यावरून वायदा बाजाराच्या एकस्पायरीचा परिणाम होता असे जाणवले. आता जूनची एक्सपायरी ५ आठवड्यांची आहे हे लक्षात ठेवा. ट्रेडिंगसाठीही जास्त दिवस मिळतील.

मार्केटने नवा इतिहास रचला. सेन्सेक्स ३१००० आणी निफ्टी ९६०० ला पोहोचले. निफ्टी बँक २३९८० होती निफ्टी ९५०० वरून ९६०० व्हायला ६ सत्रे लागली. तर सेन्सेक्सला ३०००० ते ३१००० होण्यास ३५ सत्रे लागलीमोदींनी वेगवेगळी ध्येय धोरणे वापरून देशाचा पर्यायाने प्रत्येक नागरिकाचा विकास साध्य केला आणी त्यांच्याच ‘सबका साथ सबका विकास’ या घोष वाक्याला विशेष अर्थ प्राप्त झाला. परदेशी गुंतवणूकदाराचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. सामान्य लोकही पुन्हा शेअर मार्केटकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे तेजीच्या लाटा येऊन मार्केटने उच्चांक गाठला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०९८५ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९५८० वर बंद झाले.

 

 

आठवड्याचे समालोचन – GST ची वरात शेअर मार्केटच्या दारात – 15 मे २०१७ ते १९ मे २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेले वर्षभर GST गाजतंय. GST म्हणजे गुड्स आणी सेवाकर, एक देश एक कर, मोठी कर सुधारणा इत्यादी आपण ऐकत आलो. पण GST लागू झाल्यानंतर महागाई वाढेल अशी शंका वर्तवली जात होती. तसे होणार नाही अशी सरकारने ग्वाही दिली आहे. सामान्य माणसाच्या उपयोगात येणाऱ्या बर्याच गोष्टींवर GST कराची तरतूद नाही. अन्नधान्य, दुध, भाज्या, फळे, शिक्षण, हेल्थकेअर, लोकल ट्रेन आणी टू टायर टिकट हे GSTच्या कक्षेबाहेर ठेवले आहेत. चहा, साखर, खाद्यतेले, लाईफ सेविंग बल्क ड्रग, कोळसा यांच्यावर ५% GST लागेल. बर्याच वस्तूंवर आता आकारत असलेल्या करापेक्षा GST  खाली ठरवलेला कराचा दर कमी असेल. पण चैनीच्या किंवा सिगारेटस्, लक्झुरी कार्स, महागडे मोबाईल, तसेच लक्झुरी हॉटेलातील वास्तव्य यावर GST २८ % आकारला आहे. GST चे पाच दर असतील ०%, ५%, १२%, १८% आणी २८% सरकारने उद्योगांना आवाहन केले आहे की ज्या उद्योगात GST चा दर आताच्या अप्रत्यक्ष करापेक्षा कमी केला असेल; त्यांनी तो आपल्या ग्राहकांकडे पास ऑन करावा. GST खाली बहुतांश सेवावर उदा. बँकिंग,विमा. टेलिकॉम, IT १८% GST  आकारला जाईल. सोने चांदी आणी इतर किंमती धातू, लॉटरी सर्विसेस या बाबतीत ३ जून २०१७ रोजी होणार्या GST कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.GST चा फायदा लॉजिस्टिक कंपन्यांना होईल.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • रशिया आणी सौदी अरेबिया यांनी क्रूड उत्पादनावरील निर्बंध मार्च २०१८ पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता दिल्यामुळे क्रूडचे भाव वाढले.
  • अस्मानी सुलतानी आणी आता संगणकी संकटाना तोंड देणे एवढेच आपल्या हातात असते. सायबर ATTACK मुळे १५० देशातील २,००,००० लोक, संस्था धोक्यात आल्या आहेत. यात मुख्यतः बँक्स हॉस्पिटल्स आणी सरकारी खाती आहेत. या सायबर हल्ल्याचे नाव RANSOMWARE असे आहे. तुमच्या संगणकावरील डाटा ENCRYPT करुन तुमच्याकडे RANSOM रकमेची मागणी केली जाते. सुदैवाने आतापर्यंत भारतात एक आंध्रप्रदेश सोडल्यास याचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’’ मध्ये हा एक अडथळा ठरू शकतो.
  • USA मध्ये काही USA ला सेन्सिटीव असलेली माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाला दिली अशी बातमी आल्यामुळे आणी त्यामुळे ट्रम्प यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असे वाटल्यामुळे USA मधील मार्केट पडली. त्याचा थोडाफार परिणाम आपल्या शेअरमार्केटवरही झाला.

 

सरकारी अन्नौंसमेंट

  • सरकारने ५ वर्षासाठी इराणमधून आयात होणार्या क्लीअर फ्लोट ग्लासवर प्रती टन US$५५.५९ तर चीनमधून आयात होणाऱ्या अल्युमिनियम रेडीएटर्सवर US $ २२.८९ ANTI DUMPING ड्युटी लावली.
  • सरकारने चीन, कोरिआ, जपान, युक्रेन या देशातून आयात होणाऱ्या कोल्ड रोल्ड स्टीलवर (हे ऑटो इंडस्ट्रीमध्ये वापरतात) ५ वर्षासाठी प्रती टन US $ ५७६ ANTI DUMPING ड्युटी बसवली.
  • डिफेन्स इंडस्ट्रीयल लायसेन्सची प्रक्रिया सोपे केली. आता DIPP (डीपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज पॉलिसी आणी प्रमोशन) अवाश्यक त्या सर्व मंत्रालयांकडून विना हरकत प्रमाणपत्र मागवेल त्यासाठी लायसेन्ससाठी अर्ज करणाऱ्या कंपनीला सर्व मंत्रालयांशी संपर्क साधण्याची जरुरी नाही.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • IDBI पाठोपाठ UCO  या राष्ट्रीयीकृत सरकारी बँकेवर RBI ने PCA खाली कारवाई केली. यामुळे या बँकेला नवीन शाखा उघडणे तसेच कर्मचाऱ्यांची भरती करणे, लाभांश देणे यावर बंदी आणी प्रत्येक प्रकारच्या खर्चात बचत करणे क्रमप्राप्त झाले आहे.
  • NPPA ने ५ जरुरीच्या औषधांच्या किमती वाढवल्या. ही औषधे सन फार्मा, ल्युपिन, सिप्ला या कंपन्या बनवतात. NPPA ने काही औषध बनवणाऱ्या कंपन्यांना त्या काही औषधांसाठी ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारत आहेत म्हणून नोटीस पाठवली.
  • सरकारने CNG चे भाव Rs ०.३५ आणी PNG चे भाव Rs ०.८१ ने वाढवले. याचा इंद्रप्रस्थ GAS या कंपनीला होईल.
  • DGFT कडून चंबळ फरटीलायझरला युरिआ निर्यातीसाठी परवानगी मिळाली.
  • सरकारने आपले कोल लिंकेज धोरण जाहीर केले.
  • मेडीकल उपकरणे आणी विविध रोगांसाठी असलेल्या प्रतिबंधक लस आयात करावी लागू नयेत म्हणून सरकार मेडिकल उपकरणे तयार करणार्या कंपन्यांना सवलती देणार. या सवलती कमी व्याज दराने कर्ज, करात सवलत या स्वरूपात असतील.
  • सरकार प्रिंट मिडीया क्षेत्रात FDI ला परवानगी देणार आहे. याचा फायदा HT मेडिया, जागरण यांना होईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • एप्रिल २०१७ साठी ट्रेड डाटा आला. भारताची निर्यात सतत ८ व्या महिन्यात वाढली एप्रिलमध्ये निर्यात US$२४.६ बिलियन झाली. ही वाढ १९.७% आहे. निर्यात ३० पैकी २३ क्षेत्रात वाढली. भारतीय मालासाठी USA आणी युरोपमध्ये मागणी वाढली. पण त्याचबरोबर आयातही ४९% ने वाढून US$ ३७.८ बिलियन झाली. यात मोठा वाटा सोन्याच्या आयातीचा आहे. सोन्याची आयात २११% वाढून US $ १.२ बिलियनवरून वाढून एप्रिलमध्ये US$ ३.८ बिलियन झाली. यात US$च्या भारतीय रुपयाबरोबर असलेल्या विनिमय दरात झालेली घट, त्याचबरोबर लोक सोने हे एक गुंतवणुकीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहेत. कारण बाकीच्या ASSETवरील उत्पन्नाच्या दरात सतत घट होत आहे. उदा :- बँक डीपॉझीट, कर्जरोखे. त्यामुळे ट्रेड डेफिसिट US$४.८ वरून एप्रिलमध्ये US$ १३.२ बिलियन झाली.
  • MSCI स्माल कॅप निर्देशांकात फ्युचर लाईफ स्टाईल या शेअरचा समावेश झाला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • कॅनडा पेन्शन प्लानने एव्हरस्टोन ग्रूपची इंडोस्पेस ही १३ लॉजिस्टिक पार्क असलेली कंपनी US ५०० मिलियनला खरेदी केली. इंडोस्पेस आणी कॅनडा पेन्शन प्लान यांनी एक ‘INDOSPES CORE’ या नावाचे जॉइंट वेंचर सुरु करण्याचे ठरवले आहे.
  • SBI पाठोपाठ आता ICICI बँकेने ३० लाखांपेक्षा कमी रकमेच्या गृहकर्जांसाठी ०.३० % ने व्याजदर कमी केला. HDFC ने ही महिलांसाठी ०.१५% तर पुरुषांसाठी ०.१०% व्याजदर कमी करून ते SBIच्या लेव्हलवर आणले.
  • मुंद्रा पॉवर प्लांटचा वाढलेला खर्च देण्याचे CERC ने मान्य केल्यामुळे अडानी पावर हा शेअर वधारला.
  • वेदान्ता,बाटा, कजारीया सेरानिक्स, PNB, PNB हौसिंग, सुमित इंडस्ट्रीज, JSW स्टील, HUL, हिंदुस्थान कॉपर, बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक ऑफ इंडिया, दिलीप बिल्डकॉन, टाटा स्टील आणि कर्नाटक बँक यांचा निकाल चांगला आला.
  • IDBI, या सरकारी क्षेत्रातील बँकेकडे ३५ कंपन्यांचे शेअर आहेत. बँक हे शेअर विकायच्या विचारात आहे.
  • IDEA, IDBI, कॉर्पोरेशन बँक या कंपन्यांचा निकाल असमाधानकारक आला.

कॉर्पोरेट एक्शन

  • CESC या कोलकाता बेस्ड कंपनीचे रिटेल (Rs १००० कोटी), रिअल इस्टेट (Rs १५०० कोटी) पॉवर डीस्ट्रीब्युशन (Rs १०५०० कोटी) आणी टेक्नोलॉजी अशा चार विभागात डीमर्जर होणार आहे जेव्हा मार्केट तेजीत असते तेव्हा डीमर्जर करतात. जेव्हा मार्केट मंदीत असते तेव्हा कॉन्सालीडेशन करून खर्च वाचवतात. डीमर्जर नंतर VALUE Rs १५५०० कोटी होईल. पण ही बातमी मार्केटला ४ महिने आधीपासून होती. हा शेअर Rs ५५० होता आता Rs १००० पर्यंत आला. त्यामुळे ‘BUY ON HUMOUR AND SELL ON  NEWS’  या नियमाप्रमाणे शेअरची किंमत कमी झाली. या कंपनीची चार वेगवेगळ्या कंपन्यात डीमर्जर होईल ते याप्रमाणे CESC जनरेशन, CESC डीस्ट्रीब्युशन, स्पेन्सर, आणी CESC व्हेंचर्स या कंपन्यात होईल. जर तुमच्याकडे CESC चे १० शेअर्स असतील तर तुम्हाला ५ शेअर्स CESC जनरेशन, ५ शेअर्स CESC डीस्ट्रीब्युशन, ३ शेअर्स स्पेन्सर, आणी २ शेअर्स CESC व्हेंचर्सचे मिळतील.
  • आता टीसीएस च्या BUY BACK विषयी :- या BUY BACK चा रेशियो साधारण १०० शेअर्समागे 2 किंवा ३ शेअर्स असेल अशी चर्चा होती. पण ज्या शेअरहोल्डर्सकडे ८५ पेक्षा कमी शेअर्स असतील त्यांना स्माल शेअर होल्डर्स ठरवून त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येकी २० शेअर्सपैकी कंपनी ९ शेअर्स BUY BACK करेल म्हणजे हे प्रमाण ४५% पडते. आपल्याला जर TCS ने BUY BACK चा फोरम पाठवला असेल तर आपण तो अवश्य उघडून पहा. इतर शेअरहोल्डर्ससाठी मात्र हा रेशियो ४०९ शेअर्स पैकी १० शेअर्स BUY BACK असा असेल.
  • मदरसन सुमी या कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या २ शेअर्समागे १ बोनस शेअर जाहीर केला.
  • सिंटेक्स इंडस्ट्रीजचे डीमर्जर होईल आणी नव्या कंपनीचे नाव सिंटेक्स प्लास्टिक असे असेल. रेशियो १:१ असेल.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • SBI LIFE ही आयुर्विमा क्षेत्रातील मोठी कंपनी IPO आणून त्यांचे प्रमोटर SBI आणी BNP पारिबास आपला १२% स्टेक विकतील. ह्या कंपनीचे फंडामेण्टल चांगले आहेत आणी ही भारतातील खासगी क्षेत्रातील दुसर्या नंबरची आयुर्विमा क्षेत्रातील कंपनी आहे.
  • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या IPOची तयारी पूर्ण झाली.

या आठवड्यात झालेली लिस्टिंग

  • या आठवड्यात IRB इन्फ्रा या कंपनीच्या InVIT चे लिस्टिंग झाले. Rs १०२ ला दिलेले InVIT १०३.६० पैशाला लिस्ट झाले.
  • हुडको या कंपनीच्या शेअरचे Rs ७३ वर लिस्टिंग झाले. हा शेअर किरकोळ गुंतवणूकदाराना Rs ५८ ला तर इतरांना Rs ६० ला दिला होता, इशू प्राईस वर बऱ्यापैकी लिस्टिंग गेन झाला.
  • पी एस पी प्रोजेक्ट्स या कंपनीचा IPO एकूण ८.६ वेळा तर किरकोळ कोटा ६.५ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.

मार्केटने काय शिकवले

गुरुवारी USA चे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बातमीने मार्केट ढवळून निघाले. ट्रम्प यांच्याविरुद्ध ‘इम्पीचमेंटची’ कारवाई होईल का काय? या बातमीमुळे IT क्षेत्रावर जे धोक्याचे ढग जमा झाले होते ते विरळ होतील. व्हिसाच्या धोरणात शिथिलता येईल असे जाणवताच IT सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढू लागले. म्हणजेच घडणारी किंवा होऊ घातलेली घटना आणी त्याचे परिणाम कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांवर होतील. याची सांगड घालता आली पाहिजे. त्याच प्रमाणे कोणत्या घटनेचा किती परिणाम शेअर्सच्या प्राईसमध्ये आधीच समाविष्ट आहे हे समजले पाहिजे. जे CESC च्या बाबतीत घडले एकतर ह्या बातमीचा परिणाम शेअर्सच्या किमतीमध्ये समाविष्ट होता आणी लोकांना RESTRUCTURING समजावयास थोडे गुंतागुंतीचे वाटले. त्यामुळे शेअरचा भाव खाली आला.

गुरुवारी पुट कॉल रेशियो १.४१ होता. हा पुट कॉल रेशियो १.२६ पर्यंत घटला. याचा अर्थ ९५०० च्या स्तराला ज्यांनी पोझिशन घेतली होती ते बाहेर पडले. हे कमजोर, संधीसाधू ट्रेडर्स होते. आता मार्केट निफ्टी ९३०० ते ९५०० या पातळीवर राहील. GST येऊ घातल्यामुळे त्याच्या परिणामांचा विचार करून शेअरमार्केटमध्ये उलाढाल करा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०४६४ आणी NSE निर्देशांक ९४२७ वर बंद झाला.

आठवड्याचे समालोचन – उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका – ८ मे २०१७ ते १२ मे २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केट एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे रोज नव्या नव्या सीमा ओलांडत आहे. नवे नवे प्रदेश जिंकत आहे. आणी आपला ठसा काळाच्या पडद्यावर उमटवत आहे. काल होते ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही अशी स्थिती आहे. निफ्टी आणी सेन्सेक्स हे निर्देशांकच नव्हे तर वेगवेगळे सेक्टोरल निर्देशांक आळीपाळीने चौकार षटकार मारत आहेत आणी बाजूला होऊन दुसर्या निर्देशांकांना वाट करून देत आहेत.पण त्यातल्या त्यात एक बरे आहे जसे एका खेळाडूने षटकार मारला, नंतर सिंगल्स घेतल्या, धावफलक हालता ठेवला, एकाग्रता ढळू दिली नाही नंतर पुन्हा एक षटकार मारला असे झाले तर मजा येते. तसेच सध्या सुरु आहे. प्रत्येक लेव्हलवर मार्केट स्थिरावते आहे.. नंतर पुढची चाल सुरु होते आहे. पण मार्केट्ची लहर सांभाळावी लागते हेच खरे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • या आठवड्यात झालेल्या दोन राष्ट्रातील निवडणुकांच्या निकालांनी राष्ट्राराष्ट्रातील शांतता आणी सौहार्द वाढण्यास मदत होईल असे वाटते.
  • दक्षिण कोरिआमध्ये समन्वयवादी आणी उदारमतवादी Moon Jae–in अध्यक्ष म्हणून निवडून आले. यामुळे उत्तर कोरिआ आणी दक्षिण कोरिआ याच्या संबंधात सुधारणा होईल. नव्या अध्यक्षांनी उत्तर कोरीआला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे USA आणी उत्तर कोरिआ यांच्यातील तणाव थोडा कमी होईल असे वाटते.
  • फ्रान्स मध्ये मध्यममार्गी आणी युरोपिअन युनियनमध्ये विश्वास ठेवणारे श्रीMACRON फ्रांसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे आता बहुचर्चित फ्रेकझीट होण्याचा संभव राहिला नाही तसेच फ्रांस ‘प्रोटेक्शनीझम’ च्या आहारी जाणार नाही असे वाटते.
  • USA आपले व्हिसा धोरण अधिकाधिक कडक करीत आहे. आता व्हिसासाठी अर्ज करणार्याला आपली १५ वर्षाची व्यक्तीगत माहिती द्यावी लागेल. यात पासपोर्ट डीटेल्स, सोशल मेडिया डीटेल्स यांचा समावेश आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

  • DPCO च्या नियंत्रणाखाली मेडिकल इक्विपमेंट बनवणार्या कंपन्यांना आणण्याचा संभव आहे. कोणत्याही वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी किती रक्कम आकारावी या संबंधी सरकार काही नियम करण्याच्या विचारात आहे. यामुळे लाल पाथ LAB, थायरो केअर या कंपन्यांच्या उत्पनावर परिणाम होईल.
  • सरकारी कंपन्यांच्या ETFचा दुसरा चरण सुरु होईल. यात SBI, बँक ऑफ बरोडा आणी PNB यांचा समावेश असेल. २५ सरकारी कंपन्या यासाठी शॉर्टलिस्ट केल्या आहेत. या मध्ये ‘SUTTI ’ मधील काही कंपन्या सामील आहेत.
  • केंद्र सरकारच्या शेती मंत्रालयाने जाहीर केलेल्या तिसऱ्या अंदाजाप्रमाणे जून २०१७ च्या वर्ष अखेरीस अन्नधान्य, डाळी यांचे उत्पादन २७३.३८ मिलियन टन होईल. यामुळे मार्केटला आणखी एक शुभ शकून झाला.
  • सरकारने पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या कंपनीला NATIONAL LONG DISTANCE आणी इंटरनेट पुरविण्यासाठी युनिफाईड परवाना दिला.
  • सरकारने स्टीलच्या ४७ प्रोडक्ट्सवर पांच वर्षासाठी US $ ४७८ ते US $ ५६१ एवढी ANTI DUMPING ड्युटी लावली
  • 11 मे २०१७ रोजी केंद्र सरकारची डिफेन्स प्रोक्युअरमेंट पॉलिसीअंतर्गत खाजगी कंपन्यांबरोबर बैठक आहे यात BEL, BEML, L & T, M & M. वालचंदनगर इंडस्ट्रीज, ASTRA मायक्रोवेव्ह अशा कंपन्यांचा समावेश आहे.
  • पंतप्रधान श्री लंकेचा दौरा करणार आहेत या दरम्यान ऑईल, GAS क्षेत्रात बरेच करार होण्याची शक्यता आहे. IOC ला याचा फायदा होईल.
  • केंद्र सरकारच्या संरक्षण धोरणाच्या अंतर्गत ४ विभाग करण्यात आले आहेत. (१) सिंगल इंजिन फायटर प्लेन (२) हेलीकॉप्टर (३) सबमरीन (४) आर्म्ड लडाखू वाहन. ज्या कंपनीला ज्या विभागासाठी ऑर्डर दिली असेल ती कंपनी तो विभाग बदलू शकत नाही. या कंपन्या ४९% विदेशी भांडवल आणू शकतात. आणी विदेशी कंपन्यांबरोबर करार करू शकतात.
  • सरकार अतिरिक्त साखर आयात करायला परवानगी देणार नाही.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • WPI, CPI आणी IIP चे आकडे आले. हे सगळे आकडे मार्केटसाठी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहेत.
  • WPI एप्रिल महिन्यासाठी ५.२९% वरून ३.८५% झाले. WPI (WHOLESALE PRICE INDEX) च्या सिरीजचे बेस वर्ष २००४-०५ बदलून २०११-१२ करण्यात आले. या निर्देशांकात १९९ नवे आयटेम घेण्यात आले. आधी या निर्देशांकात ६२० आयटेम होते. यामुळे अधिक चांगला डाटा मिळेल त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चांगले चित्रण समाजासमोर येईल. WPI मध्ये इनडायरेक्ट करांचा समावेश केलेला नाही.
  • IIPचे बेस वर्षही २०११-२०१२ ठरवण्यात आले IIP औद्योगिक उत्पादनातील प्रगती दाखवते. मार्च महिन्यासाठीचा IIP १.९ वरून २.७ झाला.
  • एप्रिल २०१७ या महिन्यासाठीचा CPI (CONSUMER PRICE INDEX) हा किरकोळ महागाईचा निर्देशांक ३.८९% वरून २.९९% झाला.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सुप्रीम कोर्टाने BSIV च्या नियमातून TRACTOR आणी शेतकी इक्विपमेंटला सूट दिल्यामुळे M & M, आयशर, संघवी मूव्हर्स, ACE, अशोक LEYLAND, एस्कॉर्टस यांच्या शेअर्सचे भाव वाढले.
  • ऑरोबिंदो फार्मा या कंपनीच्या हैदराबाद प्लांटचे इन्स्पेक्शन करून USFDA ने ७ त्रुटी असलेला फोरम नंबर ४८३ दिला.
  • RBI ने IDBI बँकेचे नेट NPA जास्त आहेत आणी ROA (RETURN ON  ASSETS) निगेटिव्ह असल्यामुळे PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) खाली सुधारणात्मक कारवाई सुरु केली आहे  यामुळे त्यांना नवीन शाखा उघडता येणार नाहीत तसेच लाभांश देता येणार नाही.
  • येस बँकेने NPA च्या संदर्भात जी आकडेवारी दिली त्याबद्दलही RBIने शंका व्यक्त केली.
  • MET डिपार्टमेंटने सरासरीपेक्षा जास्त पाउस पडेल असा अंदाज वर्तविला. तसेच त्याचे LPA (LONG PERIOD AVERAGE) १०० % असेल असे सांगितले. तसेच अल्निनो या भीतीदायक वादळाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी झाला आहे असे सांगितले. यामुळे FMCG कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणी एक सुखद वातावरण मार्केटमध्ये पसरले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • देना बँकेने व्हिडीओकोन इंडस्ट्रीज हा मोठा अकौंट NPA म्हणून घोषित केला. याचा परिणाम म्हणून ज्या इतर बँकांनी व्हिडीओकोन इंडस्ट्री या कंपनीला कर्ज दिले असेल त्या सर्व बँकांना हा अकौंट NPA म्हणून घोषित करावा लागेल.
  • प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल २०१७ या महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा १४.६८% ने वाढली. या वर्षी बरीच नवीन मॉडेल्स कंपन्यांनी बाजारात आणली आणी मारुतीने खूपच चांगली प्रगती (२३%) दाखवली. परंतु कमर्शिअल वाहने आणी रिक्षा यांच्या विक्रीत घट दिसून आली.
  • कोटक महिंद्र बँक Rs ५६०० कोटींचा QIP करणार आहे. या रकमेचा विनियोग BAD ASSETS विकत घेण्यासाठी करणार आहे
  • GRANUELS,PNB हौसिंग,हिरो मोटो (मार्जीन कमी झाले), गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, पेट्रोनेट LNG, सिकल  लॉजीस्टिक, HCL-TECH,  मैथान ALLOYS, सिंडीकेट बँक TRIDENT,आयचर मोटर्स, BSE या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
  • देना बँक, OBC, भारती एअरटेल, MAJESCO, कॅनरा बँक, युनियन बँक, लाल पाथ LAB, DR रेड्डीज, ग्लेनमार्क फार्मा (गायडंस निराशाजनक) या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
  • इंडिगो ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी ‘उडान’ या योजनेखाली ५० उड्डाणे सुरु करणार आहे.
  • EID PARRY या कंपनीच्या NUTRA FACILITY साठी USFDA ची परवानगी मिळाली.
  • CESC त्यांच्या रिटेल बिझिनेसमधून बाहेर पडणार आहेत.
  • EROS WORLDWIDEने EROS INTERNATIONAL या कंपनीतला स्टेक ४% कमी केला.
  • DABUR इंडिया या कंपनीने करीना कपूर हिची BRAND AMBASADAR म्हणून निवड केली.
  • दिल्ली मेट्रोची केस रिलायंस इंफ्राने जिंकली. कंपनीला Rs २९५० कोटी मिळतील.
  • L&T ला आर्टिलरी गन बनवण्यासाठी Rs ४५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
  • १५ एप्रिलपासून ग्रासिम, आयशर मोटर्स, REC, ICICI बँक यांचे MSCI निर्देशांकातील रेटिंग बदलणार आहे.

या आठवड्यातील IPO आणी लिस्टिंग

  • S चांद या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग NSE वर Rs ७०० आणी BSE वर Rs ७०७ वर झाले. हा शेअर Rs ६७० ला IPO मध्ये दिला होता आणी ६० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला होता त्या मानाने लिस्टिंग फारच कमजोर झाले असे म्हणावे लागेल.
  • HUDCO या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO एकूण ७९.४७ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. यात रिटेल कोटा १०.६० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
  • PSP प्रोजेक्ट या कंपनीचा IPO १७ मेला ओपन होऊन १९ मे २०१७पर्यंत खुला राहील
  • STERLITE पॉवर ग्रीड व्हेंचर्स ही कंपनी आपल्या INDIA GRID TRUSTच्या Rs २२५० कोटींच्या InVIT IPO (प्राईस BAND Rs 98 ते Rs १००) १७ मे रोजी ओपन करेल. सुरुवातीला या फंडाकडे Rs ३७०० कोटींच्या २ प्रोजेक्ट असतील. राहिलेल्या ८ प्रोजेक्टवर या ट्रस्टचा पहिला अधिकार राहील.

कॉर्पोरेट एक्शन

  • पेट्रोनेट LNG आणी गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स या कंपन्यांनी १:१ या प्रमाणात बोनस दिला.
  • पिनकॉन स्पिरीट या कंपनीची २२ मे २०१७ रोजी राईट्स इशुवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
  • शिल्पी केबल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनस वर विचार करण्यासाठी २८ मे २०१७ रोजी बैठक आहे.
  • ACC आणी अंबुजा सिमेंट याचे मर्जर होणार आहे. हे मर्जर दोन्ही कंपन्यांसाठी विशेषतः अंबुजा सिमेंटसाठी लाभदायक आहे.
  • GILLET आणी PROCTOR AND GAMBLE यांच्या मर्जरची शक्यता आहे.  या दोन्ही कंपन्यांनी विशेष लाभांश जाहीर केला.

मार्केटने काय शिकवले

सध्या म्युच्युअल फंडांची कॅश लेव्हल वाढते आहे  असे  निरीक्षण केल्यास आढळते. मिडकॅप शेअरमधून गुंतवणूक काढून घेताना दिसत आहेत. DII(DOMESTIC INSTITUTIONAL INVESTORS) ची विक्री वाढत आहे, यावरून आपणही अर्थबोध घ्यावा सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

आता खरोखर संयमाची कसोटी लागत आहे. मार्केट हट्टी, अवखळ, लहरी असते. या गतीमध्ये मार्केट मर्यादेपेक्षा जास्त वाढते किंवा पडते. पण आपला पैसा आपण जपून वापरला पाहिजे. ज्याला आगत असेल त्याने स्वागत केले पाहिजे. भीती आणी हाव दोन्हीलाही मर्यादा नसेल तर माणूस वेडा ठरतो. त्यामुळे मार्केटपासून दूर पळायचे नाही पण हाव किंवा भीतीच्या आहारी न जाता योग्य वेळी योग्य किंमतीला योग्य प्रमाणात योग्य गुंतवणूक करण्याचा वसा टाकायचा नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०१८८ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९४०० वर बंद झाले.

 

 

Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन – माउंट एव्हरेस्टवर शेअर मार्केट आणी मी -२ मे ते ५ मे २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माउंट एव्हरेस्टचे नाव ऐकून आता मी एखाद्या ट्रेकिंग मोहिमेचे वर्णन करणार असे तुम्हाला वाटले असेल. पण या आठवड्यात BSE आणी NSE या दोन्ही एक्स्चेंजच्या  निर्देशांकांनी आतापर्यंतची उच्चतम शिखर गाठून जणू काही आता स्वच्छंद विहार करण्यासाठी ‘झेप घे रे पाखरा’ स्टाईलने ‘ब्लू स्काय’ टेरीटरीत प्रवेश केला आहे. म्हणून मी म्हणते जणू काही उच्चांक गाठून शेअर मार्केटने सर्व गुंतवणूकदारांना खूप मोठ्या आनंदाचा अनुभव दिला आहे. अर्थात आपल्या सर्व वाचकांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्सचे भावही माउंट एव्हरेस्टवर असल्यामुळे एकूण पोर्टफोलीओची किंमत उच्चतम स्तरावर असेल असे वाटते.

बोनस ही एक कॉर्पोरेट एक्शन. पण गुंतवणूकदाराला हवीहवीशी असलेली आणी बोनस देणाऱ्याविषयी आदराचे स्थान शेअरहोल्डर्सच्या मनात उत्पन्न करणारी कॉर्पोरेट एक्शन. ज्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा होतो, किंवा ज्या कंपन्या प्रगतीपथावर असतात किंवा ज्या कंपन्यांच्या BALANCE SHEET मध्ये पुष्कळ प्रमाणात कॅश किंवा अल्क्युम्युलेटेड प्रॉफीट असतात त्या कंपन्या बोनस जाहीर करतात. हा आपला आजवरचा अनुभव, पण सरंक्षक (डीफेन्सिव) बोनस पॉलिसी असे नाव प्रचारात येण्याचा संभव आहे. ICICI BANK, किटेक्स् गारमेंट, तसेच बायोकॉन या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक आले. तरी या कंपन्यांनी अनुक्रमे १:१०, १:५, आणी २ :१ असा बोनस जाहीर केला. म्हणजेच यामागे शेअरची मार्केट प्राईस टिकवून ठेवणे हा उद्देश दिसतो. ज्या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक आहेत त्यांचा बोनस घेवून फायदा काय. बोनस मिळाल्यावर शेअर पडेल म्हणजेच आजचे मरण  उद्यावर असेच नाही का ?

आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला पहिला सलाम ‘इन्फोसिस’ या भारतीय कंपनीने दिला. इन्फोसिसने घोषणा केली की कंपनी USAच्या १०००० स्थानिक नागरिकांसाठी काम उपलब्ध करेल आणी USA मध्ये आपले ४ ‘HUB’ चालू करेल. या घोषणेचे USAच्या प्रेसिडेंट कार्यालय ‘व्हाईट हाउसने’ स्वागत केले आहे. शेवटी तुम्ही ‘रोमला गेलात तर रोमनसारखे वागणे भल्याचे असते’ ही म्हण पटते..
  • आता UK आणी युरोपिअन युनियन यांच्यातील ब्रेकझीटसाठीच्या वाटाघाटी मार्केटला बऱ्याच दिवस बातम्या पुरवतील असे दिसते. तसेच फ्रान्समधील निवडणूकांचे निकाल या नाट्यात भर घालतील.
  • याबरोबरच USA आणी उत्तर कोरिआ यांच्यातील सवाल जवाब आणी त्याचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी होणारी कृती निश्चितच जागतिक स्तरावर नाट्य निर्माण करेल.
  • USA च्या (सेन्ट्रल बँक) फेडने आपल्या व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत.
  • अडाणी एंटर प्रायझेसला QUEENSLAND प्रोजेक्ट मधील पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यासाठी दंड भरावा लागेल.
  • टाटा स्टीलने आपला UK मधील स्पेशालिटी स्टील बिझिनेस LIBERTY या कंपनीला विकला.

सरकारी अनौंसमेंट

  • रेरा :- रिअल्टी क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणी घरे विकत घेणाऱ्या ग्राहकांचे हितरक्षण करण्यासाठी केंद्रीय सरकारने १ मे २०१६ रोजी रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथारीटी) स्थापन करून सर्व राज्यांना आपापले नियम बनवण्यास सांगितले. महाराष्ट्र सरकारने १ मे २०१७ रोजी महाराष्ट्र राज्यासाठी ह्या ऑथारीटीची स्थापना केली. आता बिल्डर्स आणी डेव्हलपर्सना त्याना असलेला या क्षेत्रातील गेल्या ५ वर्षातील अनुभव, प्रत्येक भावी किंवा चालू असलेल्या प्रोजेक्टचा अंदाजे खर्च, प्लान, लेआउट, या प्रोजेक्टमध्ये केलेली गुंतवणूक आणी आतापर्यंत या प्रोजेक्टमधील किती flat विकले, आणी प्रत्येक प्रोजेक्टसाठी ठरवलेला एस्क्रो अकौंट नंबर, स्थानिक सरकारी ऑथारी टी ( उदा :-महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद) आणी इतर प्रशासनीक संस्थांकडून(आवश्यक असल्यास) मिळालेली मंजुरी इत्यादी विषयीची माहिती रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करावी लागेल. बिल्डर किंवा डेव्हलपर्सना आता कोणत्याही प्रोजेक्टची जाहिरात किंवा बुकिंग, प्रमोशन किंवा विक्री करण्याआधी आपली प्रोजेक्ट रजिस्टर करावी लागेल. या बरोबरच बिल्डर्स आणी डेव्हलपर्सना affidavit करून वेबसाईटवर दिलेल्या  माहितीची सत्यता प्रस्थापित करावी लागेल. प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळा एस्क्रो अकौंट(यामध्ये ग्राहकांकडून मिळालेली ७०% रक्कम जमा करावी लागेल) असल्यामुळे गृहग्राहकानी भरलेला पैसा त्याच प्रोजेक्टसाठी वापरला जाईल. जर प्रोजेक्ट मध्ये काही बदल करायचा असेल तर २/३ flat ग्राहकांच्या संमतीनेच करावा लागेल. जर प्रोजेक्ट रजिस्टर केली नाही किंवा दिलेली माहिती खोटी निघाली तर या कायद्यात जबर दंडाची आणी तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी तरतूद केली आहे. या कायद्यामुळे २५ वर्ष राहिल्यानंतर बिल्डींग बेकायदा ठरण्याचा जो धोका आहे त्यामुळे आज जे पूर्ण किंमत देऊन घर घेतलेलं लोक बेघर होत आहेत त्याला भविष्यात आळा बसेल असे वाटते.या कायद्याखाली रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या ब्रोकर्सना आणी एजंटना या कायद्याखाली रजिस्टर केल्याशिवाय आपला उद्योग सुरु करता /ठेवता येणार नाही. या कायाद्याचा फायदा गोदरेज प्रॉपर्टीज, शोभा डेव्हलपर्स, ओबेरॉय रिअल्तीज दिलीप बिल्डकॉन यांना होईल.
  • केंद्र सरकारने आपली नवीन स्टील पॉलीसी जाहीर केली या पॉलिसीप्रमाणे सर्व सरकारी इन्फ्रा आणी इतर प्रोजेक्टमध्ये भारतात उत्पादन केलेल्या आयर्न आणी स्टीलचा उपयोग केला जाईल. आयर्न आणी स्टील क्षेत्रात Rs १० लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. यामुळे २०३०-३१ पर्यंत सर्व प्रकारचे स्टील भारतात उत्पादित होऊ शकेल.सरकारच्या या निर्णयाचा फायदा स्टील बनवणाऱ्या उद्योगांना आणी ज्या बँकांचे स्टील सेक्टरअध्ये NPA आहेत अशा बंकाना होईल उदा :- OBC, युनियन बँक
  • कर्नाटक राज्य सरकारने सिनेमाच्या तिकिटावर जास्तीत् जास्त Rs २०० ची मर्यादा घातली.
  • मंत्रिमंडळाने NPA चा प्रश्न सोडवण्यासाठी तयार केलेल्या योजनेला माननीय राष्ट्रपतींनी समती दिली.या योजनेअंतर्गत बँकिंग रेग्युलेशन ACTच्या कलम ३५ A A आणी A B मध्ये सुधारणा केली जाईल. RBI बँकांना १ किंवा अधिक कमिटीज नेमून NPAच्या बाबतीत सल्ला देईल. सरकारने BANKRUPTCY CODE जारी केले.
  • स्पेनडेक्स घाग्यांवर ANTI DUMPING ड्युटी बसवली.
  • मंत्रिमंडळाने ITDCच्या मालकीच्या भरतपूर, भोपाळ, आणी गुवाहाटी येथील हॉटेल्स त्या त्या राज्य सरकारांना विकण्याचा निर्णय घेतला

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • HEINEKEN ही डच कंपनी विजय मल्ल्याने गहाण ठेवलेले युनायटेड स्पिरीट या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा विचार करत आहे.
  • टाटा कॉफी ही कंपनी Rs ३०० कोटी खर्च करून व्हिएतनाममध्ये एक युनिट सुरु करणार आहे.
  • आर्सेलर मित्तल ही कंपनी SAIL बरोबर JV करून ऑटो ग्रेड स्टील प्लांट लावणार आहे.
  • CIMMCO कंपनी आता TRACTOR बनवणार आहे.
  • I G पेट्रोकेमिकल्स, D-MART, मेरिको, फेडरल बँक, यांचे निकाल चांगले आले.
  • ICICI बँक आणी HDFC चे निकाल ठीक होते. बँक ऑफ महाराष्ट् या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेचा निकाल सगळ्याच परिमाणात असमाधानकारक म्हणावा लागेल.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • बांधकाम क्षेत्रातील सरकारची १००% सबसिडीअरी मिनिरत्न HUDCO ( HOUSING AND URBAN DEVELOPMENT CORPORATION) आपला Rs १२०० कोटींचा IPO ८ मे ते ११ मे २०१७ या काळात Rs ५६ ते Rs ६० या प्राईस बंद मध्ये आणत आहे. यात किरकोळ अर्जदारांना Rs २ सूट  दिली जाईल. मिनिमम लोंट २०० शेअर्सचा असेल ही कंपनी हौसिंग आणी इन्फ्रा प्रोजेक्टसाठी कर्ज देते. यांचे लोन बुक Rs ३६३८६ कोटी असून यात हौसिंग आणी इन्फ्रा यांचे प्रमाण ३७% आणी ६३% आहे. सरकार आपला या कंपनीतील १०.२ % स्टेक विकत आहे. वाढत्या इन्फ्रा आणी हौसिंग क्षेत्रातील सरकारी गुंतवणुकीचा फायदा या कंपनीला होईल.
  • IRB इंफ्राच्या InVIT ईश्युला चांगला प्रतिसाद मिळाला. हा इशू ३.३ वेळेला ओव्हरसबस्क्राईब झाला. आता हे InVIT हा काय नवीन प्रकार आहे ते पाहू. InVIT म्हणजेच ‘INFRASTRUCTURE INVESTMENT ट्रस्ट’. हा म्युच्युअल फंडाचा एक नवा अवतार आहे. यावर SEBI चे नियंत्रण असते. रिअल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची ही INFRASTRUCTURE शी संबंधीत अशी सुधारीत आवृती आहे. याचे दोन प्रकार आहेत (१) पूर्ण झालेल्या आणी उत्पन्न मिळवणार्या प्रोजेक्टमधील गुंतवणूक (२) पूर्ण झालेल्या किंवा अपूर्ण असलेल्या प्रोजेक्टमधील गुंतवणूक. (FLEXIBILITY) InVIT STOCK एक्स्चेंज वर लिस्ट केली जातात. ASSETSची VALUE कमीतकमी Rs ५०० कोटी असावी आणी इशू साईझ Rs २५० कोटी हवी. सेबीने मिनिमम सबस्क्रिप्शन Rs १० लाख आणी ट्रेडिंग लॉट Rs ५ लाखाचा ठरवला आहे. ज्यांना १० ते १५ वर्षासाठी STEADY ANNUITY इन्कम पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही योजना सोयीची आहे. या योजनेत बरेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट InVIT ला ट्रान्स्फर केलेले असल्यामुळे एखादा प्रोजेक्ट बंद पडला म्हणून काळजी नसते बरेच प्रोजेक्ट्स असल्यामुळे रिस्क डायव्हरसीफाय होतो. इक्विटी बेस्ड इन्व्हेस्टमेंट असल्याने उत्पन्नाची किंवा घातलेल्या भांडवलाची हमी नाही. पण तुम्ही तुमच्या InVIT वरील इन्कम कमी  आहे असे आढळले तर यातून EXITLOAD न भरता EXIT घेऊ शकता. यावर साधारणतः ९.५% ते १०% रिटर्न मिळेल असे गृहीत धरले जाते.पण प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली तर युनिट धारकालाही अधिक पैसे मिळू शकतात जर प्रोजेक्टमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज अभ्यास करून येत नसेल तर InVIT च्या वाटेला न गेलेले बरे !
  • रिलायंस इंफ्राने InVIT साठी DRHP सेबीकडे फाईल केले.
  • कोल इंडियाचे लंडन STOCK एक्स्चेंज वर लिस्टिंग केले जाणार आहे.
  • S CHAND या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग ९ मी २०१७ रोजी होईल.

कॉर्पोरेट एक्शन

  • S H केळकर या कंपनीने BUY BACK OF शेअर्स वर विचार करण्यासाठी १२ मी रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
  • ICICI बँकेने १:१० तर किटेक्स गारमेंट या कंपनीने १:५ या प्रमाणात बोनस दिला.

मार्केटने काय शिकवले

सध्या लोकांना पैसे गुंतवण्यासाठी फारसे चांगले पर्याय उपलब्ध नाहीत. बॅंका आपल्या मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरात सतत कपात  करत आहेत. शेअर मार्केट तेजीत आहे ६ महिन्यासाठी दिलेले टार्गेट २ महिन्यात पूर्ण होत आहे. पण जागतिक पातळीवर येऊ घातलेले धोके, पावसाची अनिश्चितता आणी GST मुळे  उद्योग जगतातील बदलणारे हिशोब हे धोके दिसत आहेत. त्यामुळे फार काळ वाट न बघता ‘शुभस्य शीघ्रम’ या पद्धतीने दिसत असलेले प्रॉफीट घरी आणावे. म्हणजे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९८३१ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ९२७५ वर बंद झाला.

 

 

आठवड्याचे समालोचन – IPL शेअरमार्केटचे – २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेअरमार्केट म्हणजे क्रिकेटसारखा खेळच. मार्केटमध्ये असणारी अनिश्चितता, मिळणारा पैसा, वैभव, प्रसिद्धी, लोकांना मार्केटचे असणारे आकर्षण, अनेक प्रकारचे किस्से, आकडेवारी या सगळ्यांची तुलना क्रिकेट या खेळाशी करावीशी वाटते. जसे क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट, वन डे, २०-२०, आणी IPL असे प्रकार असतात तसेच मार्केटमध्ये लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, इंट्राडे असे प्रकार असतात. IPL मध्ये जसे आपणाला नवनवीन खेळाडू (ज्यांनी कधी भारताचे प्रतिनिधित्व केलेले नसते) मैदान गाजवताना दिसतात. त्याच पद्धतीने ट्रेडर्स सध्या दुर्लक्षित पण चांगले शेअर शोधत आहेत त्यामुळे रोज जुन्याच शेअर्सची नव्याने ओळख होत आहे. नवे शेअर्स लोकांच्या दृष्टीपथात येत आहेत. यातील कित्येक शेअर्स IPL मधील खेळाडूंच्या विक्रमासारखे रोज ऑल टाईम हाय किमती नोंदवत आहेत. सेन्सेक्सने ३०००० तर निफ्टीने ९३०० पार केले. US $ चा प्रचंड ओघ FDI स्वरूपात येत आहे. त्यामुळे रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर आज दोन वर्षाच्या हायवर आहे. RBI ला हा विनिमय दर कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागत आहे. सर्वत्र BJP ला बहुमत मिळत असल्यामुळे भारतातील राजकीय स्थैर्य वाढत आहे, सरकार आता पुन्हा  नव्या जोमाने आणी नवे नवे रीफोर्म्स आणण्याचा प्रयत्न करेल असे वाटते. प्रगतीच्या मार्गातले सर्व अडथळे दूर झालेले दिसतात.

जणू काही वर वर जाणारे मार्केट हे स्वप्नवत आहे असे भासत आहे. पण तुम्ही मात्र स्वप्नातून वेळेवर जागे व्हा. वास्तवातच रहा आणी या स्वप्नाची वास्तवात राहून मजा चाखा, फायदा घ्या, संपन्न आणी समृद्ध व्हा.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी USA च्या विविध करांच्या दरात कपात जाहीर केली. यात कॉर्पोरेटस, छोटे बिझिनेस आणी पार्टनरशिप यांना लागू होणारा आयकर ३५% वरून १५% वर आणला जाईल असे घोषित केले. तसेच USA तील कंपन्यांनी परदेशात मिळवलेले उत्पन USA मध्ये करपात्र असणार नाही. व्यक्तीगत उत्पन्नाच्या बाबतीत असलेले आयकराच्या ७ वेगवेगळ्या दरांचे ३ दरात रुपांतर केले, कमाल कराचा दर ३९.६% वरून ३५% वर आणला. तसेच एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असले तर INVESTMENT INCOME TAX  तसेच ESTATE TAX काढून टाकला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा USA मधील सर्व प्रकारच्या उद्योगांवर परिणाम होईल. या प्रकारे ट्रम्प यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेले एक आश्वासन पुरे करण्याचा प्रयत्न केला.

किया मोटर्स ही आंध्र प्रदेशात Rs १२८०० कोटी गुंतवून आपले उत्पादन युनिट सुरु करणार आहे. या युनिटमध्ये २०१९ च्या मध्यापासून ३ लाख कार्सचे उत्पादन केले जाईल.

सरकारी अनौंसमेंट

GST ची सपोर्ट सिस्टीम तयार करण्याचे संपूर्ण काम ITI या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मिळाले.

स्वच्छ भारत सेस, इन्फ्रा सेस, कृषी कल्याण सेस GST मध्ये सामील केले जातील. लक्झरी कर, एन्टरटेनमेंट कर वेगळे लागणार नाहीत. ५ पेट्रोलियम प्रोडक्टस् वर GST  १ वर्षापर्यंत लागू होणार नाही. याबाबतीत ५ वर्षानंतर रिव्ह्यू केला जाईल.

सरकारने असे जाहीर केले की सर्व डॉक्टर्सनी जनरिक औषधे आपल्या रुग्णांना घ्यावयास सांगावी. एकाच प्रकारच्या औषधाला निरनिराळ्या कंपन्या त्यांच्या ब्रांड VALUE साठी निरनिराळ्या किमती आकारत आहेत असे आढळले. त्याला प्रतिबंध बसेल. औषधे स्वस्त होतील असा सरकारचा होरा आहे.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • सेबीने कमोडीटी मार्केटमध्ये ऑप्शन contractसाठी मंजुरी दिली.
  • Rs १०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा IPO कंपनी आणत असेल तर IPO द्वारा उभारण्यात आलेल्या रकमेचा उपयोग कसा केला जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मॉनिटरिंग एजन्सी नेमावी लागेल असे सेबीने सांगितले.
  • अनिवासी भारतीय आणी त्यांच्या मालकीच्या संस्थांना पार्टीसिपेटरी नोतेस विकत घेण्यास सेबीने प्रतिबंध केला आहे.
  • ब्रोकरच्या इक्विटी आणी कमोडीटी असलेल्या दोन्ही विभागांना एकत्र करण्याची परवानगी दिली.
  • E WALLETS द्वारा म्युच्युअल फंडामध्ये प्रतिदिवशी Rs ५०००० पर्यंत गुंतवणूक करण्यास सेबीने परवानगी दिली.
  • सेबीने कमोडीटी मार्केटमधील ५ ब्रोकर्सना गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली.
  • NPPA (NATIONAL PHARMACEUTICAL PRICING AUTHORITY) ने ABBOT आणी मेड्ट्रोनिक्स या कंपन्यांना आपले ‘STENTS’ बाजारातून काढून घ्यावयास परवानगी नाकारली. त्या ऐवजी किमतीत काही बदल करता येतो का हे पाहण्याची सुचना केली.
  • जुबिलींयंट लाईफच्या गाजरौला येथील आणी अन्य १३ प्लांटमध्ये काम बंद करायला NGT( NATIONAL GREEN TRIBUNAL) ने सांगितले. या प्लांट्समध्ये फूड प्रोडक्ट्स तयार केली जात होती.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ADVANCE ENZYME या कंपनीने मलेशियातील पाम ऑईल क्षेत्रातील आणी भारतातील डिझेल क्षेत्रातील कंपनी घेतली.
  • बायोकॉन आणी मायलॉन या दोन्ही कंपन्या रक्ताच्या कर्करोगावर औषध बनवत आहेत हे कळताच ROCHE या कंपनीने हरकत घेतली होती. परंतु याचा निकाल बायोकॉनच्या बाजूने लागला.
  • टाटा मोटर्स या कंपनीला भारतीय सेनेकडून ३१९२ सफारी गाड्यांची ऑर्डर मिळाली.
  • IGL (इंद्रप्रस्थ GAS) या कंपनीने FPI ची सीमा २४% वरून ३०% केली.
  • प्रिझम सिमेंट या कंपनीला लाईमस्टोन मायनिंगची ५० वर्षांसाठी लीज दिली.
  • सन टी व्ही ने मलयालम टी व्ही वाहिनी ‘सूर्या कॉमेडी’ सुरु केली.
  • बाहुबली २ हा सिनेमा ७००० स्क्रीनवर रिलीज होणार आहे.याचा फायदा UFO मूव्हीज, मुक्ता आर्ट्स, PVR, INOX लीजर या कंपन्याना होईल.
  • मार्कसंस फार्मा या कंपनीच्या गोवा प्लांटच्या निरीक्षणात USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.
  • स्ट्राईड शसून या कंपनीच्या कुददालोर प्लांट च्या निरीक्षणात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.
  • भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला बांगलादेशकडून १३२० MW थर्मल पॉवर स्टेशनचे Rs १०००० कोटींचे काम मिळाले.
  • ल्युपिनला गोवा प्लांटसाठी VAI ( VOLUNTARY ACTION INDICATER) मिळाला म्हणजे प्युपिंनने सुधारणा केली आहे आता USFDA रेग्युलेटरी कारवाई करणार नाही.
  • सरकार ३ स्टेपमध्ये बँकात भांडवल घालणार आहे. पहिल्या चरणात Rs २५०० कोटी, नोव्हेंबर आणी फेब्रुवारीत Rs ५००० कोटी घालणार आहे.
  • टाटा डोकोमो यांच्यातील वाद मिटवण्यासाठी केलेल्या कराराला सरकारने मान्यता दिली. RBI ने घेतलेल्या हरकती नामंजूर केल्या.
  • फेडरल बँक, इंडियन बँक, HDFC BANK, येस BANK, लक्ष्मी विलास बँक, कोटक महिंद्र बँक, कॅनफिना होम्स, विप्रो, M M. फायनांसियल, LIC हौसिंग, इंडिया बुल्स हौसिंग, GIC हौसिंग, IDFC बँक, हाटसन अग्रो यांचे निकाल चांगले आले.
  • रिलायंस इंडस्ट्रीज, हेक्झावेअर, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, मोतीलाल ओसवाल, बंधन बँक यांचेही निकाल चांगले आले.

कॉर्पोरेट एक्शन

  • बायोकॉन या कंपनीने २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले. तुमच्याजवळ १ शेअर असेल तर तुम्हाला २ बोनस शेअर्स मिळतील. तसेच Rs ३ लाभांश जाहीर केला.
  • रिलायंस कॅपिटलमधून रिलायंस होमचे डीमर्जर होणार आहे. रिलायंस कॅपिटलचा १ शेअर असेल तर रिलायंस होम चा १ शेअर मिळेल. रिलायंस होमचे वेगळे लिस्टिंग होईल.
  • केर्न इंडिया आणी वेदांताचे मर्जर या आठवड्यात पूर्ण झाले. त्यामुळे आता केर्न इंडिया मध्ये ट्रेडिंग होणार नाही.
  • न्युक्लीअस सॉफटवेअर ही कंपनी Rs ३५० प्रती शेअर या दराने शेअर BUY BACK करणार आहे. यासाठी कंपनी Rs ११७.७९ कोटी खर्च करणार आहे.
  • पोकर्ण या कंपनीची STOCK SPLIT वर विचार करण्यासाठी ८ मे रोजी बैठक आहे.
  • विप्रो या कंपनीने १:१ बोनस शेअरची घोषणा केली.
  • इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स ने Rs ३६ प्रती शेअर तर CEAT या कंपनीने Rs ११.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

नजीकच्या काळात येणारे IPO

  • या आठवड्यात S चांद या कंपनीचा IPO २८ एप्रिल रोजी बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
  • हुडको या सार्वजनिक क्षेत्रातील घरबांधणी क्षेत्रात असलेल्या सरकारी कंपनीचा IPO ८ मे २०१७ ते ११ मे २०१७ या काळात येईल या IPO ची साईझ Rs २० कोटी असून प्राईस BAND Rs ५६ ते Rs ६० असेल.
  • IRB इन्फ्रा या कंपनीने InVit चा इशू ३ मे २०१७ पासून ५ मे २०१७ पर्यंत उघडेल असं सांगितलं. प्राईस band Rs १०० ते Rs १०२ राहील.

मार्केटने काय शिकवले

सध्या जागतिक पातळीवर ताणतणावाचे वातावरण आहे. मार्केट सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे STOCK स्पेसिफिक राहावे. जर शेअर स्वस्तात खरेदी केले असतील तर भांडवल आणी थोडा फायदा मिळेल एवढे शेअर्स विकावेत आणी बाकीच्या शेअर्ससाठी TRAILING  STOPLOSS लावावा आणी त्याचे पालन करावे. मार्केट पडू लागताच पूर्ण गुंतवणूक काढून घ्यावी.

शुक्रवारच्या मार्केटचे निरीक्षण केले असता असे आढळले की खाजगी बँकांचे शेअर्स पडत होते पण राष्ट्रीयकृत सरकारी बँकांचे शेअर मात्र वाढत होते. असे का बरे? सरकार सतत या बँकामध्ये कोट्यावधी रुपयांचे भांडवल घालत आहे, NPA अकौंटचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदे करण्यापासून ते निरनिराळ्या कायद्यात सुधारणा करण्यापासून, ते थेट NPA  झालेल्या कंपन्या दुसऱ्या चांगल्या कंपन्यांमध्ये मर्ज करण्यापासून ते आजारी बँकांचे दुसर्या चांगल्या बँकात मर्जर करण्यापर्यंत सर्व पातळीवर सर्वंकष प्रयत्न करत आहे. हे सर्व प्रयत्न फलदायी ठरतील असे गुंतवणूकदारांना वाटते आहे. जर इंडियन बँकेच्या निकालांसारखे चांगले निकाल आले तर हे प्रयत्न फलदायी होत आहेत असा निष्कर्ष काढता येईल का? जर असा निष्कर्ष बरोबर असला तर महाग असलेले खाजगी बँकांचे शेअर विकून स्वस्त असलेले राष्ट्रीयीकृत सरकारी बँकाचे शेअर घ्यावेत का?  अशी निरीक्षणाची दिशा ठेवली पाहिजे. मार्केटचे निरीक्षण करणे म्हणजेच काय घडत आहे ? का घडत आहे आणी किती वेगाने घडत आहे? याची कारणे शोधणे होय.

मार्केट पडणे किंवा वाढणे नैसर्गिक आहे. जसे क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू कधी खेळेल आणी सामन्याचा रंग बदलेल ते सांगता येत नाही. किंवा एखाद्या खेळाडूचा ‘BAD PATCH’ सुरु असतो खेळाडू चांगला असला तरी काही काळ चांगला खेळ करू शकत नाही. असे ‘BAD PATCH’असलेले चांगले शेअर शोधण्याचे काम करावे लागेल असाच रागरंग आहे. तुम्हाला असे काही जमते का ते पहा! निरीक्षणाने शक्य होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २९९१८ वर आणि NSE निर्देशांक निफ्टी ९३०४ वर बंद झाला.