Tag Archives: weekly market analysis in marathi

आजचं मार्केट – २० जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जून २०१८

आज विदेशी बाजार सुधारल्यामुळे स्थानिक शेअरमार्केटमध्येही तेजी आली. आज बुल्स नी चांगलीच मुसंडी मारली. स्वतःचा मार्केटवरील ताबा सुटू दिला नाही. मार्केट थोडे पडले तरी खरेदी होत होती. आणि दिवसअखेरी पर्यंत  तेजीचा किल्ला लढवला. यामुळे बुलिश हरामी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला. १९ जून २०१८ ची कँडल मोठी पण मंदीची होती पण आजची कँडल मात्र तेजीची आणि कालच्या कँडलमध्ये मावणारी अशी होती. हरामी याचा अर्थ जापनीज भाषेत गरोदर स्त्री असा होतो. हा रिव्हर्सल पॅटर्न आहे.   
आता ट्रेंड वॉरमध्ये यूरोपीय देशही सामील झाले.  USA मधून आयात होणाऱ्या युरो २००० बिलियन किमतीच्या मालावर आपण ड्युटी लावू असे त्यांनी  जाहीर केले.
या वर्षभरात सरकार MMTC (१०%), NHPC (१०% ), NTPC (५%), कोल इंडिया (५%) या प्रमाणे विनिवेश करेल.  IPO विषयीच्या नियमात बदल करण्यावर विचार विनिमय करण्यासाठी उद्या सेबीची बैठक आहे. वेदांताने तुतिकोरिन येथील प्लांटवरील  बंदी उठवण्यासाठी मद्रास हायकोर्टात अर्ज दिला. कोर्टाने २५ जून २०१८ रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे. सिप्ला या कंपनीच्या HIV वरील औषधासाठी मंजुरी मिळाली.
सरकारने इंटरनेट टेलिफोनीला मंजुरी दिली. आणि टेलिकॉम कंपन्यांना सरकारने जरुरी आदेश दिले आहेत.  टेलिकॉम कंपन्यां एप्सच्या सहाय्याने टेलिफोनी सेवा देतील. यामुळे आता तुम्हाला  सिमकार्ड शिवाय कॉल करता येतात.
ज्वेलरी क्षेत्रात हॉलमार्किंग सक्तीचे केले. यासाठी सरकारने ज्वेलर्सना सहा महिने ते एक वर्ष मुदत दिली आहे.
एव्हिएशन सेक्टर मध्ये गेल्या  मे  महिन्यात  गेल्या चार वर्षातील किमान संख्येपेक्षा प्रवाश्याची संख्या कमी होती. इंडिगोचा मार्केट शेअर  ४०.९% झाला. येत्या डिसेंबरपर्यंत १४ विमानतळ उडाण योजनेअंतर्गत तयार केले जातील.
पॉवर सेक्टरमधील NPA वर विचार करण्यासाठी DFS ने संबंधित पार्टिजची बैठक बोलावली आहे. यात ऊर्जा मंत्रालय, PFC, REC, पॉवर कंपन्या आणि त्यांना कर्ज देणार्या बँकांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील.
सरकारने पब्लिक प्रॉक्युअरमेंट योजनेखाली संरक्षण खात्यासकट सर्व खात्यांना स्थानिक लेदर प्रोडक्टसचा समावेश करण्यासाठी आदेश दिले आहेत. पादत्राणांमध्ये ७०% तर लेदर वस्त्रप्रावरणा मध्ये ६०% स्थानिक लेदर प्रोडक्टस खरेदी करावेत असे आदेश दिले. या सरकारच्या निर्णयामुळे बाटा, खादिम’s, तसेच मिर्जा इंटरनॅशनल या शेअर्स वर अनुकूल परिणाम झाला.
BOSCH ही कंपनी येत्या ३ वर्षात Rs  ७०० कोटींची गुंतवणूक करेल. JSW स्टिल्स च्या प्रमोटर्सनी आज ३२ लाख शेअर्स गहाण ठेवले.
ज्या ४८३८ कंपन्यांच्या कर्ज घेण्यावर मर्यादा घालण्यात आली होती त्या कंपन्यांना आता सरकार काही सवलती देण्याचा विचार करत आहे. आजच्या मार्केटचे अवलोकन करताना बुल्सची सरशी झाली असे आढळते. हरामी पॅटर्न बघताना ट्रेंड बदलला पाहिजे असे वाटते. पण मूलभूत काही बदल झाले तर काही सांगता येत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५४७ वर  NSE  निर्देशांक निफ्टी १०७७२ वर तर बँक निफ्टी २६५५७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

आजचं मार्केट – १९ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ जून २०१८

सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी जो ओपनिंग ट्रेड झाला तोच  इंट्राडे हाय होता. त्यानंतर दिवसभर मार्केट पडतच राहिले. मार्केटने निफ्टी १०७०० चा स्तर  गाठला. या मध्ये सुधारणा होण्याची शक्यता धूसर आहे. बेअरीश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला.
USA  आणि चीन मधील ट्रेंड वॉर अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करू लागले आहे. USA  चे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन मधून आयात होणाऱ्या US $ २०० अब्ज  किमतीच्या मालावर  १०% अतिरिक्त ड्युटी लावण्याची घोषणा केली. याचा परिणाम म्हणजे चीनमध्ये रबराच्या किमती ७% कोसळल्या तर बेस मेटल २.५% पडले. त्यामुळे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केटवर दिसून आला. रुपया आणखी कमजोर झाला. US $१=Rs ६८.३८  इतका रुपयांचा डॉलर बरोबर विनिमयाचा दर झाला.
सरकार ऑइल इंडिया मधील १०% हिस्सेदारी  विकून Rs २४५० कोटी गोळा करण्याच्या विचारात आहे. सार्वजनिक  क्षेत्रातील सरकारी बँकांबरोबर अर्थमंत्र्याची आज महत्वाची बैठक होती. यात क्रेडिट विशेषतः SME आणि इतर प्रायोरिटी सेक्टर मधील क्रेडिट कसे वाढवता येईल यावर विचार  होणार होता. सरकारी बँकांपैकी ११ बँका RBI च्या PCA खाली असल्यामुळे त्यांच्यावर बरीच बंधने आहेत.
TCS या कंपनीच्या BUY बॅक मध्ये किरकोळ शेअर होल्डर म्हणून भाग घ्यायचा असेल तर आपल्याजवळ ९५ किंवा त्यापेक्षा कमी शेअर्स पाहिजेत. या BUY बॅक मध्ये एका PAN  नंबरवर  BUY BACK साठी  एकच अर्ज करता येईल.
गोवा कार्बनने आपला पारादीप प्लांट बंद ठेवण्याची मुदत वाढवली.
वेदांताने असे जाहीर केले की त्यांच्या तानजीगढ प्लांट मध्ये पूर्ववत  उत्पादन सुरु झाले. टाटा पॉवर आणि IDBI  बँक यांच्यात ऑटोमेटेड बिल पेमेंटसाठी करार झाला. मेटने जाहीर केले की २३ जून ते २५ जून २०१८ पर्यंत मान्सून बिहार आणि झारखंड मध्ये दस्तक  देईल. व्हील्स इंडिया या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २२ जून रोजी बोलावली आहे. यात बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार होईल.
२० जून ते २२ जून २०१८ या दरम्यान RITES( Rs ६ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूट) आणि फाईन ऑरगॅनिक केमिकल्स यांचे IPO ओपन राहतील. भारत २२ ETF चा इशूही  किरकोळ  गुंतवणूकदारांसाठी ओपन होईल. यात २.५% डिस्काउंट असेल. VARROC इंजिनीरिंग या ऑटो अँसिलरी क्षेत्रात असणाऱ्या कंपनीचा US $ २८८ मिलियनचा IPO (याचा प्राईस बँड Rs ९६५ Rs ९६७ आहे) येत आहे. हा IPO २६ जून २०१८ पासून ओपन होईल. या आठवड्यात IPO ची धमाल आहे. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२८६ NSE  निर्देशांक निफ्टी १०७१० आणि बँक निफ्टी २६२६५ वर बंद झा

 

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १८ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ जून  २०१८

USA आणि चीन यांच्या मध्ये जणू काही महा ट्रेड वॉर सुरु झाले आहे. स्वतःची इच्छा असो वा नसो बाकीचे देशही यात गुरफटले जाणार आहेत. भारतही यापासून अलग राहू शकला नाही. त्यांने USA मधून येणार्या हाय रेंज मोटार सायकल, बदाम आदी सुक्या मेव्यावरील ड्युटी वाढवली.  ट्रेड वॉर मुळे  तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होईल.
Dr रेड्डीजच्या २ जनरिक औषधांवर USA मध्ये निर्बंध लावले. OPEC देश २० आणि २१जून २०१८ रोजी व्हिएन्नामध्ये ७ वे आंतरराष्ट्रीय सेमिनार घेणार आहे. या सेमिनारमध्ये क्रूडचे  उत्पादन वाढवण्याचा निर्णय होईल अशा अपेक्षेने आज क्रूडचे दर घटले. याचा परिणाम HPCL, BPCL, IOC या ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर झाला.
अडाणी एंटरप्रायझेस  मधून डीमर्ज झालेली अडाणी ग्रीन या कंपनीचे लिस्टिंग आज Rs ३० ला झाले. १००० अडाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स असतील तर तुम्हाला ७६१ शेअर्स अदानी ग्रीन एनर्जीचे मिळाले. या हिशोबानुसार Rs २५ ला लिस्टिंग व्हायला पाहिजे होते. हा शेअर NSE वर  कमाल Rs ३१.५०  च्या भावाला गेला होता.
DCM श्रीराम या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ५५ लाख शेअर्स Rs ४५० प्रती शेअर्स या भावाने BUY BACK करेल अशी घोषणा केली. RITES ( रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिकल सर्व्हिसेस) हा IPO  २० जून ते २२जून २०१८ या काळात ओपन राहील. प्राईस बँड  Rs १८० ते Rs १८५ ( दर्शनी किंमत Rs  १०) असेल. लॉट साईझ ८०ची असेल.
फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्री ही ४८ वर्ष जुनी कंपनी  Rs  ६०० कोटींचा IPO आणत  असून प्राईस बँड Rs ७८० ते Rs  ७८३ असून मिनिमम लॉट १९ शेअर चा आहे. ही कंपनी स्पेशालिटी केमिकल्सच्या उद्योगात आहे. कंपनीच्या विक्रिपैकी ६५% विक्री परदेशात आहे. कंपनी आता आपल्या विविध प्लांटचा विस्तार तसेच परदेशी कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर करत आहे.
सरकार कोल  इंडियामधील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मेटने  सांगितले की २४ जून २०१८ पासून मान्सून जोर पकडेल. स्पाईसजेट ने १४ नवीन घरगुती उड्डाणाची घोषणा केली. प्रीकोल या कंपनीच्या हरिभक्ती आणि कंपनी या स्टॅटयूटरी ऑडिटर्सनी आपला वार्षिक ऑडिट रिपोर्ट सादर केल्यावर राजीनामा दिला आहे.
लोकांनी पावसाळ्यासाठी चप्पल, बूट, यांची खरेदी पुष्कळ केलेली दिसत आहे. त्यामुळे आज पादत्राणांशी संबंधित BATA, रिलॅक्सो, लिबर्टी, खादिम’स हे शेअर वाढले. ब्ल्यू डार्ट, फ्युचर सप्लाय चेन, महिंद्रा लॉजिस्टिक्स हे लॉजिस्टिक  क्षेत्रातील शेअर्स वाढले.
ICICI बँकेच्या टॉप मॅनेजमेंट मध्ये बरेच मोठे बदल होत आहेत अशी बातमी आल्यामुळे ICICI बँक वाढली.
या आठवड्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही त्याचप्रमाणे हा पूर्ण आठवडा क्रिटिकल असेल असे वाटते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५४८ NSE निर्देशांक निफ्टी १०७९९ बँक निफ्टी २६४०९  वर बंद झाले.

 

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १४ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ जून २०१८

आजचा दिवस इन्फोसिसच्या नावाने इतिहासात कोरला गेला. इन्फोसिसचे स्टॉकएक्स्चेंज वर लिस्टिंग होऊन २५ वर्षे झाली. फेब्रुवारी १९९३ मध्ये इन्फोसिसचा IPO आला होता. तेव्हा त्याची किंमत Rs ९५ प्रती शेअर होती. १९९९ मध्ये शेअरचे विभाजन झाले. यानंतर ७ वेळेला बोनस दिला. ज्यांच्या जवळ एक शेअर होता त्याचे ३८४ शेअर्स झाले. ज्यांनी त्यावेळेला Rs ९५०० गुंतवले किंवा १००शेअर्स खरेदी केले त्यांची गुंतवणूक आज Rs ५ कोटीपर्यंत वाढली. इन्फोसिसने सामान्य माणसाला शेअरमार्केट विषयी विश्वास उत्पन्न करून शेअरमार्केट कडे आकर्षित केले.

आज फिफा वर्ड कप रशियामध्ये सुरु होत आहे. त्यामुळे COX AND KINGS आणि थॉमस कूक या शेअरकडे लक्ष दिले पाहिजे. फेडने अंदाजाप्रमाणे ०.२५% रेट वाढवला. म्हणजेच पूर्वी १.७५% होता तो आता २% झाला. ग्रोथ २.८% आणि महागाई २% राहील असा फेडचा अंदाज आहे.एका दृष्टीने व्याज दर वाढणे हे त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रगतीचे दर्शक असते.

ECB ने आपले व्याजाचे दर कायम ठेवले आणि बॉण्ड खरेदी डिसेंबर २०१८ पर्यंत बंद करू असे सांगितले. ICICI बँक आपली ICICI प्रु मधील ८०% हिस्सेदारी आहे यापैकी २% हिस्सेदारी OFS च्या माध्यमातून विकणार आहे. ही OFS २ दिवस चालू राहील. अशावेळी ICICI बँक खरेदी करणे आणि ICICI PRU विकणे असा PAIR ट्रेंड होऊ शकतो. ICICI बँकेने पुंज लॉईड विरुद्ध इंसॉल्वन्सीची याचिका NCLT मध्ये दाखल केली. ओबेरॉय रिएलिटी आणि हिंदुस्थान कॉपर QIP इशू आणत आहेत.

जागरण प्रकाशनची आज ‘शेअर BUY BACK ‘ साठी एक्स डेट होती ( OFS QIP शेअर BUY BACK आणि इतर कॉर्पोरेट एक्शन यांच्या विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे ) रबराच्या किमती ५% ने कमी झाल्या आहेत. पुढील पंधरा दिवसात आणखी ५% कमी होतील ही गोष्ट टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर आहे.

HDFC बँकेची विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ७४% केली.Rs २४००० कोटींच्या विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाली.
मारुतीने डिझेल गाड्या विकणे बंद करायचे ठरवले आहे. रिलायन्स पॉवर ने ७% पेक्षा जास्त शेअर्स तारण ठेवले.
हिंदुजा LEYLAND फायनांस या अशोक लेलँड ग्रुपच्या कंपनीने Rs ५०० कोटींचा IPO आणण्याचे ठरवले आहे. अशोक LEYLAND चा या कंपनीमध्ये ६२% हिस्सा आहे. टाटा स्टीलने युरोपमध्ये पास्को बरोबर करार केला. कन्साई नेरोलॅकच्या गुजरात प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले. मान इंडस्ट्रीज त्यांचा मरिनो सेंटर PVT LTD मधला स्टेक विकणार आहेत.

WPI मे २०१८ चा ४.४३% ( एप्रिल २०१८ मधील ३.१८ वरून वाढला ) यावेळी WPI च्या सर्व पोट निर्देशांकात वाढ झाली.
मार्केट प्रत्येक धक्का पचवते आहे. थोडीशी नाराजी दाखवते आहे. २ पाऊले मागे ४ पाऊले पुढे अशा रीतींने मार्केट पुढे वाटचाल करत आहे. आता बँक ऑफ जपान काय करते हे पाहू या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५९९ NSE निर्देशांक निफ्टी १०८०८ आणि बँक निफ्टी २६५६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १३ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ जून २०१८
मार्केट आज फेडच्या निर्णयाची वाट बघत होते . मार्केटमध्ये आज थकावटही जाणवत होती. महागाई वाढली होती. पण ग्रोथ समाधानकारक होती. आज मार्केट बरेचसे  दोलायमान होते.
पेज इंडस्ट्रीजने जॉकी या कंपनीबरोबरचा करार वाढवला. भारत २२ ETF चा फॉलो- ऑन- इशू  येणार आहे. यावेळी एक्सिस बँक, ITC, लार्सन अँड टुब्रो यातील सरकारचा हिस्सा विकला जाणार आहे. १९ तारखेला अँकर इन्व्हेस्टरसाठी हा इशू  ओपन आहे. २० जून २०१८ ते २२ जून २०१८ हे तीन दिवस इतरांसाठी ओपन राहील. या इशूद्वारे सरकारला Rs ६००० कोटी  मिळतील. BPCL आणि पॉवर ग्रीडमध्ये एल आय सी ने स्टेक  वाढवला. EIH  मधील पोझिशन एल आय सी ने कमी केली.
TCS ने पुन्हा एकदा १५ जून २०१८ ला ‘शेअर BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे. BUY BACK वर Rs १०००० ते Rs १५००० कोटी  खर्च करेल. BUY BACK ऑफ शेअर्सविषयी माझ्या ब्लॉगवर आणि  ‘ मार्केट आणि मी’  या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. रिलायन्स जिओने  पुन्हा एक ऑफर आणली. स्पर्धा जास्त तीव्र  झाली. याचा नकारात्मक परिणाम आयडिया आणि  भारती एअरटेलवर  झाला.
आज फेड, उद्या युरोपियन बँक आणि बंक ऑफ जपान या तीन सेंट्रल बँका आपली वित्तीय पॉलिसी जाहीर करतील .
अदानी एंटरप्राईझेसनी रुची सोयासाठी  Rs ६००० कोटीची बोली लावली. जय बालाजी वर SBI चे Rs ९०० कोटींचे कर्ज आहे. SBI ने कंपनीविरुद्ध इंसॉल्व्हंसी याचिका जाहीर केली. फेड ०.२५% दर वाढवील हे मार्केटने एक्सेप्ट केले आहे. यापेक्षा जास्त दर वाढले किंवा दर वाढलेच नाहीत  तर मार्केट वर परिणाम होईल..
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७४९ NSE निर्देशांक निफ्टी १०८५६  बँक निफ्टी २६६४२ वर बंद झाले

 

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ७ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ जून २०१८

आजच्या तेजीचा हिरो सर्किट फिल्टर आणि त्यात केलेले बदल होते.

आज ४४७ शेअर्सचे सर्किट फिल्टर वाढवले. FACT आणि मद्रास फर्टिलायझर्सचे सर्किट १०% वरून २०% केले. थंगमायल ज्युवेलरी आणि HOV यांचे सर्किट १०% वरून २०% केले. चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे सर्किट वाढवले उदा :- जयश्री टी, हॅरिसन मलायलम. मिश्र धातू निगम आणि फिलिप्स कार्बन यांचे सर्किट ५% वरून २०% केले.

ASM च्या अमलाखाली येणाऱ्या शेअर्सची संख्या वाढतच आहे. ASM आणि सर्किट फिल्टर वाढवणार या बातम्या मार्केट मध्ये आधीच माहित झाल्या होत्या अशी तक्रार आहे. सेबीने या बाबतीत चौकशीचे आदेश दिले आहेत

UK रेग्युलेटर्सनी कॅनरा बँकेविरुद्ध मनीलॉन्डरिंगच्या बाबतीत दोषी ठरवून US $ १२ लाख दंड ठोठावला आणि ५ महिनेपर्यंत ठेवी घेण्यास बंदी केली.

महाराष्ट्रातील राज्य सरकार केमिकल फर्टिलायझर्सवर बंदी घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरगॅनिक केमिकल्सवर लक्ष ठेवावे उदा :- टाटा केमिकल्स याचा तोटा तर HOEC ला फायदा होईल. HOEC चे सर्किट १०% चा २०% केले.

TCS आणि इंटेल मिळून पुण्याला एक डेटा अनॅलिटीकल सेंटर चालू करणार आहेत. बाहरीनच्या बँकेने बँकिंग सॉफ्टवेअरसाठी TCS ची निवड केली.

MAX ग्रुप ने IDBI फेडरल इन्शुरन्स या कंपनीला खरेदी करण्यासाठी इच्छा दाखवली. पण काही अटींवर एकमत न झाल्यामुळे हे शक्य झाले नाही.

टाटा मोटर्सची स्थिती सुधारत आहे असे दिसते. १ जूनला आलेले घरगुती विक्रीचे आकडे आणि आज आलेले परदेशातील विक्रीचे आकडे चांगले आले . JLR ची विक्री ६.१% ने वाढली जरी UK आणि USA मध्ये JLR ची विक्री वाढली तरी चीन आणि युरोप मध्ये मात्र कमी झाली

उद्या आठड्याचा शेवटचा दिवस. शुक्रवारी कोणते चित्रपट रिलीज होत आहेत त्या कंपन्यांकडे ट्रेडर्सचे लक्ष असते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४६३ NSE निर्देशांक निफ्टी १०७६८ आणि बँक निफ्टी २६५१७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ६ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ जून २०१८

साखर उत्पादकांसाठी सरकारी पॅकेज मंजूर होणार अशी अनेक दिवस गर्जना चालू होती. कधी मंत्रिमंडळाची बैठक रद्द होत होती तर कधी बैठकीच्या अजेंड्यावर हा विषय नसायचा. आज अखेरीस पॅकेज मंजूर झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने Rs ८००० कोटीचे पॅकेज मंजूर केले. साखरेची किमान किंमत Rs २९ प्रती किलो ठरवली. ३० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकसाठी मंजुरी दिली. यासाठी Rs १२०० कोटींचा फंड स्थापन केला जाईल. इथनॉल ब्लेंडींग साठी परवानगी दिली. साखर उत्पादकांनी इथेनॉलची उत्पादनक्षमता वाढवल्यास त्यांना Rs ४५०० कोटीचे कर्ज मंजूर केले जाईल. इथेनॉलची किंमत प्रती लिटर Rs ६ ते Rs ७ पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. पण बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने साखरेशी संबंधित शेअर्स थोडे वाढले पण नंतर पुन्हा पडले.

RBI ने आपले वित्तीय धोरण जारी केले. यात त्यांनी आपला व्हू ‘न्यूट्रल ‘ ठेवला. RBI ने रेपो रेट ( ६% वरून ६.२५% ) आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये (५.७५% वरून ६%) ०.२५% वाढ केली. CRR ४% आणि SLR १९.५% वर कायम ठेवला. याचाच अर्थ ठेवींवरील आणि कर्जावरील व्याजाचे दर वाढतील. भारताच्या प्रगतीच्या वाढीतील दराचे अनुमान ७.४% कायम ठेवले. पहिल्या सहामाहीत हे अनुमान ७.५% ते ७.६% तर दुसर्या सहामाहीत ७.३% ते ७.४ % ठेवले आहे. RBI ने आपण या दराबद्दल जास्त आश्वस्त नाही असे सांगितले. त्यांनी वाढती महागाई ( ४.९% पहिल्या सहामाहीत आणि ४.७% दुसऱ्या सहामाहीत), क्रूडचे वाढते दर, आंतरराष्ट्रीय जिओपॉलिटिकल ताणतणाव, ट्रेड वार यांच्या विषयी चिंता व्यक्त केली. घरासाठीच्या कर्जाच्या वर्गीकरणात बदल जाहीर केले. बँकांना त्यांचे पहिल्या तिमाहीतील मार्क टू मार्केट लॉसेससाठी वर्षभरात प्रोव्हिजन करण्यास परवानगी दिली.

कॅडीला हेल्थकेअरच्या अहमदाबाद युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली. HCC या कंपनीच्या मॅक्स ग्रुप बरोबरच्या जाईंट व्हेंचरला बांगलादेशात एकूण Rs ७४० कोटींचे न्युक्लीअर प्लांटचे काम मिळाले. यात HCC चा हिस्सा Rs २९५ कोटींचा असेल. इलेक्ट्रो स्टील स्टील या कंपनीने आपल्या कर्जदारांना Rs ७३९९ कोटींचे शेअर्स दिले. औरोबिंदो फार्माच्या मेहबूबनगर प्लांटच्या २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने फॉर्म नंबर ४८३ देऊन तीन त्रुटी दाखवल्या. कॅपिटल १st आणी IDFC बँकेच्या मर्जरला RBI ने मंजुरी दिली. त्याबरोबरच कॅपिटल १st होम फायनान्सच्या कॅपिटल १st मध्ये मर्जरला ही मंजुरी दिली.

बहुतेक उद्या दुपारपर्यंत बँक निफ्टी मध्ये तेजी राहील. कारण १२ जून २०१८ रोजी फेड काय करेल याचा विचार ट्रेडर्स करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१७८ NSE निर्देशांक निफ्टी १०६८४ आणि बँक निफ्टी २६३६७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!